गॅस चे इन्स्पेक्शन. फसवेगिरी?

Primary tabs

बाप्पू's picture
बाप्पू in काथ्याकूट
29 Dec 2018 - 5:48 pm
गाभा: 

नुकतेच मी नवीन घरी शिफ्ट झालो असून मी माझे गॅस कनेक्शन ची एजेन्सी बदलत आहे..

माझ्याकडे दोन गॅस शेगड्या आहेत. त्यापैकी आत्ता वापरात असलेली शेगडी नीट चालत नाही. त्याचा प्रॉब्लेम असा आहे कि गॅस चे स्पीड लहान केल्यानंतर तो विझून जातो. परंतु सवय झाल्याने मी गेले काही दिवस ती तशीच वापरात होतो. नवीन घरी गेल्यावर नवीन शेगडी वापरायला काढायची या उद्देशाने मी ती तशीच ठेवली होती..

नव्या घरी गॅस एजेन्सी चा माणूस गॅस चे इन्स्पेक्शन करण्यासाठी आला तेव्हा त्याला म्हणाले कि जुन्या शेगडीत प्रॉब्लेम आहे तेव्हा तू नवीन शेगडी फिट कर आणि त्यानंतर तू इन्स्पेक्शन कर. म्हणजे मला पण कंपनी च्या एक्सपर्ट कढून शेगडी जोडून मिळेल व तुझे ही काम होईल.

आता त्याने नवीन शेगडी जोडली पण ती जोडण्या आधी त्याने बटनाशी स्क्रू ड्राइवर ने काहीतरी ठोकाठोकी केली. या दरम्यान त्याने मला खोबरेल तेलाची बाटली आणण्यासाठी किचन मधून बाहेर पाठवले. त्यामुळे मी 30-40 सेकंद तिथे उपस्थित नव्हतो.
गॅस ची तपासणी करताना अचानक मला आढळून आले कि एका बर्नर मधून खूप मोठी ज्वाळा येत आहे. इन्स्पेक्शन ला आलेल्या व्यक्ती ने सांगितले कि याचा वाल्व खराब झाला असून हा बदलावा लागेल. त्याला 250 रुपये लागतील. मी त्याला सांगितले कि ही नवीन शेगडी आहे आणि मी एकदाही वापरली नाही. काही दिवसापूर्वी मी फक्त टेस्ट करण्यासाठी चालू करून पहिली होती तेव्हा तर ती ठीक चालली होती. त्यानंतर आता अचानक ही कशी काय खराब होईल?? अजून यावर आम्ही कधीच स्वयंपाक केला नाहीये. तर तो व्यक्ती म्हणाला कि ते मलाही नाही माहीत. तुम्हाला शेगडी नीट करायची असेल तर करून घ्या किंवा मला माझा इन्स्पेक्शन चे 100 रुपये द्या व मी माझ्या इन्स्पेक्शन च्या रिपोर्ट मध्ये तशी नोंद करून निघून जातो.

आता माझ्यापुढे काहीच पर्याय शिल्लक नाही राहिला. माझेच मला समजेना कि नवीन शेगडी जी काही दिवसापूर्वी टेस्टिंग दरम्यान एकदम ठीक चालत होती तिला अचानक काय झाले.
शेवटी त्याला विचारलं कि मला जुनी शेगडी नीट करायची आहे तर त्याला किती खर्च येईल त्याचे उत्तर आले कि 650 रुपये.
शेवटी त्याला त्याचे 100 रुपये देऊन सांगितलं कि तू होती तशी जुनी शेगडी जोडून दे व इन्स्पेक्शन करून जो काही रिपोर्ट असेल तो लिह आणि जा इथून ..

आता या प्रसंगानंतर पडलेले काही प्रश्न

1) इन्स्पेक्शन मध्ये काही त्रुटी आढळल्यास गॅस ची एजेन्सी बदलून घेण्यात काय अडचणी येऊ शकतात. माझ्या गॅस च्या इन्स्पेक्शन मध्ये त्या व्यक्तीने बटण प्रॉब्लेम असे लिहिले आहे.

2) नवीन शेगडी जोडताना त्या व्यक्तीने काही मोडतोड किंवा हातचलाखी केल्याची शक्यता आहे का? असेल तर याबद्दल मी कुठे दाद मागू शकतो का?

3)इन्स्पेक्शन ला आलेल्या व्यक्तीला पैसे घेऊन गॅस मध्ये दुरुस्ती करून देण्याची परवानगी आहे का?

4) आता मी पुढे काय करावे? नवी शेगडी बाहेरून दुरुस्त करावी का? ती शेगडी एक वर्षांपूर्वी घेतली असल्याने त्याची वॉरंटी संपलेली आहे. त्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे याबद्दल मी अजूनही सांशक आहे कारण काही दिवसापूर्वी टेस्ट करताना ती व्यवस्थित चालली होती. व त्या टेस्ट व्यतिरिक्त मी त्या शेगडी चा वापर कधीच केलेला नाहीये.

5) अश्या प्रकारचा अनुभव या आधी कोणाला आला आहे का? असल्यास आपण काय केले??

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

29 Dec 2018 - 7:17 pm | मार्मिक गोडसे

गॅस बर्नर तिरके बसल्यास पिवळ्या रंगाची मोठी ज्वाळा येते, हवा आणि गॅसचे योग्य मिश्रण न झाल्याने असे होते. हाताने बर्नर व्यवस्थीत बसवून बघा.

कंजूस's picture

29 Dec 2018 - 7:27 pm | कंजूस

हो.
पुर्वीचे आणि आताचे ( शिवाय वेगवेगळ्या एजन्सीवाल्यांचे पैसे काढण्याचे तंत्र) कामाचे स्वरुप बदलले आहे.
मला सवत: ला /किंवा दुसऱ्याला गॅस रिपेरींग येते म्हणून काम करून चालत नाही. शिवाय तसे मिकॅनिकला सांगूही नये.
अधिकृत एजंटच्या माणसाकडून तपासून घ्यावेच लागते. पाचसहाशे रुपयांची फोडणी लागतेच.
( काही एजन्सीवाले प्रामाणिक आहेत. पण तुमच्या इमारती/एअरियाप्रमाणे पैसे लावतातच)
थोडं सविस्तर नंतर लिहीन.

सुबोध खरे's picture

29 Dec 2018 - 7:34 pm | सुबोध खरे

मलाही गॅसच्या एजंटने असाच बर्नरचे नॉब बदलायला सांगितले होते. मी त्याला दमात घेऊन सांगितले कि १५ दिवसापूर्वीच तुमचा माणूस नॉब बदलून गेला त्यालाच परत बोलावतो इतक्या लवकर कसा नॉब खराब झाला. मग त्याने बर्नर "सरळ" करून दिला.

माझ्या मित्राच्या कार चा ए सी खराब झाला म्हणून त्याचा कॉम्प्रेसर बदलायला हवा, १० हजार खर्च येईल म्हणुन त्याच्या मेकॅनिक ने सांगितले. मी त्याला माझ्या मेकॅनिक कडे पाठवले त्याने एका ठिकाणी वेल्डिंग करून गॅस भरून दिला १ हजार रुपयात तीन वर्षे ए सी व्यवस्थित चालू होता.

काही तरी करून पोट जाळायला हवं म्हणून ते असं करतात.

Nitin Palkar's picture

29 Dec 2018 - 7:41 pm | Nitin Palkar

१) शेगडीच्या तपासणीत त्रुटी आहे हे सिद्ध कसे करणार? घडलेला सर्व प्रकार गॅस एजन्सीच्या व्यास्थापाकास/ मालकास लेखी कळवा. नवीन घराच्या परिसरात गॅस सिलिंडर पुरवठ्याची काय स्थिती आहे यावर एजन्सी बदलणे सोयीचे कि गैरसोयीचे ते ठरेल.
२) आलेल्या तंत्रज्ञाने हातचलाखी केली असण्याची शक्यता असू शकते. अनेकदा त्याला एजन्सी मालकाची फूस असू शकते...
३) तपासणीसाठी आलेला तंत्रज्ञ दुरुस्ती करू शकतो...
४) नव्या शेगडीची वॉरंटी संपलेली असली तरी कंपनीशी थेट संपर्क साधून बघा, अनेक कंपन्या वाजवी आकार घेऊन घेऊन आपल्या उत्पादनाची दुरुस्ती करून देतात.
५) गॅस गिझरच्या बाबतीत असा अनुभव आला होता. वार्षिक देखभाल कंत्राटदाराचा तंत्रज्ञ विनाकारण एक 'सेफ्टी व्हाल्व' बसवावा लागेल असे सांगत होता व त्याचे ८००/- रुपये मागत होता... कंत्राटदाराशी बोलून ते टाळले. गिझर व्यवस्थित चालू आहे.

सुबोध खरे's picture

29 Dec 2018 - 7:45 pm | सुबोध खरे

कोणताही एजन्सीचा मालक आपल्या कर्मचाऱ्याविरुद्ध काहीही कार्यवाही करणार नाही. कारण आजकाल तंत्रज्ञ सहज मिळत नाहीत. आणि तुम्ही जाऊन कुठे जाणार? तुमच्या भागात एका कंपनीचा एकच एजंट असतो हे त्याला माहिती असतेच.

१.५ शहाणा's picture

29 Dec 2018 - 8:12 pm | १.५ शहाणा

एक टूल कीट ड्रायवर घेवून स्वता दुरुस्ती करा फार सोपे आहे फुकट

टर्मीनेटर's picture

29 Dec 2018 - 8:37 pm | टर्मीनेटर

सार्वत्रिक अनुभव आहे हा .
एकतर गॅसशी संबंधित काही धोके सांगितले तर सहसा कोणी तक्रार न करता दुरुस्ती करून घेतात, याच गोष्टीचं गैरफायदा हे मेकॅनिक लोकं घेतात अर्थात त्यात एजन्सी मालकाचाही सहभाग असतोच त्यामुळे तिकडे तक्रार करूनही काही फायदा नाही. उलट ते अजून मीठ मसाला लाऊन त्यातले धोके तुम्हाला समजावून सांगतील.
व्हॉल्व हे ब्रासचे असल्याने सहसा लवकर खराबही होत नाहीत. वर प्रतिसादात म्हंटल्या प्रमाणे गॅस बर्नर तिरके बसल्यास पिवळ्या रंगाची ज्वाळा येते.

गॅस एजन्सीने रिपेरिंगचा ठेका विकलेला असतो. तो त्यातून पैसे करायला बघतो. मिकॅनिक लोकांना कमिशनवर ठेवतो॥ ते भराभर कामं उरकून पैसे कमावतात. म्हणजे तीन लोकांना एका कामाचे पैसे मिळतात त्यामुळेच सेवा तत्पर असते.
पुर्वी गॅस एजन्सीचेच पगारी लोक होते ते दोन दिवसांनी येत असत. जेवढ्यास तेवढेच काम करत॥ वाल्व बदलत नसत वारंवार. वाल्व काढून त्याला मेलिकोट ग्रीस ( एक ग्राफाइट ग्रीस) लावत.
गॅस पेटवून बटणाखाली काडी पेटवून धरली तर मोठा जाळ होतो कारण वाल्वचे ग्रीस जाऊन गॅस लीक होत असतो.
आता तुम्ही आग्रह धरला की ग्रीसींग करून दे तर बरेच आढेवेढे घेऊन ६५/रु सर्विस चार्जमध्ये काम करतात. पण नवीन शेगडीचे तसं करणार नाहीत.
पावत्या जपून गॅसपाशीच ठेवल्या/ पुस्तकातही एन्ट्री घेतली की मागचे काम कधी कोणते केले बघून वाद घालता येतो.
( पण गॅसच्या बाबतीत डुइटयुवरसेल्फ शक्यतो करू नये.)

Blackcat's picture

30 Dec 2018 - 9:17 am | Blackcat (not verified)

गेली कित्येक वर्षे घरात गैस नाही,

इंडक्शन व्यवस्थित सुरू आहे

संजय पाटिल's picture

30 Dec 2018 - 10:15 am | संजय पाटिल

इंडक्शन स्वस्त पडतो का गॅस?

Blackcat's picture

30 Dec 2018 - 10:57 am | Blackcat (not verified)

आमचे तिघांचे लाईट बिल पूर्ण घराचे 800 ते 1000 येते,

मुंबईतील विजेचे दर पाहता आणि भारतीय स्वयंपाक पद्धतीचा विचार करता इंडक्शन शेगडी स्वस्त पडेल असे वाटत नाही.

याचा अर्थ हा की आपल्या कडे वीजेची समस्या नाही.

याचा अर्थ असा ही होवू शकतो की वीज वापर जास्त असताना मीटर मध्ये बिघाड असल्या मुळे बिल कमी येत आहे . तसेच
काँग्रेस चे कार्यकर्ते असल्या मुळे व मीटर मध्ये फेरफार केला असन्याची शक्यता बिल्कुल नाही =)

घोरपडे's picture

31 Dec 2018 - 3:00 pm | घोरपडे

तुमचे गैस ची जोडणी ही HP कंपनीची असनार ..असे वाटते..

बाप्पू's picture

2 Jan 2019 - 7:18 pm | बाप्पू

अगदी बरोबर घोरपडे जी..

घोरपडे's picture

3 Jan 2019 - 3:09 pm | घोरपडे

गैस चे जोडणी पूर्व inspection करुण घ्यावे असा कही नियम नाही ...--पण black money साथी HP गैस असले insepection करते ...
यासाठी
१) तुमचे connection HP गैस to bharat गैस transfer करुण घ्या
२) नाहीच जमले तर ... inspection charges ची GST पावती मागा
३) HP गैस ची कोणतीच टाकी ही correct वजनची भरत नाही ... पुण्यात तरी ...
---मी स्वता अनेक वेळा HP गैस ची टाकी मोजली ...पण कधि वजन बरोबर भरले नाही २००ग्राम ते ५००ग्राम पर्यंत कमी भरते
.. हे लोक गैस काढून टाक्या विकतता..

ह्याला कंटाळून मी HP to bharat गैस connection transfer केले .. now not facing any issue.

सर्व प्रतिसाद कर्त्यांचे धन्यवाद. लवकरच या बाबतचा सविस्तर अपडेट देईल. कामाच्या गडबडीमुळे अजून तरी या प्रकरणात मी अजून पुढे काय करायचे हा निर्णय घेतलेला नाहीये.

तपासणी सहीशिवाय शिलेंडर मिळत नाही .

तपासणी रिपोर्ट त्याने दिला आहे. त्यात बटण प्रॉब्लेम असे लिहिलं आहे. त्यामुळे सिलेंडर मिळेल कि अजून एकदा तपासणी करून घ्यावी लागेल हे बघावं लागेल..
बघुयात आता काय काय होतय ते.

मलाही केंट आर ओ च्या बाबतीत असाच अनुभव आला आहे.