वन मोर फेअर चान्स.

Primary tabs

वेडसर's picture
वेडसर in काथ्याकूट
29 Dec 2018 - 10:01 am
गाभा: 

माझं म्हणणं इतकंच, की कारणं काही का असेनात, फक्त एकाच परिवारापुढे लोटांगणं घालत त्या परिवाराला सातत्याने ६० वर्ष संधी दिली गेली. मग मोदींना अजून किमान पुढची ५ वर्ष तरी संधी द्यायला नको का?

त्यामुळे निदान मी तरी २०१९ ला मोदींकरताच मतदान करणार आहे. आपण आपल्यापुरतं काय ते बोलावं!

Let me give Modi one more fair chance in 2019.

मग २०२४ ला काय करायचं ते बघू.

आपण काय म्हणता? :)

वेडसर.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

29 Dec 2018 - 10:07 am | मुक्त विहारि

आमचा पास....

वेडसर's picture

29 Dec 2018 - 10:21 am | वेडसर

मस्त उत्तर! :)

Blackcat's picture

29 Dec 2018 - 1:42 pm | Blackcat (not verified)

अभिव्यक्ती व मतदान हे निर्भीडपणे करावे म्हणूनच स्वतंत्र भारताची निर्मिती झाली.

तुमच्या मर्जीने मतदान करण्यास तुम्हाला शुभेच्छा

मार्मिक गोडसे's picture

29 Dec 2018 - 2:18 pm | मार्मिक गोडसे

अर्धवट संसार करण्याला पूर्ण ५ वर्ष दिली हे काय कमी आहे का?

६० वर्स देशाचं वाट्टूळ क्येलं तरीबी प्वॉट भरना व्हय?

-१०० वरून +१० झालं आसलं तरी सम्दे मिलून +११० व्हतात, नाय का? चस्मा काडा नायतर तुम्चे ग्य्रेट न्येते तुमालाबी ईकून ढेकर देत्याल तेवाच जाग ईल. :)

Blackcat's picture

29 Dec 2018 - 4:31 pm | Blackcat (not verified)

मग बाजपेयीं अन मोदींनी 10 वर्षात कुणाला आत का नाही घातले ?

ट्रम्प's picture

29 Dec 2018 - 5:37 pm | ट्रम्प

त्य मातर न्हाय समजल , आन गुप्तमतदान कशा पाई ? छाती ठोकुन सांगणार की आपल मत मोदीनांच .

Blackcat's picture

29 Dec 2018 - 8:05 pm | Blackcat (not verified)

स्वतः चौकीदार 56 इंची छाती ठोकत फिरतातच की , तुम्हाला कोण अडवणार ?

तुम्ही ठोका की 32 इंची छाती !!! = )

६० वर्षांमदी चालाक लोकान्नी लई भोकंवाले कायदे करून ठ्येवले हाईत, त्ये भोकासून सुळ्ळकन पळू जाता येत. त्ये कानून बदलाला ग्येलं की राज्यसबेमदी मासळि बाजार व्हतो, त्ये उगी व्हय? आनी वर मंत्री आनी न्येत्यांच्या हातात हात घालून खिसं भरलेलं बाबू लोकांची फौज आजून तशीच हाये ना. सुप्रीम कोर्टात पुरावा जान्याआदी आरोपीकडं पुराव्याचं कागूद उगी जात व्हतं का? इश्वास बसत नसला तर तुम्च्या प्यार्‍या चिद्दूला इचारा. त्यो तर २०१४च्या विलक्षनाच्या आदी कोंत्याही निर्नयाची मंत्र्यावर कायदेशीर जबाबदारी नाय आसा कानून आनू र्‍हायला व्हता. तेवा बाकी कांग्रेसीबी कायद्याची भाषा बगून इक्ते चक्करल्ये की त्येंनीच इरोध करून आनि तुमच्या मासायबांचे पाय धरून चिद्दूला गप केला. त्यो कायदा आला आसता तर मंग त्योबी इक्ते घोळ करून सुममद्ये निगून ग्येला आसता बर्का. आशी लई लई हुश्शार मानस फ्यामिलीच्या पायात हिकडं तिकडं घोटाळत आसतात, नायका?

कितिजन कदी येकदाचा मोदी जातो आनी आपलं दुकान चालू व्हतं येची वाट पाहू र्‍हायलेत. आता राजस्तान आनी मद्यपरदेशात ताबडतोड युरियाचा घोळ सुरू झाल्येला हाये, ह्ये काय सागतंय?

Blackcat's picture

29 Dec 2018 - 9:06 pm | Blackcat (not verified)
Blackcat's picture

29 Dec 2018 - 9:07 pm | Blackcat (not verified)

मोदीना तर जबाबदारी टाळायला कायद्याचीही गरज नाही,

सगळे नेहरू गांधींवर ढकलले की झाले.

Blackcat's picture

29 Dec 2018 - 9:07 pm | Blackcat (not verified)

मोदीना तर जबाबदारी टाळायला कायद्याचीही गरज नाही,

सगळे नेहरू गांधींवर ढकलले की झाले.

गब्रिएल's picture

29 Dec 2018 - 9:34 pm | गब्रिएल

आतापत्तूर इत्कं दगूड मारत व्हता. आत्ता कोनी जरा खरं सांगल तर लगूलग पळू र्‍हायला? आरारारारारा. =)) =)) =))

घोरपडे's picture

31 Dec 2018 - 3:04 pm | घोरपडे

१०० % बरोबर .....

मामाजी's picture

29 Dec 2018 - 8:40 pm | मामाजी

आहो मागो साहेब गरीबी हटाओ ही घोषणा १९७१ मधे इंदिरा गांधींनी दिली होती. त्यानंतर कॉंग्रेसने जवळपास पंचवीस वर्षे राज्य केले तरीही अजुन ते गरीबी हटवतातच आहेत . तेव्हा पंचवीस वर्षे गरीबी हटाओ ला दिली ही काय कमी आहेत का? हा प्रश्न आपण कॉंग्रेसला का विचारत नाहीत..
आता पाच वर्षाच्या या अर्धवट संसारात देशातल्या वीज पूरवठ्या बद्दलची जरा माहिती काढून सांगण्याची कृपा कराल का.
म्हणजे पाच वर्षापूर्वी देशातील वीजेची मागणी, होणारी वीजेची निर्मीती व पुरवठा, भारनियमन इत्यादी व सध्याची देशातील वीजेची मागणी, होणारी वीजेची निर्मीती व पुरवठा, भारनियमन

Nitin Palkar's picture

29 Dec 2018 - 7:51 pm | Nitin Palkar

सर्वच भाजपेयी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नक्की नाहीत पण मोदींना सध्यातरी पर्याय नाही. मोदींना अजून एक संधी नक्कीच द्यायला हवी.

Blackcat's picture

29 Dec 2018 - 8:03 pm | Blackcat (not verified)

नेहरूंनी मत मागताना मोगलांनी 300 वर्षे किती वाईट केले , इंग्रजानी 300 वर्षे किती वाटोळे केले , याची रडगाणी ऐकवून मते मागितली नव्हती.

मोदीवाले लोक 5 वर्षात फारच बदलले

2014 - काँग्रेसमुक्त भारत , मोदी 50 वर्षे
2015 - मोदी 30 वर्षे
2016 - मोदी 20 वर्षे
2017 - मोदी 2024 लाही
2018 - पाच वर्षे तरी द्यायलाच पाहिजेत ना ?

काँग्रेस 60 वर्षे धरतात , मग मोदी 5 च का ? भाजपा 10 नको का धरायला ? की बाजपेयीं ची 5 वर्षे होनोलुलु च्या इतिहासात मोजायची ?

मग म्हणताना काँग्रेस 60 आणि बाजपेयीं 5 असे तर म्हणायचे
काँग्रेसची 60 वर्षे पकडताना , भाजपाच्या बाजूने मात्र मोदींची 5 च सांगतात , म्हणजे बाजपेयीं सरकार अकार्यक्षम होते , असे मानायचे का ?

सर शांत व्हा. मनाला इतकंही लावून घेऊ नका :)

डँबिस००७'s picture

29 Dec 2018 - 8:38 pm | डँबिस००७

नेहरूंनी मत मागताना नेहरुंच पुराण आम्हाला नका सांगु !!

नेहरूंना कोणी मत दिलेलच नव्हत !!
ते म गांधीजींच्या मागे लागुन सरदार वल्लभभाई पटेलांना मिळालेल पंत प्रधानपद अक्षरशः ओरबाडुन घेतल होत हा ईतिहास आहे ! त्या पुर्वी म.गांधीजींनी
सुभाषचंद्र बोसना असच चुकीच्या पद्धतीने डावलल होत !

गब्रिएल's picture

29 Dec 2018 - 8:45 pm | गब्रिएल

लई परयत्न करून लई वर्षं लपवल्येलं खरं ह्येआसं सांगून तुमी त्येंची हवा काडून टाकली, आत्ता, तुमी जलमभराची दुष्मनी घ्येत्ली आहे सायेब. =)) =)) =))

Blackcat's picture

29 Dec 2018 - 8:49 pm | Blackcat (not verified)

पटेल निधन पावले 1950 ला.
पहिली निवडणूक झाली 1951 ला.

मग नेहरूंनी पटेलांचे पद कसे घेतले म्हणे ?

त्येला इत्तिहास वाचावा लागतो. आनी तो बी खराखरा, आपल्या मालकानं डोस्क्यात भरवलेलं खोटंनाटं नव्हं, कसं? त्येच्यासाटी मिपावर म्हंतात की आब्यास वाडवा, आब्यास वाडवा. =)) =)) =))

रमेश आठवले's picture

29 Dec 2018 - 9:08 pm | रमेश आठवले
Blackcat's picture

29 Dec 2018 - 9:32 pm | Blackcat (not verified)

बाकी कारणे काही का असेनात ,

There are reasons for that, one Sardar Patel was not well, he passed away on 2 and half years time. Justifies Gandhi's vision.

सरदार पटेलना श्वासविकार होता , ते स्वातंत्र्यानंतर अडीच वर्षात निधन पावले.
https://www.quora.com/Why-was-Sardar-Patel-not-made-the-Indian-prime-min...

गब्रिएल's picture

29 Dec 2018 - 9:36 pm | गब्रिएल

नक्की? आजूण काय वरून सांगून आलं आसलं तर त्येबी सांगा. नायतर सोत्ताच इचारशक्ती तुटेपत्तूर ताणायलाबी पैश्ये पडत न्हाय. काय म्हंता? ही ही ही ही. =)) =))

Blackcat's picture

30 Dec 2018 - 12:39 pm | Blackcat (not verified)

And, Sardar Patel was equally if not more generous in paying tribute to Nehru. On the occasion of Nehru’s 59th birthday, Patel said in the Constituent Assembly, “Mahatma Gandhi chose Pandit Nehru as his political heir and it was very gratifying to see that the choice fell on the right person”. Patel added, “Nehru was truly following the ideals set by Gandhiji and had raised the status of India in the counsels of nations in the world.” He also noted they “moved like brothers and were associates for over 30 years”. Nehru reciprocated by saying “but for Sardar Patel’s affection and advice, he would not have been able to run the state”. (‘True Disciple of Mahatma’, TOI, 15 November 1948, P9)

https://theprint.in/opinion/seven-decades-before-statue-of-unity-nehru-h...

आजूनबी गुलामी आनी सरंजामशाई आवडनारी आनी "हम नही सुदरेंगे" इचाराची लोकं बगून आसं बाकी लोकांच्या दिमागात येनारच की वो. :)

म्हंजे आजपत्तूर 'रागा'सारकं 'बनवलेला माल' मिपावर वतत व्हतात व्हय? आरारा! :)

ट्रम्प's picture

29 Dec 2018 - 10:09 pm | ट्रम्प

जातिद्वेषातुन भाजपद्वेष वाढलाय का तुमचा ? त्यामुळे काँग्रेसने लीलाव करून बाजारात बसवले तरी चालेल पण भाजप ला मत द्यायचे नाही ही असे एकंदरीत तुमचे मत झालेले दिसते .

ट्रम्प's picture

29 Dec 2018 - 10:15 pm | ट्रम्प

मिपापण कधी कधी रागा सारख बिहेवियर करते , ब्लैक केट साठी टाइप केलेला प्रतिसाद गाब्रिएलकडा कड़े गेला

डँबिस००७'s picture

29 Dec 2018 - 8:38 pm | डँबिस००७

आमच मत भाजपलाच !!

नावातकायआहे's picture

29 Dec 2018 - 9:11 pm | नावातकायआहे

+१

मार्मिक गोडसे's picture

29 Dec 2018 - 9:27 pm | मार्मिक गोडसे

आता पाच वर्षाच्या या अर्धवट संसारात देशातल्या वीज पूरवठ्या बद्दलची जरा माहिती काढून सांगण्याची कृपा कराल का.
गावागावात,घराघरात अर्धवटरावांनी वीज पोहोचवून आणि भारनियमनमुक्त केल्याने शेतकरी दिवसभर शेतीकाम सोडून टिव्ही बघत बसले आणि रात्रीचे शेतात राबून पाणी भरू लागले हा मोठा फरक जाणवला.

ट्रेड मार्क's picture

30 Dec 2018 - 9:30 am | ट्रेड मार्क

आपल्याला शाळेत नागरिकशास्त्र हा एक विषय होता तो तुम्ही ऑप्शनला टाकला होता का? नुसतं आपलं काहीतरी एक वाक्य टाकून द्यायचं म्हणजे आपलं काम झालं असं वाटलं काय?

जरा डोळे उघडे ठेऊन तुम्हीच संशोधन केलंत तर बरं होईल. तरी तुम्हाला सोपं व्हावं म्हणून खालील लिंका देतोय, जरा वाचाव्यात.

लिंक १

लिंक २

लिंक ३

लिंक ४

अजूनही बऱ्याच बातम्या देता येतील. पण जरा तुम्हीच बघा संशोधन करून.

मार्मिक गोडसे's picture

30 Dec 2018 - 12:08 pm | मार्मिक गोडसे

वीज वितरण कंपन्या वीज का उचलत नाही?अजुनही काही ग्रामीण भागात लोड शेडींग आहे हे आपल्याला माहीत आहे का? अशा लींका देऊन जमिनीवरचे सत्य नाकारण्यात तुम्हाला समाधान मिळत असेल तर बोलणंच खुंटले.

मामाजी's picture

30 Dec 2018 - 2:44 pm | मामाजी

अजुनही काही ग्रामीण भागात लोड शेडींग आहे हे आपल्याला माहीत आहे का? नाही, कारण आम्ही शहरी आहोत.. तेव्हा जरा आमच्या सारख्यांना समजेल अशा स्वरूपात सांगाल का, म्हणजे

गावाचे नाव तालुका लोड शेडिंग दिवस. लो शे सुरू व्हायची वेळ संपायची वेळ
अबक पफब दर गुरूवार सकाळी १०:०० सायंकाळी ५:००

गावाचे नाव -------तालुका------- लोड शेडिंग दिवस---------लो शे सुरू व्हायची वेळ-------संपायची वेळ
----अबक --------- पफब------------दर गुरूवार----------------सकाळी १०:००---------------सायंकाळी ५:००

मामाजी's picture

30 Dec 2018 - 7:35 pm | मामाजी

मागो साहेब, आपण दिलेली ही लिंक व मी सरळ व साध्या शब्दात आपल्याला लोड शेडिंग चालू असलेल्या गावांची नावे द्यायची केलेली विनंती यांचा काय संबंध आहे हे मला कळले नाही. आपण जरा उलगडून सांगीतले तर बरे होइल.

मार्मिक गोडसे's picture

30 Dec 2018 - 7:53 pm | मार्मिक गोडसे

महावितरण कंपनीच्या साईटवर तुम्हाला माहिती मिळेल. नुसती गावाची नावं समजून काही कळणार नाही. एखाद्या गावात थ्री फेज (शेती) बंद असते ,सिंगल फेज (घरगुती)चालू असते.
मुळात वीजनिर्मिती पुरेशी होत असेल तर भारनियमन कशासाठी?

मार्मिक गोडसे's picture

3 Jan 2019 - 12:19 pm | मार्मिक गोडसे

शहरी भागातील लोड शेडींग माहीत नसलेल्या लोकांसाठी ,
फ्रॉम दि हॉर्सेस माऊथ

https://www.google.co.in/amp/www.agrowon.com/agriculture-news-marathi-fa...

तोंड बंद.

मार्मिक गोडसे's picture

7 Jan 2019 - 12:21 am | मार्मिक गोडसे

मामाजी, बोलाकी..... शॉक बसला की काय?

गब्रिएल's picture

29 Dec 2018 - 9:41 pm | गब्रिएल

ओ लै हुश्शार रागाभक्त (कोनी कोणी मंदभक्त म्हंत्यात, पन ह्या, मी नाय म्हन्नार), चष्मा काडा आनी ह्यी साईट बगा. समदं समजंल. :)

https://transformingindia.mygov.in/

मार्मिक गोडसे's picture

29 Dec 2018 - 9:51 pm | मार्मिक गोडसे

तुमचं बरोबर आहे, परंतू शेतकरी अशा साईट बघत नसल्याने सवयीने रात्री शेतात पाणी भरतात.

Blackcat's picture

29 Dec 2018 - 11:06 pm | Blackcat (not verified)

भाजपा मोदी प्रेमींना आजही काँग्रेसमध्ये डोकावल्याशिवाय चैन पडत नाही , नेहरुच का , पटेलच का नाहीत ,..... नारसिंहराब .... चिदम्बरम ..... राहुल

वास्तविक ह्यांचा भाजपा संघरुपात 1925 सालीच वेगळी चूल घालून बसला , पण 1925 पासून 46 अखेर ह्यांच्यापैकी कुणीही काठी सरसावत मी पँतप्रधान होणार किंवा गृहमंत्री होणार , असे म्हणाला नाही,

तेंव्हा काय अन आज काय , ह्यांना काँग्रेसमध्ये कोण काय होणार ह्यांचीच चिंता लागलेली असते ,

नाखु's picture

30 Dec 2018 - 7:39 am | नाखु

योग्य आहे,कृष्णमार्जार .मी सहमत आहेच पण भाजपचे समर्थक, अत्यंत दीर्घद्वेषी सुद्धा तुमच्याशी सहमत होतील तुमच्याच विधानाचा न लिहीलेला उत्तरार्ध वाचला की

भाजपा संघरुपात 1925 सालीच वेगळी चूल घालून बसला , पण 1925 पासून 46 अखेर ह्यांच्यापैकी कुणीही काठी सरसावत मी पँतप्रधान होणार किंवा गृहमंत्री होणार , असे म्हणाला नाही,

कारण संघात सरसंघचालक गुणवत्ता आणि दर्जा पाहूनच निवडला जातो,ते कॉंग्रेसचे अध्यक्षपदासारखे (फक्त
पुर्वपुण्याईवर ) गांधी घराण्यातील सुमार वकुबाच्या युवराजांची हक्काची गादी नाही

Blackcat's picture

30 Dec 2018 - 7:51 am | Blackcat (not verified)

मग तसे असेल तर भाजपावालयाना काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकांची चिंता का असावी ?

गुणवत्तेच्या जीवावर भाजपचे अध्यक्ष , पंप्र , गृहम्मतरी वगैरे निवडून येऊ देत. पण गुणवत्तेवर येऊनही भाजपाचे लोक टिकेना झालेत , वाजपेयी व त्यांचे सरकार 5 वर्षे , ह्या सरकारातही अनेक दिगग्ज मंत्री समरक्षण , रेल्वे वगैरे दोन वर्षातच बदलले , इरानींची दोन तीन डीपारमेंटे झाली ,
काँग्रेसचे लोक 10-15 वर्षे खुर्ची चालवायचे, जनता हेही पहात असेलच ना ?

डँबिस००७'s picture

30 Dec 2018 - 10:05 am | डँबिस००७

काँग्रेसचे लोक 10-15 वर्षे खुर्ची चालवायचे, जनता हेही पहात असेलच ना ?

10-15 वर्षे खुर्ची पकडुन बसले मग सामान्य नेते करोडो रु ची मालमत्ता जमवु शकले !! उदा. छगनराव भुजबळ !

मार्मिक गोडसे's picture

30 Dec 2018 - 9:47 am | मार्मिक गोडसे

इतके दिवस काँग्रेसमुक्त भारत ची वल्गना करणाऱ्या सत्ताधारी पक्षाला आणि त्याच्या भक्तांना, राहुल गांधी पंतप्रधान होणार इतका आत्मविश्वास कुठून आला देव जाणे.

तेजस आठवले's picture

30 Dec 2018 - 6:40 pm | तेजस आठवले

हा प्रतिसाद वैयक्तिकरित्या कोणालाही नाही.

काँग्रेसमुक्त भारत ही कल्पना भाजपने सोडून द्यावी हेच योग्य राहील. लोकशाहीत एक जबाबदार विरोधी/सत्ताधारी पक्ष असणे चांगले आहे. काँग्रेसला राज्यकारभाराचा भरपूर अनुभव आहे, पण घराणेशाही त्यांना त्रासदायक ठरली आहे आणि ठरणार आहे, पण त्यातून ते कुठलाही बोध घ्यायला तयार नाहीत असे दिसते. जोपर्यंत रागा किंवा इतर कोणी गांधी काँग्रेसचे मुख्य आहेत, तोपर्यंत आपल्याला जिंकायचे असल्यास रागाच पुढले पंतप्रधान होऊ शकतात हा आत्मविश्वास लोकांच्या मनात पेरणे महत्वाचे आहे हेही भाजप जाणते.
माझे तर असे मत झाले आहे की भाजपने पार्टी विथ डिफरन्स हे वाक्य पण आता सोडून द्यावे आणि सत्तेसाठी शक्य त्या सर्व तडजोडी कराव्यात.मागे राहू नये.भाजप हा काही धुतल्या तांदुळासारखा पक्ष नाही, मग उगाच आपली तशी इमेज करण्यात वेळ घालवू नये.कर्नाटकात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कुमारस्वामींचे तोंडही बघणार नाही असे म्हणणाऱ्या काँग्रेसने पुढच्याच आठवड्यात हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली.आज लोकसत्तेत शिवसेनेला सत्तेपासून दूर राहण्यासाठी नगरमध्ये भाजप-राष्ट्रवादी युती झाल्याची बातमी आली आहे.
बाकी देशात अघोषित आणीबाणी चालू आहेच.मनमोहन सिंगांवरील चित्रपट आधी काँग्रेसला दाखवून हवा तसा बदलून घ्यावा आणि मग प्रदर्शित करावा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू ही बातमी सगळ्याच वृत्तपत्रांनी दाबली आहे.
https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/author-ram-khandekar-a... हा आज छापून आलेला लेख बऱ्यापैकी संतुलित आणि वास्तववादी आहे.

Blackcat's picture

30 Dec 2018 - 7:10 pm | Blackcat (not verified)

लोकशाही व घटना लिहिण्याची काँग्रेस साक्षेदार आहे , त्यामुळे मोठी पार्टि म्हणजे सत्ताधीश व उर्वरित ते विरोधी पक्ष ही कल्पना त्यांना आहे ,

काँग्रेसने विरोधी पक्षास कधी ही वागणूक दिली नाही , काँग्रेस सत्ताधीश असताना बाजपेयींना भारताचे प्रतिनिधी म्हणून पाठवले,

याउलट , मोदीजी तर परदेशातही गांधी परिवार व काँग्रेसची बदनामी करत फिरतात , राष्ट्रीय सणात काँग्रेस नेत्याला पाचव्या रांगेत बसवले गेले होते.

जनतेचे भले यातच आहे की सत्ताधीश व विरोधी पक्ष दोघांनाही आपल्या / देशाच्या सेवेस लावणे

Blackcat's picture

30 Dec 2018 - 7:12 pm | Blackcat (not verified)

काँग्रेसने विरोधी पक्षास कधी हीन वागणूक दिली नाही ,

मामाजी's picture

30 Dec 2018 - 7:55 pm | मामाजी

बरोबर फक्त आणिबाणीत सर्व विरोधकांना तुरूंगात डांबून अत्यंत सन्मानाची वागणूक दिली.

काँग्रेसने विरोधी पक्षास कधी हीन वागणूक दिली नाही ,...... तर हिंदु जनतेलाच हिन करुन टाकल !
सर्वात सहिष्णु समाजाला आतंकी ठरवणारे नेते कॉंग्रेसचेच !!
हिंदु धर्माची सर्वात जास्त अवहेलना ह्याच पक्षाने केली !!

ट्रेड मार्क's picture

4 Jan 2019 - 6:57 am | ट्रेड मार्क

लोकशाही व घटना लिहिण्याची काँग्रेस साक्षेदार आहे

तुम्ही म्हणताय ती काँग्रेस कधीच विसर्जित झाली. आता ज्याची तरफदारी करताय ती काँग्रेस कधीच संपली. १९६९ साली काँग्रेसने इंदिरा गांधींना पार्टीमधून बाहेर काढले आणि नंतर इंदिरा गांधींनी काँग्रेस (I), म्हणजेच इंदिरा काँग्रेस स्थापन केली. या काँग्रेसचा आणि घटना लिहिण्याला साक्षीदार असण्याचा काही संबंध नाही. तसेच लोकशाहीशी सुद्धा काही संबंध नाही हे त्यांनी आणीबाणी लागू करून दाखवून दिले. त्यांनी आणीबाणी का लागू केली हे पण माहित नसेल तर हे वाचा.

अजूनही काँग्रेस लोकशाही मानत नाही हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. गांधी कुटुंबातील व्यक्ती सोडून इतर कोणी काँग्रेसचा अध्यक्ष होऊ शकत नाही इतकेच नव्हे तर देशाचा पंतप्रधानही होऊ शकत नाही. कोळसा उगाळावा तेवढा काळाच.

२०१९ मध्ये दोन मोठ्या राजकीय नेत्यांवर आधारित बायोपिक येत आहेत. यातला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट आधीच वादात सापडला आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपटदेखील पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. या सर्व बायोपिकमध्ये आणखी एका बायोपिकची चर्चा आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची. या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबोरॉय हा मोदींच्या तरुणपणीच्या भूमिकेत दिसणार अशा चर्चा आहेत.

मराठी कथालेखक's picture

30 Dec 2018 - 8:46 pm | मराठी कथालेखक

भाजप चालेल

ट्रम्प's picture

30 Dec 2018 - 10:27 pm | ट्रम्प

https://youtu.be/q6a7YHDK-ik
एक्सीडेंटल पी एम च्या ट्रेलर ला 50 लाख लाईक भेटले आहेत आणि 47 हजार डिसलाईक भेटले अस का बर ? का या अकडेवारी मध्ये काही फेरफार करता येतो का ? का 50 लाख भाजप प्रेमी आणि 47 हजार काँग्रेस प्रेमी ?
का यु ट्यूब पण भाजप साठी काम करते ?

एम एम सिंग साहेबाना काल परवा पत्रकारानी या सिनेमा बद्दल विचारले असता त्यांनी सोइस्कर रित्या मौन धारण केले कदाचित सिनेमा मध्ये त्यांची इमेज चांगली दाखवली आहे म्हणून , पण सुरजेवाला मात्र खाल्ल्या मीठाला जागुण ट्रेलर विरोधात आकाश पातळ एक करत आहेत .

Blackcat's picture

31 Dec 2018 - 6:56 am | Blackcat (not verified)

'मी नथुराम' लाही लाईक्स जास्त व दिस्लाईक्स कमी आहेत.

मोदीना सांगा , गांधींच्या पुतल्यापुढे नको , नथुरामाला नमस्कार करावा .

डँबिस००७'s picture

31 Dec 2018 - 9:20 am | डँबिस००७

तुम्ही तुमच्या युवराजाची काळजी करा !
मोदीजींच ते बघुन घेतील !

Blackcat's picture

31 Dec 2018 - 10:27 am | Blackcat (not verified)

मोदींची काळजी करणार्यानीच हा धागा काढला आहे.

ट्रम्प's picture

31 Dec 2018 - 9:55 am | ट्रम्प

अहो मला अस म्हणायचे आहे की लाईक डिसलाईक करणारे सुशिक्षित आहेत असे गृहीत धरले तर सुशिक्षित लोकांचा मतप्रवाह मोदींच्या बाजूने जास्त आहे अस वाटतंय .
बाकी मला रागाचे काही वावड नाहीये , फक्त त्याने पंतप्रधान पदासाठी सर्व विरोधी पक्षांचा पाठिम्बा मिळवावा मग आम्ही पण काँग्रेस ला मत देणार .
आता फक्त तुम्ही काँग्रेस गरीबांना जशी खिजगिणतीत काढ़ते तसे तुम्ही आमच्या एका मता ला काढू नका =)

आजूनबी डोसक्यात येत नसंल तर वाजपेयी सरकार पडल्यावर २००४ पासून २०१४ पत्तूर क्येलेली लूटमार आटवा. तेवा शर्ट्प्यांट चोरली व्हती, आता परत सत्येत आलं तर अंडरवियरबी चोरायला मागं पाहनार नाय. :(

Blackcat's picture

31 Dec 2018 - 4:17 pm | Blackcat (not verified)

सलमान सुटला
तू जी वाले सुटले

आज तेलगी स्केम सगळे सुटले , तेलगी मेला नसता तर तोही बाइज्जत बरा झाला असता !!!

देशातले लोक धरता येईनात आणि परदेशातून आणलेला धरून ठेवणार म्हणे

ह्येला म्हंत्यात कावळ्याची नजर.

पंगतीत गोडाधोडाचं जेवान आसलं तरी नजर मांडवाभायेरच्या जनावराच्या पो वर! चांगलं काय करायची आदत नसलेल्या न्येत्यांचे पाय पकडल्याले आसल्यावर आजून काय व्हनार म्हना? लई ब्येकार. :(

आयला तुम्ही छुपे मोदी समर्थक आहात कि काय? कुलगाय सारखे?

गामा पैलवान's picture

3 Jan 2019 - 12:42 am | गामा पैलवान

कोणी सोडलं त्यांना? मोदींनी तर नाही ना सोडलं?

-गा.पै.

सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टीसपासून ते ग्रामपंचायतीतल्या शिपायापर्यंत सगळ्यांना मोदीच तर म्यानेज करतात. ट्रम्पने चीनबरोबर भांडण करो नाहीतर तुमच्या गल्लीतले दिवे कोणा भुरट्याने चोरून नेवो, त्याला मोदीच तर जबाबदार असतात.

तरी आश्चर्य या गोष्टीचं आहे की एवढं सगळं म्यानेज करणारा माणूस लोकांना नकोय!