✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वन मोर फेअर चान्स.

व
वेडसर यांनी
Sat, 12/29/2018 - 10:01  ·  लेख
लेख
माझं म्हणणं इतकंच, की कारणं काही का असेनात, फक्त एकाच परिवारापुढे लोटांगणं घालत त्या परिवाराला सातत्याने ६० वर्ष संधी दिली गेली. मग मोदींना अजून किमान पुढची ५ वर्ष तरी संधी द्यायला नको का? त्यामुळे निदान मी तरी २०१९ ला मोदींकरताच मतदान करणार आहे. आपण आपल्यापुरतं काय ते बोलावं! Let me give Modi one more fair chance in 2019. मग २०२४ ला काय करायचं ते बघू. आपण काय म्हणता? :) वेडसर.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29550 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

हा प्रतिसाद वैयक्तिकरित्या

तेजस आठवले
Sun, 12/30/2018 - 18:40 नवीन
हा प्रतिसाद वैयक्तिकरित्या कोणालाही नाही. काँग्रेसमुक्त भारत ही कल्पना भाजपने सोडून द्यावी हेच योग्य राहील. लोकशाहीत एक जबाबदार विरोधी/सत्ताधारी पक्ष असणे चांगले आहे. काँग्रेसला राज्यकारभाराचा भरपूर अनुभव आहे, पण घराणेशाही त्यांना त्रासदायक ठरली आहे आणि ठरणार आहे, पण त्यातून ते कुठलाही बोध घ्यायला तयार नाहीत असे दिसते. जोपर्यंत रागा किंवा इतर कोणी गांधी काँग्रेसचे मुख्य आहेत, तोपर्यंत आपल्याला जिंकायचे असल्यास रागाच पुढले पंतप्रधान होऊ शकतात हा आत्मविश्वास लोकांच्या मनात पेरणे महत्वाचे आहे हेही भाजप जाणते. माझे तर असे मत झाले आहे की भाजपने पार्टी विथ डिफरन्स हे वाक्य पण आता सोडून द्यावे आणि सत्तेसाठी शक्य त्या सर्व तडजोडी कराव्यात.मागे राहू नये.भाजप हा काही धुतल्या तांदुळासारखा पक्ष नाही, मग उगाच आपली तशी इमेज करण्यात वेळ घालवू नये.कर्नाटकात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कुमारस्वामींचे तोंडही बघणार नाही असे म्हणणाऱ्या काँग्रेसने पुढच्याच आठवड्यात हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली.आज लोकसत्तेत शिवसेनेला सत्तेपासून दूर राहण्यासाठी नगरमध्ये भाजप-राष्ट्रवादी युती झाल्याची बातमी आली आहे. बाकी देशात अघोषित आणीबाणी चालू आहेच.मनमोहन सिंगांवरील चित्रपट आधी काँग्रेसला दाखवून हवा तसा बदलून घ्यावा आणि मग प्रदर्शित करावा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू ही बातमी सगळ्याच वृत्तपत्रांनी दाबली आहे. https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/author-ram-khandekar-article-on-pv-narasimha-rao-3-1814366/ हा आज छापून आलेला लेख बऱ्यापैकी संतुलित आणि वास्तववादी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

छान. सुंदर

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 12/30/2018 - 19:10 नवीन
लोकशाही व घटना लिहिण्याची काँग्रेस साक्षेदार आहे , त्यामुळे मोठी पार्टि म्हणजे सत्ताधीश व उर्वरित ते विरोधी पक्ष ही कल्पना त्यांना आहे , काँग्रेसने विरोधी पक्षास कधी ही वागणूक दिली नाही , काँग्रेस सत्ताधीश असताना बाजपेयींना भारताचे प्रतिनिधी म्हणून पाठवले, याउलट , मोदीजी तर परदेशातही गांधी परिवार व काँग्रेसची बदनामी करत फिरतात , राष्ट्रीय सणात काँग्रेस नेत्याला पाचव्या रांगेत बसवले गेले होते. जनतेचे भले यातच आहे की सत्ताधीश व विरोधी पक्ष दोघांनाही आपल्या / देशाच्या सेवेस लावणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले

दुरुस्ती

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 12/30/2018 - 19:12 नवीन
काँग्रेसने विरोधी पक्षास कधी हीन वागणूक दिली नाही ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

बरोबर फक्त आणिबाणीत सर्व

मामाजी
Sun, 12/30/2018 - 19:55 नवीन
बरोबर फक्त आणिबाणीत सर्व विरोधकांना तुरूंगात डांबून अत्यंत सन्मानाची वागणूक दिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

काँग्रेसने विरोधी पक्षास कधी

डँबिस००७
Mon, 12/31/2018 - 08:23 नवीन
काँग्रेसने विरोधी पक्षास कधी हीन वागणूक दिली नाही ,...... तर हिंदु जनतेलाच हिन करुन टाकल ! सर्वात सहिष्णु समाजाला आतंकी ठरवणारे नेते कॉंग्रेसचेच !! हिंदु धर्माची सर्वात जास्त अवहेलना ह्याच पक्षाने केली !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

कोणती काँग्रेस?

ट्रेड मार्क
Fri, 01/04/2019 - 06:57 नवीन
लोकशाही व घटना लिहिण्याची काँग्रेस साक्षेदार आहे तुम्ही म्हणताय ती काँग्रेस कधीच विसर्जित झाली. आता ज्याची तरफदारी करताय ती काँग्रेस कधीच संपली. १९६९ साली काँग्रेसने इंदिरा गांधींना पार्टीमधून बाहेर काढले आणि नंतर इंदिरा गांधींनी काँग्रेस (I), म्हणजेच इंदिरा काँग्रेस स्थापन केली. या काँग्रेसचा आणि घटना लिहिण्याला साक्षीदार असण्याचा काही संबंध नाही. तसेच लोकशाहीशी सुद्धा काही संबंध नाही हे त्यांनी आणीबाणी लागू करून दाखवून दिले. त्यांनी आणीबाणी का लागू केली हे पण माहित नसेल तर हे वाचा. अजूनही काँग्रेस लोकशाही मानत नाही हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. गांधी कुटुंबातील व्यक्ती सोडून इतर कोणी काँग्रेसचा अध्यक्ष होऊ शकत नाही इतकेच नव्हे तर देशाचा पंतप्रधानही होऊ शकत नाही. कोळसा उगाळावा तेवढा काळाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

आणि आता मोदींवरही सिनेमा येत आहे,

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 12/30/2018 - 19:17 नवीन
२०१९ मध्ये दोन मोठ्या राजकीय नेत्यांवर आधारित बायोपिक येत आहेत. यातला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट आधीच वादात सापडला आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपटदेखील पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. या सर्व बायोपिकमध्ये आणखी एका बायोपिकची चर्चा आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची. या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबोरॉय हा मोदींच्या तरुणपणीच्या भूमिकेत दिसणार अशा चर्चा आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले

मोदी नको

मराठी कथालेखक
Sun, 12/30/2018 - 20:46 नवीन
भाजप चालेल
  • Log in or register to post comments

https://youtu.be/q6a7YHDK-ik

ट्रम्प
Sun, 12/30/2018 - 22:27 नवीन
https://youtu.be/q6a7YHDK-ik एक्सीडेंटल पी एम च्या ट्रेलर ला 50 लाख लाईक भेटले आहेत आणि 47 हजार डिसलाईक भेटले अस का बर ? का या अकडेवारी मध्ये काही फेरफार करता येतो का ? का 50 लाख भाजप प्रेमी आणि 47 हजार काँग्रेस प्रेमी ? का यु ट्यूब पण भाजप साठी काम करते ? एम एम सिंग साहेबाना काल परवा पत्रकारानी या सिनेमा बद्दल विचारले असता त्यांनी सोइस्कर रित्या मौन धारण केले कदाचित सिनेमा मध्ये त्यांची इमेज चांगली दाखवली आहे म्हणून , पण सुरजेवाला मात्र खाल्ल्या मीठाला जागुण ट्रेलर विरोधात आकाश पातळ एक करत आहेत .
  • Log in or register to post comments

छान

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 12/31/2018 - 06:56 नवीन
'मी नथुराम' लाही लाईक्स जास्त व दिस्लाईक्स कमी आहेत. मोदीना सांगा , गांधींच्या पुतल्यापुढे नको , नथुरामाला नमस्कार करावा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

तुम्ही तुमच्या युवराजाची

डँबिस००७
Mon, 12/31/2018 - 09:20 नवीन
तुम्ही तुमच्या युवराजाची काळजी करा ! मोदीजींच ते बघुन घेतील !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

छान

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 12/31/2018 - 10:27 नवीन
मोदींची काळजी करणार्यानीच हा धागा काढला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

काळे मांजर !!!

ट्रम्प
Mon, 12/31/2018 - 09:55 नवीन
अहो मला अस म्हणायचे आहे की लाईक डिसलाईक करणारे सुशिक्षित आहेत असे गृहीत धरले तर सुशिक्षित लोकांचा मतप्रवाह मोदींच्या बाजूने जास्त आहे अस वाटतंय . बाकी मला रागाचे काही वावड नाहीये , फक्त त्याने पंतप्रधान पदासाठी सर्व विरोधी पक्षांचा पाठिम्बा मिळवावा मग आम्ही पण काँग्रेस ला मत देणार . आता फक्त तुम्ही काँग्रेस गरीबांना जशी खिजगिणतीत काढ़ते तसे तुम्ही आमच्या एका मता ला काढू नका =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

आजूनबी डोसक्यात येत नसंल तर

गब्रिएल
Mon, 12/31/2018 - 15:35 नवीन
Image removed. आजूनबी डोसक्यात येत नसंल तर वाजपेयी सरकार पडल्यावर २००४ पासून २०१४ पत्तूर क्येलेली लूटमार आटवा. तेवा शर्ट्प्यांट चोरली व्हती, आता परत सत्येत आलं तर अंडरवियरबी चोरायला मागं पाहनार नाय. :(
  • Log in or register to post comments

अजज्याबात नाही

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 12/31/2018 - 16:17 नवीन
सलमान सुटला तू जी वाले सुटले आज तेलगी स्केम सगळे सुटले , तेलगी मेला नसता तर तोही बाइज्जत बरा झाला असता !!! देशातले लोक धरता येईनात आणि परदेशातून आणलेला धरून ठेवणार म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल

ह्येला म्हंत्यात कावळ्याची

गब्रिएल
Mon, 12/31/2018 - 22:43 नवीन
ह्येला म्हंत्यात कावळ्याची नजर. पंगतीत गोडाधोडाचं जेवान आसलं तरी नजर मांडवाभायेरच्या जनावराच्या पो वर! चांगलं काय करायची आदत नसलेल्या न्येत्यांचे पाय पकडल्याले आसल्यावर आजून काय व्हनार म्हना? लई ब्येकार. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

आयला तुम्ही छुपे मोदी समर्थक

आनन्दा
Tue, 01/01/2019 - 10:57 नवीन
आयला तुम्ही छुपे मोदी समर्थक आहात कि काय? कुलगाय सारखे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

कोणी सोडलं त्यांना?

गामा पैलवान
गुरुवार, 01/03/2019 - 00:42 नवीन
कोणी सोडलं त्यांना? मोदींनी तर नाही ना सोडलं? -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

सगळ्यांना मोदीच तर म्यानेज करतात

ट्रेड मार्क
गुरुवार, 01/03/2019 - 09:00 नवीन
सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टीसपासून ते ग्रामपंचायतीतल्या शिपायापर्यंत सगळ्यांना मोदीच तर म्यानेज करतात. ट्रम्पने चीनबरोबर भांडण करो नाहीतर तुमच्या गल्लीतले दिवे कोणा भुरट्याने चोरून नेवो, त्याला मोदीच तर जबाबदार असतात. तरी आश्चर्य या गोष्टीचं आहे की एवढं सगळं म्यानेज करणारा माणूस लोकांना नकोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा