✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अज्ञाताचा गड चढताना

अ — अनन्त्_यात्री, Sun, 08/19/2018 - 19:04
अज्ञाताचा गड चढताना अशी पायरी आली तर्कबुध्दी थकुनिया त्यावरी विश्रांतिस्तव बसली उठून गड बेलाग लांघण्या कंबर कसुनी उठली निरीक्षणाची, निष्कर्षाची वाट पकडुनी चढली जिथे संपली वाट त्या तिथे काहीतरी लखलखले त्या तेजातच अज्ञाताचे नवेच दर्शन घडले

प्रतिक्रिया द्या
2511 वाचन

💬 प्रतिसाद (4)

चांगली कविता.... आवडलीच

चांदणे संदीप
Sun, 08/19/2018 - 23:57 नवीन
चांगली कविता.... आवडलीच! :) हा माझा निराळा दृष्टीकोन: कवितेचा गड लढताना अशी हुशारी आली विवेकबुद्धी जिंकुनिया तेथ आधारास्तव बसली जागून भवसागर तरण्या सजग सज्ज झाली माणुसकीची, आपुलकीची कास धरून चालली जिथे हरवली वाट तमात तिथेही लख्ख झगमगले त्या दीपोत्सवात ज्ञानकणाचे मोती मला मिळाले धन्यवाद! Sandy
  • Log in or register to post comments

Sandy,

अनन्त्_यात्री
Wed, 08/22/2018 - 19:59 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments

जिथे संपली वाट त्या तिथे

सोत्रि
Sun, 11/10/2019 - 11:13 नवीन
जिथे संपली वाट त्या तिथे काहीतरी लखलखले त्या तेजातच अज्ञाताचे नवेच दर्शन घडले
_/\_ _/\_ _/\_ - (नतमस्तक) सोकाजी
  • Log in or register to post comments

वा!

श्वेता२४
Mon, 11/11/2019 - 13:43 नवीन
शेवट आवडला
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा