मितान्नीच्या राजवाड्याचा शोध ?

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
4 Aug 2019 - 7:27 pm

मितान्नी साम्राज्य! कपोलकल्पित नव्हे तर पुरातत्वीय आधार असलेला इतिहास. काही वैदीक देवतांची नावे आणि काही संस्कृतशब्द थेट मध्यपुर्वेत आणि तेही ईस्वीपुर्व १५०० ते ईस्वीपुर्व १४०० च्या काळात, आजपासून सुमारे साडेतीन हजार वर्षांपुर्वी. मितान्नीच्या सम्राटांनी तो फारसा जतन नाही केला पण त्यांचा पत्रव्यवहार इजिप्त सहीत आजूबाजूच्या प्रतिस्पर्धी राजवटीतून सापडलेला. क्ले टेब्लेट म्हणजे मातीच्या पाटीवरील तेथील तत्कालीन भाषेतील क्युनीफोर्म लिपी स्वरुपात. हे राजे दुचाकी रथ म्हणजे आपण टांगा म्हणतो त्या प्रकाराचा युद्धोपयोगात प्रवीण असावेत.

मित्तान्नी राजांचा राजवटीचा प्रांत कोणता तर मागच्या चारेक वर्षात धर्मांध इसीसने बळकावलेला मोसूल (इराक) ते सिरीयाचा लेवांत म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रदेशाशी ढोबळमानाने समकक्ष असावा, माझा समज/ कयासाशी वस्तुस्थिती अंशत वेगळी असु शकते चुभूदेघे. हि ढोबळ समकक्षता निव्वळ योगायोग हेवेसानल.

Near East 1400 BCE
.
.
.
यांच्या अश्वदल प्रमुखांचे नाव किक्कुली याने घोड्यांची देखभाल कशी करावी या विषयावर एक ग्रंथही (तेथील भाषेत) लिहिला. मी 'तेथील तकालीन स्थानिक भाषा' हा उपयोग आवर्जून करतोय कारण काही देवतांची नावे काही राजांची नावे आणि किकुलीच्या ग्रंथातून आलेली काही संख्या विशेषणे या पलिकडे संस्कृत साहित्य अद्याप तरी प्राप्त झालेले नाही.

मितान्नींची स्थानिक भाषा "हुरीयन" इंडो-युरोपीय अथवा अफ्रो असियाटीक भाषाकुलातील नसून वेगळ्या स्वतंत्र भाषिक कुलातील असावी. सांगण्याचा मुद्दा प्राप्त झालेल्या विशीष्ट शब्दांपलिकडे संस्कृत अथवा भारतीय भाषांशी संबंध प्रथम दर्शनी तरी दिसत नसावा.

* प्राप्त संस्कृत शब्दाचे १ उदाहरण Transcription of cuneiform bi-ir-ya-ma-aš-da Interpretation Priyamazdha Vedic equivalent प्रीयमेधा

* इतर प्राप्त संस्कृत शब्द प्रितअश्वा, अर्थस्मरा / रितस्मरा ? , अर्ततमा / अर्थधामा/ रितधामा ?, त्वेषरथा, इंद्रौता, वरूण, मित्र, इंद्र, नासत्या, अग्नी, अश्व, एक, त्री, पंच, सप्त, नव आणि वर्तन (बहुधा वर्तुळ /गोलाकार अर्थाने) संदर्भ

दोन्ही गोष्टी शक्य आहेत की मित्तान्नी राजे स्थानिकच होते त्यांना किक्कुली किंवा तत्सम वैदीक धर्मीय गुरू प्राप्त झाले ज्यांनी त्यांची नामकरणे संस्कृतातून सुद्धा वापरली, युद्धकरार लिहिताना त्यात इंद्र वरुणादी वैदिक देवतांना आवाहन केले आणि घोड्यांच्या प्रशिक्षणासंदर्भात संस्कृत संख्या विशेषणे वापरली. किंवा खरोखरच एखाद्या वैदीक धर्मीय राजवटीने तेथिल स्थानिक राजवट जिंकुन राज्य केले हे सांगणे अवघड असले तरी मला पहिली शक्यता अधिक वाटते याचे कारण म्हणजे या राजवटीचा काही संपर्क भारतात झाला असता तर त्यांच्या भाषेतील पत्रांची क्ले टॅब्लेट सिंधू संस्कृतीच्या खोर्‍यात कुठेतरी सापडण्यास हरकत नव्हती अर्थात त्यांनी भारतीय वैदीकांशी पत्र व्यवहार केला पण काळाच्या ओघात नष्ट झाला अशीही शक्यता असू शकतेच पण तरीही व्यापार मार्गाशी संबम्धीत असलेल्या सिंधू खोर्‍यातून व्यापार संबंधानेतरी क्युनीफॉर्म लिपीतील काही पुरावे मिळण्यास हरकत नसावी पण असे पुरावे इतक्या सगळ्या उत्खनातून अद्यापतरी पुढे आलेले दिसत नाहीत त्यामुळे मितान्नी राजवटीत दिसणार्‍या राजांच्या नावावरुन खूप मोठी फुशारकी मारावी अशा दिग्विजयाची शक्यता कमी वाटते. सांगण्याचे कारण हेही की मितान्नी राजांच्या इतर पत्र व्यवहारात इतर स्थानिक देवतांचीच नावे येतात वैदिक देवतांची नव्हे.

तरीही मित्तान्नी राजवट कालीन वैदिक संस्कृत शब्द आढळ वैदीक संस्कृताचा काळ किमान ईस्व पुर्व १५०० वर्षे ला नेतात आणि त्या योगे वैदिक संस्कृती सिंधू संस्कृतीच्या मध्य काळाच्या आसपासतरी राहीली असली पाहिजे यावर शिक्का मुर्तब होते. या विषयीच्या वाद विवादात एक्झॅगरेशनच्या भरात हा महत्वाचा दुवा चर्चा करणार्‍यांच्याकडून सुटतो का अशी शंका वाटते.

मितान्नीची नेमकी आता आठवण येण्याचे कारण की मोसुलच्या जवळ धरणाजवळील पात्र जसे आटले तसे एक पुरातत्वीय स्थळाची शक्यता २०१०च्या आसपास जाण्वली पण मधल्या राजकीय अस्थीरतेच्या काळात उत्खनन होण्याची शक्यता नव्हती. तर सांगण्याची गोष्ट अशी की त्या पात्रात एका मातीच्या विटांच्या राजवाडाड्याचे अवशेष आढळून आल्या ची घोषणा जून २०१९ अखेरीस स्थानिक तसेच जर्मन विद्यापीठाच्या पुरातत्व संशोधकांनी केली. हे अवशेष बहुधा मित्तान्नीचे आहेत असा पुरातवईय संशोधकांचा कयास आहे. भारतीय माध्यमांचे या बातमी कडे कितपत लक्ष गेले माहित नाही पण यात अजून एक चालू संशोधनाबाबत उल्लेख माझ्या तरी पहाण्यात आला नाही . तर आणखी एक महत्वाची बाब अशी की या राजवाड्यात काही क्ले टॅब्लेट सापडल्या असून त्याचा अर्थ लावण्याचे काम जर्मनीतील विद्यापीठातील अभ्यासकांकडुन केले जात आहे.

एक्झॅगरेशने आग्रह टाळून या भाषिक आणि राजकीय इतिहासाकडे अधिक सखोल आणि वस्तुनिष्ठपणे भारतीयांनी पाहीले पाहीजे असे वाटते. असो.

वेळे अभावी लेख अधिक उल्लेखांनी लिहू शकलो नाही या साठी क्षमस्व. खाली आताच्या बातम्यांचे काही दुवे आणि मित्तान्नी विषयावर काही युट्यूब असल्यास खाली जोडेन.

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळणारा, शुद्धलेखन आणि व्याकरणाचे डोस न देता व्यक्तिगत टिका न करता केलेल्या चर्चा सहभागासाठी अनेक आभार.

* Univesity Press Releases

* https://www.kurdistan24.net/en/news/b5c8d1a2-f984-432b-8229-cf7839446a60

* https://www.classicult.it/tag/zakhiku/?lang=en
* https://www.livescience.com/65850-bronze-age-palace-iraq.html

*** ***

* विकिमीडिया कॉमन्सवरील नकाशे

इतिहास

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

4 Aug 2019 - 10:02 pm | प्राची अश्विनी

खूप छान परिचय. Interesting

डँबिस००७'s picture

4 Aug 2019 - 10:59 pm | डँबिस००७

ह्या विषयावर फार पुर्वी डॉ सुभाष काक ह्यांनी काम केलेल आहे ! ह्यांच्या मते सरस्वती नदीच्या लुत्प झाल्या नंतर नदीच्या बाजुला वस्तीला असणार्या लोकांनी चार दिशेला प्रस्थान केले !! मितान्नीच्या लोकांचे मुळ ईथे आहे !
ह्यात मितान्नीच्या लोकांचे संबंध
पुढे ईजिप्तच्या घर्‍याण्याशी आले !!

पुढे ईजिप्तच्या घर्‍याण्याशी आले !!

हे बरोबर आहे की मितान्नी राजघराणे काही काळ इजिप्त राजघराण्याचे सत्तास्पर्धी होते आणि राजकीय सोईसाठी नंतरच्या काळात आपल्या मुली इजिप्त राजघराण्यात विवाहबद्ध करून वैवाहीक संबंधाने जोडले गेले.

ह्या विषयावर फार पुर्वी डॉ सुभाष काक ह्यांनी काम केलेल आहे ! ह्यांच्या मते सरस्वती नदीच्या लुत्प झाल्या नंतर नदीच्या बाजुला वस्तीला असणार्या लोकांनी चार दिशेला प्रस्थान केले !! मितान्नीच्या लोकांचे मुळ ईथे आहे !

डॉ. सुभाष काक यांच्या बद्दल ऐकले पण अद्याप वाचनाचा योग आलेला नाही. उपरोक्त दाव्यासाठी त्यांनी कोणते आधार वापरले आहेत याची कल्पना नाही.

मला वाटते किमान पक्षी मितान्नी राजघराणे आणि मितान्नीचे समकालीन स्थानिक यात फरक करावयास हवा. हा धागा लेख लिहिण्यापुर्वी मी इंग्रजी विकिपीडियावरील लेख पुन्हा एकदा चाळले असता मित्तान्नी स्थानिक जनता भाषिक आणि धार्मीक प्रथा दृष्ट्या वेगळ्या गटात दिसते. वैदिकांचा भाषिक किंवा सांस्कृतिक सामान्य जनतेवर मोठा प्रभाव पडला असण्याची शक्यता कमी वाटते. थायलंडचे लोक वेगळे असूनही राजघराण्यातील व्यक्तिंना संस्कृत नावे दिली जातात असेही झाले असू शकते. अगदी म्यानमार कत्टर बौद्ध सम्राट राज्याभिषेक तेवढा वैदीक ब्राह्मणांकडून करून घेत.

मध्यपुर्वची सध्या स्थिती काही असु द्यात पण त्यांच्या ऐतिहासिक लिपी आणि लेखन अधिक व्यवस्थित जपले गेल्याने एक मितान्नी राजघराण्याच्या अंदाजे तीन ते चार पिढ्या सोडल्यातर वैदीकांचा त्या दिशेने जाणवणारा असा प्रभाव दिसत नाही असे अधिक मोकळेपणाने स्विकारता यावे असे वाटते. अर्थात कोणतेही पुर्वग्रह न ठेवता भारतीय पुरातव, इतिहासकारानी मध्यपुर्वेच्या अभ्यासात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला असता तर या विषयावर कदाचित अधिक व्यवस्थित प्रकाश पडण्यास मदत झाली असती असे वाटते

लोकसत्ता, सकाळ वृत्तपत्रात आली होती, डेक्कन काॅलेज मधील संशोधकाच्या हवाल्याने तिथे श्रीराम व सीतेची मुर्ती तसेच गणपतीची मुर्ती असल्याचे म्हटले गेले, छायाचित्रे पण होती.

नेमके संदर्भ दुवे देऊ शकाल का ? कारण

१) मी वर दिलेल्या विद्यापीठाचा प्रेस रिलीज आणि बातम्यांमध्ये तसा कोणताही उल्लेख नाही.

२) राम, सीता, गणेश या ऋवेदातील देवता नव्हेत

३) मितान्नी प्रदेशाच्या स्थानिक मुर्ती देवता अवैदीक आणि वेगळ्या आहेत भारतीय पौराणिक देवतांशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही.

माहितगार's picture

5 Aug 2019 - 8:50 am | माहितगार

आपला गैरसमज होत असल्याची शक्यता अधिक वाटते