✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

धून वाजवी बासरीवाला

ब — बिपीन सुरेश सांगळे, Sat, 05/11/2019 - 23:01
धून वाजवी बासरीवाला ------------------------------------------------------------------------------------------ धून वाजवी बासरीवाला रास रंगला यमुनेच्या काठाला पुनव प्रकाशी सारे नाहले दंग नर्तनी सारे विसरले भिडे टिपरी कोणाची कोणाला धून वाजवी बासरीवाला जळात लहर अंगात बिजली मी तू पणाची भावना विझली असीम शांतता मनाच्या तळाला धून वाजवी बासरीवाला आता राधा हरी अन हरी राधा गाठ जिवाशिवाची हि भलतीच बाधा स्वर्गीय नाद तो पोचे टिपेला धून वाजवी बासरीवाला बिपीन Bip499@hotmail.com

प्रतिक्रिया द्या
1445 वाचन

💬 प्रतिसाद (2)

छान आहे!

इरामयी
Sun, 05/12/2019 - 20:02 नवीन
पौर्णिमेच्या प्रकाशात रात्रीच्या वेळी अंगणात खेळण्यातली मजा आता जवळजवळ विस्मृतीत गेली आहे. या कवितेच्या निमित्ताने त्या गोष्टीची आठवण झाली. आमच्या मामाच्या गावी आम्ही मुली लहानपणी कोकणात खांब-खांब-खांबोली , लंगडी, फुगडी , लपंडाव आदी खेळ खेळायचो. कविता आवडली.
  • Log in or register to post comments

| इरामयी

बिपीन सुरेश सांगळे
Sun, 05/12/2019 - 23:52 नवीन
| इरामयी खूप धन्यवाद लेखनाशी कोण कसे रिलेट होते ते सांगू शकत नाही . तुम्हाला बालपणीच्या अंगणातल्या खेळण्याची आठवण यामुळे आली , हे वाचून बरे वाटले एक विनंती - बहावा हि कथा वाचली नसेल तर कृपया ती वाचावी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा