[श श क स्पर्धे बाहेरचे] - मॅच
पटापट दोन घास गिळून कुलदीप खेळायला पळाला.
आज परत कुल्याची आणि शिऱ्याची मॅच होती.
कालच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिऱ्या आज मैदानात उतरला.
टॉस झाला, कुल्याच्या गोलंदाजांचे पिसे काढत, शिऱ्याच्या फलंदाजानी १० षटकात १२० धावा कुटल्या.
कुल्याचे सलामीचे फलंदाज आणि मधली फळी धावसंख्या ६ षटकात ६० नेऊन परतली.
केदयाच्या बरोबरीने त्याने धावसंख्या ९८ केली.
शेवटचे षटक, जिंकायाला २३ धाव शिल्लक, मॅच अटीतटीची झाली.
तीन चेंडुवर कुल्याने तडाखेबाज षटकार लावत शिऱ्याच्या तोंडचे हसू पळवले.
चौथा बाउन्सर हुकला.
पाचाव्या चेंडुवरची एकेरी धाव नाकारली.
शेवटचा चेंडू आणि पाच धावा.
आणि हे काय… " शीटSS शीटSS " कुल्या किंचाळला .
...
...
"काय झालं कुलदीप ... " बाहेर आई दार ठोठावत होती.
याद्या
3064
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
मस्त
मस्त...
हा .... हा ....
=)) =)) =))
नै समजली
आजच्या मुलांचे मोबाइल वेड /
In reply to नै समजली by टवाळ कार्टा
वा!!
उशिर झाला.
In reply to वा!! by तुषार काळभोर