घनदाट गर्द रेशमी केशकुंतल

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
12 Jul 2019 - 6:10 pm

घनदाट गर्द रेशमी केशकुंतल
नेत्रास कोरले काजळ कि सोमल
तनुत रातराणीची मादक दरवळ
गात्रात मदनाची बेफाम सळसळ
*
नजर, कधि लाजरी, कधि नाचरी
रतिरुप,नखशीकांत तु लावण्य परी
वाकलेली लज्जेने तु अबोध रमणी
रुप चमके,जशी नभी शुक्रचांदणी
*
वसने ,गर्भ रेशमी अंगी ल्याली
तव उरास काचे ,भर्जरी काचोळी
देहात रानवारा,उसळे उधाण लाटा
गालास खळी,अशी तु लावण्यकळी
*
अबोल पौर्णीमा, अन धुंद चांदणी
जवळ श्रुंगार वेडी,बेधुंद रागीणी
नाचति वक्षावर, चकोर मंडले बेभान
मुग्ध ति कुजबुज अन चोरटे अलिंगन ,
*
रोम रोम नशेने फुलले,श्वासात श्वास भिनले..
एक मेकाच्या सहवासात,बहरुन यौवन आले
तारुण्य अन यौवनाचा प्राशितो मी कण नी कण
ओंजळीत दिले मी तुजला,तृप्तिचे लक्ष लक्ष क्षण

Avinash

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

12 Jul 2019 - 6:24 pm | जेम्स वांड

काका तुम्ही नाश्त्यात शिलाजीत खाऊन बसता का काय राव. अभिव्यक्ती आड यायला नको कोणाच्या म्हणून इतके दिवस बोलायची भीड होती पण आता न बोलता राहवत नाहीये, जरा आवराच आता हे तुमचे अतिरेकी कामुक लिखाण.

-वांडो

साहित्य संपादक/मालक जरा लक्ष घातलेत तर बरे होईल ही नम्र विनंती.

चंबा मुतनाळ's picture

12 Jul 2019 - 6:24 pm | चंबा मुतनाळ

अक्कुजी आपने दिल जीत लिया !!