भगवंत हा सर्वस्व अर्पण करणार्याचा दाससुद्धा होण्याची तयारी ठेवतो. बली वास्तविक असुर घराण्यातील असूनसुद्धा त्याच्या उदार तत्त्वामुळे व त्याने भगवंताला शरण जाऊन आपले सर्वस्व अर्पण केल्यामुळे भगवंताने त्याला योग्य मार्गदर्शन करून त्याच्या जीवनाला कलाटणी दिली व त्याचा उद्धार केला. त्याच्या राज्यात असलेले असुरवृत्तीला पोषक असे भोगमय विचार घालवून, त्या ठिकाणी त्यागाची भावना रुजवून, जनतेला दैवीविचार देऊन सुख व समृद्धी यांचे जीवन प्रदान केले.'
सनातन ताई इतकेच जर देवाला करायचे होते तर देवाचा राजा इंद्र ह्याला सदबुध्दी का दिली नाही. लंपट इंद्राचे आसन धोक्यात आले म्हणुन बळीराजा चा बळी का दिला? जर देवाने हेच दैवीविचार इंद्राच्या राज्यात रुजवले असते तर बरे झाले असते.
बळीने कोणावरही अत्याचार केला नव्हता. त्याच्या राज्यात सर्व सुखी होते.परंतु त्याच्या सदगुणी वागण्यामुळे देवांचे आसन डळमळीत झाले होते.म्हणुन विश्वासघात करुन त्याची हत्या केली गेली.त्याप्रित्यर्थ आज ही बलीप्रतिपदेला सर्वजन परत बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करत असतात.
वेताळ.
प्रतिक्रिया
विश्वासघात केला त्याला हे गोंडस रुप देता आहात.