Skip to main content

स्मृति बालपणाची

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 31/10/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
फिरून आली मला स्मृति निघून गेलेल्या त्या जमान्याची त्या माझ्या बालपणाची अरेरे,एकटेच सोडून जाणार्‍या अन पुन्हा कधीच न येणार्‍या त्या बालपणाची ते लुटुपुटुचे खेळणे ते लुटुपुटुचे संवगडी ते धावत पळून जाणे शीव मला असे ओरडणे विसरपडेना अजुनही त्या सुखदेयी स्वप्नाची त्या आनंददायी बालपणाची फिरून आली मला स्मृति निघून गेलेल्या त्या जमान्याची रडावे पुन्हा पुन्हा आठवून ते गतदिवस बालपणाचे स्मरावे पुन्हा पुन्हा आठवून ते संवगडी बालपणाचे फिरून आली मला स्मृति निघून गेलेल्या त्या जमान्याची अन पुन्हा कधीच न येणार्‍या त्या बालपणाची श्रीकृष्ण सामंत
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1148
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया