मित्र दारू घेऊन येतात... तुमच्या प्रतिभेला आवाहन आणि आव्हान

चामुंडराय's picture
चामुंडराय in काथ्याकूट
27 Apr 2019 - 7:52 am
गाभा: 

आमची प्रेर्ना

मित्र दारू घेऊन येतात...

तुमच्या (काव्य) प्रतिभेला आवाहन आणि आव्हान देखील.

खिलजीभायच्या "माणसे मित्र बनून येतात" चे विडंबन करायला घेतले आणि अचानक एक कल्पना सुचली.
"मित्र दारू घेऊन येतात" अशी मध्यवर्ती संकल्पना घेऊन "आणि झिंग सोडून जातात" किंवा "आणि नशा सोडून जातात" किंवा आणखी काही सुचेल ते असा शेवट करायचा, मधल्या ओळी मात्र रिकाम्या ठेवायच्या.

आता तुम्ही काय करायचे तर तुम्हाला जसे सुचेल तसे मधल्या ओळी पूर्ण करायच्या आणि इथे प्रतिसादामध्ये टाकायच्या. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने वेगवेगळ्या कल्पना सुचतील. प्रत्येकाचे अनुभव वेगळे, आवाका वेगळा, प्रतिभा वेगळी त्यामुळे एकंदरीतच वाचायला मज्जा येईल.

दारुकामाचे काही प्रसंग उदाहरणार्थ सांगायचे झाले तर कोणा मित्राची बॅचलर्स पार्टी, कोणाचे प्रोमोशन तर कोणा एकाच्या सासऱ्याला लॉटरी लागली, कोणा एका मित्राची बायको माहेरी गेली किंवा येनाराय, येनाराय असा गजर करणारा परंतु क्वचितच येणारा तुमचा एखादा एनआरआय मित्र ड्युटी फ्री मधून दोन इम्पोर्टेड खंबे घेऊन आला आहे इत्यादी. अशा आणि इतर प्रसंगांना समोर ठेवून तुमची काव्य प्रतिभा या गाळलेल्या ओळी प्रसवू दे अशी मदिरा देवीला ओठी लावून प्रार्थना.

चला तर मग, उचला तो पेग आणि लावा ओठाला....नो नो ... उचला ती लेखणी .. आपलं ... उचला ते बोट आणि लावा कळफलकाला.

केशवसुतांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून

लिखाणाने भरू द्या मिपा
लेखणी भरभर चालू द्या...
बघूनीया प्रतिभा तुमची
धुंद आम्हा होऊ द्या...

क्विता चालू

मित्र दारू घेऊन येतात
.
.
.
.
आणि झिंग सोडून जातात ...

मित्र दारू घेऊन येतात
.
.
.
.
आणि नशा सोडून जातात ...

मित्र दारू घेऊन येतात...

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

27 Apr 2019 - 10:13 am | महासंग्राम

अजुनी बसुनी आहे हलता गडी हलेना
संपले खंबे तरीही याला काही चढेना

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Apr 2019 - 1:58 pm | ज्ञानोबाचे पैजार

मित्र टाईट होऊन येतात
आणि आपल्याला अजिबात चढली नाही
असे दाखवण्यासाठी
स्थिर उभे रहाचा प्रयत्न करत
लालभडक डोळ्यांनी
नजर चोरून पहात
माकडचाळे करत सुटतात

मित्र टाईट होऊन येतात
सोसायटीच्या वॉचमन वर
उगाच डाफरून
दुसऱ्याच कोणाच्या तरी
घराची बेल वाजवत
रात्रभर घर शोधत बसतात
उजाडताना वॉचमनच्याच मदतीने
एकदाचे घरी पोचून
रात्री पर्यंत गुडूप होतात......

पैजारबुवा,

सोन्या बागलाणकर's picture

28 Apr 2019 - 8:46 am | सोन्या बागलाणकर

ग्रेट पैजारबुवा!
आवडली.

नाखु's picture

27 Apr 2019 - 3:22 pm | नाखु

दारु प्यायला बसतात आणि....
शिग्रेटलाच "अग्नि" शप्पथ आणा भाका देतात...
तूच आपला भाऊ म्हणून यजमानालाच तासतात...
मुद्दा पटवायला सुरूवात इंग्रजी तून करून शेवट हमखास मराठीतून शिवीनेच करतात..
एखाद्या असफल प्रेमीला मुद्दाम आठवण काढून अमूकतमूक तुझ्या लायकीचीच नव्हती म्हणून जखम ताजी करतात....
मित्र जरी कितीही प्यायले तरी मी कधीतरीच घेतो हे (फक्त) न घेणार्यालाच पटवत असतात.....
कधी कधी मित्रांचेही मित्र असतात पिण्याच्या कार्यक्रमाला बरोबर उगवतात,बिल देण्याअगोदर महत्त्वाचे काम आठवल्या मुळे निघूनही जातात.....
तरी काही मित्र असतातच शिल्लक राहिलेल्या चिवड्यातील जास्तीच्या तिखटमीठ मसाल्यासारखे कधीही अलग न होणारे,शिलकीचा माल अज्जात उचलला तरी चकणा म्हणूनच कामी येणारे..

असतात काही मित्र....

कोरडाठाक नाखु

महासंग्राम's picture

27 Apr 2019 - 3:52 pm | महासंग्राम

मित्र स्वतः दारू बनून येतात
सदैव दारूचे गात गोडवे
तोंडात फक्त चकणा ठेवतात,
काही पेग मध्येच
आज गाडी तेर्रर्रर्रर्रर्ररा भाई चालयेगा म्हणत
बत्त्या गुल करतात ...

काही फुकटे मित्र बनून येतात
दारू न पिता
फक्त चकणा खाऊन
बारभर कान खात बसतात
आपल्याला चढलेली असतांना
जुन्या प्रेयसीची आठवण काढून
पुन्हा गुडूप होतात......

माणसे मित्र बनून येतात...

दुर्गविहारी's picture

28 Apr 2019 - 5:16 pm | दुर्गविहारी

कवी लोकांनी आता काथ्याकूट वरही आक्रमक केले काय ??
;-)))

दुवि सर, चुकून हा धागा काथ्याकूट मध्ये पडला त्या बद्दल क्षमस्व.

परंतु काथ्याकूट मध्ये आहे म्हणून गाळलेल्या ओळी खरडायला काकू करू नका.

रच्याकने : मिपावर गवि, मुवि, दुवि अश्या बऱ्याच " वि " ची मांदियाळी आहे असे निरीक्षण नोंदवतो.
मिपाविहारी असा नवीन आयडी घ्यावा का?

खिलजि's picture

29 Apr 2019 - 2:36 pm | खिलजि

मित्र दारू घेऊन येतात

एकाएकी रामनाम जपणारे

थोड्यावेळाने का होईना

सर्व योजनेत सामील होतात

कुणी थेम्ब शिंपडते चारी दिशेला

तर कुणी देत असते अलोट मैत्रीच्या आणाभाका

दोन खंब्यामध्ये बरेच अंतर असते

कधी कमी होते तेच कळत नाही

कुणीतरी वाट बघतं असतं घरी

घड्याळ बाजूला काढून ठेवतात

मित्र दारू घेऊन येतात

दारू तिचे काम करते ,, (कामवासना ) जागृत होते

मग मित्र थेट पारू घेऊन येतात

अलंकार भिरकावून

केवळ व्यभिचारी बनून

रात्रभर खेळत बसतात

उजाडताना परत

सांसारिक अंधकारात

गुड्डूप होतात ...

मित्र आधी दारू आणि मग पारू घेऊन येतात

सर्व आणाभाकांचा , कर्तव्यांचा सर्वनाश करतात

आपण सुरुवात करतो ,,, मित्र फक्त घात करतात .............

बी.डी.वायळ's picture

1 May 2019 - 12:44 pm | बी.डी.वायळ

मित्र दारू घेऊन येतात
मैफिल गावाबाहेर शेतात
दारु पिऊन धुंद होतात
कोणी बेसूर गाणी गातात
कोणी हळूच ताल धरतात..
माणसे मित्र बनून येतात...
कधी वाइट बनून जातात.. ( दारुमुळे)

ज्या कोणी या धाग्याच्या पडक्या झोपडीला तुमच्या काव्य प्रतिभेची सोन्याची विट लावली आणि तसेच वाचन करण्यासाठी हजेरी लावली त्या सर्वांसाठी ...

जोहार मिपाकर जोहार। तुमच्या प्रतिसादांचे आभार ।
बहु संतुष्ट जाहलो। तुमच्या प्रेमासाठी आलो।।

जालिम लोशन's picture

3 May 2019 - 9:50 pm | जालिम लोशन

न पिताच चढली.