मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनाहूत

अनन्त्_यात्री · · दिवाळी अंक
H
अनाहूत
अज्ञाताच्या देशातून कोणी अनाहूत येतो जड चेतनाच्या सीमा पार पुसून टाकतो धगधूर धुक्यातून क्षणमात्र डोकावतो रस रंग नाद गंध सरमिसळ करतो विझणार्‍या रोमरोमी ज्योती पेटवू बघतो लेखणीच्या टोकापाशी थोडा अडून बसतो मन ओथंबून येता सरसर बरसतो अज्ञाताच्या देशातून कोण अनाहूत येतो? कवितेच्या गावातून शब्द अनवट येतो! भवताल कोंदुनिया दहा अंगुळे उरतो... H
दिवाळी अंक वर्ष

वाचने 15329 वाचनखूण प्रतिक्रिया 14

टर्मीनेटर Wed, 11/07/2018 - 14:55
लेखणीच्या टोकापाशी थोडा अडून बसतो मन ओथंबून येता सरसर बरसतो
वाह

नाखु Tue, 11/13/2018 - 11:07
भवताल कोंदुनिया दहा अंगुळे उरतो... फारा दिवसांनी हा शब्दप्रयोग वाचला पुन्हा एकदा धन्यवाद