शिव त्रिगाथा
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
भगवान शंकर..रुद्र .शिव.. नीलकंठ.मूळ त्रिदेवांपैकी एक .. जनक ब्रह्मा , पालक विष्णू आणि संहारक महेश..सृष्टीचा समतोल राखणारा शिव.
देव आहे का नाही हे मला माहित नाही पण देवत्वाच्या समीप जाणारी जर एखादी शक्ती असेल तर ती आपल्या कायेमध्ये चेतना फुंकणारी आणि आंतरिक प्रेरणा देणारी शक्ती होय. अशाच आंतरिक प्रेरणेने एक I.I.M उच्च विद्याविभूषित , बड्या वित्त कंपनीत उच्चपदावरील अधिकारी शिवभक्त अमिश त्रिपाठी सगळं हातचं सोडून भगवान शंकरावर पुस्तक लिहितो काय आणि rest is the history...शिव त्रिगाथा ही भारतीय साहित्यविश्वात अल्पाधि वेळात सर्वाधिक खपाची पुस्तके ठरतात.. हे सगळेच विलक्षण व अचंबित करणारे ..
भगवान शंकराला 4000 वर्षांपूर्वीच्या तिबेट मधील एका भटक्या टोळीचा प्रमुख म्हणून मांडताना भारतीय संस्कृती व हिंदूच्या ह्या देवतेबद्दलच्या श्रद्धेला जराही छेद जाऊ न देण्याचे 'शिवधनुष्य' अमिश यांनी विलक्षण बुद्धिमत्ता , अफाट कल्पनाशक्ती व सुसंगत तर्कशुद्ध मांडणीच्या बळावर लीलया पेलले आहे.
Immortals of Meluha, Secrets of the Nagas आणि Oath of the Vayuputras ह्या तीन पुस्तकांच्या संचात भटक्या शिव ते नीलकंठ महादेवापर्यंतचा प्रवास अतिशय ओघवत्या भाषेत व कमालीच्या बारकाव्यांसकट मांडला आहे .
पौराणिक पात्रे(दक्ष , सती , नंदी , गणपती , कार्तिकेय इत्यादी ) भौगोलिक स्थळे (अयोध्या , मगध , काशी ) समकालीन संस्कृती (इजिप्त , इराक )यांचा अचूक संदर्भ तसेच समुद्र मंथनातून अमृत निर्मिती , देवासूर युद्ध गणपतीचा जन्म , सरस्वती नदीचे लुप्त होणे , निळकंठाचे रहस्य आदी पौराणिक चमत्कृतीना दिलेली तार्किक जोड आपल्याला शिव कमालीचा विश्वसनीय बनवतात. तसेच अमृतामधील (इथे सोमरस )संभाव्य अँटिऑक्सिडंट गुणधर्म , तिसरा डोळा (कुंडलिनी चक्र ), बिनतारी परस्पर संवाद ,अण्वस्त्रे , मेंदूत विचारांमुळे होणारी कंपने ह्या व अशा अनेक वैज्ञानिक स्पष्टीकरणांमुळे हि त्रिगाथा केवळ fiction न राहता आपल्याला नविन दृष्टिकोन देते.
अमिश त्रिपाठी त्यांच्याह्या त्रिगाथेतून पौराणिक आशयाआधारे अतिशय सखोल विचार मांडतात. सुष्ट व दुष्ट ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत व ह्या दोन्ही प्रवृत्ती पूर्णपणे कधीच नष्ट होऊ शकत नाहीत फक्त समीकरणातून समतोल राखण्यापुरते बाहेर काढाव्या लागतात इत्यादी.
अजूनही बरेच काही लिहिण्या सांगण्यासारखे आहे पण प्रत्यक्ष गोष्ट सांगून वाचनातील मजा कमी करण्याचा प्रमाद मी करू इच्छित नाही व तसे करणे योग्यही नाही...
हर हर महादेव ....
प्रतिक्रिया
अमिश ची पुस्तके लहान काय
हेच म्हणणार होतो
छान
चांगले वाईट ठरवणारे आपण कोण!
असाच नाही काही.
अजून एक महत्वाची गोष्ट अशी
आनन्दा यांच्याशी शत प्रतिशत
अत्यंत पकाऊ पुस्तके आहेत ही.