कुचर्चा: युरेशियन ब्राह्मण-आणि इतिहासकार

Primary tabs

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
5 Sep 2018 - 7:06 pm
गाभा: 

(आमचे सौभाग्य, एका महान इतिहासकारासोबत चर्चा करायला मिळाली. काय ते मानवी आनुवांशिकतेचा इतिहास ......)

इतिहासकार: पटाईत, इतिहास म्हणजे पुराणातील वांगी नव्हे, मानवी आनुवांशिकतेचे अध्ययन असते. काही डोक्यात घुसले का? युरेशिअन भटुर्क्या?

मी: म्हंजे मी युरेशिअन, तुमि कोण?

इतिहासकार: आम्ही मूळ निवासी, तुम्ही गायी मेंढ्या हाकत साडे तीन हजार वर्षांपूर्वी इथे आलात.

मी: म्हंजे, दुग्धक्रांती साडेतीन हजार वर्षांपूर्वी झाली. मी उगाच कुरियन साहेबांना श्रेय देत होतो.

इतिहासकार: दुध क्रांतीचा आणि इतिहासाचा काय संबंध? विषयांतर करू नको भटुर्क्याSSS

मी: तेच तर मी म्हणतो, ते भटुकडे आय मीन माझे पूर्वज, युरोपियन गायींना हाकत इथे आले असतील ना. हे खरे असते तर तेंव्हाच दुग्ध क्रांती घडली असती. आता बघा न पुराण कथेत काय लिवले आहे, "गायीला नव्हता पान्हा, गोकुळात उपाशी कान्हा आणि दुधावरून बेचार्या कंसाला नाहक जीव गमवावा लागला रे S S S".

इतिहासकार: अरे, गाढवा, इतिहास म्हणजे गायी म्हशी नव्हे. तुझ्या फालतू किस्से-कहाण्या नव्हे. इतिहास म्हणजे, मानवी आनुवांशिकतेचे अध्ययन. तुमची ती भटुकडी संस्कृत भाषा युरोपिंन परिवारातील आहे या देशातील नाही.

मी: च्यायला, आमच्या संस्कृतच्या शास्त्री सरांना खोटारडा म्हंटलेले, अस्मादिकांना मुळीच खपणार नाही. शास्त्री सर कधीच खोटे बोलत नाही.

इतिहासकार: मला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नको, मानवी इतिहासाच्या चर्चेत, हे शास्त्री सर, कुठून उपटून काढले.

मी: तेच म्हणतो, आमच्या पहाडगंजच्या शाळेत संस्कृत शिकवायचे, शास्त्री सर. मला आठवीत संस्कृत मध्ये ९० टक्के मार्क असतानाही मी ९वीत हिंदी विषय घेतला. जाम रागावले शास्त्री सर. मला म्हणाले, हिंदीत तर टाॅपरला हि ७५ टक्के मिळत नाही. संस्कृत मध्ये मराठी / मद्रासी मुलांना सुद्धा ७५ टक्के सहज मिळतात (अस्मादिकांची लायकी). हिंदी भाषा तर ज्यांना संस्कृत बोलणे आणि शिकणे जमत नाही त्यांच्यासाठी. (पहाडगंजच्या मराठी शाळेत ९० टक्के विध्यार्थी पाकिस्तान मधून आलेले शरणार्थी - मुलतानी, पंजाबी आणि सिंधी इत्यादी, उरलेले १० टक्के मराठी आणि मद्रासी इत्यादी). प्रथम श्रेणीत पास व्हायचे असेल तर संस्कृत घे. मी शास्त्री सरांचे ऐकले नाही आणि हिंदी फक्त ५५ टक्के मार्क्स मिळाले. शास्त्री सरांची भविष्यवाणी खरी ठरली.

इतिहासकार: तुझ्या या टुकार कहाणीचा इतिहासाची काय संबंध,

मी: कसा नाही, बघा मद्रासी माणूस कसा खणखणीत संस्कृत म्हणतो आणि पंजाबी माणसाला संस्कृत बोलणे कठीण जाते. मग युरेशिअन लोकांना संस्कृत कशी जमनार, काही विचार केला का यावर. मानवी आनुवांशिकतेचा इतिहास...

इतिहासकार: तुला म्हणायचे तरी काय आहे,

मी: हेच, बामन असो किंवा द्रविड सर्वच इथले मूळ निवासी. संस्कृत हि मूळ निवासी लोकांची आदी भाषा. बाकी आर्य जाती, युरेशिअन सर्व थोतांड आहे. फूट डालो राज करो नीती राबविण्यासाठी.

इतिहासकार: मी मूर्ख आहे. गाढव आहे. तुझ्या सारख्या बिनडोक माणसासोबत चर्चा करतो आहे.

मी: ओळख पटली ना.

पुढे चर्चा होणे शक्य नव्हते.

(राखीगढ येथे सापडलेल्या रथस्वाराचे डीएनए दक्षिण भारतीय वनवासी जमातीशी मिळतात. कुमारी कंदम १५००० वर्षांपूर्वी पाण्याखाली गेले. गेल्या २० हजार वर्षांत समुद्र किमान २० मीटर वर आला आहे. आपल्या पुरातन साहित्याच्या आधारावर आपण आपला इतिहास शोधला पाहिजे न कि विदेशी गुलामीचा चष्मा लावलेल्या तथाकथित इतिहासकारांच्या नजरेतून. )

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

6 Sep 2018 - 2:20 pm | खटपट्या

उगाच भटुकड्या हा शब्द गरज नसताना वापरलाय.

बाकी चालुद्या

माहितगार's picture

6 Sep 2018 - 8:33 pm | माहितगार

अभ्यासक विरुद्ध सर्वसामान्य व्यक्ति अशा असमान चर्चेत सर्वसामान्य व्यक्तिकडून होणारा प्रतिवाद गोंधळलेला असणे तसे आश्चर्यकारक नसावे. 'अबकड उच्चजातीकृत' जन्माधारीत विषमतेबद्दल, कथित अभ्यासक हितसंबंधी चष्म्यांनी, राजकीय रंग लावून दिलेल्या आक्षेपांचा; सर्वसामान्य व्यक्तिने, विषयाच्या माहितीच्या अपूर्णतेने आणि सखोल अभ्यासाचा अभाव असलेला, गोंधळलेला प्रतिवाद ?

स्वधर्म's picture

7 Sep 2018 - 2:26 pm | स्वधर्म

मा. पटाईत काका,
तुंम्हाला कारण नसताना स्वजातीचे नाव घेऊन व तोंडदेखली पडती बाजू घेऊन कुठल्या गुलामीचा चष्मा लावलेल्या इतिहासकारावर (की इतर जातींवर?) टीका करायची अाहे ते नीट समजले नाही. अापण लोकमान्य टिळक यांनी लिहीलेले ‘अार्क्टिक होम अॉफ वेदाज’ या ग्रंथाबद्दल वाचलेले अाहे का? खुद्द पुस्तक नव्हे, पण त्याबद्दल इथे (दुवा: https://en.wikipedia.org/wiki/The_Arctic_Home_in_the_Vedas) थोडक्यात वाचता येईल. त्यांनी अार्य लोक उत्तर ध्रुवावरून इथे (अाशियात) अाले, असे सिध्द करण्याचा प्रयत्न केला अाहे. त्यामुळे तुंम्ही काळ्या रंगात रंगवलेले इतिहासकार कोण, असा प्रश्न पडलाय. असो, पण टिळक यांचा सिध्दांत नंतर अालेल्या अनेक संशोधनांनी बाद ठरत चालला अाहे, हे पण नोंदवून ठेवतो.
वरील दुव्याचा पहिला परिच्छेद:
The Arctic Home in the Vedas is a history book on the origin of Aryanic People by Bal Gangadhar Tilak, a mathematician turned astronomer, historian, journalist, philosopher and political leader of India. It propounded the theory that the North Pole was the original home of Aryans during the pre-glacial period which they had to leave due to the ice deluge around 8000 B.C. and had to migrate to the Northern parts of Europe and Asia in search of lands for new settlements. In support to his theory, Tilak presented certain Vedic hymns, Avestic passages, Vedic chronology and Vedic calendars with interpretations of the contents in detail.

विवेकपटाईत's picture

8 Sep 2018 - 5:02 pm | विवेकपटाईत

राखीगढचे ३५०० वर्षांपूर्वीचे DNA आणि दक्षिण भारतीय जनजाती समूहाचे DNA एकच आहे. ब्रिटीशांनी भारत देशात नेहमीच विदेशी लोकांनी राज्य केले आहे, हे सिद्ध करण्यासाठी. आर्य नावाची जात होती आणि ती विदेशातून आली असा दुष्प्रचार केला. आंग्ल शिक्षित लोक त्यात लोकमान्य टिळक हि या दुष्प्रचाराला बळी पडले यात नवल नाही. शिवाय जातीचा अभिमान असणारच. त्या काळी फक्त स्वामी दयानंद सरस्वती एकमात्र विद्वान होते ते या दुष्प्रचाराला बळी पडले नाही. टिळक पुरातत्व शास्त्री नव्हते शिवाय त्यांनी सामान्य माणसांचे अध्ययन केले असते तर सहज कळले असते संस्कृत भाषा पंच द्रविड भागातील लोक जास्त चांगली बोलू शकतात, सप्तसिंधू प्रदेश किंवा उत्तर-पश्चिमे पलीकडच्या लोकांपेक्षा. स्वामी दयानंद यांच्या अनुसार आपण सर्वच आर्य आहोत आणि ऋषी पुत्र आहोत. आर्य अर्थात धर्माने वागणारा आणि अधर्माने वागणारा अनार्य. म्हणून रावण ब्राह्मण असूनही राक्षस होता. इक्ष्वाकु कुळातील राजा कल्माषपाद याला हि राक्षस / अनार्य म्हंटले आहे.
तसेच पंच द्रविड भागात राहणारे लोक हे वेगळ्या जातीचे होते (फूट डालो राज करो). करुणानिधी सारखे विद्वान हि या जाळ्यात अटकले. त्यांनी हि राजनीती साठी या खोट्या कल्पनेचा दुष्प्रचार केला. असो.

दीपक११७७'s picture

11 Sep 2018 - 11:53 pm | दीपक११७७

पुर्ण पणे सहमतं, मुळातं टिळकांनी केलेल्या अभ्यासात हडप्पा ई संस्कृती येत नाही.

टवाळ कार्टा's picture

8 Sep 2018 - 3:03 am | टवाळ कार्टा

लै बडवेगिरी होऊ शकते इथे

जेम्स वांड's picture

8 Sep 2018 - 12:56 pm | जेम्स वांड

पटाईतांना सरकारी हापिसात काम करायचा (?) अनुभव आहे म्हणे दांडगा, म्हणजे असं मला आपले म्हात्रे काका म्हणत होते बुआ, म्हणून आदर करावा ह्यांचा (हे मी स्वतः ठरवलं होतं, तसंही सरकारी हापिसात काम करणारा माणूस होता हेच मोठं कारण आहे आदराचं) पण ह्यांची तद्दन जातीयवादी, किवंडी मानसिकता पाहून आदर आग्रह स्थगित करावा का काय ह्या विचारावर तरी येतोय. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या "नॉन-ब्राह्मणांत" पण हे असलं मूलनिवासी वगैरे करत बसायला किमान आमच्या पिढीला तरी वेळ नाही (आम्ही सरकारी नोकर नाही ना!) किंवा आम्ही कामधंदे सोडून सोशल मीडियावर ज्या विद्येतलं काही कळत नाही त्यावर अकलाही पाजळत बसत नाही, आमचे ब्राह्मण मित्र तंगडी खातात अन आम्ही चंद्रोदय पाहूनच संकष्टी सोडतो, त्यामुळे असल्या दळभद्री प्रकाराने मराठी भाषेची हिंद्याळलेली आयमाय करत तद्दन टुकार रुपकं घेऊन वर कुठंतरी उत्तरेत बसून जातीय तेढ वाढवू नका पटाईत.

विवेकपटाईत's picture

8 Sep 2018 - 5:05 pm | विवेकपटाईत

बिना व्यवस्थित वाचता दिलेला प्रतिसाद आहे. अजून तरी काही वेळ आहे, निवृतीला. पण सचिवालयाच्या जवळ प्रदर्शन साठी आलेला स्वत:ला तथाकथित मूल निवासी म्हणविणारा औलीया भेटला होता. त्याच्या सोबतचा हा संवाद आहे. आपण सर्व कुठल्याही जाती धर्माचे का असोना भारतीय आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

टवाळ कार्टा's picture

10 Sep 2018 - 2:30 pm | टवाळ कार्टा

डोक्याला हात

माहितगार's picture

8 Sep 2018 - 1:28 pm | माहितगार

अप्रत्य़क्ष आणि अल्पशा प्रमाणात हा विषय हाताळणारी आमची गंड मार्गदर्शन काव्य- नावाची कविता आहे. या निमीत्ताने जाहीरात करुन घेतो तेवढीच.

राखीगढीमुळे कोणत्या सिद्धान्ताला बळकटी मिळते - AIT (Aryan Invasion Theory) ला की OIT (Out of India Theory) ला?

वरील दोनहि विचारांच्या मागे गाढे विद्वान् उभे आहेत आणि ते सांगतात त्यापलीकडे मी काही लिहावे इतपत माझा अभ्यास नाही.

तथापि वर्तमानपत्रीय लेखन वाचून असे वाटले की R1a1 हे जनुक राखीगढीमध्ये सापडलेल्या दफनातील अस्थिपंजरामधे आहे, ते दक्षिण भारतात बहुतांशी सापडते आणि उत्तर भारतामध्ये अधिक दुर्मिळ आहे ह्यावरून काही तर्क बांधायचाच झाला तर तो AIT (Aryan Invasion Theory) ला पुष्टि देणारा असायला हवा. पटाईतकाकांनी त्याच्यापासून १८० अंश दूर असा तर्क त्याच साधनामधून कसा काढला?

’मद्रासी माणूस कसा खणखणीत संस्कृत म्हणतो आणि पंजाबी माणसाला संस्कृत बोलणे कठीण जाते’ असल्या anecdotal आधारावरून काय मिळणार? ’मद्रासी माणूस खणखणीत संस्कृत म्हणतो’ म्हणजे काय? उलटपक्षी तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि तामिळ भाषा अहंतेच्या दबावाखाली ब्राह्मणी विचार आणि संस्कृत भाषा माघार घेतांना दिसतात हे कसे?