✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

प्रियाच्या शरीरात शीरलेली दुर्गा गोगटे एक भयकथा

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Tue, 07/09/2019 - 10:08  ·  लेख
लेख
वासुदेव सोमण कोकणातून दहा वर्षा पूर्वीच पुण्याला स्थायिक झाले होते सोमणांचा मुख्य व्यवसाय भिक्षुकी लग्न -नामकरण मुंज आदी कार्ये ते करत असत अल्पसंतोषी स्वभाव होता यजमानांना व्यवस्थित सेवा देवे प्रसंगाचे पावित्र्य सांभाळणे हि त्यांची खासियत होती यजमान पण त्यांच्या ह्या वागण्यावर खुश असायचे ठरलेल्या बिदागी शिवाय त्यांना आणखीन पैसे पण मिळत असत पुण्यात वन रूम किचन चा ब्लॉक होता एक राजकारणी यजमान होते त्यांच्या कृपे मुळे त्यांना हा ब्लॉक सरकारी कोट्यातून अल्प दरात मिळाला होता * भार्या सुनंदा गृहिणी होती प्रिया नावाची एक गोड चेहे-याची मुलगी होती ती कॉलेज च्या दुस-या वर्षाला होती सौंदर्य व संस्कार यानाचा मिलाप म्हणजे प्रिया * त्या दिवशी प्रिया घरी आली प्रिया हातपाय धुवून घे मी तुझ्यासाठी सांजोपहार म्हणून पोहे केले आहेत मला नको आई-आज मी हॉटेल मध्ये पाव भाजी खाल्ली आहे काय हे -तुला माहीत आहे मला हॉटेलींग पसंत नाही आग कॉलेजच्या मित्रा नी आग्रह केला म्हणून गेले त्यांचे मन नाही मोडू शकले सुंदर ने प्रिया कडे पाहिले तिच्या डोळ्यात वेगळीच चमक तिला दिसली रात्री प्रियाला कामुक स्वप्न पडले स्वप्न बघता तिच्या अंगावर रोमांच उठले जागी झाली तेव्हा तिला एक नवी अनुभूती मिळाली होती तिचे शरीर मोहरून गेले होते चेहे-या वर एक निराळी चमक आली होती * सकाळी उठल्यावर ती आरशात आपाला चेहेरा न्याहाळत होती क्षणा क्षणाला चेहेरा बदलत होता चेहे-यावर सुदंरता राज्य करत होती आपण इतके सुंदर दिसतो याचे तिला नवीनच भान आले शरीरावरील उभार बघून ती आंनदीत होत होती हा तिला नवा अनुभव होता * रात्रीचे दहा वाजत आले होते पण प्रियाचा पत्ता नव्हता सुनंदा वाट पाहात होती प्रिया घरात आली नव्हती अधून मधून खिडकी तुन डोकावत असे ती खूप अस्वस्थ होती आग येईल ती किती अस्वस्थ होत आहेस -वासुदेव म्हणाला तुमच्या लक्षात आले का ? हल्ली प्रियाचं वागणं खूप बेताल झालं आहे काही धरबंध राहिला नाही वागण्यात बोलत असतानाच प्रिया प्रवेशली तिच्या दोन्ही हातात शॉपिंग बॅग्ज होत्या आग किती उशीर ? दहा वाजून गेलेत कुल डाऊन ममा प्रिया हसत म्हणाली बाबा तुमचे यजमान देशमुख आहेत ना त्याचा मुलगा संग्राम यांच्या बरोबर गप्पा मारत बसले होते- आणि हे काय नवीन कुल डाऊन ममा सुंनदा म्हणाली आणि हि खरेदी कुठून केली अन पैसे कुणी दिले संग्राम शी गप्पा मारता तो म्हणाला मला तुला गिफ़्ट द्यायचे आहे -आपण मॉल मध्ये जाऊ तिथे गेल्यावर म्हणाला तुला आवडेल ते खरेदी कर मग मी पण मनसोक्त शॉपिंग केले ठीक आहे -बाबा म्हणाले * मग कधी शॉपिंग कधी सिनेमे -कधी हॉटेलिंग -पब याचे सत्र सुरु झाले हा सारा प्रकार सुनंदा ला अस्वस्थ करत होता प्रिया सुनंदाला जुमानत नव्हती - त्या दिवशी प्रिया आठ वाजता घरी आली तिच्या तोंडाला विचित्र वास येत होता प्रिया हा कसला वास येत आहे ? आई म्हणाली आई मी बियर घेतली आहे -हल्ली सारेच घेतात असे म्हणत तिने कपाटावरची ब्याग खाली काढली अन त्यात ती कपडे ड्रेस भरू लागली आग कुठे निघाली आहेस ? आमचा आठ नऊ मित्र मैत्रिणीचा ग्रुप आहे आम्ही चार दिवस गोव्याला जाणार आहोत तिने वासुदेवाला बोलावले अहो ऐकलंत का हि गोव्याला जायला निघाली आहे प्रिया हा काय सारा प्रकार आहे ? असे बोलत असतानाच आठ नऊ मित्र मैत्रिणी चा घोळका घरात घुसला बाबा ना पहाताच तो काका नमस्कार असे म्हणाल आम्ही मित्र चार दिवस गोव्याला जाणार आहोत -तुम्ही प्रिया ला अनुमती द्या --तुमच्या होकारा शिवाय आंही तिला नेऊ शकत नाही वासुदेवाला काय बोलावे ते सुचेना सुनंदा कडे पाहात तो म्हणाला -ठीक आहे जपून जा सांभाळून राहा बाबा थ्यांक्यू -असे म्हणत प्रियाने बाबा ना मिठी मारली * प्रिया पूर्णपणे तोल सुटल्यागत वागत होती रात्री अपरात्री उशिरा घरात येणे कॉलेज ला दांड्या क्लब पब मध्ये वेळ घालवणे मित्रा सोबत रात्र घालवणे - तिचे असे वागणे बघून वासुदेव सुनंदा पण अस्वस्थ होत होते सुनंदाच्या डोळ्याचे पाणी खळत नव्हते काय झाले तिचे असे -किती शांत अन संस्कारी होती प्रिया -कुणाही नजर लागली असावी ? का कुणी करणी केली असेल तिच्यावर असेच जर चालू राहिले तर पुढे कसे होणार तिचे बाबा तिचे बोलणे ऐकत होते - पुरोहित महासंघाचे आप्पा राशिनकार अध्यक्ष होते शिवाय त्यांनी वासुदेवशास्त्री नेने महाराजांचा अनुग्रह पण प्राप्त केला होता वास्तुशास्रे -पत्रिका -उदक शांती वेद पुराण आदिवर त्याची हुकमत होती वासुदेव त्यांच्या कसे आला त्याने आपली सारे व्यथा त्यांना सांगितली - आप्पा नी प्रिया चे पत्रिका व ग्रहमान पाहिले व म्हणाले पत्रिका दूषित आहे -तिला लागण झाली आहे बाहेरची बाधा झाली आहे आपण असे करू वासुदेव ओंकारेश्वरा च्या बाजूला संख्ये गुरुजी राहातात -ते त्रिकाल ज्ञानी आहेत त्रिपिंडी श्राद्ध करण्यात ते विख्यात आहे भूत प्रेत बाधा करणी यावर त्यांच्या कडे उपाय आहेत - आप्पा व वासुदेवाने गुरुजींना सारे सांगितले तुमच्या घराण्यात कुणी कुलटा स्त्री होती का ? म्हणजे व्यभिचारी ?? नाही हो माझे व हिचे घराणे पहिल्या पासून पौरोहित्य व्यवसायात आहे -आमचा पिढ्यान पिढ्याचा तो वारसा आहे - मान्य आहे *तू असे कर आपल्या मूळ गावी जा घारी व सासुर वाडीला चौकशी कर घरातल्या वडिलधा-या माणसाशी वार्तालाप कर नक्की काहीतरी माहिती हाती लागेल * वासुदेव कोकणात आला सख्खे मावस चूलत सा-याकडे विचार पूस केली पण हाती काही लागले नाही तो सासुर वाडी ला आला तिथे त्याने सारी हाकिगत सांगितली खाटेवर बसलेल्या ८० वर्षाच्या गोदाक्का सारे ऐकत होत्या -त्याने वासुदेवाला जवळ बोलावले हे केव्हा घडले मला आठवत नाही पण आहे सासू वा पणजी सासू ला गोपाळ नावाचा मुलगा होता तो पण पुरोहित होता शांत स्वभावाचा मुलगा होता त्याचा विवाह बाजूच्या गावातील गोगट्या च्या दुर्गी शी झाला दुर्गी दिसायला सुंदर होती -बांधा उफाड्याचा होता सणाच्या दिवशी नवी साडी व अलन्कार घातले की कामदेवाचे रती शोभत असे लग्न झालल्यावर काही दिवस बरे गेले बाजरी हाट च्या निमित्ताने ती बाहेर पडू लागली तीच देखणं रूप गावातल्या टोळभैरवाना वेड लावू लागले नजरांनजरी झाली अन दुर्गेचे पाऊल घसरले आधी चोरट्या गाठी भेटी चालू झाल्या नंतर ती उघड पणे वाड्यावर जाऊ लागली काही वेळा रात्र पण ती ति रंगवत असे १००-२०० उम्ब-याच गाव हिचे चाळे डोळ्यावर आले आधी लोक दबक्या आवाजात बोलत असत आता उघड पणे बोलू लागले बाजार बसावी कुलटा -रंग ढन्ग करणारी अशी शेलकी विशेषणे लावत महिला तिचा उद्धार करत असत गोपाळ च्या परिवाराला ते सारे असह्य होत असे सासूने एकदा तिला बोलावले अन खडसावले आग काय वागतेस असे तू तुला काही लज्जा शरम ? आपले घराणं पुरोहिताच मान आहे आपल्या घराण्यास शोभते का तूला ?दुर्गा व गोपाळ ऐकत होते दुर्गा म्हणाली -सासूबाई सांगणार होते पण राहून गेले माझ्या उदरात आपल्या घराण्याचा वंश वाढत आहे हे ऐकताच सासूबाई कडाडल्या -निर्लज्य लाज नाही वाटत असे बोलायला गावभर उनाडक्या करते -त्याचा परिणाम पोटात वाढत आहे -अन हे पाप तू गोपालच्या शिरी फोडत आहेस लाज नाही वाटत -दुसरी एखादी असती तर गळ्यात धोंडा बांधून परसदारी विहीर आहे त्यात जीव दिला असता दुर्गा रडत म्हणाली सासूबाई मला क्षमा करा तुला ? अन क्षमा -ते शक्य नाही जा तोंड काळे कर - दुर्गा रात्र भर विचार करत होती आपल्या मुळे सासर महेर दोन्ही नावाला बट्टा लागला याचे तिला वाईट वाटले साधारण एक चा सुमार होता ती उठली व विहिरीवर गेली बाजूचा दगड तिने कास-याने गळ्यात बांधला सर्वांची क्षमा मागत तिने विहिरीत उडी मारून जीवन यात्रा संपवली सकाळी गावात बभ्रा झाला गाव विहिरी जवळ लोटला गोपाळ नाचक्की सहन नाही झाली त्याने जागेच प्राण सोडला पुत्र शोकाने हृदय फाटलेल्या माउलीं न पण जीवन यात्रा संपवले घर उदास झाले गावक-यांनी परसदारीची विहीर बुजवून टाकली दुर्गी चा आत्मा क्रिया कर्म न झाल्याने आताच घुटमळत राहिला आज्जीने वासुदेवाला सारे सांगितले * वासुदेव पुण्यास परतला सुनंदा ला त्याने सारी कहाणे ऐकीवाली तो आप्पाच्या घरी आला त्यांना पण सारे सविस्तर सांगितले वासुदेव व आप्पा संखे गुरुजींच्या कडे आहे त्यांनी सारी कथा सांगितली गुरुजी म्हणाले आपल्याला सुगीच्या आत्मयास मुक्त केले पाहिजे अमावास्यांच्या रात्री आपणनदी किनारी पूजा घालू त्रिपिंडी श्राद्ध व उदक शांती करू अन दुर्गीच्या आत्म्यास मुक्त करू - पूजा सम्पन्न झाली बारा वाजता यज्ञातून एक ज्योत प्रकट झाली दुर्गेच्या आकाराची तिने गुरुजींशी नामना केले व पंच तत्वात विलीन झाली * त्या नंतर प्रिया च्या वागण्यात लक्षणीय बदल झाला चेहे-यावर नैसर्गिक सात्विक भाव नांदू लागले * हरतालिकेचा सण होता साड़ी नेसून प्रिया तयार होती खुप सुंदर दिसत होती आईच्या डोळ्यात समाधानाचे भाव दिसत होते आई मी पूजा व उपवास करणार आहे कर ग छान नवरा मिळेल हो तुला -- * गंगाधर जोशी चा नातू अमेरिकेतून सुटी साठी घरी आला होता -अविनाश जोशी प्रियाला दाखवण्या चा कार्यक्रम होता प्रिया घरात सर्वाना पसंत पडली विवाह सपंन्न झाला - विमान तळाव्रर सर्वांचा निरोप ते जोडपे विमानात बसले प्रियाच्या बाजूच्या सीट वर एक तरुणी बसली होती हाय प्रिया म्हणाली मी प्रिया जोशी मी दुर्गा गोगटे-- दुर्गा -नाव ऐकल्या सारखे वाटत आहे शक्य आहे इतक्या दिवस तर मी तुझ्या शरीरात राहात होते - आता तू अमेरिकेत म्हणून आले असे म्हणत तिने प्रियाच्या शरीरात प्रवेश केला बाजूची सीट रिकामी झाली
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नाट्य

प्रतिक्रिया द्या
24623 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

भयकथा

उपयोजक
Wed, 07/10/2019 - 15:05 नवीन
बैठे बैठे क्या करें? करना है कुछ काम, शुरु करो भयकथा लेके मिपाका नाम।
  • Log in or register to post comments

खिलजी साहेब विमानात आहेत

हस्तर
Wed, 07/17/2019 - 14:06 नवीन
खिलजी साहेब विमानात आहेत सध्या
  • Log in or register to post comments

माहिती करता धन्यवाद...

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 07/18/2019 - 17:04 नवीन
त्यांना इमानात शेजारी दुर्गी बसली नाहीयेना चेक करायला सांगा. असली तर झपाटून टाका म्हणावं दुर्गीला पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

हैदराबाद पूर्ण उफाळून येईल मग

हस्तर
गुरुवार, 07/18/2019 - 18:02 नवीन
हैदराबाद पूर्ण उफाळून येईल मग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा