मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शशक' १९] - ड्रॅक्युला

साहित्य संपादक · · स्पर्धा
"तुला त्या रक्त पिणाऱ्या ड्रॅक्युलाची गोष्ट माहितीय?" रियान म्हणतो. त्याचे नेहमीच लालसर दिसणारे डोळे आज अधिकच तांबारलेत असा भास मला होतो. ट्रान्ससिल्वानियाच्या राजप्रासादात राहणारा काऊंट ड्रॅक्युला मला चांगलाच माहितीय. "ही केवळ एक कथा आहे" मी म्हणते. "कुठल्याही कथेमध्ये काहीतरी सत्यता असतेच" बोलताना रियानचा एक दात लककन हलतो. "असं काही नसतं डियर" मी थोडीशी धास्तावूनच म्हणते. "तहान लागलीय मला, काहीतरी प्यावंसं वाटतंय".रियानचे डोळे लाल होऊ लागलेत. मी पाणी घेऊन येते. रियान आता झोपलाय, त्याच्या गोऱ्यापान गळ्यावर माझी नजर खिळून राहतेय. त्याचं ताजं गरम रक्त कधी एकदा पितेय असं मला झालंय. शेवटी त्या रक्तपिपासू पिशाच्चाची, काऊंट ड्रॅक्युलाची मीही एक वारसदार आहे.

वाचन 7147 वाचनखूण प्रतिक्रिया 18

L Lawliet Sun, 02/10/2019 - 14:26
धक्का एकदम शेवटी आणि एकदम छोट्या वाक्यात बसणे अपेक्षित असते

खिलजि Mon, 02/11/2019 - 20:49
भारी ट्विस्ट ..... मज्जा येते , हे असं थोडंसं पटकन वाचायला नि अनुभवायला

तुषार काळभोर Mon, 02/11/2019 - 20:56
स्त्री ड्रॅक्युला म्हणजे वॅम्पयर की वॅम्पायर हा वेगळा प्रकार असतो?