३१ डिसेंबर

mukund sarnaik's picture
mukund sarnaik in जनातलं, मनातलं
16 Jan 2019 - 8:15 pm

३१ डिसेंबर ची पार्टी. तिघे जण मित्र असतात व ते ३‍१ डिसेंबर ची पार्टी करायचे ठरवतात व त्यानुसार ते सर्व जण रात्री १०:३० वाजता ठरल्याप्रमाणे बाहेर पडतात.बाहेर पडल्यानंतर रोड वर धमाल मस्ती करत चालेले असतात कारण बाहेर माहोलच नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जल्लोश चाललेला असतो.कारण थोड्याच वेळात नवीन वर्ष चालु होणार असते.पण ते ज्या रोड वरून जाणार असतात त्या रोडवर एक पिझ्झा खाण्याचे स्वस्त व मस्त हॉटेल आहे.असे त्या तिघांपैकी एक मित्र त्या दोघांना सांगतो कि आपण( ४०₹ ला एक आहे असे पण सांगतो. )जाऊन पिझ्झा खाऊ.व ते दोन मित्र पण तयार होतात.ते तिघे मग त्या हॉटेल मध्ये जाऊन टेबलावर बसतात.व मेन्यु कार्ड मागवतात मागितल्यावर ते मेन्यु बघायला लागतात.पण ते कार्ड इग्लिंश मध्ये असते.त्यांना काही कळत नाही कि कुठला पिझ्झा मागवायचा कारण ते पहिल्यांदास तिथे गेलेले असतात.आणि जो वेटर असतो तो इग्लिश मध्ये बोलत असतो.पण ते मोडके तोडके इंग्लिश बोलुन (कारण त्या तिघांना पण इंग्लिश येत नसते.)कार्डमध्ये बघुन अॉर्डर करतात पिझ्झा.व त्यांना मेन्युमध्ये बघुन वाटते की आपण जे मागवले आहेत ते एकावर एक फ्री आहे म्हणुन.पण ते जेव्हा पुन्हा कार्ड निट चेक करतात तेव्हा त्यांना कळते की ते एकावर एक फ्री नाही अाहे म्हणुन.ते अॉर्डची वाट बघत बसतात.तेव्हढ्यात तिथे लाईट जाते व एक मित्र म्हणतो की चला आपण जाऊया येथुन पण एक मित्र म्हणतो की नाही पिझ्झा खाऊनच जाऊ.मग त्यांनी मागवलेला पिझ्झा येतो.व ते खायला लागतात पण त्यांना तो पुर्ण जात नाही म्हणुन ते तो पार्लस करायला व बिल आणयला सांगतात.बिल आल्यावर ते फक्त पिझ्झा लियले आहे त्या पुढिल किंमत वाचुन त्याला बिल देतात व बाहेर पडतात.व त्या हॊटेल पासुन थोड्यास अंतरापर्यंत जात असतात व मागुन त्यांना त्या हॉटेल मधिल वेटर गर्ल हाका मारुन थांबवते व ते तिघे थांबतात व विचारतात की काय झाले.व ति वेटर गर्ल बिल दाखवत ईंग्लिश मध्ये बोलत असते पण त्यांना ते काय म्हणते आहे ते कळत नाही पण जेव्हा ती बिल दाखवुन म्ह्मणते की सर्व्हिस टक्स भरला नाही तेव्हा त्यांना समजते की मोठ्या हॉटेल मध्ये तो द्यावा लागतो.व ते सर्व आपले पाकिट खिसे चेक करतात पक्त एकाच्याच पाकिटात तेव्हढे पैसे निघतात व ते पैसे देऊन थोडे पुढे घेल्यावर ज्या मित्रांने कल्पना दिलेली असते त्याला ते दोघे खुप बोलतात त्याला शिव्या घालतात.पण ऐक मित्र म्हणतो नशीब माझ्याकडे पैसे मिळाले नाहीतर आपल्या तिघांना तिथे भांडी घासावी लागली असती.असे एकुन तो मित्र त्या दोघांची माफी मागतो.व ते ठरवतात कि येथुन पुढे माहीत असेल तरच हॉटेलमध्ये जायचे.पिझ्झा पार्लस घेतलेला असतो तो फुगे विकणारया मुलाला देतात.व त्याच्या चेहरयावरचा आनंद बघुन खुश होतात.व रंगाचा बेरंग झालेल्या पार्टिची आठवन मनात साठवत व येण्यारया नववर्षाचे स्वागत करीत घरी जातात. टिप.हि कथा मी स्वत: लिहीलेली आहे.लेखक- मुकूंद.आवडल्यास जरुर शेअर करा.

मौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

बाप्पू's picture

16 Jan 2019 - 11:01 pm | बाप्पू

चांगला प्रयत्न.... छान छान गोष्टी नावाचे एक पुस्तकं यायचे लहानपणी.. त्याची आठवण झाली.

mukund sarnaik's picture

17 Jan 2019 - 1:42 pm | mukund sarnaik

धन्यवाद

टवाळ कार्टा's picture

17 Jan 2019 - 3:43 am | टवाळ कार्टा

जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत

चौथा कोनाडा's picture

17 Jan 2019 - 5:09 am | चौथा कोनाडा

छान !

पुढील कथेच्या प्रतीक्षेत.

mukund sarnaik's picture

17 Jan 2019 - 1:33 pm | mukund sarnaik

धन्यवाद

mukund sarnaik's picture

17 Jan 2019 - 1:34 pm | mukund sarnaik

धन्यवाद

ट्रम्प's picture

17 Jan 2019 - 9:40 am | ट्रम्प

तुमच्या दुसऱ्या कथेची आतुरतेने वाट बघतोय !!!

धन्यवाद लवकरच दुसरि कथा लिहितो

वकील साहेब's picture

17 Jan 2019 - 10:21 am | वकील साहेब

मला वाटलं की एखाद कोडं आहे की काय? एवढी सगळी श्टोरी सांगितल्यावर शेवटी विचारेल की, "सांगा त्यांनी कोणता पिझ्झा खाल्ला असेल?"

विजुभाऊ's picture

17 Jan 2019 - 10:30 am | विजुभाऊ

व्याकरण गंडले आहे.
कथा पूर्ण रीती वर्तमान काळात का लिहीली आहे. ती भूतकाळात असायला हवी.
उदा "एक राजा असतो". या ऐवजी "एक राजा होता." "तीन मित्र असतात" या ऐवजी "तीन मित्र होते." हे बरोबर वाटेल. क्रीयपदांचे काळ बदलून पुन्हा लिहून बघा परीणामकरक वाटेल गोष्ट
गोष्ट सांगणे आणि लिहीणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

कानडाऊ योगेशु's picture

17 Jan 2019 - 8:35 pm | कानडाऊ योगेशु

वर वकिलसाहेबांनी लिहिल्याप्रमाणे लेखातील भाषा ही एखादे कोडे सांगताना वापरण्यात येणार्या पध्दतीसारखी आहे.

हि कथा स्व:ताच्या अनुभवावरुन लिहलेलि आहे.

विजुभाऊ's picture

17 Jan 2019 - 2:03 pm | विजुभाऊ

ओ दादा
अगदी ठरवून पद्धतशीरपणे चुकीचे मराठी लिहीण्याच्या पण केलाय का तुम्ही.

हि कथा स्व:ताच्या अनुभवावरुन लिहलेलि आहे.

शुद्धलेखन जाऊदेत पण निदान शब्द तरी नीट लिहीत जा हो.
हि हा शब्द "ही" असा
स्वःत हा शब्द उच्चारताही येत नाहिय्ये. तुम्हाला स्वतः असे म्हणायचे आहे का?

टर्मीनेटर's picture

17 Jan 2019 - 4:51 pm | टर्मीनेटर

साष्टांग नमस्कार तुम्हाला....
आज पर्यंत कुठल्याही हॉटेल वा रेस्टॉरंट मध्ये मी कधी पार्ट पेमेंट, जसेकी फक्त पदार्थांच्या किमती एवढेच पैसे भरून आणि उर्वरित टॅक्स ची रक्कम न भरताच बाहेर पडलोय असं झालेलं नाहीये. आणि तुम्ही दावा करताय कि हे तुम्ही तुमच्या अनुभवावरून लिहिलेलं आहे...कसा विश्वास ठेवायचा?
काल्पनिक लिहिणे वेगळे आणि स्वानुभव लिहिणे वेगळे असते हो लेखक महोदय.

पण त्यांनी कथेत शेवटपर्यंत उत्सुकता तानून धरलेली असल्यामुळे कथा उत्कृष्टच होत गेली यात काही वाद नाही !!!
मुकुंद साहेब , विषय मांडण्याची तुमची हातोटी जबरदस्त आहे , तिल अजिबात मुरड़ घालु नका !!!!

तुमच्या पुढील कथेला आगावु शुभेच्छा !!!