[शशक' १९] - ड्रॅक्युला
"तुला त्या रक्त पिणाऱ्या ड्रॅक्युलाची गोष्ट माहितीय?" रियान म्हणतो. त्याचे नेहमीच लालसर दिसणारे डोळे आज अधिकच तांबारलेत असा भास मला होतो.
ट्रान्ससिल्वानियाच्या राजप्रासादात राहणारा काऊंट ड्रॅक्युला मला चांगलाच माहितीय.
"ही केवळ एक कथा आहे" मी म्हणते.
"कुठल्याही कथेमध्ये काहीतरी सत्यता असतेच" बोलताना रियानचा एक दात लककन हलतो.
"असं काही नसतं डियर" मी थोडीशी धास्तावूनच म्हणते.
"तहान लागलीय मला, काहीतरी प्यावंसं वाटतंय".रियानचे डोळे लाल होऊ लागलेत.
मी पाणी घेऊन येते. रियान आता झोपलाय, त्याच्या गोऱ्यापान गळ्यावर माझी नजर खिळून राहतेय. त्याचं ताजं गरम रक्त कधी एकदा पितेय असं मला झालंय. शेवटी त्या रक्तपिपासू पिशाच्चाची, काऊंट ड्रॅक्युलाची मीही एक वारसदार आहे.
वाचने
7147
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
+1
नाही
+१
+१
+१
जबरी ट्विस्ट!!
+१
+१
+१
vampire
+१
+१
+१ .....
Mayboli var basuri id chi
The concept is already published
१
+१
भारीच