ड्युएल

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जनातलं, मनातलं
16 Apr 2019 - 3:06 pm

चांगली कलाकृती कोणती? तर जिचा आस्वाद घेणे, अनुभव घेणे संपले तरी डोक्यात सुरू राहते ती! अशी माझी साधी सरळ व्याख्या आहे. या व्याख्येला पुरेपूर उतरणारा एक सिनेमा मला कसा भावला हे मांडायचा आज प्रयत्न करणार आहे.

सिनेमा हे दृक-श्राव्य माध्यम. यात माणसांनी कमी आणि कॅमेराने जास्त बोलले पाहिजे. संवाद साधला पाहिजे. संवादाचे देखील दोन प्रकार आहेत. एक म्हणणे मांडायचा आणि दुसरा म्हणजे स्पष्ट मांडणी न करता खाणाखुणा सांगण्याचा. समोरच्याला विचार करायला भाग पाडण्याचा. यात काही गोष्टी मांडणे जाणीवपूर्वक टाळावे लागते. पण यात तोल सांभाळावा लागतो तो अति अवघड! सगळे बटबतीतपणे उघड करून सांगायचे देखील नाही पण त्याच्या खुणा पुरेशा मिळत रहायला हव्यात. दिगदर्शकाचा यात कस लागतो. स्टीव्हन स्पिलबर्गचा दिगदर्शकीय मोठेपणा समजायला हा सिनेमा आदर्श ठरेल.

माणूसपणाच्या जगण्यात कळत नकळत माणसावर लादल्या गेलेल्या वा स्वतः घेतलेल्या ओळखी मात करतात. ती ओळख माणसातल्या माणुसपणावर कुरघोडी करत जाते. मी नवरा, मी प्रेयसी, मी साहेब,मी सेलेब्रिटी, मी नेता वगैरे ओळखी आपण सावध नसलो तर आपल्या उपद्रव मूल्याच्या (न्यूसन्स व्हॅल्यूच्या) प्रमाणात आपलं माणूसपण संपवत असतात. या वेगवेगळ्या ओळखी जगण्यातल्या सोयी साठी दिल्या/घेतल्या गेल्या आहेत, विशिष्ट परिस्थिती पुरत्याच आहेत, माणुसपणा हीच आपली मूलभूत खरी ओळख आहे हे विसरलं जातं. आणि मग power corrupts and absolute power corrupts absolyutely असा जंगलाचा कायदा मोकाट सुटतो.

सिनेमात हे फारच परिणामकारकपणे मांडलं आहे. 10-12 मोजकी पात्र, एकूण 60-70 वाक्य भरतील इतकेच संवाद! तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस हाच हिरो. त्याला हिरो म्हणायचं कारण त्याला व्हीलनसोबत भिडावं लागतं इतकंच. पूर्ण सिनेमात व्हिलन दिसतच नाही. ते जाणीवपूर्वक टाळलं आहे. त्याची फक्त शक्तिशाली ओळख दिसत राहते. सिनेमा पुढे सरकत जातो आणि आता फक्त ओळख शिल्लक आहे. त्यातला माणूस कधीच संपला आहे ही भयावह जाणीव होत राहते. मोजक्या वेगवान घटनांतून साधी कहाणी उलगडत जाते आणि मनावर अमीट परिणाम घडवत राहते. आवर्जून पहायलाच हवा असा सिनेमा, Duel (1971)

-अनुप

चित्रपट

प्रतिक्रिया

अत्यंत जबरदस्त चित्रपट आहे हा.

वकील साहेब's picture

16 Apr 2019 - 5:40 pm | वकील साहेब

आत्ताच बघितला. आवडला

अन्या बुद्धे's picture

16 Apr 2019 - 10:09 pm | अन्या बुद्धे

:)