मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शशक' १९] - बाळ

साहित्य संपादक · · स्पर्धा
"माझं बाळ कुठे आहे ?" बाळांतपणानंतर शुद्धीवर आलेल्या प्रितीने तिचा पती रोहनकडे विचारणा केली. "आलीस तू शुद्धीवर! वा देवच पावला. अग तो काय तुझ्या शेजारीच तर आहे पाळण्यात. कसा हसतोय बघ लबाड!" "अगदी तुमच्यावर गेला की हो. नाक डोळे तुमचेच घेतलेत. बर मला सांगा याच्या सगळ्या टेस्ट झाल्या आहेत ना ? नाही तर मागच्या सारखं.." रोहनने प्रितीच्या तोंडावर हात धरला. " तो भुतकाळ होता प्रिती! हा पाहूणा मात्र आपल्या सोबतच राहणार आहे. विश्वास ठेव." एवढ्यात रोहनचा मित्र , सुनिल तेथे आला. रोहन त्याला घेऊन बाजूला आला.भरल्या आवाजात तो सुनिलला बोलू लागला ," मुल दत्तक घेण्याचं मोठं काम तू फार कमी वेळात करून दाखवलस गड्या."

वाचन 10223 प्रतिक्रिया 0