लेखकअनन्त्_यात्रीयांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
अनाहूत
अज्ञाताच्या देशातून कोणी अनाहूत येतो
जड चेतनाच्या सीमा पार पुसून टाकतो
धगधूर धुक्यातून क्षणमात्र डोकावतो
रस रंग नाद गंध सरमिसळ करतो
विझणार्या रोमरोमी ज्योती पेटवू बघतो
लेखणीच्या टोकापाशी थोडा अडून बसतो
मन ओथंबून येता सरसर बरसतो
अज्ञाताच्या देशातून कोण अनाहूत येतो?
कवितेच्या गावातून शब्द अनवट येतो!
भवताल कोंदुनिया दहा अंगुळे उरतो...
प्रतिक्रिया
सुरेख!
क्या बात!!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
छान
वाह
प्रतिसाद
सुंदर कविता
वाह!
मित्रहो, प्राची अश्विनी
छान कविता
मस्तंच. खुप आवडली.
सौन्दर्य, पद्मावति
भारीच आहे
नाखु,