Skip to main content

हे मला माहित नव्हते!! आपणास??

हे मला माहित नव्हते!! आपणास??

Published on बुधवार, 29/05/2019 प्रकाशित
गेल्या आठवड्यात माझं बँक ऑफ बडोदाचे एटीएम कार्ड हरवले. माझ्या लक्षात येताक्षणी मी ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून तात्काळ ब्लॉक केलं आणि नवीन एटीएम कार्डसाठी साठी नोंदणीसुद्धा केली. छोटासा व्यवसाय असूनही माझे सगळे कलाईन्ट कॅशलेस व्यवहार करतात. मलाही सोपं वाटत ते. पण स्वॅप मारायला कार्डच नसेल तर लोचा झाला. नवीन कार्ड यायला पंधरा दिवस लागणार हे माहीतच होतं. तर माझी पंधरा दिवसांसाठीची फरफट सुरु झाली. महिनाअखेर असल्याने येणारे पैसे मागत सुटलो. ते बँकेत जमाही होत गेले. पण काढणार कसे? एक युक्ती सुचली कि मित्राच्या अकॉउंटला टाकून त्याच्याकडून घ्यावे. एकदा केलंही. पण प्रत्येक वेळी कोणता मित्र आपल्यासाठी रिकामा असणार. काल बँकेत गेलो आणि कार्ड डिलिव्हरीचं स्टेटस विचारलं तर ते म्हणाले पुढील पंधरा दिवसांत पत्त्यावर येऊन जाईल. थंडगार एसी मध्ये बसून पंधरा दिवस बोलताना त्यांना काहीच वाटत नाही. वाटणार तर कशाला? वेळ माझी गंडलीय. मग मी त्यांना पासबुक साठी नोंदणी केली तर किती दिवसात येईल विचारले. उत्तर आलं तात्काळ मिळेल. अरे वाह!!! करा नोंदणी अन द्या पासबुक म्हणालो. ते म्हणाले पासबुक पाहिजे कशाला? मी-पैसे काढायला! ते- त्याची गरज नाही. माझ्यासाठी नवीन माहिती पुढीलप्रमाणे.... जर कार्ड नसेल आणि पासबुकही नसेल तर तुमच्या बँकेच्या कोणत्याही ब्रॅन्चमध्ये कसलीही स्लिप ना भरता फक्त आधार किंवा पॅन दाखवून बायोमेट्रिक पद्धतीने पैसे काढता येतात.

याद्या 6452
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

अनेक बँकांत इंटरनेट बँकिंगद्वारे कोणत्याही मोबाईलफोनवर पैसे ट्रान्सफर करून आलेल्या कोड्सचा वापर करून एटीएममधून कार्ड (किंवा खातेही) नसताना थेट विथड्रावल करता येतं. बँक ऑफ बरोडामध्येही ही सोय आहे असं आंजावर दिसतंय.

तुम्हाला चेकबुक म्हणायचय का ?

१. जर कार्ड नसेल आणि पासबुकही नसेल तर तुमच्या बँकेच्या कोणत्याही ब्रॅन्चमध्ये कसलीही स्लिप ना भरता फक्त आधार किंवा पॅन दाखवून बायोमेट्रिक पद्धतीने पैसे काढता येतात. तुमच्या नेहमीच्या बँकेतील मॅनेजर तुम्हाला कोणतीही फोटो आयडी (उदा : ड्रायव्हिंग लायसेन्स) स्वीकारून एक "लूज चेक (एक चेक)" देऊ शकतो. तो बेअरर चेकच्या स्वरूपात वापरून खात्यातून नकद काढता येते. २. सावधगिरी म्हणून दोन बँकांत खाते ठेवावे, म्हणजे ऐनवेळेस अडचण होणार नाही.

आमच्या गावात महाराष्ट्र ब्यांकेने दोन कार्यकर्ते नेमले आहेत. जे बायोमेट्रीक मशीन घेऊन घरोघरी जाऊन पैसे देने घेणे व्यवहार करतात. त्यात त्यांना टक्के वारी मधे लाभ भेटतो. एक प्रकारचा फिरता एटीएम प्रकार

In reply to by चौथा कोनाडा

ते तपासून पहायला हवे, नाही तर आमच्या पैशातूनच आमाला मुंबई दाखवत असले म्हणजे झालं.

परवाच कुठेतरी वाचलं की YONO अँप वरून काहीतरी code generate करून जवळच्या एटीएम मधून विना कार्ड पैसे काढता येतात. प्रत्येक बँकेची अशी काही सुविधा आहे का बघायला हवी. म्हणजे शाखेत न जाता पैसे मिळवण्यासाठी.