सरमद कशानी
कशानी हे मराठी क्रियापद नाही भारतात आलेल्या एका इराणी अवलीयाचे नाव आहे. 'सरमद कशानी' भारतात येऊन प्रेमळ आणि उदार भारतीय सम्राट औरंगजेबाने फाशीवर चढवलेला एक इराण मार्गे आलेला अर्मेनियन नग्न अवलिया होता.
मूळचा कदचित ज्यू असून मुस्लिम धर्म स्विकारून त्यागला अथवा सोबतच राम - लक्ष्मण स्विकारले, व्यापारासाठी भारतात आल्यावर त्याला अभयचंद नावाचा जिवश्च मित्र भेटला सर्वस्वाचा त्याग करून अभयचंदा सोबत त्याने भारत भ्रमंती केली. काव्य स्पिरिच्युआलीझम मध्ये त्याला रस असावा. पण धर्मांधतेला प्रखर आव्हान देण्याचा स्वभाव असावा. मुघल राजपूत्र दारा शिकोहला सोबत काही प्रमाणात तरी त्याची उठबस झाली असावी.
बादशहा औरंगजेबाने सत्तेवर आल्यावर या दिगंबर फकीराला अटक केली आणि शांततेच्या धर्माच्या ईश्वराच्या निंदेच्या आरोपावरून त्यास फाशी दिले.
त्याचे काही काव्य आणि अनुवादही असवेत. नास्तिक ईश्वर निंदेचे वेगवेगळे मार्ग शोधतात धर्मांध औरंगजेबाला त्वेष देणारी त्याची ईश्वर निंदेची त्याची तर्हाही निराळीच होती. शांततेच्या धर्माच्या ईश्वराची एकेरी एकाधिकारशाही असल्याचे पुन्हा पुन्हा उद्घोषित करताना ' जगात (दुसरा) ईश्वर नाही पण अमुकच ईश्वर आहे' अशा उद्घोषणेचे स्वरुप असावे. हा अवलिया सरमद त्या उद्घोषणेचा पहिला अर्धाभाग 'जगात ईश्वर नाही..' एवढाच म्हणत असे . जेव्हा बादशहाने उर्वरीत भाग म्हणण्याची सक्ती केली तेव्हा मी उद्घोषणेच्या पहिल्या भागानेच खूप भारावलो आहे त्यामुळे दुसर्या भागाकडे पोहोचण्यास अवकाश आहे असे गंमतीशीर उत्तर मोठ्या हिमती ने दिले.
आणि एका नागड्या नास्तिकाने आपल्या स्वातंत्र्यासाठी जिवाची बाजी लावली. शांततेच्या धर्माचे आणि प्रेमळ बादशहाचे औदार्य उजागर करून इतिहासाच्या पानांवर भाषणस्वातंत्र्यासाठी जिव गमावलेल्यांच्या यादीत सुवर्णाक्षरांनी नोंद करून ठेवली.
संदर्भ https://en.wikipedia.org/wiki/Sarmad_Kashani
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
गड्डा साहेब
गड्डा साहेब
सहमत
एकांगी लिहिणे हा हक्कच
भंकस बाबा, माहितीगार