त्यांना माहीत असतात,
आपले दुखरे कोपरे!
आणि कोपऱ्यातील लपलेले घाव...
त्यांना माहीत असतात,
आपल्या मनाचे कप्पे!
आणि कप्प्यांतील सुकलेले भाव...
म्हणून जास्त जखमा करणारे...
ते आपलेच असतात!
आणि जखमेवर मीठ चोळणारे...
ते आपलेच असतात!
परक्यांना काय माहित...
आपले हळवे कप्पे अन् कोपरे?
आपल्या जखमांची खपली काढणारे...
ते आपलेच सगे अन् सोयरे!
मना तू आपला-परका भेद करू नकोस...
आपल्यांवर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकू नकोस...
कारण परक्यांसारखे भासणारे...
ते आपलेच असतात...
ते आपलेच असतात!!
- निमिष सोनार
सुरेख कविता.
मना तू आपला-परका भेद करू नकोस...
आपल्यांवर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकू नकोस...
यातला भेदभाव न करता दोघांवरही वाजवीपेक्षा जास्त विश्वास न टाकण्याचा सल्ला खास आवडला.
कविता आवडली.
कविता आवडली
सुरेख कविता.मना तू आपला-परका
छान कविता.
छान कविता