प्रस्थापितांचे सामाजिक भान: भाग २
मागच्या भागात मी प्रस्थापितांची अगदी सोपी व्याख्या सांगितली होती. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा संघर्ष संपला अशी कोणतीही व्यक्ती प्रस्थापित होते. साधन संपत्तीची उपलब्धता, समाज्याला प्रभावित करण्याची क्षमता, व्यवस्थेवर प्रभाव टाकणे किंवा नवीच व्यवस्था उभी करणे याची व्यक्ती परत्वे उपलब्ध असणारी संधी असे या प्रस्थापितांचे वर्णन करता येईल. साहजिकच छोटा अथवा मोठा व्यक्ती समूह किंवा देश जेंव्हा एखाद्या समस्येशी झुंजत असतो तेंव्हा प्रस्थापितांकडे लोक साहजिकच अपेक्षेने बघतात. मी स्वतः तर अशा लोकांकडे आशाळभूतपणे बघत असतो. पण बहुतांशी आपल्याला येणार अनुभव नेमका उलट असतो. एखाद्या आगीच्या ठिकाणी बंब यावा आणि त्यात पाणीच नसावे अशा प्रकारचा, तीव्र स्वरूपाचा निराशाजनक असा तो अनुभव असतो.
खरे तर आपण जितके प्रस्थापित होऊ तितके व्यवस्थेशी आपलं साटंलोटं तयार होतं. माणसं गुळमुळीत बोलतात. यालाच 'पॉलिटिकली करेक्ट असणं' असं नाव देतात. कालच शेखर गुप्तांची यूट्यूबवर एक क्लिप बघत होतो. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या रणनीतीवर बोलताना म्हटलं कि काँग्रेसने स्वतःच्याच बलस्थानांकडे दुर्लक्ष केले. २००८ च्या जगाला मंदीने घेरले परंतु भारतीय अर्थव्यवस्था आघाडीच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत सर्वात कमी झळ बसणारी अर्थव्यवस्था होती. सत्यम कॉम्पुटर्सचा घोटाळाही त्या सरकारने अगदी ललामभूत मानला जावा अशा पद्धतीने हाताळला. त्या तुलनेत सध्याच्या सरकारची मागची टर्म सपशेल अयशस्वी होती. असे असतानाही काँग्रेसने आपल्याच कर्तबगारीकडे दुर्लक्ष केले.
मला हे असे वरातीमागून घोडे नाचवणारे विचारवंत कुणाच्याही काय कामाचे असा प्रश्न पडतो. पत्रकारांनी एक विशिष्ट पद्धतीने जनमत तयार करणे हि खरं तर सर्वमान्य रीत आहे. त्यात गुप्ता कोणती व्यावसायिक निष्ठेशी प्रतारणा करणार होते? आणि आता हे ज्ञान पाजळून त्यांनी काय मिळविले?
एकूणच सामाजिक आणि आर्थिक बदलांमध्ये तळागाळातील वर्गच निर्नायकी भूमिका बजावू शकतो असे आताशा वाटू लागले आहे.
छान.
१. निर्नायकी की निर्णायकी?
In reply to १. निर्नायकी की निर्णायकी? by आनन्दा
एखादा शब्द चुकीचा लिहिला गेला तरी
In reply to एखादा शब्द चुकीचा लिहिला गेला तरी by सर टोबी
अन्यथा देशाची आर्थिक स्थिती
In reply to एखादा शब्द चुकीचा लिहिला गेला तरी by सर टोबी
हिणकस शेऱ्याचा काय संबंध?
> एकूणच सामाजिक आणि आर्थिक
In reply to > एकूणच सामाजिक आणि आर्थिक by एमी
कोणत्याही प्रकारच्या शासन व्यवस्थेमध्ये
In reply to कोणत्याही प्रकारच्या शासन व्यवस्थेमध्ये by सर टोबी
एजंट आणी मॅनेजर यात फरक आहे.