मिपा वर जिल्बी पाडणे किती शहाणपणाचे आहे?

Primary tabs

चामुंडराय's picture
चामुंडराय in काथ्याकूट
5 Aug 2018 - 9:50 pm
गाभा: 

मिपा वर जिल्बी पाडणे किती शहाणपणाचे आहे?

जिल्बी पाडताना तुमच्या अंगात लेखकू चा संचार होतो का?

तुमच्या जिल्बी ला किती ट्यार्पी मिळतो यावर तुमच्यातील लेखकू ची लायकी ठरते का?

तुमच्या स्वतःच्या लेखनाला काही किंमत असते का? कि आलेल्या प्रतिसादांनी धागा कसा पेट घेतो यालाच किंमत असते?

तुमचा कंपू कसा वागेल त्याचे खापर तुमच्यावर फोडले जाते का?

आणि तुमच्या वर खापर फुटावे म्हणून तुमच्या विरुद्ध असलेला कंपू कसा प्रयत्न करतो?

तुमचा कंपू तुम्हाला PBUY - (Praise be upon you) किंवा तुमच्या विरुद्ध असलेला कंपू तुम्हाला BBUY - (Blame be upon you) करतो का?

तुम्हाला काय वाटते याबद्दल? तुमचा काय अनुभव आहे?

प्रेर्ना - अर्थातच...

प्रतिक्रिया

कंजूस's picture

6 Aug 2018 - 2:36 am | कंजूस

१) मिपावर किंवा इतर संस्थळाच्या तुलनेत/
२) जिलबी पाडणे/ किंवा आपला प्रामाणिक लेख पण इतर त्याला मत्सराने जिलबी म्हणतात/ लेखनाचे मुल्य कधी समजणार हे लोक?
३)शहाणपणा/सूज्ञपणा/वेडेपणा नक्की काय?
एवढे पर्याय कोसळले एकदम.

चौथा कोनाडा's picture

6 Aug 2018 - 7:11 am | चौथा कोनाडा

प्रश्न, प्रश्न आणि... प्रश्न ?
कुणी उत्तर देता का उत्तर ?

ट्रम्प's picture

6 Aug 2018 - 7:51 am | ट्रम्प

शहाण्या ने सांगत रहावे , सामान्य जनतेने ऐकत रहावे !
ज्याचे ज्ञान अगाध , जो करितो सामान्यांचे रंजन त्यास काय टीआरपी ची गरज !
इतरांच्या टीआरपी वरी जळुनी करू नये आपुला दाह !
लेखकाला दर्जा त्याला जन्मा पासुनी नाही भेटत , लेखणी चालवून त्यास लागीते सिद्ध करावया !

...ज्याचे ज्ञान अगाध , जो करितो सामान्यांचे रंजन त्यास काय टीआरपी ची गरज !
इतरांच्या टीआरपी वरी जळुनी करू नये आपुला दाह !
लेखकाला दर्जा त्याला जन्मा पासुनी नाही भेटत , लेखणी चालवून त्यास लागीते सिद्ध करावया !

+१

शहाण्या ने सांगत रहावे , सामान्य जनतेने ऐकत रहावे !...

इथे जरासेच बदल, वेगवेगळ्या परस्पर विरोधी बाजूच्या शहाणे काय म्हणू इच्छितात ते पुर्वग्रहांशिवाय समजून घ्यावे. स्वतःच्या जिवनातील निर्णय मात्र स्व-विवेकाने घ्यावेत. आणि '...घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे ' च्या धर्तीवर '...घेता घेता एक दिवस सांगणार्‍याचे हात घ्यावे ' आणि (प्रसंगी जिलब्यंवरच्या टिकेकडे दुर्लक्ष करुन) प्रत्येकाने आपण स्वतःही सांगू लिहू लागावे.

ज्योति अळवणी's picture

7 Aug 2018 - 6:30 pm | ज्योति अळवणी

मिपा वर कंपू आहेत हे जाणून आहे. पण गेली साडे तीन वर्षे मी जमेल तसं लिहिते आणि आलेल्या प्रदिसादांना स्वीकारते. जमेल तशी उत्तरे देते गरज असेल तर. मला माझं लेखन समाधान देत आणि प्रचंड टिकेल अजून तर तोंड द्यावे लागलेले नसल्याने मी समाधानी आहे

टवाळ कार्टा's picture

8 Aug 2018 - 4:16 am | टवाळ कार्टा

प्रतिसाद आवडेश

नाखु's picture

9 Aug 2018 - 10:21 am | नाखु

वाचक नाखु

रंगीला रतन's picture

9 Aug 2018 - 10:36 am | रंगीला रतन

आधी धागा वाचल्यावर फार काही अर्थबोध झाला नव्हता, नंतर त्यामागची प्रेर्ना समजली. :) :)

अत्रुप्त आत्मा's picture

9 Aug 2018 - 2:15 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/pen-emoticon-6802.html