श्रीगणेश लेखमाला - || केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे ||

Primary tabs

शंकर उणेचा's picture
शंकर उणेचा in लेखमाला
22 Sep 2018 - 8:52 am

.

|| केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ||
अर्थातच
'DIY' ## Do It Yourself ##

हे बडी!!
व्हॉट्स अ‍प ड्यूड!!
गोइंग कूल!!
ओह शिट यार!!

इंग्लिश शब्दांच्या या अतिक्रमणाला जरी 'वेळेची गरज' असं म्हणून आपण 'वेळ मारून नेली',
तरी एक खंत कायमची मनात राहते...
खंत आपल्यातील अस्सलपणा हरवत चालल्याची,
खंत मातीच्या धुंद करणाऱ्या वासाची जागा कुठल्यातरी इंपोर्टेड बॉडी स्प्रेने घेतल्याची,
खंत अस्सल देशीपणाचा खमंग वास देणाऱ्या शब्दांना केवळ गावठी वाटतात म्हणून सोडून दिल्याची.

कदाचित हीच 'खंत' टोचत असेल आणि म्हणूनच की काय # 'मिसळपाव' # म्हणजेच # मि.पा.#
नावाचं अस्सल मराठी संकेतस्थळ सुरू केलं.
'मिसळपाव' या नावातच एक वेगळा खमंगपणा आहे. एक वेगळा अस्सलपणा आहे.
नुसतं नाव घेतलं, तरी कट्ट्यावरची तर्री, ताज्या पावाची लादी, फरसाणाची वाटी, बारीक चिरलेला कांदा आणि
या सगळ्यावर आडवा हात मारताना
चवीला असणारे चर्चेचे अनेक विषय...

तिथे त्या कट्ट्यावर जी चर्चा व्हायची, जे निर्णय घेतले जायचे, जे नियोजन ठरायचं, ते जगात कुठेच एवढ्या अस्सलपणे ठरणार नाही अथवा घेतलं जाणार नाही,
पण त्याकरिता मॅकडी, पिझा, कॅफे आणि बर्गर सोडून 'मिसळपाव'वर आडवा हात मारायलाच जायला पाहिजे.

कदाचित संसाराच्या तथाकथित जबाबदार्‍या सांभाळताना अथवा पेलताना ह्या कट्ट्यापासून आपण जर दूर दूर जाऊ लागलो, मनात असूनही मिसळीवर ताव मारतानाचा चर्चेचा आडवा हात फिरेना,
त्यामुळेच मिसळपाव ही कट्टा संस्कृती जिवंत राहण्यासाठी ती चर्चा, तो अनुभवांचा फड घरबसल्या सगळ्यांना मिळण्यासाठी 'मिसळपाव' हे अद्ययावत मराठी संकेतस्थळ सुरू केलं असावं.

महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण जगभरातील अनेक नामवंत व्यक्ती आज 'मिपा'वर आहेत आणि विविध विषयांवर त्यांचे लेख, माहिती आणि चर्चा मिपावर सढळ हाताने वाढलेली मिळते.

आज १२व्या वर्धापनदिनानिमित्त मलाही माझा अनुभव लिहायची संधी मिळाली, हे माझं भाग्यच आहे .

मिपाबद्दल प्रशांतकडून माहिती मिळाली. प्रशांतची आणि माझी ओळख ICCमध्ये - म्हणजेच इंडो सायकलिस्ट क्लबमध्ये एक इव्हेंटमध्ये झाली.
ICCने आयुष्यात खूप काही दिलं, त्याची गणना खरोखर शब्दामध्ये करणं अशक्य आहे.
त्यातलाच एक हिरा म्हणजे प्रशांत तायडे!
अत्यंत मितभाषी आणि सदा हसऱ्या चेहऱ्याने कोणालाही मदत करायला तयार असणार प्रशांत पहिला की याच्यासारखा आपला मित्र - किंबहुना भाऊ - आहे, हे पाहून अभिमान वाटतो.
त्याचं प्रत्येक काम अगदी परफेक्ट असतं, म्हणूनच त्याच्या सायकलिंगची पोस्ट पाहिली की "आला परफेक्ट प्रशांत" असं म्हणत त्याचं नामकरणच 'परफेक्ट प्रशांत' असं करून टाकलं आणि त्यानेसुद्धा दादाने दिलेलं नाव हसत हसत स्वीकारलं.

हां, तर सायकलिंगवरून मुद्दाम सांगावंसं वाटतं, ते म्हणजे आमच्या प्रेमाचं चाक सायकलीने फिरवलं अगदी जोरात आणि असं की आता ते काही थांबेल असं मला तरी वाटत नाही.

२०१७ साली १४५ किलो वजन घेऊन ICCच्या 'हाइक एन बाइक'च्या इव्हेंटमध्ये मी शरीराचा सगळा डोलारा संभाळात कसाबसा साधारण दहा ते पंधरा किलोमीटर सायकल चालवीत घोरवडेश्वर सर केला.

1

आणि तेव्हापासून ICCच्या परिवारात सामील झालो. सगळ्यात जाड माणूस म्हणून मी सगळ्यांच्या लक्ष्यात राहिलो होतो. आता परिवारात - म्हणजेच व्हॉट्स अ‍ॅप ग्रूप, फेसबुकवरचे ग्रूप यात सामील होणं आलंच ना. आणि मग या परिवारातील सगळ्यांनीच मला आपलंसं करून घेतलं. म्हणजे माझ्यासारख्या जाड माणसाला.

मग ठरवलं - आपणही फिट होऊ, किमान स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्याइतपत तरी सायकल चालवू. आणि मग सुरू झालं सगळं.
मग या ग्रूपमधून रोज सगळ्यांचे अपडेट बघायचे आणि मग आपण आपल्या स्वतःलाच प्रेरणा देत पॅडल मारत राहायचं.
मग जशी जशी तुमची इच्छा प्रबळ होत जाते,
तसं तसं तुमचं ज्ञान आणि विषयाची भूक वाढत जाते. मग तुम्हाला आणखी काही तरी पाहिजे असतं. पुढचं काहीतरी हवं असतं आणि ही भूक असणं अत्यंत उत्तम आणि गरजेचं आहे.

माझी ती भूकच मला ICC अ‍ॅटिव्ह ग्रूपपर्यंत घेऊन गेली. या ग्रूपवर तुमचं वर्क आउट तुम्ही पोस्ट करायचं आणि मग तुम्ही केलेल्या सायकलिंग, स्विमिंग आणि रनिंग यावर एक पॉइंट सिस्टिमनुसार पॉइंट मिळत जाऊन तुमचा त्या त्या महिन्याचा रँक, म्हणजेच नंबर ठरतो. आणि मग तीन महिन्यांचा एकत्रित डेटा घेऊन त्या त्रैमासिकाचा विजेता घोषित केला जायचा.

हे सांगण्याचा उद्देश हा की जोपर्यंत तुम्ही तुमच्या फुटबॉल ग्राउंडवरचा 'गोल पोस्ट' ठरवत नाही,
तोपर्यंत 'मेरेडोना' असो नाहीतर 'मेसी' असो, गोल मारणार कुठे ???? गोल पोस्टच नाही!
तर मग अशा पद्धतीने प्रथम उत्तम आरोग्याचे गोल ठरवून मी माझी वाटचाल चालू केली.

माझ्याकडे अत्यंत साधी सायकल होती. म्हणजे आजही अत्यंत साधी MTB आहे. मला खरोखर अगदी बेसिक कन्सेप्टही माहीत न्हवत्या,
मला सायकलबद्दल तर काहीच माहिती नव्हती.
माझ्या रोजच्या सरावात, माझ्याएवढ्या वेगाने मागे राहणारं कोणी नव्हतं,
फक्त माझ्याकडे होती ती एक जिद्द आणि एक ध्यास की हे करायचंच.
तुम्ही असं तुमच्या मनात ठरवलं ना, की मग जगातली कुठलीच शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही.
आणि जोपर्यंत तुमच्या मनात तुम्ही ठरवत नाही, तोपर्यंत जगातली सगळी शक्ती तुमच्याकडे असूनही ती व्यर्थ आहे.

मग काय, आधी 'वेळ' मोजायचो........
आज अर्धा तास चालवली, उद्या चाळीस मिनिटं, परवा पन्नास मिनिटं...
मग भूक वाढत गेली.
मग स्ट्रवावर किलोमीटर मोजले जाऊ लागले,
मग स्पीड बघितला जाऊ लागला,
मग एलिव्हेशनकडे नजर फिरू लागली,
आणि मग एक ना दोन, रोज वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी होऊ लागल्या. सुट्टीच्या दिवशी मग लांबच्या सफरी होऊ लागल्या आणि आपोआपच १४५चा काटा १४०, १३५मार्गे १२५वर येऊन थांबला.
2
जेव्हा तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश येतं ना, तेव्हा प्रयत्नांची ताकद वाढते आणि अपयशाची चिंता आणखी खोल जाऊन पडते आणि मग तुम्ही सुटता आणखीनच भन्नाट.

पण हे सगळं करताना मी दोन गोष्टींची खूप काळजी घेतली.
एक म्हणजे या गोष्टीतून खूप आनंद घेत राहिलो, कारण त्याशिवाय जगात हीच काय, कुठलीच गोष्ट करू नये

3
9

5
आणि दुसरं म्हणजे कधीच कोणाशीही स्वतःची तुलना नाही केली. पण स्वतःबरोबरची स्पर्धा कधीच सोडलीही नाही!
मी माझी स्वतःबरोबर स्पर्धा सुरू केली. रोज स्वतःला जिंकायचं.
आदल्या दिवशीच्या मला रोज, मी दुसऱ्या दिवशी मागे टाकायचो.
कालच्या तुम्ही केलेल्या कामापेक्षा आजचं तुमच थोडं तरी जास्त असावं.
बस, या अत्यंत साध्या अशा या दोन तत्त्वांची कास धरून मी आज १०० किलोपर्यंत पोहोचलो.
12
दीड वर्षांचा हा प्रवास अत्यंत मोहक,
घामाने भिजलेला ,
आनंदाने ओथंबलेला,
यशाने भारावलेला,
अनुभवाने रंजक झालेला, आणि कदाचित इतराना एखाद्या काजव्याप्रमाणे छोटीशी वाट दाखवणारा ठरेल.

दीड वर्षाच्या या प्रवासात आख्खा महाराष्ट्र पालथा घातला - अष्टविनायक केले, गोव्यापर्यंतही जाऊन आलो, सेंच्युरी राइड, डबल सेंच्युरी राइड, सगळे घाट आणि आता आता एक दिवसात ३५० किलोमीटरचा टप्पा पार पाडत जवळपास १२००० किलोमीटरचा प्रवास केला.
10
वर सांगितलेल्या 'हाइक अन बाइक' इव्हेंटच्या वेळी चिंचवडहून भक्ती शक्ती चौकात मी सायकल अ‍ॅक्टिव्हावर घेऊन गेलो होतो. अंतर होतं '४' किलोमीटर. का? तर पुढच्या १० किलोमीटरला दमायला नको. तिथून इथपर्यंत आलो, अजून दमलो नाही.

ऋणी आहे सगळ्यांचा.
माझा परिवार,
ICC परिवार,
स्वानंद परिवार,
सगळे मित्र आणि मैत्रिणी, जे कायम पाठराखण करायला येतात.

ऋणी आहे त्या परमेश्वराचा की त्याने इतकं सुंदर आयुष्य दिलं आणि ते नीट ठेवण्याची योग्य बुद्धी योग्य वेळी दिली.
ऋणी आहे या निसर्गदेवतांचा.
हे कायम आमच्या स्वास्थ्यासाठी ठाण मांडून उभे आहेत एकदम 'स्वस्थ'!!!!!
ते पर्वत, त्या टेकड्या, ते समुद्र, त्या नद्या, ते डोंगर, त्या दर्‍या, ते रस्ते, त्या वाटा, ज्या म्हणतात - "या, आम्ही आपलेच आहोत!!"
78

9
फक्त तुम्ही ठरवा आणि करा
कारण तुमचं तुम्हालाच करायचं आहे.
आम्ही पाणी देऊ शकू, पण तहान नाही देऊ शकणार. ती तुमची तुम्हालाच लागली पाहिजे.
आम्ही पाण्याजवळ नेऊ, पण पाणी नाही पाजू शकणार. ते तुमचं तुम्हालाच प्यावं लागेल.
मग करून तर बघा होतंय की नाही ते!
कारण झाल्यानंतर तुम्ही लिहिलेला तुमचा लेख, यापेक्षाही उत्तम असेल, यापेक्षाही पुढचा असेल,
आणि
यातून जसे तुम्ही एकटे करायला लागला, तसं त्यातून हजारो करायला लागतील. हे वाचून तुम्ही एकाने जरी आठवड्यातून एकदा तरी स्वतःसाठी उत्तम व्यायाम केला, सायकल चालवली अथवा मस्त पाण्यात डुबकी मारली, तरी मला माझी 'रॉयल्टी' नक्की मिळेल!!

चला तर, मग वाट बघतोय तुमच्या अभिप्रायाची!!
आणि हो, माझ्या 'रॉयल्टीची'!!

13

धन्यवाद!
शंकर उणेचा
९८२२४५६५९५
१९.०९.२०१८.

श्रीगणेश लेखमाला २०१८

प्रतिक्रिया

कंजूस's picture

22 Sep 2018 - 9:52 am | कंजूस

उत्साहित करणारा लेख!

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:16 am | शंकर उणेचा

खुप खुप आभार

सतिश गावडे's picture

22 Sep 2018 - 10:09 am | सतिश गावडे

सुरुवातीला प्रशांतरावांचे कौतुक वाचून गार गार वाटत असताना तुम्ही हळूहळू विषयाला हात घालत गेलात आणि मी भारावून वाचत गेलो.

असे वजन कमी केल्याचे आधीचे आणि नंतरचे फोटो याआधी फक्त कसल्याशा काढयांच्या, गोळ्यांच्या आणि बारीक होण्यासाठी कसलेसे ड्रिंक पाजणाऱ्या लोकांच्या जाहिरातीत पाहीले होते.

नाखु's picture

23 Sep 2018 - 10:00 am | नाखु

काढल्याचे, गोळ्यांची निर्मिती करणारे सुदृढ(आर्थिकदृष्ट्या) होतात,बकरा नवीन कसाई शोधायला लागतो.

लेख अतिशय प्रेरणादायी आहे.

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:17 am | शंकर उणेचा

सायकल हाच उपाय उत्तम

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:28 am | शंकर उणेचा

आभार खूप खूप

टर्मीनेटर's picture

22 Sep 2018 - 10:43 am | टर्मीनेटर

उत्तम लेख. तुमच्या जिद्दीला सलाम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:29 am | शंकर उणेचा

आभार मनापासून

यशोधरा's picture

22 Sep 2018 - 10:51 am | यशोधरा

मस्त लिहिलंय!

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:31 am | शंकर उणेचा

आभार मनापासून

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:31 am | शंकर उणेचा

आभार मनापासून

भ ट क्या खे ड वा ला's picture

22 Sep 2018 - 10:59 am | भ ट क्या खे ड वा ला

प्रेरणादायी अनुभव आहे आपला .
लेख ही अगदी मनातून उमटलाय.
मस्त असेच सातत्य राहू दे .

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:31 am | शंकर उणेचा

खूप खूप आभार

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Sep 2018 - 11:17 am | डॉ सुहास म्हात्रे

काय भारी लिहिलंय ! असं, "जसे झाले तसे, ना गर्व ना कमीपणा" प्रकारचे वर्णन वाचण्यात एक और मजा असते... ती तुमचा लेख वाचताना पुरेपूर मिळाली !

म्हटलं तर, स्वांत सुखाय असलेला हा लेख त्याच बरोबर इतरांना सहजपणे प्रेरणा देउन जातो आहे ! चपखल फोटोंची चपखल मांडणी हा सुद्धा या लेखाचा विशेष प्रकर्षाने जाणवला.

लेखनात बरीच मौलिक मौक्तिके पेरलेली सापडली, त्यातील खास आवडलेली काही अशी...

या गोष्टीतून खूप आनंद घेत राहिलो, कारण त्याशिवाय जगात हीच काय, कुठलीच गोष्ट करू नये.

कधीच कोणाशीही स्वतःची तुलना नाही केली. पण स्वतःबरोबरची स्पर्धा कधीच सोडलीही नाही!

आम्ही पाणी देऊ शकू, पण तहान नाही देऊ शकणार. ती तुमची तुम्हालाच लागली पाहिजे.
आम्ही पाण्याजवळ नेऊ, पण पाणी नाही पाजू शकणार. ते तुमचं तुम्हालाच प्यावं लागेल.

यातून जसे तुम्ही एकटे करायला लागला, तसं त्यातून हजारो करायला लागतील. हे वाचून तुम्ही एकाने जरी आठवड्यातून एकदा तरी स्वतःसाठी उत्तम व्यायाम केला, सायकल चालवली अथवा मस्त पाण्यात डुबकी मारली, तरी मला माझी 'रॉयल्टी' नक्की मिळेल!!

एकंदरीत, खर्‍या आनंदाची गुरुकिल्ली सापडलीय तुम्हाला आणि ती तुमच्याकडून कधीच हरवणार नाही याची खात्री या लेखातून दिसते आहे :) किंबहुना, त्या किल्लीच्या प्रती काढून तुम्ही त्या इतरांमध्ये वाटत सुटलाय, हे केवळ स्पृहणिय आहे !

भविष्यात अशी अनेक शिखरे काबीज करण्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !!!

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:21 am | शंकर उणेचा

डॉक्टर सर खूप खूप आभार
अशी थाप मिळणे हे भाग्याचे लक्षण
आणि मी नक्कीच भाग्यवान

प्रशांत's picture

24 Sep 2018 - 12:58 pm | प्रशांत

एकंदरीत, खर्‍या आनंदाची गुरुकिल्ली सापडलीय तुम्हाला आणि ती तुमच्याकडून कधीच हरवणार नाही याची खात्री या लेखातून दिसते आहे :) किंबहुना, त्या किल्लीच्या प्रती काढून तुम्ही त्या इतरांमध्ये वाटत सुटलाय, हे केवळ स्पृहणिय आहे !

रच्याकनः शंभर दा लेख वाचुन तुझ्या सोबत राईड करण्यासारखीच मजा आली

पैलवान's picture

22 Sep 2018 - 11:25 am | पैलवान

अतिशय प्रेरणादायी लेख.

(स्वगत: पैलवान, ९५ वरून हळूहळू ऐंशीकडे चला! ५००मीटरवर दम लागतोय अन १ किमीला घाम निघतोय!! उठा, पहिलं पाऊल टाका!!)

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:24 am | शंकर उणेचा

खऱ्या अर्थाने रॉयल्टी तुम्हीच देणार व्यायाम झाल्यावर अनुभवाची वाट पाहतो

सविता००१'s picture

22 Sep 2018 - 11:42 am | सविता००१

अप्रतिम लेख आणि सकारात्मकता खूप आवडली लेखनातली

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:27 am | शंकर उणेचा

आभार खूप खुप मनापासून

प्रचेतस's picture

22 Sep 2018 - 11:43 am | प्रचेतस

भन्नाट लिहिलंय. अतिशय प्रेरणादायी.

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:33 am | शंकर उणेचा

आभार खूप खूप

संजय पाटिल's picture

22 Sep 2018 - 1:54 pm | संजय पाटिल

फारच छान!!!!
आधी केले मग सांगितले ....
आवडले!!!

डॉ श्रीहास's picture

22 Sep 2018 - 2:44 pm | डॉ श्रीहास

मस्त वाटलं, जोरदार लिखाण आणि त्याहून जोरात सायकलींग... मी तुम्हाला स्ट्रावावर फाॅलो करतो बरं आणि आपण एकदा भेटलो आहोत (प्रशांतमुळे)....

चालू द्या जोरात ... keep riding keep inspiring :))

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:34 am | शंकर उणेचा

हो मला आठवतय
मनापासून धन्यवाद

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Sep 2018 - 3:53 pm | ज्ञानोबाचे पैजार

एक वर्षात १४५ वरुन १०० कमाल आहे चिकाटीची आणि जिद्दीची.
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
पैजारबुवा,

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:35 am | शंकर उणेचा

खूप खूप आभारी

चौथा कोनाडा's picture

22 Sep 2018 - 4:20 pm | चौथा कोनाडा

जबरदस्त लेख आहे ! अतिशय प्रेरक !

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:35 am | शंकर उणेचा

खुप खूप धन्यवाद

प्रसाद ननवरे's picture

22 Sep 2018 - 5:52 pm | प्रसाद ननवरे

भाऊ लगे रहो.....

वाचकांचा काटा करण्यासाठी नक्कीच प्रेराणादायी लेख

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:36 am | शंकर उणेचा

खूप खूप आभार

ज्योति अळवणी's picture

22 Sep 2018 - 6:22 pm | ज्योति अळवणी

अप्रतिम. आपल्याला मनापासून वाटलं तर काहिगी अशक्य नाही हे तुम्ही सिद्ध केलंत

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:38 am | शंकर उणेचा

खरी ताकत मनाचीच

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2018 - 6:51 pm | टवाळ कार्टा

खत्रा

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:39 am | शंकर उणेचा

आभार

सुधीर कांदळकर's picture

23 Sep 2018 - 8:56 am | सुधीर कांदळकर

अजून बरीच वाटचाल बाकी आहे. ती पूर्ण झाल्यावर आणखी एक लेख लिहा, इतरांना स्फूर्ती मिळेल.

धन्यवाद.

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:39 am | शंकर उणेचा

नक्कीच

पद्मावति's picture

23 Sep 2018 - 2:17 pm | पद्मावति

जबरदस्त जिद्द. सुंदर लेख.

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:39 am | शंकर उणेचा

आभार

चित्रगुप्त's picture

23 Sep 2018 - 3:28 pm | चित्रगुप्त

केल्याने होत आहे रे.... या उक्तीचे अगदी चपखल उदाहरण आहे तुमची ही गाथा. तुमचा निश्चय, आणि त्याचे कसोशीने पालन करण्याची जिद्द, यांना शतशः नमन. हे वाचून एक विचारावेसे वाटते ते असे, की सायकलिंग खेरीज तुम्ही आहारात काही बदल केलेत का ? एवढे सायकलिंग केल्यावर भूकही जास्त लागत असेल, त्यावेळी आहार काय घेता ?

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:43 am | शंकर उणेचा

आभार
आहारातील बदल आवश्यक आहे
गोड ,बेकरी पूर्ण बंद होत
हिरव्या भाज्या ताजी फळ आणि द्रव पदार्थांवर जास्त भर होता
प्रोटीन ची इंटेक जास्त केले होते
आणि सायकल किंवा इतर कुठलंही व्यायाम योग्य झाल्यास खर म्हणजे भूक लागत नाही
लागल्यास प्रामुख्याने द्रव पदार्थ जास्त घेतले

मार्गी's picture

23 Sep 2018 - 5:00 pm | मार्गी

खूप भारी दादा!!!!!! सॅल्यूट!

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:44 am | शंकर उणेचा

आभारी आहे

प्रमोद देर्देकर's picture

23 Sep 2018 - 5:45 pm | प्रमोद देर्देकर

लय भारी .

शंकर उणेचा's picture

24 Sep 2018 - 12:45 am | शंकर उणेचा

आभारी खूप खूप

sagarpdy's picture

24 Sep 2018 - 11:54 am | sagarpdy

जबरदस्त शंकरदा __/\__
तुम्हाला strava वर बघत असतो, भारीच असतात तुमच्या राइड्स.
लेख एकदम जमलाय, अजून येत राहूद्या.

शंकर राव , कुटुंबकबिल्यातून एव्हढा वेळ काढणे सहज शक्य होत नाही कुणाला . आपली पहिली प्रतिमा जी आहे तिच्या जवळ मी काही महिन्यातच पोहोचेन ,, एकेकाळचा सलमान खान , आता दुर्दैवाने अदनान सामी बनायला चालला आहे .. तुमच्या वाटचालीस शुभेच्छा पण इथे मला सर्व प्रथम अभिमानदं तुमच्या घरातील व्यक्तीचे करावेसे वाटते ज्यांनी तुम्हाला या वाटचालीत तोलामोलाची साथ दिली . आपणास एक नम्र विनन्ती , आपण हे सर्व घराच्या जबाबदाऱ्या सांभाळून कास शक्य केले , यावर प्रकाश टाकावा अथवा ज्या कुण्या घरातील महत्वाच्या व्यक्तीचा पाठिंबा मिळाला त्याच्या नावाचा इथे उध्दार व्हावा . जेणेकरून आम्हा भावी ढेरपोट्या समुदायास प्रेरणा मिळेल . मी आता ११० पार केले आहे आणि पुढील सहा महिन्यात मला वाटत १५० असेन ..

चंबा मुतनाळ's picture

24 Sep 2018 - 4:35 pm | चंबा मुतनाळ

शंकरराव, साॅल्लीड लेख झालाय. हॅट्स आॅफ तुमच्या जिद्दीला!
मी पण तुमच्यामुळे मोटीव्हेट झालो आहे. भविष्यातल्या राईड्ससाठी शुभेच्छा

शुभां म.'s picture

24 Sep 2018 - 10:26 pm | शुभां म.

मस्त प्रवास आहे, पुढच्या प्रवासाठी खुप शुभेच्छा.

अंतु बर्वा's picture

25 Sep 2018 - 2:05 am | अंतु बर्वा

प्रेरणादायी वाटचाल! खुप शुभेच्छा!