✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कुरळ्या बटावर माझ्या

अ — अविनाशकुलकर्णी, Sun, 06/30/2019 - 09:37
तू" रेशमी सुगंधात माझ्या होऊनि सुगंध दरवळतोस तू कुरळ्या बटावर माझ्या होऊनि वारा ऊनाडतोस तू * टपो~या डोळ्यात माझ्या,होऊनि काजळ राहतोस तू गो~या भाळावरी माझ्या होऊन बिंदि विराजतोस तू * लाल अधरावरी माझ्या ,होऊनि गीत गुणगुणतोस तू गळ्यात माझ्या होऊनी मोतियाची माळ सजवतोस तू * रंगी बेरंगी चुड्यात माझ्या होऊनि सप्तरंग उतरतोस तू पायातील पैजणात माझ्या होऊन घुंघरु निनादतोस तू * गो~या तनुवर माझ्या होऊनी घननिळ बरसतोस तू रोम रोमात माझ्या होऊनी निशीगंध बहरतोस तू * हळव्या ह्या मनांत माझ्या होऊनी बेधुंद लहरतोस तू ह्रुदयातिल स्पंदनात माझ्या होऊनी सप्तसुर झंकारतोस तू आवि्ना

प्रतिक्रिया द्या
2099 वाचन

💬 प्रतिसाद (4)

मस्त अकु काका

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 07/01/2019 - 11:26 नवीन
इथे बटावर हा शब्द इंग्रजी का मराठी अर्थाने घ्यायचा? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

मग "कोवळ्या बटावर" असे लिहावे

टवाळ कार्टा
Mon, 07/01/2019 - 14:53 नवीन
मग "कोवळ्या बटावर" असे लिहावे लागेल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

फार सुलभ भावनांना वाट करून दिली आहे

जॉनविक्क
Mon, 07/01/2019 - 14:57 नवीन
  • Log in or register to post comments

अक्कू काका

खिलजि
Wed, 07/03/2019 - 16:19 नवीन
अक्कू काका मी आणि माझी रंगबिरंगी कविता ती आणि तिच्या बटांचा गुंता मी तिला बघतो अन बटांची कविता लिहितो तीच्या बटा अश्याच झुलत असतात वाऱ्यावर आणि माझ्या कविता असतात प्रतिसादांच्या माऱ्यावर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा