macOS आणि iOS-2 (Quit All In One Click)

Primary tabs

शाली's picture
शाली in तंत्रजगत
13 Jun 2018 - 3:33 pm

बऱ्याचदा काम करताना आपल्याला एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन्सची गरज पडते. त्यानुसार आपण ती ऊघडतो. पण ती सर्व आपण लगेच बंद करतोच असे नाही. कारण वेळोवेळी त्यांची आवश्यकता लागते. उदा. मी आता पेजेस मध्ये काम करत आहे. पण काही पॅरा हे मी नोटस् मध्ये ठेवल्याने ’Notes’ उघडलेले आहे. मला मधे मधे स्क्रिन-शॉट वापरायचे असल्याने 'Photos' हे अॅप पण ओपन केलेले आहे. मला फोटोबकेट मधल्या काही लिंक हव्यात त्यामुळे ’Safari' ओपन आहे. स्क्रिनशॉट एडीट करण्यासाठी 'PhotoScape' ओपन आहे. प्रत्यक्षात मी Pages मध्ये काम करत असलो तरी ही सगळी ॲप्स बॅकग्राउंडला ओपन आहेत.
11
ज्यावेळी माझे काम पुर्ण होते तेंव्हा मला हे प्रत्येक ॲप माउस क्लिकने बंद करावी लागतात किंवा ⌘+tab नंतर ⌘+Q हे किबोर्ड शॉर्टकटस् वापरावे लागतात. हे जरा कंटाळवाणे आहे. यावर ऊपाय काय? तर ऊपाय आहे Automator.

तर पाहुयात Automator वापरुन ही सगळी ॲप्स एकाच क्लिक मध्ये कशी बंद करता येतील ते. Automator वापरुन 'Quit All' हे ॲप तयार करु. त्याला साजेसा म्हणजेच पटकन समजेल असा आयकॉन देउ आणि हे ॲप Dock वर तुम्हाला हवे तेथे place करु.

सर्वात प्रथम Automator ओपन करा. यासाठी तुम्हाला Applications मध्ये जाऊन Utilities मध्ये जावे लागेल. किंवा ⌘+Spacebar हा शॉर्टकट वापरुन Spotlight Search ऊघडा आणि aut टाईप करुन enter दाबा. Automator ओपन होईल.
यात तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. जसे Workflow, Applications, Service, Print Plugin वगैरे. त्यातील Application वर क्लिक करा.

1

वरती डाव्या बाजुला Search box असेल. त्यात "Quit" टाईप करा. Search box च्या खालीच तुम्हाला काही पर्याय आलेले दिसतील. त्यातील "Quit All Applications" हा पर्याय ऊजव्या बाजुला असलेल्या box मध्ये ड्रॅग करा. (MacBook वापरत असाल तर तिन बोटांनी आणि iMac वापरत असाल तर माऊसने ड्रॅग करा.)

2

आता हे खालील प्रमाणे दिसेल.

8

आता हा workflow सेव्ह करा. सेव्ह करताना योग्य ते नाव द्या. मी "QuitAll" हे नाव दिले आहे. तुम्ही सेव्ह करताना location निवडले नसेल तर हे ॲप 'Applications' मध्ये सेव्ह होईल.

56

Finder मध्ये जावून Applications उघडा. (Applications ओपन करण्यासाठी ⇧+⌘+A हा किबोर्ड शॉर्टकट वापरता येईल.) तुम्ही सेव्ह केलेले ॲप सिलेक्ट करा.

By default त्याचा आयकॉन हा Automator चा आयकॉन असेल. तुम्ही जर एकापेक्षा जास्त workflow तयार केले असतील तर, कोणते कशासाठी आहे हे समजायला अवघड जाईल. कारण हे ॲप आपण Dock वर ठेवणार आहोत. जिथे फक्त आयकॉन दिसेल नाव नाही. त्यामुळे या ॲपचे डिफॉल्ट आयकॉन बदलून समजायला सोपा असा आयकॉन द्या. (आयकॉन कसा बदलायचा हे मी मागील लेखात सांगितले आहे.)

0

बस् Automator वापरणे ईतके सोपे आहे. तुम्ही तयार केलेला workflow हा ॲपसारखेच काम करेल. जेंव्हा जेंव्हा तुम्ही Dock वरील या अॅपवर क्लिक कराल, क्षणात तुमची सगळी ओपन असलेली ॲप्स बंद होतील. जे ॲप ओपन असते त्या ॲपच्या Dock वरील आयकॉनखाली ग्रे डॉट असतो. QuitAll वर क्लिक केले की हे सगळे ग्रे डॉट नाहीसे होतील. म्हणजेच तुमचे background ला असलेली सगळी ॲप्स बंद झाली आहेत. करुन पहा. काही अडचण आलीच तर विचारा.

6

पुढच्या भागात AutoResponder Message बद्दल माहिती पाहू.

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

13 Jun 2018 - 9:08 pm | गामा पैलवान

शाली,

उत्तम उपक्रम आहे. एक सुचवावंसं वाटतं. तुमचं जे भित्तीचित्रं (=वॉलपेपर) आहे तो लक्ष विचलित करतो. साधासा वापरावा ही विनंती.

आ.न.,
-गा.पै.

हे लक्षातच नाही आले. प्लेन वॉलपेपर ठेऊन स्क्रिनशॉट घेईन ईथून पुढे. खुप धन्यवाद.

शाली's picture

13 Jun 2018 - 10:09 pm | शाली

गा.पै.
बदल केला आहे.

मदनबाण's picture

14 Jun 2018 - 6:38 am | मदनबाण

छान लिहताय... मी खिडकीवाला असल्याने सफरचंदा बद्धल माहित नाही. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shyama Meghame | ശ്യാമമേഘമേ | Adhipan | Malayalam Cover | Sanah Moidutty