याला म्हणतात धर्मेंदर स्टाईल .. हे मिथ्या नसून सत्य आहे ..
हो मित्रानो , मी खरंच दोन दोन धर्मेंद्र बघितले आहेत .. आत तुम्ही म्हणाल या मंचावर मारामारी धत्तिंङ्गिरी वगैरे नको ..पण थोडा वेळ आपण मला वाटत याही विषयावर एकमेकांचे अनुभव वाटून घेतले पाहिजेत .. एक किस्सा सांगतो .. सांगतो कसला याची देही याची डोळा मी बघितलेला आहे त्याचे वर्णन करतो ..
मी वरळीला असताना , आम्ही सर्व अभ्यास करायला , सिंवगार्डनमध्ये जमत असू .. तिथे अभ्यास करायला टवाळ पोरेही यायची .. त्यांचा अभ्यास कमी आणि टपोरीपणा जास्त असायचा .. मी दोन्ही पोरांमध्ये ओळखीचा असल्याने मला तसा काही त्रास नव्हताच उलट अभ्यासू पोरांना माझी मदतच व्हायची .. ती टपोरी पोरे जरा मस्ती कमी करायची .. काही आमच्या कॅम्पातली मुले होती त्यापैकी एक नाव गुन्ग्याभाऊ ( नाव बदललेले आहे ). तर हा पोरगा एकदम रांगडा आणि मस्तीखोर होता ... त्याच्याबद्दल बरेच काही ऐकून होतो .. किंबहुना आमच्या इमारतीतील सात आठ मोठ्या पोरांना एकदा क्रिकेटवरून भांडण झाली म्हणून त्याने माझ्यासमोर बदड बदडल होतं. डोक्याने फार गरम . मला त्याच्या शक्तीचा सुप्त अभिमान होता आणि त्याच्या निर्भयपणाचाही .. मी तर आमच्या पोरांना बदलूनही त्याचा एकदम फॅन झालोहोतो .. कारणही तसंच होतं.. इथे सात आठ पोरे ( ती हि चांगली खाती पिती ) आणि विरुध्ध हा एकटा .. तरीही तो भारी पडला होता .. असो , कालांतराने तो माझा फार जवळचा मित्रा झाला . आम्ही अभ्यासाला बसायचो , तेव्हा तो कधी कधी त्याच्या मारामारीचे किस्से सांगायचा . दुसऱ्या कुणालाही ते अतिशयोक्ती वाटतील पण मी सप्रमाण ते बघितले होते म्हणून ते सत्य म्हणायचो ..
असाच एकदा अभ्यास करता असताना , सुन्या ओरडत आला गार्डनमध्ये .. अरे तिकडे गुन्ग्याला त्या झोपडपट्टीतल्या पोरांनी पकडलाय आणि तुफान राडा चालू झालाय .. मी जसा होतो तसाच धावत सुटलो . सुरुवातीला माझा प्रयत्न त्याला मदत करायचा होता .. त्या ठिकाणी भरपूर गर्दी झाली होती .. सर्व दादा भाई , झोपडपट्टीतली पोरे तिथे नाक्यावर जमा झाली होती .. गुंग्या काय ऐकायला तयार नव्हता नाही ती पोरे .. त्यातल्याच एकाने तेव्हड्यात त्याच्यावर हात टाकला .. झालं ते सलमान म्हणतो ना , इस्को बोल कॉलरसे हात उठा . आणि सरळ चोपायला चालू केलं ... तेव्हड्यात भर त्याच्या पिताश्रींनी पडली .. तेही तस्सेच .. अंगापिंडाने एकदम डेव्हिड बून .. तश्याच मिश्या आणि मारामारी बहुधा या गुन्ग्याने त्यांच्याकडून वारसा हक्काने मिळवली असावी ..
आम्ही सर्व तिथे मदत करायला गेलो खरे पण त्याची त्यांना गरजच नव्हती .. दोघा बापलेकांनी मिळून पूर्ण तीसचाळीस पोरांना कपडे धुतात तसे आपटले आणि वाळत घातले.. बाकीचे त्यांचे ते रूप बघूनच पळून गेले ..
तर मला आपण सर्वास हा प्रश्न विचारायचा आहे कि आपण असा हीमॅन कधी बघितला आहे का ?
आणि जर कधी अनुभव घेतला असेलच तर इथे तो मांडावा हि नम्र विनंती .. बादवे हे गुन्ग्याभाऊ आता सध्या पोलिसदलात कार्यरत आहेत आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वास साजेशी कामगिरी बऱ्याचदा केलेली आहे आणि पुढेही करतील हीच त्या श्रीचरणी प्रार्थना ...
सिद्धेश्वर विलास पाटणकर
याद्या
4799
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
छान लिहलय !!!!
इथे काही आयडी एकट्याने पाच
भारी आहे किस्सा. असा एक
या अश्या अमानवी ताकदीच्या
सोंड = ?
In reply to या अश्या अमानवी ताकदीच्या by खिलजि
सोंड म्हणजे अकरावे बोट ओ
ते होय.
In reply to सोंड म्हणजे अकरावे बोट ओ by खिलजि
हा हा हा , खिलजी आज बहुत दिनोके बाद खूष हुआ