✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गझल : पुन्हा एकदा...

B — bhagwatblog, Tue, 06/18/2019 - 15:15
मा‍झ्याच स्वप्नांना लावला मी सुरूंग संकल्प सोडला अर्धवट पुन्हा एकदा शर्थीचे प्रयत्न सत्यात आले नाहीत निश्चयाचे संपले बळ पुन्हा एकदा स्वप्नांची लचके तोडली मी स्वत: पराभवाने दिली मात पुन्हा एकदा कष्टाची घागर भरली पुन्हा संपूर्ण अपयशाचे भरले रांजण पुन्हा एकदा प्रयत्नाचा डोंगर उभारला मी स्वत:च नियतीनेच दिला घाव पुन्हा एकदा सुखांना जिंकण्याचा भास मला झाला दु:खाने केले गर्वहरण पुन्हा एकदा काळेकुट्ट ढग अन दाटलेल आभाळ संकल्पाचा सोडला बाण पुन्हा एकदा

प्रतिक्रिया द्या
5653 वाचन

💬 प्रतिसाद (9)

छान !

चौथा कोनाडा
Mon, 06/24/2019 - 22:58 नवीन
छान ! स्वप्नांची लचके तोडली मी स्वत: ऐवजी स्वप्नांचे लचके तोडले मी स्वत: असं चालणार नाही का ?
  • Log in or register to post comments

धन्यवाद

bhagwatblog
Tue, 06/25/2019 - 12:07 नवीन
"स्वप्न" शब्दाचे अनेकवचनी लिहायचे होते त्यामुळे "स्वप्नांची लचके तोडली मी स्वत:" असे लिहिले आहे. प्रतिसादा साठी धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

"स्वप्नांची लचके" असे

चौथा कोनाडा
Tue, 06/25/2019 - 16:24 नवीन
"स्वप्नांची लचके" असे बोलण्यात / ऐकण्यात / वाचण्यात आले नव्हते आता पर्यन्त. उच्चार देखिल गैरसोयीचा आणि विचित्र वाटतो आहे. आपण नविन शब्द प्रयोग निर्माण करत असाल तर हार्दिक शुभेच्छा ! (आज काल मराठीची काळजी वाटते )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: bhagwatblog

असो

अभ्या..
गुरुवार, 06/27/2019 - 12:31 नवीन
(आज काल मराठीची काळजी वाटते )
नुसती मराठीचीच नाही तर त्यातील घासून गुळगुळीत झालेले कंटेंट, चुकीचे सादरीकरण, त्यातील चुका दाखवल्यावरही मान्य न करता मीच सांगतोय ते बरोबर, नाहीतर द्या तुम्हीच उदाहरण अशा नवलेखकी वृत्तीची जास्त काळजी वाटतेय. ते ही एक असोच म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

कल्पना ठीक आहेत. पण माफ करा

राघव
Wed, 06/26/2019 - 19:18 नवीन
कल्पना ठीक आहेत. पण माफ करा तांत्रिकदृष्ट्या ही गझल नाही. तसेच थोडी गेयता कमी पडते आहे. कदाचित काही शब्द बदल करून फरक पडावा. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

राघव,? कृपया एखादे उदाहरण

bhagwatblog
गुरुवार, 06/27/2019 - 12:25 नवीन
राघव,? कृपया एखादे उदाहरण द्याल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

कल्पना ठीक आहेत. पण माफ करा

bhagwatblog
Mon, 07/01/2019 - 12:11 नवीन
राघव,,तुम्ही सांगितल्या प्रमाणे ही तांत्रिकदृष्ट्या गझल नाही. जाणकारांचे हेच मत आहे. धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: bhagwatblog

प्रतिसादा साठी धन्यवाद चौथा

bhagwatblog
गुरुवार, 06/27/2019 - 12:00 नवीन
प्रतिसादा साठी धन्यवाद चौथा कोनाडा, राघव... "स्वप्नांची लचके" लवकरच बदल करतो. शब्द एखादे उदाहरण द्याल का?
  • Log in or register to post comments

सुखांना जिंकण्याचा भास मला

मदनबाण
Sun, 06/30/2019 - 10:56 नवीन
सुखांना जिंकण्याचा भास मला झाला दु:खाने केले गर्वहरण पुन्हा एकदा वा...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा