शस्रक्रिये च्या टाक्यांमधे पाणी होणे

चहा चपाती's picture
चहा चपाती in काथ्याकूट
30 Jul 2019 - 1:42 pm
गाभा: 

माझ्या वडीलांना पित्तखड्यांचा त्रास होता. त्यासाठी वडिलांची पित्ताशय काढण्याची शस्रक्रिया नाशिक येथे केली. दुर्बिणीद्वारे तिन आठवड्यांपुर्वी ही शस्रक्रिया केली गेली. पोटात चार ठिकाणी छिद्र करण्यात आले. बाकी ठिकाणचे टाके बरे झाले पण बेंबीजवळचा टाका भरुन आला नाही.

काल बेंबीजवळची जागा सुजली होती. थोड्या हालचाली ने त्यातुन पाणी आले. जवळजवळ २०-२५ मिलि पाणी (पस) निघाले.

शस्रक्रिये नंतर आज पर्यंत अंघोळ केली नाही आणि जखमही कोरडी ठेवली होती. दर ४ दिवसांनी hospital मधे डॉक्टरां कडे जावुन dressing केले होते. तरी देखिल असे झाले.

असे का झाले ?
शस्रक्रिया व्यवस्थित पार पडली का कि काही त्रुटी राहिल्या?
पुढे काय काळजी घ्यावी.
काही टेस्ट कराव्या का?

कृपया सल्ला द्यावा.