
त्यांना माहीत असतात,
आपले दुखरे कोपरे!
आणि कोपऱ्यातील लपलेले घाव...
त्यांना माहीत असतात,
आपल्या मनाचे कप्पे!
आणि कप्प्यांतील सुकलेले भाव...
म्हणून जास्त जखमा करणारे...
ते आपलेच असतात!
आणि जखमेवर मीठ चोळणारे...
ते आपलेच असतात!
परक्यांना काय माहित...
आपले हळवे कप्पे अन् कोपरे?
आपल्या जखमांची खपली काढणारे...
ते आपलेच सगे अन् सोयरे!
मना तू आपला-परका भेद करू नकोस...
आपल्यांवर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकू नकोस...
कारण परक्यांसारखे भासणारे...
ते आपलेच असतात...
ते आपलेच असतात!!
- निमिष सोनार

दिवाळी अंक वर्ष
वाचने
8218
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली.
कविता आवडली.
कविता आवडली
असं म्हणण्यापेक्षा भयानक पटली आहे.
स्वानुभव हीच गॅरंटी आणि काय
अत्यंत खरं लिहिल आहे हो...
सुरेख कविता.मना तू आपला-परका
सुरेख कविता.
मना तू आपला-परका भेद करू नकोस...
आपल्यांवर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकू नकोस...
यातला भेदभाव न करता दोघांवरही वाजवीपेक्षा जास्त विश्वास न टाकण्याचा सल्ला खास आवडला.
छान कविता.
छान कविता.
हमें तो अपने ने लूटा, गैरों में कहां दम था,
मेरी कश्ती वहां डूबी जहां पानी कम था'।
हा शेर आठवला.
छान कविता
पटलं १०० टका सही