वारी
त्यागाने धजलेले, भक्तीत चूर,
देह हे सजलेले ।
धुळीने नटलेले, समर्पणां आतुर
पाय हे वळलेले ।
नामाने माखलेले, वारीचे काहूर
हृदयीं ह्या उठलेले ।
मातीने रंगलेले, भजनांचे सूर
नभीं या दंगलेले ।
माऊलीने भारलेले, भक्तांचे ऊर
कीर्तनीं या न्हालेले ।
पंथ भिजलेले, भक्तीने महामुर,
जीव हे चिंबओले ।
ध्यास ल्यालेले, जरी क्षणभंगुर
आयुष्य विठुरायांत मुरलेले ।
- अभिजीत
वा
धन्यवाद
महामुर म्हणजे काय?
धन्यवाद. महामुर म्हणजे प्रचंड
सुरेख
वारी आवडली.