काश्मीरमध्ये नक्की काय चाललेय?
नमस्कार मंडळी
काश्मीर हे १९८७- ८८ पासुन नेहमीच धुमसत राहिले आहे. खरेतर १९४७ पासुन म्हणायला हवे. कारण राजा हरिसिंग यानी भारत स्वतंत्र झाला तेव्हा प्रथम स्वतंत्र राहायचा निर्णय घेतला पण नंतर पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा शेवटी काश्मीर भारतात विलिन केले आणि भारतीय लष्कराची मदत घेतली.
पाकिस्तानचा काश्मीर् वर नेहमीच डोळा राहिला आणि त्यातुन पुढे २ युद्धे झाली. पुढे थेट युद्धात जिंकणे अशक्य आहे हे कळल्याने अनेक छुपे हल्ले, अतिरेकी कारवाया, घुसखोरी वगैरे सुद्धा आजमावुन बघितली गेली आणि त्यातुन हळुहळु पाक व्याप्त काश्मीरचा प्रश्न उभा ठाकला. याशिवाय स्थानिक मुस्लिम जनतेची सहानुभुती मिळवणे , काश्मीरी पंडीतांना धमकावणे, पळवुन लावणे वगैरे सुद्धा झाले.
मी मोदीभक्त नाहि, पण मोदी सरकार आल्यापासुन चित्र थोडे बदलले आहे. काश्मीर प्रश्नावर धडक आणि आक्रमक पावले टाकली जात आहेत. किवा त्याचे नीट मार्केटींग केले जात आहे म्हणा. मग तो सर्जिकल स्ट्राईक असो किवा कटराचा रेल्वेपुल असो.
पण परवा शुक्रवारपासुन काश्मीरात जे चालु आहे त्याची नीट संगती लागत नाहिये. लष्कराला काहितरी खबर मिळालेय आणि शस्त्रसाठा सापडला अशी बातमी आहे. ईतक्या वर्षात प्रथमच सरकारने अमरनाथ यात्रा स्थगित केली. त्या नंतर खोर्यातील सर्व पर्यटकांना बाहेर पडायच्या सुचना दिल्या आणि ठिकठिकाणी पर्यायी आणि अतिरिक्त वाहतुकिच्या सोयी उपलब्ध केल्या. पहलगाम मधे पहाडात गेलेले गिर्यारोहक सोडुन बाकी सर्वांना खाली आणले. जम्मु स्थानक आणि श्रीनगर विमानतळ गर्दीने फूलुन गेलाय.
शाळा कॉलेज बंद आहेत आणि नागरीकांना ८-१० दिवस पुरेल ईतका अन्न व ईतर जीवनावश्यक वस्तुंचा साठा करायची सुचना आहे. पेट्रोल पंपावर २ कि.मी. पर्यंत रांगा आहेत. लष्कराच्या तुकड्या उतरवल्या जात आहेत. थोडक्यात चिन्हे काहीशी ठीक नाहित.
१२ ऑगस्टला ईद आहे. १५ ऑगस्टला स्वतः मोदी काश्मीरात झेंडा वंदन करणार अशीही एक हूल आहे.
तर काय अंदाज आहे तुमचा? तज्ञ मिपाकरांचे यावर मत जाणुन घ्यायला आवडेल.
वर्गीकरण
वाचने
12045
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
थांबा कि जरा
काश्मीर प्रकरण : घटनेतून कलम
काश्मिर सोडा आता पाकिस्तानाची
In reply to काश्मिर सोडा आता पाकिस्तानाची by माकडतोंड्या
समजले नाही
सहज पाहिले पाकिस्तानची सद्य
चालू वर्तमान आणि भविष्य काळ.
In reply to चालू वर्तमान आणि भविष्य काळ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जम्मू आणि काश्मीर यापैकी
श्री खरे साहेबांशी एकदम सहमत.
प्रश्न आहे की काश्मिरीही
In reply to प्रश्न आहे की काश्मिरीही by माहितगार
आझादी की ३७० हवंय - काश्मिरी कोंडी .
In reply to आझादी की ३७० हवंय - काश्मिरी कोंडी . by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काश्मिरी मुळ ओळख पंडिती आणि
श्रीनगर मध्ये पिढीजात घर
In reply to श्रीनगर मध्ये पिढीजात घर by यशोधरा
काळजी करू नका
लोकसत्ता
In reply to लोकसत्ता by धर्मराजमुटके
बीबीसी पण ?
https://youtu.be/31wbvKT8uEM
याना काश्मिर हवाय्,काश्मिरि
In reply to याना काश्मिर हवाय्,काश्मिरि by योगेश कोकरे
याना काश्मिर हवाय्,काश्मिरि
In reply to याना काश्मिर हवाय्,काश्मिरि by योगेश कोकरे
'भारत एकसंघ हवाय कोणत्याही तडजोडीं शिवाय'
लै भारी व्हिडीओ
गेली 70 वर्ष
गव्हर्नर भाषण काश्मीर