याला म्हणतात धर्मेंदर स्टाईल .. हे मिथ्या नसून सत्य आहे ..

खिलजि's picture
खिलजि in काथ्याकूट
20 Nov 2018 - 6:53 pm
गाभा: 

हो मित्रानो , मी खरंच दोन दोन धर्मेंद्र बघितले आहेत .. आत तुम्ही म्हणाल या मंचावर मारामारी धत्तिंङ्गिरी वगैरे नको ..पण थोडा वेळ आपण मला वाटत याही विषयावर एकमेकांचे अनुभव वाटून घेतले पाहिजेत .. एक किस्सा सांगतो .. सांगतो कसला याची देही याची डोळा मी बघितलेला आहे त्याचे वर्णन करतो ..
मी वरळीला असताना , आम्ही सर्व अभ्यास करायला , सिंवगार्डनमध्ये जमत असू .. तिथे अभ्यास करायला टवाळ पोरेही यायची .. त्यांचा अभ्यास कमी आणि टपोरीपणा जास्त असायचा .. मी दोन्ही पोरांमध्ये ओळखीचा असल्याने मला तसा काही त्रास नव्हताच उलट अभ्यासू पोरांना माझी मदतच व्हायची .. ती टपोरी पोरे जरा मस्ती कमी करायची .. काही आमच्या कॅम्पातली मुले होती त्यापैकी एक नाव गुन्ग्याभाऊ ( नाव बदललेले आहे ). तर हा पोरगा एकदम रांगडा आणि मस्तीखोर होता ... त्याच्याबद्दल बरेच काही ऐकून होतो .. किंबहुना आमच्या इमारतीतील सात आठ मोठ्या पोरांना एकदा क्रिकेटवरून भांडण झाली म्हणून त्याने माझ्यासमोर बदड बदडल होतं. डोक्याने फार गरम . मला त्याच्या शक्तीचा सुप्त अभिमान होता आणि त्याच्या निर्भयपणाचाही .. मी तर आमच्या पोरांना बदलूनही त्याचा एकदम फॅन झालोहोतो .. कारणही तसंच होतं.. इथे सात आठ पोरे ( ती हि चांगली खाती पिती ) आणि विरुध्ध हा एकटा .. तरीही तो भारी पडला होता .. असो , कालांतराने तो माझा फार जवळचा मित्रा झाला . आम्ही अभ्यासाला बसायचो , तेव्हा तो कधी कधी त्याच्या मारामारीचे किस्से सांगायचा . दुसऱ्या कुणालाही ते अतिशयोक्ती वाटतील पण मी सप्रमाण ते बघितले होते म्हणून ते सत्य म्हणायचो ..
असाच एकदा अभ्यास करता असताना , सुन्या ओरडत आला गार्डनमध्ये .. अरे तिकडे गुन्ग्याला त्या झोपडपट्टीतल्या पोरांनी पकडलाय आणि तुफान राडा चालू झालाय .. मी जसा होतो तसाच धावत सुटलो . सुरुवातीला माझा प्रयत्न त्याला मदत करायचा होता .. त्या ठिकाणी भरपूर गर्दी झाली होती .. सर्व दादा भाई , झोपडपट्टीतली पोरे तिथे नाक्यावर जमा झाली होती .. गुंग्या काय ऐकायला तयार नव्हता नाही ती पोरे .. त्यातल्याच एकाने तेव्हड्यात त्याच्यावर हात टाकला .. झालं ते सलमान म्हणतो ना , इस्को बोल कॉलरसे हात उठा . आणि सरळ चोपायला चालू केलं ... तेव्हड्यात भर त्याच्या पिताश्रींनी पडली .. तेही तस्सेच .. अंगापिंडाने एकदम डेव्हिड बून .. तश्याच मिश्या आणि मारामारी बहुधा या गुन्ग्याने त्यांच्याकडून वारसा हक्काने मिळवली असावी ..
आम्ही सर्व तिथे मदत करायला गेलो खरे पण त्याची त्यांना गरजच नव्हती .. दोघा बापलेकांनी मिळून पूर्ण तीसचाळीस पोरांना कपडे धुतात तसे आपटले आणि वाळत घातले.. बाकीचे त्यांचे ते रूप बघूनच पळून गेले ..
तर मला आपण सर्वास हा प्रश्न विचारायचा आहे कि आपण असा हीमॅन कधी बघितला आहे का ?
आणि जर कधी अनुभव घेतला असेलच तर इथे तो मांडावा हि नम्र विनंती .. बादवे हे गुन्ग्याभाऊ आता सध्या पोलिसदलात कार्यरत आहेत आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वास साजेशी कामगिरी बऱ्याचदा केलेली आहे आणि पुढेही करतील हीच त्या श्रीचरणी प्रार्थना ...

सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया

ट्रम्प's picture

20 Nov 2018 - 10:17 pm | ट्रम्प

छान लिहलय !!!!
सध्या तरी एव्हढेच , आठवल्या वर आम्ही ही पुरवणी जोडू !!

टवाळ कार्टा's picture

21 Nov 2018 - 3:14 pm | टवाळ कार्टा

इथे काही आयडी एकट्याने पाच-पन्नास आयडीबरोबर एकट्याने "चर्चा" करताना बघितले आहेत ;)

दुर्गविहारी's picture

22 Nov 2018 - 12:08 pm | दुर्गविहारी

भारी आहे किस्सा. असा एक प्रकार योगायोगाने बेळगावला बघायला मिळाला. बेळगावच्या लष्करी प्रशिक्षण संस्थेतील एक ट्रेनी आणि रिक्षावाले यांची भाड्याच्या मुद्द्यावरून वादावादी झाली. त्याने एकट्याने पाच- सहा रिक्षावाल्यांना धुतले. मी त्याभागातील किल्ले बघण्यासाठी गेलो असताना योगायोगाने हा थरार बघायला मिळाला.

या अश्या अमानवी ताकदीच्या लोकांचा सदुपयोग झाला तर ठीक .. जसा आता गुन्ग्याभाऊंचा पोलिसदलात होतो आहे .. मी जेव्हा पण आठवड्याकाठी तिथे जातो तेव्हा त्याला आवर्जून भेटतो आणि त्याचे रंगतदार किस्से ऐकतो .. त्यालाही मला ते सांगायला मजा येते .. मागच्या आठवड्यातील किस्सा .. तो सध्या डिटेक्शनला कार्यरत आहे .. तिथे एका अट्टल गुंडाला एका खुनाच्या आणि घरफोडीच्या आरोपाखाली अटक झाली .. तो गुंड म्हणे गेंड्याच्या कातडीचा बनलेला आहे .. भाऊ नुकतेच नव्याने हजार झाले आहेत .. साहेब लोक त्याचा नावलौकिक जाणून आहेत .. तर स्टेशनऑफिसरने त्याला बोलते करायला गुन्ग्याला आमंत्रित केले .. साहेबाला मागचा अनुभव होता आरोपीचा ,, मार खाऊन खाऊन कोर्टात पोलिसांविरुद्ध बदनामी करायचा आणि कोर्ट कस्टडी मागून घ्यायचा .. साहेबाने त्याला सविस्तर सांगितले आणि मॅटर गुन्ग्याच्या हातात दिले .. गुंग्या फक्त आत गेला आणि थोड्याच वेळात बाहेर आला तोही जबानीनीशी ... साहेब पण चाट आणि सर्व पोलीस
स्टेशनही अवाक .. गुंग्या मला सांगत होता ,, आत गेलो आणि काहीच नाही केले फक्त त्याची सोंड धरून इतक्या जोरात पिरगाळली कि त्याची जीभ दीडफूट बाहेर आली होती .. त्याचा पत्ता त्याचे राहायचे आणि लपायचे पत्ते आधीच जाधवांकडून घेतले होते ... ते त्याला पद्धतशीरपणे वाचून दाखवले .. त्याला हेही सांगितलं कि जर कोर्टात उलट फिरलास तर तुझी सोंड पुढच्या खेपेला काहीच कामाची ठेवणार नाही .. त्याचा जीव असा गुदमरला होता कि काय विचारून सोया नाही .. आणि मग त्याला माझ्या हाताची ताकद दाखवली , बोनस म्हणून .. काम फत्ते .. असा गुन्ग्याभाऊ आणि त्याचा गुन्हेगारीजगतास बसलेला तडाखा ..

गामा पैलवान's picture

22 Nov 2018 - 6:24 pm | गामा पैलवान

खिलजि,

सोंड म्हणजे गळ्याची बोंडी का?

आ.न.,
-गा.पै.

सोंड म्हणजे अकरावे बोट ओ गापैंजि .. जे प्रत्येक माणसाला निर्विवादपणे असते ...

गामा पैलवान's picture

23 Nov 2018 - 3:02 am | गामा पैलवान

खिलजि,

ते म्हणताय होय! मला गळ्याची बोंडी वाटली. मी ती पिरगळूनही पहिली (स्वत:चीच). खरोखरची जीभ बाहेर येते (स्वत:चीच).

आ.न.,
-गा.पै.

आ न गा पै , आता फगस्त एक काम करा , तेव्हढी सोंड पिरगाळून बघा बरं आणि मला व्यनि करून सांगा जीभ बाहेर येतेय कि नाही त्ये ... ह घ्या.. आपण दोघे आता मित्र कि नै , दोस्तीत वाईट वाटून घायचं नै .. तुम्हाला हवं असलं म्या आधीच माफी मागून ठेवतो ...