अंदाज तुमचा, आमचा, मिपाकरांचा.
आजवर मिपाच्या मुख्य फलकावर वेगवेगळ्या प्रकारचे धागे काढायची संधी मिळाली ( थ्यांक यू मिपा!) पण राजकारणाशी संबंधित धागा मात्र कधी काढला नव्हता. तेव्हा, आज राजकारणाशी संबंधित एक धागा. होऊ द्या खर्च.. वगैरे, वगैरे! आणि इतकी वर्षं मिपावर असून एकही राजकारण विषयक धागा काढला नाही, ह्याची एक मिपाकर म्हणून... वगैरे, वगैरे सुद्धा.
स्वतःची राजकारण विषयक मतं मिपावर मांडली नसली (मत असलं तरी ते मांडण्याइतका माझा अभ्यास नाही ) तरी मिपावरील राजकारण विषयक धागे वाचायला - त्यातले वितंडवाद टाळून - मला प्रचंड आवडतं. ह्या धाग्यांची वाचनसंख्या पाहता, बरेच जण हे धागे वाचत असावेत. मिपावर राजकारणाचा अभ्यास असणारे जाणकार आहेत -(त्यांची मते जाणून घ्यायची उत्सुकता आहेच)- तरी, अजून यंदाच्या निवडणुकांबाबत अंदाज वर्तवणारा धागा आला नाही बघता, म्हटलं, असा एक धागा काढावा. निवडणुकीच्या वातावरणात, कुठे कोण निवडून येईल? राज्य पातळीवर, देश पातळीवर कोणता पक्ष आपलं अस्तित्व पुराव्यानिशी शाबीत करेल, असं तुम्हांला वाटतं?
बोला, बोला! आपापले अंदाज, अपेक्षा, आकडेवारी मांडा मिपाकर मंडळी. फक्त नो वितंडवाद आणि नो तू तू मी मी. ओके? धन्यवाद!
माझा लिंबूटिंबू अंदाज आणि अपेक्षा: मागील वेळी भाजपची जशी लाट होती, तशी ह्या वेळी नसेल, तरीही बरेच ठिकाणी निसटते का होईना, भाजपाच्या पदरात विजय पडतील. काँग्रेसची टक्केवारी वाढेल पण दिल्ली का दरबार दूर होगा. काही प्रादेशिक पक्ष आणि त्यांची स्वतःच्या फायद्याची आणि देशाला रसातळाला नेणारी राजकारणं थांबली, संपली तर बरं होईल.
शेवटी, देशाची भरभराट व्हावी, सामान्य माणूस सुखी व्हावा, भ्रष्टाचार कमी व्हावा, अशा आपल्या माझ्या माफक अपेक्षा.
तेव्हा, सुरू हौद्यात चर्चा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
_/\_
महाराष्ट्र
सुधारीत तक्ता
एकदम मस्तं
मी गुगल ड्राईव्हवर डाटा बेस
बापरे हे तर ....
तातपुरत्या फायद्यासाठी इतका
टेबल मिपावर जसं च्या तसं
टेबल मिपावर जसं च्या तसं
टेबल जसेच्या तसे दिसायला हवे
तुमच्या पध्दतीत या सगळ्याला
असे पण काही मतदार असतात
हेच ते तरते मतदार. हे
शंभरी पार केल्याबद्दल अभिनंदन.
भाजपा
मावळ, मुंबई काय म्हणतायत?
धागा आणि त्यावरील प्रतिसाद दोन्ही आवडले.
आपण निवडणूक निकाल ऐकताना बर्
फेज ३ नंतरची परिस्थिती
महाराष्ट्र फेज ४ दुपारी २ वाजता
फेज ४ दुपारी ३:३० वाजता
फेज १,२,३ एकत्रीत मतदान टक्केवारी
केरळमधे सगळीकडे मतदान
भागवत सायेब,
कोण किती कुठ?
माझा अंदाज...
त्यात कॅब ड्रायव्हर,
अंदाज खरा ठरलाय...
फेज ४ रात्री ८:३० वाजता
राजस्थान, मध्यप्रदेश व
केरळ, तामिळनाडू, कर्नाटका,
विधानसभा आणि लोकसभा
फिर एक बार, मोदी सरकार.
माझा अंदाज आणि अपेक्षा :
अंदाज : NDA २६०+
सुप्त लाट
संपूर्ण महाराष्ट्र मतदान टक्केवारी
बारामतीचा गड राखणार की जाणार ?
बारामतीची मतदार संख्या २१
एक महत्वाचा मुद्दा सांगायचा
पण मग या वेळी महदेव
जानकर कमळ चिन्ह वापरत नाहीत.
मध्यप्रदेशमध्ये ७ जागांवर
रायबरेली मागच्या वेळचे मतदान
५ व्या टप्यातही मध्यप्रदेशमधे
रायबरेलीमधे व अमेठीमधे
प. बंगालमधे अजूनही
अपडेट
जम्मू काश्मिर...
काश्मीर खोर्यात निचांकी