Skip to main content

वैद्यकिय मदत

शस्रक्रिये च्या टाक्यांमधे पाणी होणे

लेखक चहा चपाती यांनी मंगळवार, 30/07/2019 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वडीलांना पित्तखड्यांचा त्रास होता. त्यासाठी वडिलांची पित्ताशय काढण्याची शस्रक्रिया नाशिक येथे केली. दुर्बिणीद्वारे तिन आठवड्यांपुर्वी ही शस्रक्रिया केली गेली. पोटात चार ठिकाणी छिद्र करण्यात आले. बाकी ठिकाणचे टाके बरे झाले पण बेंबीजवळचा टाका भरुन आला नाही. काल बेंबीजवळची जागा सुजली होती. थोड्या हालचाली ने त्यातुन पाणी आले. जवळजवळ २०-२५ मिलि पाणी (पस) निघाले. शस्रक्रिये नंतर आज पर्यंत अंघोळ केली नाही आणि जखमही कोरडी ठेवली होती. दर ४ दिवसांनी hospital मधे डॉक्टरां कडे जावुन dressing केले होते.

"वैद्यकिय मदत" ह्या विषयावर वाहिलेला वेगळा धागा असावा का?

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 22/01/2017 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, एखादा आजार झाला असेल तर, त्या आजाराला बरे करणारे बरेच डॉ. इथेच मिपावर उपलब्ध आहेत. पण त्यांना लवकरात लवकर मिपाकर रुग्णाला मदत करता यावी म्हणून वेगळा विभाग असावा का? जेणेकरून मिपावर आल्या आल्या ते आधी रुग्णांना हवी असणारी मदत बघून आणि त्यांना योग्य तो सल्ला देवू शकतील. प्रास, आनंदी गोपाळ,बाबा पाटील, डॉ. म्हात्रे आणि डॉ. सुबोध खरे ह्यांना थोडा त्रास नकीच होईल.