प्रस्थापितांचे सामाजिक भान: भाग २

Primary tabs

सर टोबी's picture
सर टोबी in काथ्याकूट
17 Aug 2019 - 11:40 am
गाभा: 

मागच्या भागात मी प्रस्थापितांची अगदी सोपी व्याख्या सांगितली होती. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा संघर्ष संपला अशी कोणतीही व्यक्ती प्रस्थापित होते. साधन संपत्तीची उपलब्धता, समाज्याला प्रभावित करण्याची क्षमता, व्यवस्थेवर प्रभाव टाकणे किंवा नवीच व्यवस्था उभी करणे याची व्यक्ती परत्वे उपलब्ध असणारी संधी असे या प्रस्थापितांचे वर्णन करता येईल. साहजिकच छोटा अथवा मोठा व्यक्ती समूह किंवा देश जेंव्हा एखाद्या समस्येशी झुंजत असतो तेंव्हा प्रस्थापितांकडे लोक साहजिकच अपेक्षेने बघतात. मी स्वतः तर अशा लोकांकडे आशाळभूतपणे बघत असतो. पण बहुतांशी आपल्याला येणार अनुभव नेमका उलट असतो. एखाद्या आगीच्या ठिकाणी बंब यावा आणि त्यात पाणीच नसावे अशा प्रकारचा, तीव्र स्वरूपाचा निराशाजनक असा तो अनुभव असतो.

खरे तर आपण जितके प्रस्थापित होऊ तितके व्यवस्थेशी आपलं साटंलोटं तयार होतं. माणसं गुळमुळीत बोलतात. यालाच 'पॉलिटिकली करेक्ट असणं' असं नाव देतात. कालच शेखर गुप्तांची यूट्यूबवर एक क्लिप बघत होतो. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या रणनीतीवर बोलताना म्हटलं कि काँग्रेसने स्वतःच्याच बलस्थानांकडे दुर्लक्ष केले. २००८ च्या जगाला मंदीने घेरले परंतु भारतीय अर्थव्यवस्था आघाडीच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत सर्वात कमी झळ बसणारी अर्थव्यवस्था होती. सत्यम कॉम्पुटर्सचा घोटाळाही त्या सरकारने अगदी ललामभूत मानला जावा अशा पद्धतीने हाताळला. त्या तुलनेत सध्याच्या सरकारची मागची टर्म सपशेल अयशस्वी होती. असे असतानाही काँग्रेसने आपल्याच कर्तबगारीकडे दुर्लक्ष केले.

मला हे असे वरातीमागून घोडे नाचवणारे विचारवंत कुणाच्याही काय कामाचे असा प्रश्न पडतो. पत्रकारांनी एक विशिष्ट पद्धतीने जनमत तयार करणे हि खरं तर सर्वमान्य रीत आहे. त्यात गुप्ता कोणती व्यावसायिक निष्ठेशी प्रतारणा करणार होते? आणि आता हे ज्ञान पाजळून त्यांनी काय मिळविले?

एकूणच सामाजिक आणि आर्थिक बदलांमध्ये तळागाळातील वर्गच निर्नायकी भूमिका बजावू शकतो असे आताशा वाटू लागले आहे.

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

17 Aug 2019 - 7:04 pm | जॉनविक्क

छानच.

एकूणच सामाजिक आणि आर्थिक बदलांमध्ये तळागाळातील वर्गच निर्नायकी भूमिका बजावू शकतो असे आताशा वाटू लागले आहे.

लेख वाचलाय तरीही ही बाब पुरेशी विस्कटून सांगावी अशी विंनती आहे.

आनन्दा's picture

19 Aug 2019 - 10:24 am | आनन्दा

१. निर्नायकी की निर्णायकी? स्पष्ट केलेत तर बरे होइल
२. आपण झुंडीचे मानसशास्त्र हे पुस्तक वाचले आहे का? भाउ तोरसेकरांच्या लेखांमध्ये बर्याच वेळेस येतो उल्लेख.

  1. एकूण वाक्याचा नूर बघता योग्य तो अर्थ काढता येतो असे मला वाटते. विनाकारणच हिणकस शेरा मारायचा असेल तर माझी सपशेल माघार.
  2. झुंडीचे मानसशास्त्र यावर तोरसेकरांनी आत्ताच का लिहावे (मी तोरसेकरांचा वाचक नाही. निव्वळ विशेषणांनी भरलेला लेख असेल जसे कि 'सडकी मनोवृत्ती, करोडोंचा भ्रष्टाचार, सत्तर वर्षाची घाण' कि समजावे कि लेखकाचा अभ्यास कमी आहे.) हा प्रश्न आहे. सध्याचे सरकार आणि तोरसेकर ज्यांचे चाहते आहेत ते हे झुंडीच्या मानसशास्त्रामुळेच तर परत सत्तेत आलेत. अन्यथा देशाची आर्थिक स्थिती गाळात घालणाऱ्यांना परत निवडून येण्याची काहीच संधी नव्हती.
सुबोध खरे's picture

21 Aug 2019 - 12:37 pm | सुबोध खरे

अन्यथा देशाची आर्थिक स्थिती गाळात घालणाऱ्यांना परत निवडून येण्याची काहीच संधी नव्हती.

हांगाश्शी

आता कसं लायनीवर आल्यासारखा वाटतंय?

आनन्दा's picture

21 Aug 2019 - 1:14 pm | आनन्दा

हिणकस शेऱ्याचा काय संबंध?

झुंड निर्नायकीच असते. त्यामुळे दोन्ही वाक्ये तितकीच अर्थवाही आहेत. त्यातले तुम्हाला अपेक्षित काय आहे ते विचारलं तर इतका राग?

बाकी, एकंदर प्रतिसादाचा सूर पाहिल्यावर तुम्ही देखील झुंडीचाच भाग असल्याचे वाटत आहे. त्यामुळे चर्चा अशक्य. बाकी झुंडीचे मानसशास्त्र या पुस्तकाचे लेखां बहुधा विश्वास पाटील आहेत. नेमके माहीत नाही. पण भाऊ तोरसेवर नाहीत हे नक्की.

> एकूणच सामाजिक आणि आर्थिक बदलांमध्ये तळागाळातील वर्गच निर्नायकी भूमिका बजावू शकतो असे आताशा वाटू लागले आहे. >
१. बंड होणार आणि प्रस्थापितांना पळ काढावा लागणार
२. काही काळ सगळं आलबेल असणार
३. नवीन प्रस्थापित तयार होणार आणि ते अन्याय करू लागणार

आणि परत पायरी १ ला जायचं

चांगल्याचा शोध हि एक सतत चालणारी प्रक्रिया असते. मला तरी सध्याचे प्रस्थापित जाऊन नवे येण्यामध्ये काही गैर वाटत नाही. परंतु सध्याच्या शासकांना घालवून देताना भारतीयांच्या भ्रष्टाचाराच्या ज्या कल्पना आहेत त्यात काही बदल व्हावे असे निश्चित वाटते. उदाहरणार्थ बोफोर्सचा घोटाळा. बोफोर्सचा व्यवहार जगात पुढारलेल्या देशांमध्ये, अगदी भारतात झाला तसाच झाला असता तर त्याला कोणीही भ्रष्टाचार म्हटले नसते. मध्यस्थ असणे हि त्या देशांमध्ये एक मान्यता पावलेली गोष्ट आहे. भारतातही आता लेखक, खेळाडू, आणि कलाकार यांच्या करिअर म्यॅनेज करणाऱ्या कंपन्या आहेत.

जालिम लोशन's picture

21 Aug 2019 - 2:00 pm | जालिम लोशन

एक फुकटचे खातो आणी एक मेहनतीचे! आरटीओ',>= इस्टेट एजंट असतात आणी सोसायटी, बॅंक, मॅनेजर असतात. एक बेकायदेशीर मार्गाने काम करतात आणी एक घाम गाळतात. एकाचे ऊत्पन अमर्यादित असते आणी एकाचे मर्यादित असते.