मिस शलाका B.A.

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
28 Nov 2018 - 8:22 am

"शलाका!"

बसस्टॉपवर काकांनी एका पाठमोर्‍या मुलीला हाक मारली.

त्या मुलीनं मागे वळून पाहिलं.

"देशपांडे काका! काय म्हणताय? बर्‍याच दिवसांनी गाठ पडली."

"हो.हल्ली फारसं येणं होत नाही इकडे!"

"हो.बाबा बोलले मला.काळजी घ्या बरं तब्येतीची!"

"हो तर घ्यायलाच पाहिजे.तुझ्या लग्नात हिंडता फिरता यायला हवं मला.काका हसत हसत म्हणाले."

"लग्न!" शलाकाच्या कपाळावर आठ्या!

का गं? काय झालं?

"नै काही नाही!"

"अगं योग्य वयात लग्न झालेलं चांगलं"

"हो काका पण मनासारखं स्थळ तरी यायला पाहिजे ना?"

"कसं स्थळ हवंय तुला? सांग मला"

"आता पुण्यातले खर्च तुम्हाला माहितीच आहेत.त्यामुळे पगार जरा चांगलाच हवा हो!"

"चांगला म्हणजे किती?"

"किमान ५ लाखाचं तरी पॅकेज असावं"

"हे किमान?"

"हो.तेवढे लागतातंच"

"शलाका! अगं ३२ वर्षांची आहेस तू! जेमतेम BA आहेस.केवढ्या या अपेक्षा?"

"काका! आता आहेत भरपूर अॉप्शन मुलींसाठी मग काय बिघडलं? शलाका हसत हसत म्हणाली"

"बरं तुझ्या दादाचं काय? त्याची ती 'ऐटीतली नोकरी' काय म्हणतेय? त्याचं कुठे जुळलं की नाही?"

"चाललीय बरी! परवा आली होती एक मुलगी सांगून"

"मग? सरकलं का पुढे?"

"छे हो! मुलीनंच नकार दिला!"

"का बरं?"

"दादापेक्षा तिचं पॅकेज जरा जास्त होतं.म्हणजे दादाला ३९ आहे तिला ४१ होता."

"२ हजारासाठी?"

"हो"

"कठीणाय"

"जाऊ दे नाहीतरी ती मुलगी तोंडावरुन जरा गर्विष्ठच वाटत होती.होकार दिला असता तरी शोभली नसती दादाला"

"तू म्हणतेस म्हणजे असेल तसंच!" काकांनी कसंबसं हसू दाबत म्हटलं.

"अच्छा! काका बाय!" बसकडे पळता पळता शलाका!

बस डोळ्यापुढून जाईपर्यंत काका हसतंच होते.

(काल्पनिक संवाद)

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

माहितगार's picture

28 Nov 2018 - 9:02 am | माहितगार

मार्मिक

शलाका पळुन गेली ... काकांनी लैच बोर केलं राव .. =))

विनिता००२'s picture

28 Nov 2018 - 10:06 am | विनिता००२

प्रयत्न चांगला आहे.

पण ...पॅकेज हे वार्षीक असतं, महिन्याचं नाही.

आनन्दा's picture

28 Nov 2018 - 10:49 am | आनन्दा

अहो त्यांना लाख म्हणायचे असतील..

विनिता००२'s picture

28 Nov 2018 - 12:14 pm | विनिता००२

"दादापेक्षा तिचं पॅकेज जरा जास्त होतं.म्हणजे दादाला ३९ आहे तिला ४१ होता."

"२ हजारासाठी?" >>

हे वाचूनच सांगितले :)

उपयोजक's picture

28 Nov 2018 - 1:29 pm | उपयोजक

३९ आणि ४१ हे महिन्याचे पगारच आहेत.पॅकेजला १२ नं भागून काढलेले.
:)))))))

माहितगार's picture

28 Nov 2018 - 10:57 am | माहितगार

या दोन वाक्यांबाबत अधिक चर्चेसाठी स्कोप असावा असे वाटते.

"अगं ३२ वर्षांची आहेस तू! "

"जेमतेम BA आहेस.केवढ्या या अपेक्षा?"

टर्मीनेटर's picture

28 Nov 2018 - 10:58 am | टर्मीनेटर

"कठीणाय" :)
काल्पनिक संवाद आवडला.

सुबोध खरे's picture

28 Nov 2018 - 12:54 pm | सुबोध खरे

आमच्या एका स्नेहींची मुलगी आय आय एम लखनौ वरून व्यवस्थापन पदविका घेऊन बड्या बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला लागली. अर्थात पॅकेज भरभक्कम होतं (१८ लाख होतं सुरुवातीला). तिची अपेक्षा "राजबिंडा भरपूर पॅकेज असलेला (किमान ३० लाख) राजकुमार" अशी होती. हा नको- याचं नाक मोठं आहे, तो नको -त्याला पुढे थोडं टक्कल आहे, तो नको -त्याचं पोट सुटलंय, असं करत करत बरेच मुलगे नाकारले. आता वय ३४ आहे. आता पॅकेज ४५-५० लाख आहे अजूनही "मुलगा" शोधणे चालू आहे. पॅकेज निदान ४० लाख पाहिजे.

दुसरे एक सद्गृहस्थ (जी एस बी) माझ्या कडे रुग्ण म्हणून आले होते. त्यांचा मुलगा आय आय टी चा अभियंता. (सध्या वय वर्षे ३२). बंगलोरला बहुराष्ट्रीय कंपनीत सज्जड पगाराची नोकरी आहे (पॅकेज ४० लाख). त्याला दोन वर्षांपूर्वी एक मुलगी सांगून आली होती मुलगी पसंत पडली होती पुढे बोलणी करून नाते जुळवणार तेवढ्यात त्यांच्या नातेवाईकांकडून एक बातमी कळली कि एका मुलाबरोबर सध्या प्रेम प्रकरण चालू आहे ( लिव्ह इन राहत होती पण लग्न ठरायला आल्यामुळे मुलगी परत माहेरी आली होती) लग्न झाल्यावर काही तरी खुसपट काढून परत यायचं आणि भरपूर पोटगी किंवा एकदाच भरपूर पैसे उकळायचे असा बेत होता. या प्रकरणामुळे त्या मुलाने हाय खाल्ली आणि आता तो मुली बघायलाच तयार नाही.
आई वडील काकुळतीने सांगत होते डॉकटर कुणी चांगली मुलगी असेल तर सुचवा. जातीची अट नाही.

विनिता००२'s picture

28 Nov 2018 - 1:24 pm | विनिता००२

लग्न झाल्यावर काही तरी खुसपट काढून परत यायचं आणि भरपूर पोटगी किंवा एकदाच भरपूर पैसे उकळायचे असा बेत होता >> बापरे :( भितीच वाटते आजकालच्या मुलीची

लग्न झाल्यावर काही तरी खुसपट काढून परत यायचं आणि भरपूर पोटगी किंवा एकदाच भरपूर पैसे उकळायचे असा बेत होता.

पिंपरी (पुणे) : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. पैसे मिळत नसल्याने तिच्याकडे घटस्फोटाच्या मागणीसाठी तगादा लावला. घटस्फोट मिळवण्यासाठी विवाहितेच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडण्यात आले. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात घडली.

पिंपळे सौदागर परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय विवाहितेने याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पडवळ नगर, थेरगाव येथे राहणारा तिचा पती, सासरा आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

MNC मध्ये खूप पगार मिळायला लागल्यापासून हा प्रश्न जास्तच ज्वलंत झाला. माझ्या नातेवाईकांमध्ये कित्येक मुली स्वताच्या पॅकेजपेक्षा जास्त पॅकेजवाला नवरा मिळेल म्हणून आलेली स्थळे नाकारत राहिल्या आणि नंतर वय झाल्यावर पॅकेज तर जाऊद्याच पण किमान अपेक्षा पूर्ण करणारेही स्थळ यायचे बंद झाल्याने अविवाहित राहिलेल्या पाहिल्या आहेत. मुळातच किमान स्वताइतका तरी पैसे मिळवणारा नवरा हवाच हा मुलींचा अट्टाहास कितपत योग्य आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. एखादा मुलगा आता किती पैसे कमावतोय या पेक्षा भविष्यात यापेक्षा किती जास्त पैसे कमविण्याची क्षमता/योग्यता मुलामध्ये आहे याचा मुली स्थळ नाकारताना विचार करत नाहीत असे कित्येक मैत्रिणींच्या बाबतीत दिसून आलेय. शिवाय स्वता पैसे कमविण्याची क्षमता तसेच इच्छा नसणाऱ्या मुलींच्या तर काहीच्या काही अपेक्षा असतात. गाडी, बंगला, पाच आकडी पगार वर एकुलता एक असे काहीच्या बाही. स्वता सुमार दिसणाऱअया मुलींना होणारा नवरा मात्र स्मार्ट/गोराच हवा असतो. आणि या हट्टापाई सरकारी नोकरदारांची स्थळे नाकारणारे उदाहरण तर माझ्या जवळच्या नातेवाईकांमध्ये आहे. अशा मुलींकडे पाहून हसावं कि रडावं ते कळत नाही. बऱ्याचदा अशा मुलींचे पालक पण त्यांना वास्तवाची जाणीव करुन द्यायला कमी पडतात असं वाटतं. असो. खूप काही चर्चा करण्यासारखं आहे या विषयावर.

सगळीकडे वाईट, केवळ पैशाला आणि भौतिक सुखांना हपापलेल्या मुली नुसत्या. गोल्डडिगर्स.

पाश्चात्यांचं अंधानुकरण बोकाळलं आहे.

बिचाऱ्या होतकरु धडपडणाऱ्या उपवधू मुलांचे हाल नुसते.

अभ्या..'s picture

28 Nov 2018 - 1:34 pm | अभ्या..

मग नायतर काय,
गविबुवा काढा बरं काऊस्टॅम्प.
चुना तेवढा राजेश असलं तर बरं.

..आणि ही पहा तरुण मुलांची पिढी व्यसनाधीन.. छे. कलियुग कलियुग.

अभ्या..'s picture

28 Nov 2018 - 2:34 pm | अभ्या..

कलयुग कशापायी, तमाखूस युगायुगाचा दाखला है. मावळे बार भरून तर तलवारीस हात घालायचे.
तकीला, हुक्का चालतुया, मालपाण्यानं काय घोडं मारलं?

कृष्ण निघाले वैकुंठाला,

राधा बोले, पकडून बाही ...

इथे तंबाखु घे खाउनी कान्हा ...

'तिथे' तंबाखु नाही ...

जेनी...'s picture

28 Nov 2018 - 7:04 pm | जेनी...

=))

श्वेता२४'s picture

28 Nov 2018 - 1:56 pm | श्वेता२४

आणि सगळी मुले बिचारी, होतकरु?. सर्व मुले वास्तवाची जाण ठेऊन मुलींकडून/मुलीकडच्यांकडून अवास्तव अपेक्षा न ठेवणारी आहेत की काय? मुलीच्या रुपापलीकडे जाऊन तीचा स्वभाव व कर्तृत्वाचा विचार करुन निर्णय घेणारी सर्व मुले आहेत की काय? माझ्या एका मैत्रिणिचा आलेला अनुभन सांगते. ती रुपाने अत्यंत सावळी व फारशी आकर्षक देखील नाही. उंची सामान्य पण सरकारी नोकरदार. सुसंस्कृत सुस्वभावी व जबाबदार व्यक्ती आहे. मुलगा थोडा कमी शिकलेला व कमी कमावणारा असला , जबाबदाऱअया असला तरी चालेल म्हणणारी आहे. पण आता ती 35 वर्षआची झाली. धाकट्या बहीणीचे लग्न झाले. 2 वर्षापू्रवी मला तीच्याच जातीतला एक वर्षाने मोठा असलेला सरकारी नोकरदार मुलाबद्दल कळालं. तो दिसायला खूप स्मार्ट होता. त्याला अपेक्षा फक्त सरकारी नोकरदार मुलगी हवी होती. मग मी मैत्रिणीचा फोटो पाठवला. तर तो म्हणाला की मी कसा आहे दिसायला ते पहा ना. दिसायला जार स्मार्ट आणि गोरी मुलगी हवी. कमी शिकलेली व कमी कमावती पण चालेल. त्यामुळे आपले सरसकटीकरण पटले नाही बुवा.

गवि's picture

28 Nov 2018 - 2:05 pm | गवि

हे राम..

मराठी कथालेखक's picture

29 Nov 2018 - 1:01 pm | मराठी कथालेखक

काळ्या रंगाबद्दल नकारात्मकता सार्वत्रिकच म्हणावी..
हेच पहा ना तुम्ही लिहिलंय

ती रुपाने अत्यंत सावळी

पण सरळ 'काळी' म्हणायचं टाळलंत .."अत्यंत सावळी" असा फारसा वापरात नसलेला शब्दप्रयोग केलात !!

श्वेता२४'s picture

29 Nov 2018 - 1:43 pm | श्वेता२४

मानवी त्वचेचा रंगाला काळा म्हणत नसावेत बहुदा. सावळा हाच शब्द वापरला जातो. सावळा हा शब्द अपमानास्पद वाटत नाही. पण कुणालातरी काळे म्हणणे खूपच वाईट आहे. ती किती काळी आहे असे म्हणणे व ती किती सावळी आहे यामध्ये तीव्रतेनुसार फरक पडतो. शिवाय सावळी माणसे ही कधीकधी गोऱ्या माणसांनाही मागे टाकतील इतकी सुंदर दिसतात. असो.
पण लगानाच्या बाजारात काळे/गोरे असणे खूप निर्णायक ठरते. किंबहूना बाह्यसौंदर्याचा विचारच जास्त केला जातो. पण खरंच संसार करतानामात्र एखाद्या व्यक्तीचे गुण/स्वभाव /सवय चांगली नसेल तर ते नाते टिकवणे किती अवघड असते याचा कोणी विचार करत नाही. अर्थात यामध्ये आपल्याकडे लग्न जुळवताना वधू-वरांना एकमेकांची इतकी माहिती करुन देण्याची सोय नाही व त्या दोघांना काय वाटते यापेक्षा पैसा, मानपान , प्रतिष्ठा असल्या गोष्टीनाच जास्त महत्व येते. असो एकंदरीतच अॅरेंज मॅरेज पद्धतीबद्दल प्रचंड सुधारणेची गरज आहे असं वाटतं.

मराठी कथालेखक's picture

29 Nov 2018 - 3:12 pm | मराठी कथालेखक

मानवी त्वचेचा रंगाला काळा म्हणत नसावेत बहुदा.

म्हणतात हो..
गोरा , उजळ, गहूवर्णी , सावळा , काळा .. अशी श्रेणी आहे. ते असो.

किंबहूना बाह्यसौंदर्याचा विचारच जास्त केला जातो.

नवरा बायकोंत परस्परांबद्दल सर्व पातळींवर आकर्षण असणे महत्वाचे आहे (शारिरिक, बौध्दिक, भावनिक ई) पण अनेकदा स्त्री पुरुषांच्या नात्याची सुरुवात शारिरिक आकर्षणाने होते. खास करुन पारंपारिक वधू-वर संशोधन पध्दतीत.
काही वेळा मात्र बौध्दिक आणि भावनिक आकर्षणाने सुरु झालेल्या नात्यात शारिरिक आकर्षण हळूहळू उत्पन्न होते. हे खास करुन मैत्रीतून प्रेमात पडलेल्या जोडप्यांच्या बाबतीत आढळू शकेल (प्रथमदर्शनी प्रेम नव्हे). तुमच्या आसपास कदाचित तुम्ही काही अगदी अनाकर्षक स्त्रिया /मुली पाहिल्या असतीलही की ज्यांचा प्रेमविवाह कसा झाला याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. बहूधा असे प्रेम हे दीर्घ मैत्रीनंतर झालेले आढळेल.
असो.

जेनी...'s picture

28 Nov 2018 - 6:55 pm | जेनी...

आँ ???

सरसकट सगळ्या मुली वाईट्ट ?? :-०

म्हणजे पुढील पानावर सुरु करता येईल , नाहीतर तेच तेच मुद्दे येत राहतील चर्चेत :D

सिरुसेरि's picture

28 Nov 2018 - 4:04 pm | सिरुसेरि

अरेरे . काय हा दैवदुर्विलास . जगात विशुद्ध प्रेम राहिलेच नाही .

माझा लग्नाआधीच अनुभव .. मी नुकताच एका पब्लिक टेस्टिंग लॅबमध्ये कामाला लागलो होतो .. सुरुवातीचा पगार फक्त ८०० रुपये होता .. त्यावेळी आमच्या मोठ्या बहिणीचे ( सक्खी चुलत बहीण ) लग्न ठरले होते .. ती पेहसाने वकील आणि जिजाजी सी ए .. तर लग्न वनिता समाज हॉल शिवाजी पार्क येथे मोठ्या धुमधडाक्यात लागले .. तेव्हा तिथे माच्या साताऱ्याच्या बाजूचे देशमुख म्हणून जमीनदार आलेले होते .. त्यांची मुलगी फॅशन डिझायनर होती .. तेव्हा त्या मुलीला अदमासे १८००० पगार होता ..
त्या देशमुखांनी माझ्या बाबांशी प्राथमिक बोलणी केली आणि मग मला बोलावून घेतले .. मी तिथे गेल्यावर त्यांनी मला मी कुठे काम करतो ते विचारले .मी नाव गाव फळ फुल सर्व सांगितले .. मग त्यांनी मला माझ्या पगाराबद्दल विचारले .. मी मोठ्या रुबाबात उत्तर दिले ८०० रुपये महिना .. त्या उत्तरावर ते एव्हढे खुश झाले कि हात धुवून मागे लागले होते .. मुलगी दिसायला ठीकठाक होती पण माझा माझ्यावरच विश्वास नव्हता, साला ८०० रुपयाचा आठ लाख झाला तर ठीक नाहीतर हि जरशी गाय पाळणार कोण ? मी आपला कसाबसा त्यांना स्पष्ट सांगून मोकळा झालो , कि मला किमान तीन वर्षांचा तरी अवधी द्या , मला माहित नाही माझे पुढे कसे असणार ते , पण मला वाटत सद्य स्थितीवरून तरी मी आपल्या मुलीची यथायोग्य देखभाल करू शकत नाही .. त्यावर ते उत्तरले आम्हाला ठाऊक होते कि तुमचे हेच मत असणार पण एक सांगून ठेवतो , जमिनी कसल्यात आणि कारखाने बी जवळून बघितले आहेत , आमची निवड कधीच चुकत नाही आणि चुकणारही नाही .. तुम्हाला खरंच सांगू , आज देवाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित चालू आहे .. आणि या धाग्यामुळे आपसूक त्या स्मृती जाग्या झाल्या ..

उपयोजक's picture

28 Nov 2018 - 6:12 pm | उपयोजक

छान अनुभव.

बाकी देशमुखांसारखे 'समजुतदार' लोक दुर्मिळ असतात.

वामन देशमुख's picture

28 Nov 2018 - 6:56 pm | वामन देशमुख

बाकी देशमुखांसारखे 'समजुतदार' लोक दुर्मिळ असतात.

हो, हो, अगदी खरं बोललात पहा! ;)

- वामन देशमुख

जेनी...'s picture

28 Nov 2018 - 6:57 pm | जेनी...

नाव गाव फळ फूल =))

आज म्या भरून पावलो है .. आमची जेनी तै पार आलेली है ,, हत्ती मागवला है , साखर वाटणार है ,, कुणाल पाहिजे असेल तर मुंबईला यायचं है ,, स्थळांचं नाव : सायं पनवेल हायवे है , गाव : वाशी है , फळ : सध्या पेरू है , फुल : गुलबकावली है ...

ए वाजवा रे वाजवा , जेनी तै परत आलेली है

खिलजि's picture

28 Nov 2018 - 7:08 pm | खिलजि

पार = परत

जेनी...'s picture

28 Nov 2018 - 7:15 pm | जेनी...

माझ्याकडनं तुम्हाला .. एक पूस्प्गुच =))

खिलजि's picture

28 Nov 2018 - 7:29 pm | खिलजि

एक पूस्प्गुच , म्हणजे पुष्पगुच्छ का ?

जेनी...'s picture

28 Nov 2018 - 8:33 pm | जेनी...

हाहाहा... तुम्हाला नविने वाट्टं हा शब्द ;)

नै नवीन नै कै .. गुदगुल्या करून र्हायला.. लै आवडलं बघा .. पुस्पगूच .. आत्ता प्रत्येकाला देत सुटतो बघा ..

नाखु's picture

28 Nov 2018 - 6:42 pm | नाखु

दोन व्यक्तिंचे जमत नाही तर दोन घराण्यांचे** जमते.

तळटीप (अपेक्षित,अध्यारुत, आंतरिक)
आर्थिक पत प्रतिष्ठा आणि सामाजिक स्थान यांची तुलना करून जेष्ठ जाणते वरील विधान करतात.
साहजिकच निर्व्यसनी,स्वकर्तृत्वावर शिकलेला,आणि काही प्रगती करण्यासाठी कष्टाळू इत्यादी शुल्लक बाबी कालबाह्य ठरवल्या जातात.
दोन्ही बाजूंनी अपेक्षा वाढविण्यासाठी पालकांचे आणि मित्र मैत्रिणी यथायोग्य भर टाकायची धडपड करीत असतात.

वाचकांची पत्रेवाला नाखु पांढरपेशा

कंजूस's picture

28 Nov 2018 - 8:49 pm | कंजूस

कोणाचं चुकतय नक्की?

साला मै आता आमच्या खानदान का मोस्ट लग्नेबल खोंड असल्याकारणाने सध्या बाजारात बायोडाटा फिरत आहे, आमचं थोर कर्तृत्व जाणुन जन्मदात्यांनी लव-म्याटर विचारायची देखील तसदी घेतली नाही, ताईसाहेब, मातोसरी, वहिनी साहेब, दादोजी, पिताश्री सगळे एकाच कामी, मी मात्र गरीबासारखा कुठल्याही पोरीने पसंत करावे एवढीच अपेक्षा ठेऊन वाट पाहतोय आणि आमचं बाकी सैन्य धडाधड पोरी रिजेक्ट करतय.

जेनी...'s picture

29 Nov 2018 - 12:04 am | जेनी...

हिहिहि.

दुर्गविहारी's picture

11 Dec 2018 - 1:36 pm | दुर्गविहारी

सैन्याला आवरा ! नाही तर नंतर अवघड होईल. ;-)

या सगळ्यातून गेल्ये त्यातून एक कळलंय कि एखादा मुलगा (मुलगी) मनापासून आवडला तर सगळ्या अटी शिथिल होतात. पण जर आवडला नसेल तर घर -दार पगार उंची वय इ कारणं सांगितली जातात. आपल्या ठरवून केलेल्या पद्धतीत दिसणं जास्त महत्वाचं ठरतं, पण कधी कधी वागण्यातला चांगुलपणा पण आवडू शकतो.

एका स्थळाने मला नकार देताना सांगितलेलं कारण खरंच आवडलं आणि आम्ही आमच्या घरात पुढच्या लग्नांमध्ये पण ते वापरलं , ते म्हणजे - " योग नाही ". उगाच कोणाला चांगलं वाईट कशाला म्हणत बसा. समजणार २ शब्दात समजून जातो आणि खूप चिरफाड करायला लागत नाही
पण एक आहे कोणी मध्यस्थी करत असेल ना तर त्या माणसाला सहसा फार राग येतो कोणीही नकार दिला तरी. त्यांच्या दृष्टी ने सगळं "जुळतंय तरी का नाही म्हणतायात" "अपेक्षा फारच आहेत" "स्वतः काय आहात त्याचा विचार करावा" इ इ वाक्य येतात. अजूनही ओळखीत कितीतरी (साधारण ६०+) लोकांना "मुलगी" नकार देते याचं आश्चर्य वाटतं, राग येतो. साधा विचार आहे, ज्या दोघांना लग्न करायचंय ते हो म्हणाले कि झाला. पण होताच नाही ते.

अटी फार आहेत म्हणणारी माणसं स्वतःच्या मुलांच्या लग्नात मात्र तेवढ्याच अटी घालताना बघितलीयेत.

सुबोध खरे's picture

1 Dec 2018 - 10:21 am | सुबोध खरे

आमचा मामा डॉक्टर आहे त्याचे लग्न ठरवताना त्यांनी एक मुलगी पहिली होती. ती पसंत नव्हती म्हणून पत्रिका जुळत नाही असे लिहून आमच्या आजोबानी त्यांना कळवले.
त्यावर मुलीच्या वडिलांचा आजोबाना फोन आला कि तुम्ही एवढे सुशिक्षित मुलगा डॉक्टर आहे तरी पत्रिकेत विश्वास ठेवता.
तुम्ही दांभिक आहात वगैरे वगैरे.

सुरुवातीला आजोबानी ऐकून घेतले पण "दांभिक" म्हणल्यावर मात्र त्यांचा पारा चढला आणि ते म्हणाले अहो मुलीला वाईट वाटू नये म्हणून पत्रिका जुळत नाही असे म्हणण्याची पद्धत आहे.

आम्ही तिची पत्रिका पाहिलेली नाही परंतु तुमची मुलगी दिसायला सुंदर नाही, तिचे दात पुढे आहेत. आमच्या मुलाला तिचे "विचार पटले नाहीत" हे सर्व मुलीला तोंडावर बोलून तिचे मन दुखावू नये म्हणून पत्रिकेचे कारण पुढे केले होते.

मुळात मुलगी का पसंत नाही हे विचारणारे तुम्ही कोण गोमाजी लागून गेलात?

नाती जुळवायची असतील तर दोन्ही बाजूचा होकार पाहिजे. तुम्ही बळजबरीने असे नाते कसे जोडू इच्छित आहात.

शहाणे व्हा आणि आपल्या मुलीच्या मनाचा विचार करा.

अमेरिकन त्रिशंकू's picture

30 Nov 2018 - 2:02 am | अमेरिकन त्रिशंकू

लग्न झाल्यावर काही तरी खुसपट काढून परत यायचं आणि भरपूर पोटगी किंवा एकदाच भरपूर पैसे उकळायचे असा बेत होता.

भारतात अमेरिकेसारखे प्री-नपच्युअल, नवरा आणि बायकोचे लग्नापुर्वीचे आणि नंतरचे अ‍ॅसेट्स वेगळे ठेवणे, किमान १० वर्षे लग्नाला झाली असतील तरच ५०/५० वाटणी करणे वगैरे प्रकार सुरु झाले आहेत का?

आदिजोशी's picture

30 Nov 2018 - 2:08 pm | आदिजोशी

प्री-नपच्युअल मात्र असायलाच हवे. आजकालच्या मुलींचा भरवसा राहिला नाही काहीच.

हुंडाविरोधी कायद्यात प्रीनप चा समावेश व्हावा ...

पिलीयन रायडर's picture

30 Nov 2018 - 9:11 pm | पिलीयन रायडर

आजकाल अशा घटना इतक्या जवळून पाहिल्यात की प्री नप हवंच असं वाटायला लागलं आहे.
प्रॉपर्टी वर अधिकार, पोटगी, आणि सहज करता येऊ शकणारे छळचे आरोप.. सगळं एकतर्फी आहे. आणि वाईट ह्याचं वाटतं की ज्या बायकांना खरंच ह्या कायद्याची गरज आहे त्यांनाही बोल लागणार.

जसा बायकोचा नवऱ्याच्या संपत्तीवर अधिकार असतो (सुनेचा सासरच्या) तसा जावयाचा असतो का बायकोच्या संपत्तीवर अधिकार?

उद्देश काये या धाग्याचा नक्की?

१. आपण काहीतरी निकष ठेवून परक्या कोणालातरी नकार देतो तेव्हा आपण हुशार असतो. पण तेच परका कोणीतरी त्याचे काहीतरी निकष लावून आपल्याला नकार देतो तेव्हा तो गर्विष्ठ, मूर्ख वगैरे असतो. ie दांभिकपणा दाखवून देणे?

२. आपल्या स्वतःचे रूप, शिक्षण, स्वकमाई इ विचार न करता लायकीबाहेरच्या अपेक्षा जोदीदारकडून ठेवणे. ie पांघरून पाहून पाय न पसरण्याची प्रवृत्ती दाखवून देणे?

कि
३. स्वतः रूप, शिक्षण, स्वकमाई बाबतीत कितीही उत्कृष्ट असलो तरीही इतरांसारखे (ie आईबापाने समोर ठेवलेल्या चार फोटोमधील एकाला आदा पादा करून निवडून, तडजोड करून आपण किती हुशार, आनंदी आहोत हे स्वतःला, जगाला convince करत फिरणारे ) न वागणे??
प्रत्येकाने तडजोड करून लग्न केलेच पाहिजे नाहीतर ते बावळट असतात असे काही प्रतिसादांवरून वाटले

सुबोध खरे's picture

5 Dec 2018 - 8:15 pm | सुबोध खरे

इतक्या नकारात्मक होऊ नका.
कोणतीही गोष्ट करताना -- यात मुलगा किंवा मुलगी पाहणे हे आलेच -- ३ पातळ्या लक्षात ठेवाव्या

१) किमान अपेक्षा - हे एवढं पाहिजेच यात कोणतीही कमी चालणार नाही. उदा- एखादीला सिगरेट पिणारा मुलगा नकोच मग कितीहि चांगला उच्चशिक्षित भरपूर पैसे मिळवणारा असो.

२) इच्छा -- हे असेल/नसेल तर बरं उदा. चष्मा मुलाला किंवा मुलीला चष्मा नसेल तर बरं

३) आकांक्षा -- हि गोष्ट मिळाली तर सोन्याहून पिवळे - मी तितका सुंदर नाही पण माझे करियर उत्तम आहे मग मला सुंदर सुशिक्षित आणि भरपूर पगार मिळवणारी बायको मिळाली तर उत्तम

एकदा आपल्या मनात काय हवंय हे नक्की करण्यासाठी अशी वर्गवारी करता येईल. आणि हि वर्गवारी एखाद्या जवळच्या व्यक्तीला दाखवून त्याबद्दल वास्तववादी विचार केल्यास निराशा पदरात पडणार नाही.

अन्यथा मी "उच्च जातीचा कुलीन" आहे पण १० वि नापास आणि रोजगार हमी योजनेवर आहे पण मला सुंदर सुशिक्षित सरकारी नोकरी असलेली बायको पाहिजे अशी अपेक्षा असेल तर निराशाच पदरी पडन्याची शक्यता आहे.

हे ठीकच आहे. त्यातले 'कोणतीही गोष्ट करताना' हे शब्द महत्वाचे.
१. ज्यांना ती गोष्ट काहीही करून 'करायचीच' आहे ते करतील, करतात.
२. ज्यांना ती गोष्ट 'terms and conditions' जुळत असतील 'तरच' केली तर चालणार आहे ते थांबतील जुळेपर्यंत. तो त्यांचा वैयक्तीक निर्णय आहे, परिणामाचा विचार करुनच घेतलेला. तडजोड करून ते स्वतः खुश होणार नाहीतच. जोडीदार, पुढची मागची पिढी यांचे आयुष्यदेखील बरबाद करतील. त्यापेक्षा त्यांनी लग्न न केलेलच चांगलं आहे.

३. जे काहीतरी, इतरांच्या मते फालतू कारण सांगत लग्न करत नाहीयत ते समलैंगिक, asexual, demisexual असण्याची शक्यतादेखील विचारात घ्यावी लागेल.

उपयोजक's picture

5 Dec 2018 - 9:04 pm | उपयोजक

१.

ओके. पण प्रतिसाद दांभिकतेवर आले नाहीयत फारसे :D

mrcoolguynice's picture

6 Dec 2018 - 7:28 am | mrcoolguynice

१+

(अँमीजीं तुम्हीं नाही, परंतु काही इतर लोक़्स)

दांभिकतेवर, दंभिक स्टाइल प्रतिसाद दिले, की लोक़्स पितल उघड़े पडले वैगरे बोलुन, स्वतःचीं दंभिकता लपवतात.