पंढरीची वारी आणि विवाह

nishapari's picture
nishapari in काथ्याकूट
17 Nov 2018 - 5:38 pm
गाभा: 

शंकर पाटील यांच्या एका ग्रामीण विनोदी कथेत लेखकाचे वडील दरसालाप्रमाणे पंढरपूरच्या वारीला जातात आणि तिथे चांगल्या ओळख झालेल्या स्वजातीतील वारकऱ्याच्या दोन उपवर झालेल्या मुलींशी आपल्या दोन उपवर मुलांची लग्नं ठरवून बोलणी उरकूनच येतात . पुढे वारी संपल्यावर रीतसर पाहण्याचा कार्यक्रम होऊन लग्न ठरतं .

वारीत अशा प्रकारचे रोटीबेटी व्यवहार खरोखरच होत असत का ती लेखकाने रचलेली गोष्ट आहे ? आणि होत असतील तर सध्याही होतात का ? कोणाला याबद्दल सविस्तर माहिती असेल तर कृपया उत्तरात सांगा ..

प्रतिक्रिया

कंजूस's picture

17 Nov 2018 - 9:14 pm | कंजूस

वारी हे त्याकाळचे सोशल नेटवर्किंग होतं. शक्य आहे.