वमोपांना जाऊन परवा दोन सालं झाली. यंदा पुण्यतिथी चुकवायची नाही म्हणून टपून बसणार होतो. तरीपण हुकली. लक्षांत राहिली नाही. वमोपांनी खाऊ घातलेली ऑगस्ट २०१८ ची पार्टी विसरलो. काय चरलेलो त्या दिवशी (खरंतर रात्री). दुष्काळातनं आल्यागत हाणत होतो. अक्षरश: फुकटात चरलो. तरीपण त्यांची तिथी विसरलो. खरंतर मी इतका काही कृतघ्न नाही. पण म्हणतात ना, ही दुनिया फक्त जिवंत माणसांचीच आहे.
वरुण मित्रा, जिथे असशील तिथे तुला योग्य मार्ग सापडत राहो.
-गा.पै.
गापै,
आपल्या हातात काय आहे!
काही गोष्टी एखादी व्यक्ती गेल्यानंतरच आपल्याला त्या व्यक्तीप्रती कळतात. तुम्ही नका इतके विचार करू. जे झाले ते आपल्या हाती नव्हते. तुम्ही दोन क्षण त्यांचेसोबत जगलात हे स्मृतीच्या कप्यात जतन होईलच, पण तुम्ही स्वःतला कृतघ्न समजू नका. दोन वर्षानंतरही तुम्ही आठवण काढत आहात यातच सर्व काही आले.
पाषाणभेद,
एका अर्थी तुमचं बरोबर आहे. चरतांना मला माहित नव्हतं की पार्टी फुकटांत आहे म्हणून.
मला फक्त वमोपांचा जाण्याचा दिवस लक्षांत ठेवून त्या दिवशी स्मरण करायचं आहे. आता पुढल्या वर्षी बघू.
आ.न.,
-गा.पै.
वरुण मित्रा,
आज ११ जुलै. तुला जाऊन तीन सालं झाली. जिथे असशील तिथे तुला योग्य गती लाभो. तू दिलेली ऑगस्ट २०१८ ची पार्टी आजही लक्षांत आहे.
तुझा मित्र,
-गामा पैलवान
भावपूर्ण श्रद्धांजली. सोसायटीत वावरायचे असते म्हणून एखाद पेग पार्टीत घ्यावा लागतो विशेषकर आयटी क्षेत्रात गुरुग्राम, नोयडा, पुणे, बंगलोर हैदराबाद मुंबई. मुलीही घेतात. आता तर वाढदिवस, साखरपुडा आणि लग्नात दारू ही ठेवलीच जाते. मध्यम वर्गीय घरात फ्रीज मध्ये दारूची बाटली दिसणे सामान्य बाब आहे. न घेणारे आमच्यासारखे मागासलेले ठरतात. माझे दोन अत्यंत जवळचे शाळेकरी मित्र चाळीसीच्या आत गेले. दोन्ही दारू पिणारे होते. एकाला लू लागली आणि एक हार्ट अटॅक (पहिला) गेला. त्यानंतर मित्रांच्या मैफलीत जाणेच सोडून दिले. मी आज जीवंत आहे त्याचे मुख्य कारण कुठलेही व्यसन नसणे.
खरी श्रद्धांजली हीच की घरात तरी किमान दारूची बाटली ठेऊ नये.
वरुण मित्रा, जिथे असशील तिथे तुला योग्य मार्ग सापडो. तुला सत्संगती लाभो. तुझं भलं होवो. तुला जाऊन आज सहा सालं झाली. आजूनही ऑगस्ट २०१८ चा कट्टा व पार्टी आठवते आहे.
-गा.पै.
प्रतिक्रिया
:-( आदरांजली.
:(
एक वर्षं झालं ....
ठाणे कट्ट्याला एकदाच भेटलो.
दोन सालं झाली ....
गापै,
खरंय तुमचं ....
वमोपांना स्मरणांजली
वमोपांना श्रध्दांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली.
शांती व सद्गती मिळो ....
शुभेच्छा व श्रद्धांजली
वमोपाना श्रद्धांजली! अतिशय