#आई
#आई
आई आज तुझ्या आठवणी मध्ये रमून रहावस वाटतं
तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगावासा वाटतं .....
किती मस्त झाले असते जर गेलेला वेळ परत आला असता
तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण पुन्हा जगायला भेटला असता....
लहानपणापासून माझे अडखळणारे पाऊल सांभाळले
वाट चुकलो तेव्हा बोटाला पकडून सरळ चालायला शिकवले....
आमच्या भोवती असताना कधीच स्वतःचा विचार तु केला नाही
कितीही दुःख असले तरी चेहऱ्यावर कधीच दाखविले नाही ...
कधी कधी वाटतं फक्त स्वतःच्या सुखासाठी घर सोडले
म्हातारपणात आधार न देता तुला मी एकट टाकले ...
सतत वाट बघत उभी असतेस डोळे लावूनी दारी..
माझही चुकत कारण येतो फक्त पाहुणा बनुनी घरी ....
थकल्या शरीराने करतेस माझ्या साठी गोड खिर...
आजही तशीच बावरतेस जर घरी यायला झाला मला उशिर....
आज सगळं असुन माझ्या कडे वेळ मात्र नाही तुझ्या साठी
तु मात्र वेदना विसरून धडपडत असतेस फक्त माझ्या साठी....
मनातून मीही खचतो जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
हरवलेल्या नात्यांची आणि जबाबदारीची जाणीव करुन देते..
निरोप घ्यायची वेळ येते तेव्हा डोळे तुझे पाणावतात
येशील परत कधी हाच प्रश्न सारखा विचारतात ...
थकल्या पावलांनी अलगद परत मागे तु फिरतेस
लपवत जरी असली तरी आतून मात्र रडतेस....
पुन्हा एकदा एकटीच चाललीस स्वताला सावरत
जड झालेलं मन आणि भावनांना आवरत...
Coffee आणि ति
Coffee आणि ति२