माझे जिम चे प्रयोग ... जिम मधली गाणी (भाग २)

अमर विश्वास's picture
अमर विश्वास in जनातलं, मनातलं
13 Jul 2019 - 9:36 am

जिम मधली गाणी एपिसोड #३

रोजच्या प्रमाणे सकाळी उठून जिम मध्ये धडकलो ... (विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही च्या चालीवर )
आज स्पिंनिंग चा दिवस ... सायकल ऍडजस्ट करून "वॉर्म अप" ला सुरवात केली. हळू हळू गाण्यांनी जोर पकडला आणि त्याचबरोबर आमच्या पॅडलिंगने ही

आणि .. अचानक ते गाणे आले ... आजा डूब जाऊं तेरे आंखों के ओशनमें... स्लो मोशन में... अहाहा .. काय ती शायरी ... शब्द ऐकून मी अडखळोच ... ओशन मध्ये गटांगळ्या खातोय असा फील आला .. पायांची हालचाल स्लोमोशन झाली ... ह्या अवस्थेत किती वेळ होतो माहित नाही .. पण अचानक सरांचे शब्द ऐकू आले .. don' give up ... keep going ... लगेच सावरलो. सेशन पूर्ण केले .
नंतर घाम पुसत (स्पिंनिंग नंतर घाम येतो ... त्याचा गाणे ऐकण्याशी संबंध नाही) सरांना म्हणालो ... कुठून शोधात हो ही गाणी .. कायतर म्हणे आंखों के ओशनमें... स्लो मोशन में...

अय्या .. हे भारत मधलं गाणं आहे .. एक कमेंट आली ... माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह ... मग एकदम ट्यूब पेटली. आद्य वन्यजीवप्रेमी श्री सलमान खान यांचा चित्रपट ... आपल्याला काहीच माहीत नाही .. जबरदस्त कॉम्प्लेक्स आला. घरी आल्यावर गुगुल बाबा ला शरण गेलो ... कुठलं हे गाणं . मग लक्षात आलं अरे ह्याची झलक तर आपण आहे ... फक्त गाण्यापेक्षा दिशा (पटणींची) लक्षात राहिली हा काही माझा दोष नाही ...

जाताजाता सरांनी मार्गदर्शन केलेच .. अरे शब्द नको ऐकू .. फक्त बिट पकड आणि त्यानुसार स्पीड वाढावं .. अहो पूर्वी बिट ही भाजी होती हो .. आणि आम्ही गाण्यात मेलडी शोधायाचो

आता भाजीतलं बिट हे गाण्यात गेलंय ..आणि मेलडी फक्त चॉकलेटमध्येच राहिली आहे
मेलडी खाओ खुद जण जाओ

जिम मधली गाणी एपिसोड #4

रोजच्या प्रमाणे सकाळी उठून जिम मध्ये धडकलो ... (विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही च्या चालीवर )
आज परत स्पिंनिंग चा दिवस ... परत एकदा सायकल ऍडजस्ट करून "वॉर्म अप" ला सुरवात केली. हळू हळू गाण्यांनी जोर पकडला आणि मास्तरांनी सांगितल्याप्रमाणे आम्हीही "बिट" पकडायच्या मागे लागलो. आता बिट पकडण हे पोकेमन पकडण्याइतकं सोपं नाही ( आम्ही आयुष्यात कधीच पोकेमान पकडला नाही .. पण पोकेमान पकडणारे सहसा "बिट" च्या मागे लागत नाहीत .. त्यामुळे काळजी नसावी )

हे सगळं चालू असतानाच कानावर एक गाणं आदळलं .....
साडी के फॉलसा... कभी मॅच कियारे
कभी छोड दिया दिल कभी कॅच कियारे

व्वा .. मॅच ला कॅच ... काय यमक जुळवलं .. ते सुद्धा इंग्रजीतून ... पूर्वी साहिर, शकील उर्दू शब्द वापरायचे .. नंतर शैलेंद्र, गुलजार वगैरे प्रभुतींनी हिंदीला प्रतिष्ठा मिळवून दिली .. आता हिंदी सिनेमात गीतकार व्हायला इंग्रजी यावे लागते ... केव्हढी ही प्रगती

आता या कॅच - मॅच ला मॅचिंग पुढचा शब्द कुठला असेल ? मला तर बॅच शिवाय दुसरा शब्दच आठवेना ...
आता ते प्राची ला ते गच्ची जुळतंय का बघा पी ल ... असं म्हणणाऱ्या रावसाहेबांसारखी आमची अवस्था झाली.

आम्ही लक्षपूर्वक पुढचं गाणं ऐकू लागलो ... आता हे फार सोपं नसत ... एक तर "बिट" पकडायचा .. त्याबरहुकूम पायडल मारायची , कमीजास्त होणाऱ्या आणि रंग बदलणाऱ्या दिव्यांकडे दुर्लक्ष करायचे (खरंतर "इस रंग बदलती दुनियमें" हे गाणं का नाही वाजवत ?) .... आणि ह्या सगळ्यातून वेळ काढून गाण्याचे शब्द ऐकायचे ... फारच अवघड काम

तर गाणं पुढं सरकलं .. टच करके टच करके... कहाँ चलदी बच कर के
अरे ... नुसतं यमकच नाही तर चाल ही बदलली .. हा शुद्ध हलकटपणा आहे माने
या टच कारके च्या जोडीला पुढे कट करके आला पण कॅच - मॅच च काय ? शेवटी माझ्या संयमाला फळ मिळालंच ..
कॅच - मॅच च्या जोडीला स्क्रॅच करके आलं .. आणि शेवटी पॅच करके आलच .. कहाणी सुफळ संपूर्ण झाली

शेवटी
पूर्वी गाणी ही चुनरी, लेहेंगा (ते महेंगा शी मॅच होत म्हणून) वगैरे वर असायची .. आता आपण फॉल पर्यंत खाली घसरलोय ... त्याच्याखाली फक्त माती आहे

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

शेवटी च्या पुढे लई भारी

हहपुवा

सस्नेह's picture

14 Jul 2019 - 3:17 pm | सस्नेह

=)) =))

चांदणे संदीप's picture

15 Jul 2019 - 9:13 pm | चांदणे संदीप

लोल!

Sandy

सामान्यनागरिक's picture

22 Jul 2019 - 5:17 pm | सामान्यनागरिक

असली गाणी ऐकुन जर तुम्ही जिम करत असाल तर.........कदाचित शरीर वाढेल पण मानसिक खच्चीकरण होईल.
सलमान कुठल्याही जाहिरातीत दिसला तरी मी च्यानेल बदलतो. जो माणूस लोकांना चिरडुन उजळ माथ्याने वावरतो, त्याचे मी कदाचित काही बिघडवु शकत नाही. कमीत्कमी यवढं तर करुच शकतो.

मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन.

सामान्यनागरिक's picture

22 Jul 2019 - 5:17 pm | सामान्यनागरिक

असली गाणी ऐकुन जर तुम्ही जिम करत असाल तर.........कदाचित शरीर वाढेल पण मानसिक खच्चीकरण होईल.
सलमान कुठल्याही जाहिरातीत दिसला तरी मी च्यानेल बदलतो. जो माणूस लोकांना चिरडुन उजळ माथ्याने वावरतो, त्याचे मी कदाचित काही बिघडवु शकत नाही. कमीत्कमी यवढं तर करुच शकतो.

मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन.

यशोधरा's picture

22 Jul 2019 - 5:20 pm | यशोधरा

=))

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Jul 2019 - 3:00 pm | ज्ञानोबाचे पैजार

हा लेख वाचून ती दोन्ही गाणी पुन्हा (पुन्हा पुन्हा) ऐकली. कसली भारी गाणी आहेत दोन्हीही.

अहाहा :-
टच करके दिल मेरा क्युं स्क्रॅच किया रे,
कभी छोड दिया दिल, कभी कैच किया रे,

आज की शाम लगे पिक्चर का सीन कोई
मैं हीरो जैसा और तू हिरोईन कोई
स्टोरी कहाँ-कहाँ से, ओ घूम-घाम के, आ गई इमोशनमें
आजा, डूब जाऊँ तेरी आँखों के ओशन में, स्लो मोशन में

आगं आई गं.. काय रम्य कवी कल्पना आहेत दोन्ही.

आमच्या उमेदिच्या काळात समिर गालिबने अशीच युगप्रवर्तक गाणी लिहीली होती त्याची आठवण झाली

मधे त्या "ब्लु है पानी पानी पानी" ने असाच धुमाकुळ घातला होता.

पैजारबुवा,