संपादक महोदय मिसळ पाव .com वरील सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्या साठी काय करावे याबद्दल मार्गदर्शन कराल का? सगळे पर्याय तपासून पहिले आहेत पण

Primary tabs

रंगीला रतन's picture
रंगीला रतन in काथ्याकूट
11 Aug 2018 - 10:36 pm
गाभा: 

संपादक महोदय मिसळ पाव .com वरील सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्या साठी काय करावे याबद्दल मार्गदर्शन कराल का? सगळे पर्याय तपासून पहिले आहेत पण कुठेही delete profile सदृश्य पर्याय दिसला नाहीये.
जर सदस्यांना तसे करता येणे शक्य नसेल तर कृपया आपण माझ्या विनंतीस मान देऊन माझे सदस्यत्व रद्द करावे.

आपला कृपाभिलाषी
रंगीला रतन.

प्रतिक्रिया

मार्कस ऑरेलियस's picture

11 Aug 2018 - 10:51 pm | मार्कस ऑरेलियस

सर्वात सोप्पा उपाय म्हणजे precaution is better than cure.

डु आयडी काढणे बंद कर म्हणजे सदस्यत्व रद्द करण्याची वेळच येणार नाही =))))

रंगीला रतन's picture

11 Aug 2018 - 11:06 pm | रंगीला रतन

माझ्या शेवटच्या प्रतिसादात तुमचीही माफी मागितली आहे साहेब, डु आयडी काढायची गरजच नव्हती कारण आपण काही लेखक किंवा कवी नसून सामान्य वाचक होतो बाकी प्रोफाईल वर नाव गावं सगळं लिहिले होते.

जेम्स वांड's picture

11 Aug 2018 - 11:31 pm | जेम्स वांड

प्रोफाइल वर नाव गाव लिहिलं होतं म्हणजे? (जेम्स वांड)

जेम्स वांड's picture

11 Aug 2018 - 11:33 pm | जेम्स वांड

म्हणजे (नाव गाव दिलंय) ? नाव गाव दिलंय म्हणजे? (जेन्यूईन प्रश्न) मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय ते.

माहितगार's picture

13 Aug 2018 - 2:36 pm | माहितगार

तांत्रिक दृष्ट्या काय शक्य आहे आणि काय शक्य नाही याची माहिती मिपा धोरण मध्ये समाविष्ट आहे का माहित नाही पण तशी ती समाविष्ट नसल्यास समाविष्ट करुन घेने श्रेयस्कर असावे.

तो पर्यंत रंगिला रतन यांना त्यांच्या व्यक्तिगत प्रोफाईल वरील नाव गाव स्वतःचे स्वतः वगळणे शक्य असावे. काही तुरळक प्रतिसाद वगळण्याची विनंतीही मिपा मालकांकडे करण्यास हरकत नसावी पण शेकडो चर्चांमध्ये सहभागी होणारे सदस्य सर्व ठिकाणी उल्लेख वगळा म्हणाले तर अशक्य नाही पण संस्थळ मालकांसाठी कठीण त्या शिवाय विवीध चर्चांमध्ये सहभागी झालेल्यांइतंरांच्या चर्चाम्चे अर्थ हकनाक बदलतील. हे अशी सरसकट विनंती करणार्‍यांनी लक्षात घेतले पाहिजे.

अर्थात या तांत्रिक बाबी झाल्या. रंगिला रतन स्वतः बद्दल 'आपण' हे आदरार्थी बहुवचन वापरतात ते त्यांनी प्रा.डॉ. सरांसाठी 'आपण' हे आदरार्थी बहुवचन वापरावयास हरकत नव्हती. एवढीच बाब रंगिला रतन यांची खटकली बाकी त्यांनी मिपाचा निरोप घ्यावा असे माझ्या दृष्टीपथात मला आता पावेतोतरी काही खुपले नाही.

सिद्धार्थ ४'s picture

13 Aug 2018 - 4:36 pm | सिद्धार्थ ४

का आत्महत्या करत आहात ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Aug 2018 - 11:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपलं अवतार कार्य एवढ्यात संपतेय हे काही पटले नाही. कोणत्याही डू अथवा वरिजनल आयडीशी माझं भांडन नाही, आयडी काय लिहिते हे मला नेहमीच महत्वाचे वाटले आहे, मी मिपा इंजॉय करतो. आपण माझ्याबद्दल काही लिहिले असल्यास त्याचेही काही वाटलेले नाही. तेव्हा...काही काळजी करू नका. वरिजनल आयडीने आम्ही लिहितो तेव्हा हे सर्व सोसणे आले. तेव्हा, जाऊ नका.

चांगले लेखन करत राहा....! :)

-दिलीप बिरुटे
(आपलाच मिपाकर)

प्रकाश घाटपांडे's picture

16 Aug 2018 - 11:04 am | प्रकाश घाटपांडे

एखाद्याला सभासदत्व काही कारणाने अथवा विनाकारण रद्द करायचे असेल तर ते तांत्रिकदृष्ट्या शक्य व्हाव या मताशी मी सहमत आहे. किमान सरपंचांना विनंती केली तर ते शक्य व्हाव.