भीती!
लेखनविषय (Tags)
भीती.. सर्वव्यापी, सार्वकालिक, रूप बदलत व्यापून टाकणारी भावना. भीतीची भावना ही चांगली गोष्ट नाही असं आपल्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षात तसं नाही. काही प्रकारच्या भीती चांगल्या असतात. या भूतलावर आपलं अस्तित्व टिकण्यासाठी ज्या गोष्टी उपयोगी ठरल्या त्यापैकी भीती ही महत्वाची गोष्ट आहे. ती जर नसती तर fight, flight or freeze या प्रतिक्रिया देऊच शकलो नसतो आणि आपलं अस्तित्व कधीच सम्पलं असतं.
आदिमानवाच्या आणि आपल्या जीवनमानात झालेल्या बदलामुळे आज भयाची कारणं बदलली आहेत. पण प्रतिक्रिया, मनोकायिक पातळीवरच्या तशाच आहेत. भीतीचा ट्रिगर दाबणाऱ्या घटना आणि त्यांची संख्या मात्र कायच्याकाय वाढली आहे आणि भीतीचं व्यामिश्र स्वरूप देखील. आजकाल भीती रूप बदलून समोर आल्यासारखी वाटते. आणि फ्रीझ च्या प्रतिक्रियांची संख्या वाढत जातेय.
ही किंकर्तव्यमूढ अवस्था ही भयाचा सर्वात फसवा परिणाम. अनेकदा त्याग, धैर्य वगैरे सद्गुणांचे मुखवटे लावून समोर येतात. आणि परिस्थिती आणखीच अवघड होत जाते.
आणखी एक लक्षात घेऊ. भीती जरी वर्तमानात अनुभवत असलो तरी ती वर्तमानात जगत नाही. ती कायम जगते भविष्यात. असं झालं तर? हा तो भविष्य काळ. आणि जेंव्हा वाहत्या, पुढे ही एकच गती असलेल्या आयुष्यात आपण भविष्यातल्या गोष्टींच्या भयाने एका जागी अडकून पडतो तेंव्हा वर्तमानाचा नकळत भूतकाळ होतो, काळाचा वर्तमानाचा सांधा निखळतो आणि आयुष्य दुभंगते.
Hitting it home hard म्हणतात तसा हा विषय अप्रतिम पणे पोचवणारा सिनेमा म्हणजे Mine. नेमके सूत्ररूप संवाद, अप्रतिम अभिनय, तंत्रज्ञानाचा अप्रतिम नेमका वापर. एकूण मांडणी जीए च्या कथेसारखी. प्रसंग साधे रोजच्या आयुष्यातले पण मूलभूत, पूर्ण आयुष्य वेढून राहणाऱ्या विषयावर भाष्य करणारे. पहायला हवाच असा सिनेमा.
-अनुप
प्रतिक्रिया
मस्त लिहिलंय, पण गुर्जी जरा
हा चित्रपट परिचय आहे का ?
:)
प्लॉट रंजक दिसतोय..
माझी सिनेमा पुस्तक बद्दल
खरंय:)