गॅस चे इन्स्पेक्शन. फसवेगिरी?
नुकतेच मी नवीन घरी शिफ्ट झालो असून मी माझे गॅस कनेक्शन ची एजेन्सी बदलत आहे..
माझ्याकडे दोन गॅस शेगड्या आहेत. त्यापैकी आत्ता वापरात असलेली शेगडी नीट चालत नाही. त्याचा प्रॉब्लेम असा आहे कि गॅस चे स्पीड लहान केल्यानंतर तो विझून जातो. परंतु सवय झाल्याने मी गेले काही दिवस ती तशीच वापरात होतो. नवीन घरी गेल्यावर नवीन शेगडी वापरायला काढायची या उद्देशाने मी ती तशीच ठेवली होती..
नव्या घरी गॅस एजेन्सी चा माणूस गॅस चे इन्स्पेक्शन करण्यासाठी आला तेव्हा त्याला म्हणाले कि जुन्या शेगडीत प्रॉब्लेम आहे तेव्हा तू नवीन शेगडी फिट कर आणि त्यानंतर तू इन्स्पेक्शन कर. म्हणजे मला पण कंपनी च्या एक्सपर्ट कढून शेगडी जोडून मिळेल व तुझे ही काम होईल.
आता त्याने नवीन शेगडी जोडली पण ती जोडण्या आधी त्याने बटनाशी स्क्रू ड्राइवर ने काहीतरी ठोकाठोकी केली. या दरम्यान त्याने मला खोबरेल तेलाची बाटली आणण्यासाठी किचन मधून बाहेर पाठवले. त्यामुळे मी 30-40 सेकंद तिथे उपस्थित नव्हतो.
गॅस ची तपासणी करताना अचानक मला आढळून आले कि एका बर्नर मधून खूप मोठी ज्वाळा येत आहे. इन्स्पेक्शन ला आलेल्या व्यक्ती ने सांगितले कि याचा वाल्व खराब झाला असून हा बदलावा लागेल. त्याला 250 रुपये लागतील. मी त्याला सांगितले कि ही नवीन शेगडी आहे आणि मी एकदाही वापरली नाही. काही दिवसापूर्वी मी फक्त टेस्ट करण्यासाठी चालू करून पहिली होती तेव्हा तर ती ठीक चालली होती. त्यानंतर आता अचानक ही कशी काय खराब होईल?? अजून यावर आम्ही कधीच स्वयंपाक केला नाहीये. तर तो व्यक्ती म्हणाला कि ते मलाही नाही माहीत. तुम्हाला शेगडी नीट करायची असेल तर करून घ्या किंवा मला माझा इन्स्पेक्शन चे 100 रुपये द्या व मी माझ्या इन्स्पेक्शन च्या रिपोर्ट मध्ये तशी नोंद करून निघून जातो.
आता माझ्यापुढे काहीच पर्याय शिल्लक नाही राहिला. माझेच मला समजेना कि नवीन शेगडी जी काही दिवसापूर्वी टेस्टिंग दरम्यान एकदम ठीक चालत होती तिला अचानक काय झाले.
शेवटी त्याला विचारलं कि मला जुनी शेगडी नीट करायची आहे तर त्याला किती खर्च येईल त्याचे उत्तर आले कि 650 रुपये.
शेवटी त्याला त्याचे 100 रुपये देऊन सांगितलं कि तू होती तशी जुनी शेगडी जोडून दे व इन्स्पेक्शन करून जो काही रिपोर्ट असेल तो लिह आणि जा इथून ..
आता या प्रसंगानंतर पडलेले काही प्रश्न
1) इन्स्पेक्शन मध्ये काही त्रुटी आढळल्यास गॅस ची एजेन्सी बदलून घेण्यात काय अडचणी येऊ शकतात. माझ्या गॅस च्या इन्स्पेक्शन मध्ये त्या व्यक्तीने बटण प्रॉब्लेम असे लिहिले आहे.
2) नवीन शेगडी जोडताना त्या व्यक्तीने काही मोडतोड किंवा हातचलाखी केल्याची शक्यता आहे का? असेल तर याबद्दल मी कुठे दाद मागू शकतो का?
3)इन्स्पेक्शन ला आलेल्या व्यक्तीला पैसे घेऊन गॅस मध्ये दुरुस्ती करून देण्याची परवानगी आहे का?
4) आता मी पुढे काय करावे? नवी शेगडी बाहेरून दुरुस्त करावी का? ती शेगडी एक वर्षांपूर्वी घेतली असल्याने त्याची वॉरंटी संपलेली आहे. त्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे याबद्दल मी अजूनही सांशक आहे कारण काही दिवसापूर्वी टेस्ट करताना ती व्यवस्थित चालली होती. व त्या टेस्ट व्यतिरिक्त मी त्या शेगडी चा वापर कधीच केलेला नाहीये.
5) अश्या प्रकारचा अनुभव या आधी कोणाला आला आहे का? असल्यास आपण काय केले??
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गॅस बर्नर तिरके बसल्यास
हो.
मलाही गॅसच्या एजंटने असाच
माझे मत...
कोणताही एजन्सीचा मालक आपल्या
स्वता करा
सार्वत्रिक अनुभव आहे हा
गॅस एजन्सीने रिपेरिंगचा ठेका
छान
इंडक्शन स्वस्त पडतो का गॅस?
....
इंडक्शन स्वस्त पडतो का......
याचा अर्थ हा की आपल्या कडे
याचा अर्थ असा ही होवू शकतो की
तुमचे गैस ची जोडणी ही HP
अगदी बरोबर घोरपडे जी..
गैस चे जोडणी पूर्व inspection
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे
तपासणी सहीशिवाय शिलेंडर मिळत
तपासणी रिपोर्ट त्याने दिला
मलाही केंट आर ओ च्या बाबतीत