घडवणूक शब्दांची!

Primary tabs

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
7 Jun 2018 - 9:26 pm
गाभा: 

मराठीत भाषेत अन्य भाषांमधून होणारी आवक आपल्याला नवी नाही.महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमधे बोलल्या जाणार्‍या भाषांपासून ते फारसी,इंग्लिश,पोर्तुगीज,अरबी अशा बर्‍याच भाषांमधून ही आवक झालेली आहे.
काही शब्द तर मूळचे मराठी नाहीत हे सहजपणे लक्षातही येणार नाही इतके ते मराठी भाषेत बेमालूमपणे मिसळले आहेत,स्वीकारले गेले आहेत.

ही आवक अजूनही सुरुच आहे.

पण ही आवक किती होऊ द्यायची यालाही काही मर्यादा असाव्यात,त्यामागे निश्चित असे धोरण असावे असे वाटू लागले आहे.

खालील वाक्ये पहा.

"हार्डडिस्क केबलनं लॅपटॉपला अॅटेच केली की विदीन टेन सेकंद लॅपटॉप आपोआप बंदच होतो."

"पावसाडा सुरु होऊनही मुंबईच्या रस्त्यांमदले गढ्ढे महापालिकेने न भरल्याने पुन्हा एकदा महापालिकेची पोल खुललेली आहे. - अखिलेश मिश्रा ------- न्यूजसाठी"

"पिल्लू तिकडे नको जाऊ.तिकडे अँटस असतील,त्या तुला बाईट करतील."

"अगं मी बोलली होती त्याला, मला जाताना पिकअप कर म्हणून!"

अशीच मराठी वाटू शकणारी काही वाक्ये तुमच्याही कानावर बर्‍याचदा पडत असतील. या वाक्यांमधे काही मोजके शब्द मराठी आहेत,क्रियापदे मराठी आहेत.पण सोबतच इंग्लिश आणि हिंदी शब्दांचाही नको इतका भरणा आहे.

अशा भाषेला आपण मराठी का समजावं? मोजकेच मराठी शब्द आणि क्रियापद मराठी आहे म्हणून? अशी भाषा ही खरंतर इंग्लिश किंवा हिंदीची बोलीभाषा म्हणून जास्त शोभेल असं नाही का वाटत?

मराठीच्या अशा धेडगुजरी रुपाबद्दल खंत व्यक्त करुन हळहळण्यापेक्षा आपणच काही केलं तर? प्रयत्न करुन पहायला हरकत काय आहे? याच इच्छेतून सुरु झालेला हा उपक्रम "घडवणूक शब्दांची!"

१) परकीय आणि स्वकीय भाषेतून आलेले क्लिष्ट, लांबलचक, उच्चारायला अवघड असे शब्द

२) परकीय भाषेतून आलेल्या वैज्ञानिक,तांत्रिक पारिभाषिक संज्ञा

३) समान,नेमका अर्थ दर्शवणारा शब्द आधीपासूनच मराठीत उपलब्ध असूनही तोच अर्थ दर्शवणारा मराठीतर शब्द

वरील तीन प्रकारच्या शब्दांसाठी अचूक मराठी शब्द सुचवणे किंवा त्यांचे मराठीकरण करणे आणि हे करताना नवीन निर्माण केला जाणारा शब्द लांबीला कमी, उच्चारायला सोपा, अर्थवाही असेल याचाही विचार करणे म्हणजे "शब्दांची घडवणूक!"

आपणही या उपक्रमात सामील होऊ शकता.

हे निर्माण झालेले नवीन शब्द मुक्त वापरासाठी सर्वांकरिता उपलब्ध असतील.असे शब्द सुचविणार्‍यांबद्दल कृतज्ञता नक्कीच असेल,श्रेय देण्याजोगे असेल.

या उपक्रमात आपण कशाप्रकारे सहभागी होऊ शकता?

‍१) हा धागा बनवलाच आहे.इथेच आपण असे शब्द बनवून प्रकाशित करु शकता.इतरांनी बनवलेल्या शब्दांवर चर्चा,काथ्याकूट करु शकता.

२) "घडवणूक शब्दांची!" याच नावाने एक व्हॉटसअॅप समुहसुध्दा बनवला आहे.तिथे बरेचसे सदस्य हे मिपाकरच आहेत.तिथे सामील होऊ शकता.सामील होण्यासाठी आपण आपलं नाव आणि व्हॉटसअॅप नं व्यनिद्वारे मला पाठवू शकता.

३) सर्वात महत्वाचा मुद्दा: - हे शब्द केवळ बनवून उपयोग नाही तर ते सर्वत्र पसरले पाहिजेत,त्यांचा प्रसार झाला पाहिजे,मराठीजनांनी ते बोलण्यातून,लेखनातून वापरले पाहिजेत.हे शब्द रुळणे हे या उपक्रमाचं खरं यश म्हणता येईल. आंतरजाल,संभाषण,लेखन,समाजमाध्यमे अशा मार्गांनी हे शब्द पसरवण्यास,रुळवण्यास मदत करु शकता.

दर सोमवारी व्हॉटसअॅप समुहावरील अंतिमत: निश्चित झालेले शब्द इथे दिले जातील,किंवा निश्चित न झाल्यास आलेली समस्या अधिक चर्चेसाठी इथे दिली जाईल. जेणेकरुन अधिक मार्गदर्शन मिळेल.

असाही प्रश्न पडू शकतो की याआधी असे शब्दनिर्मितीचे प्रयत्न झालेले आहेत.वि.दा.सावरकरांनी भाषाशुद्धीच्या माध्यमातून हे प्रयत्न पूर्वी केले आहेत.तुम्ही असं वेगळं काय करताय?
याचं उत्तर असं की आम्ही संपूर्णतः नवीन असं काहीच करत नाही आहोत.फक्त याआधीच्या प्रयत्नांमधल्या त्रुटी दूर करण्याचा आपापल्या क्षमतेनुसार प्रयत्न करणे आणि नवीन,सोप्या शब्दांचा प्रसार,प्रचार करुन हे शब्द रुळवण्यास यथाशक्ती प्रयत्न करत आहोत.

असा प्रयत्न करुन सावरकरांची बरोबरी करण्याचे धाडस करावे हा उद्देश यामागे नसून सावरकर ही यामागची प्रेरणा असून नवशब्दांची गंगा वाहती ठेवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.

अशा नवीन शब्दांचा प्रसार,प्रचार करताना ते रुळवताना काही वेळा थट्टा,मस्करीही होईल.ती याआधीच्या प्रयत्नांवेळीही झालेली आहे.सदर आक्षेपक मस्करी करण्याऐवजी सकारात्मकपणे या उपक्रमात सामील झाल्यास अधिक आनंद होईल.

सर्व सकारात्मक सुचनांचे,सल्ल्यांचे स्वागतच आहे.

प्रतिक्रिया

शंकासुर's picture

7 Jun 2018 - 11:55 pm | शंकासुर

भाषा ही कायम काळानुसार बदलत आलेली आहे आणि ती बदलत राहणार याला काहीच वाद नाही. तर काळाप्रमाणे नवीन आलेल्या संज्ञा, प्रकिया आणि खुलासे हे परकीय भाषेत आपल्या भाषेत अंगीकृत करून घेतल्यास ह्याचा फायदा ह्या तसेच पुढील पिढीला सुद्धा नक्कीच होईल.
आशा सर्व संवाद सकारात्मक होतील.

काही दिवस आधी मी एका फ्रेंच मैत्रिणीला म्हटले कि मला तो "पेन दि एपी" नावाचा फ्रेंच ब्रेड खूप आवडला तर हि बया म्हणते त्याचा उच्चार "पें दि इं पी " असा असतो. मी म्हटले कोण सांगतो ? तर म्हणाली "मी फ्रेंच असल्याने मला ठाऊक आहे". मी तिला सांगितले कि जगात फक्त ७० मिलियन फ्रेंच लोक आहेत त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा उच्चार ठरवणे त्याच्या हातात नसून चिनी आणि भारतीय लोक प्रत्येक गोष्टीचा उच्चार ठरवतील. वर हिला चिडविण्यासाठी मी आणखीन काही भारतीय लोकांना त्या उच्चाराची चिरफाड करण्यास सांगितली. ती भयंकर चिडली आहे. वर "अग फ्रेंच लोकांना शरणागती पत्करण्यात फार अनुभव आहे" असे म्हणून मी मीठ टाकते.

उपयोजक's picture

8 Jun 2018 - 9:03 am | उपयोजक

आभार शंकासुर, साहना अनुभव मस्त! :)

वरुण मोहिते's picture

8 Jun 2018 - 9:13 am | वरुण मोहिते

नवीन शब्दांची भर कळवत राहा नक्की.

उपयोजक's picture

8 Jun 2018 - 3:16 pm | उपयोजक

नक्की!

छान उपक्रम. हल्ली सर्वात जास्त खटकणारा शब्द म्हणजे हिंदीतला 'सतर्क' मराठीत वापरला 'दक्ष' किंवा 'सावध' याअर्थी वापरला जाणे. मराठीत 'सतर्क' असा शब्दच नाही. आणि असला तरी त्याचा अर्थ 'तर्कासहित' असा होईल.

उदा. हिंदीत 'पुलिस की सतर्कता कि वजह से टली बडी चोरी।' याचे मराठीत होईल 'पोलिसांच्या दक्षतेमुळे टळली मोठी चोरी.' इथे दक्षता किंवा सावधगिरी किंवा सावधपणा असे अनेक मराठी पर्याय उपलब्ध असताना आणि आधीपासूनच मराठीत व्यवस्थित रुळलेले असताना त्याजागी 'सतर्कता', 'सतर्क' ही हिंदी ठिगळे कशाला? 'दै. सकाळ' सारखी पुणेरी वर्तमानपत्रेदेखील असे करताना दिसतात तेव्हा फार वाईट वाटते.

पुंबा's picture

8 Jun 2018 - 11:35 am | पुंबा

अगदी अगदी..
सजग, जागरूक हे शब्द तर सतर्कने गिळून टाकल्यागत वाटते.

सतिश गावडे's picture

8 Jun 2018 - 11:59 am | सतिश गावडे

आम्हाला गर्व आहे मिपाकर असल्याचा ;)

आम्हाला गर्व आहे मिपाकर असल्याचा

चुकलं.

आम्हाला गर्व आहे मिपाकर असण्यावर.

कुमार१'s picture

8 Jun 2018 - 10:41 am | कुमार१

हार्डवेअर = संगणक यंत्रणा

साफ्टवेअर = ‘’’ मंत्रणा

मोबाइल = चलभाष

landline = स्थिरभाष

रुळगाडी railway
निर्मलक detergent
धारिका file( of papers)
सदनिका res. flat
सहनिवास / जोडघर row house
जलदपत्र e-mail
MoU ' सामंजस्य करार'

जेम्स वांड's picture

8 Jun 2018 - 12:12 pm | जेम्स वांड

सगळे शुद्ध संस्कृत शब्द आहेत,

हिंदी आक्रमणाला टक्कर द्यायची तर शब्दही समकालीन हवेत. संस्कृतबद्दल राग द्वेष वगैरे अजिबातच नाहीये पण संस्कृत हे इंडो आयर्न भाषा समूहाचे बेसिक टेम्प्लेट आहे, ह्या टेम्प्लेट मधून परत बेसिक syntaxचेच शब्द उचलले तर ते इतरही भाषा पक्षी संस्कृतप्रचुर हिंदी सोबत मॅच होतील, ते काही बरे दिसणार नाही, शिवकालीन मराठी (सिरीयल मध्ये दाखवतात ती नाही) किंवा जुन्यात जुनी मराठी (जिचा उल्लेख फा ही यान का इतर कुठल्यातरी चिनी प्रवाशाने केले आहे ज्यात तो म्हणतो 'हे महारठ्ठे लोक 'दिल्ले, घेतीले वगैरे भाषा बोलतात' त्या टेम्प्लेट वर अजून रिसर्च होणे गरजेचे आहे.

उपयोजक's picture

8 Jun 2018 - 3:24 pm | उपयोजक

धन्यवाद.असेच शब्द सुचवत रहा.
मिपाकर नरेंद्र गोळे यांनी फाईलसाठी संचिका,कोषिका असेही शब्द सुचवले आहेत.

नवीन शब्दासाठी हे निकष असावेत असे वाटते.

१) उच्चारायला सोपा
२) जास्तीतजास्त ४ अक्षरी
३)अंतिम वापरकर्त्यासाठी वस्तूचा उपयोग दर्शवणारा

रमेश आठवले's picture

9 Jun 2018 - 5:51 am | रमेश आठवले

माझे एक मित्र, जे मिपाचे सदस्य आहेत, यांनी मोबाईलला कर्णपिशाच्च असे चपखल नाव दिले आहे.

उपयोजक's picture

9 Jun 2018 - 10:59 am | उपयोजक

:) :) :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Jun 2018 - 11:37 am | ज्ञानोबाचे पैजार

याच न्यायाने चतुरभ्रमणध्वनीला "नेत्रपिशाच्च" म्हणता येईल
पैजारबुवा,

वकील साहेब's picture

9 Jun 2018 - 11:33 am | वकील साहेब

MOU ला आम्ही रुजवातपत्र म्हणतो.

कुमार१'s picture

8 Jun 2018 - 10:45 am | कुमार१

आपण मराठीप्रेमी सुद्धा काही रूढ झालेल्या मराठी शब्दा एवजी (उगाचाच त्याची लाज वाटून) इं शब्द वापरतो. उदा. 'स्वछतागृह ' खूप पूर्वीच रूढ झालेला असताना आपल्या तोंडी पट्कन 'toilet' च येते. सार्वजनीक ठिकाणी विचारताना तर 'संडास वा मुतारी' हे उच्चारायची आपल्याला का लाज वाटावी?

तसेच 'मूळव्याध', 'पाळी', 'संभोग' हे सभ्य शब्द असतानाही आपण त्यांच्याएवजी इं शब्द वापरतो.

पुलंनी या संदर्भात मार्मिक टिपणी केली आहे,'' मराठी माणूस आपली लाज लपवण्यासाठी इं. शब्द वापरत असतो''.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jun 2018 - 9:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

उदा. 'स्वछतागृह ' खूप पूर्वीच रूढ झालेला असताना आपल्या तोंडी पट्कन 'toilet' च येते.

अश्या शब्दांच्या बाबतीत आपण खूपच लाजरेबुजरे आहोत. याविरुद्ध, मलेशियन लोक बघा, क्वालालंपूर आंतरराष्ट्रिय विमानतळावर सगळीकडे चक्क "Tandas (टंडास) असे लिहिलेले आहे.

कुमार१'s picture

9 Jun 2018 - 5:59 am | कुमार१

जय टंडास, जय मलेशिया !

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jun 2018 - 3:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

मलेशियन भाषेत "Tandas (टंडास)" म्हणजे मराठीत "संडास".

चामुंडराय's picture

9 Jun 2018 - 6:36 am | चामुंडराय

आपल्याला इकडे संडास म्हणायची लाज वाटते
तिकडे तर लोकं डंडास मध्ये राहतात :)

अनिंद्य's picture

13 Jun 2018 - 11:26 am | अनिंद्य

:-)

मराठी कथालेखक's picture

12 Jun 2018 - 4:44 pm | मराठी कथालेखक

आधी Toilet म्हणायचो मग त्याची लाज वाटू लागली Wash room म्हणू लागलो आणि आता rest room !!

Nitin Palkar's picture

15 Jun 2018 - 8:59 pm | Nitin Palkar

+११११११११
संडास, मुतारी हे शब्द तर आपण विसरलोच; पण 'Excuse me', 'Sorry', 'Thank you' या शब्दांमुळे आपल्याला इंग्रजी ही सर्वात सुसंस्कृत भाषा वाटते.

शेखरमोघे's picture

8 Jun 2018 - 9:51 pm | शेखरमोघे

हल्ली मराठीत कुणीही कुणाला मदत न करता हिन्दी सारखी कुणाचीतरी मदत करतात. तसेच कोणीही गावाहून येत नाही तर गावावरून येतो.

"पेन दि एपी"/"पें दि इं पी " चा किस्सा आवडला. ओळखीच्या काही चिनी आणि भारतीय मित्रान्च्या फ्रेंच शिकवण्यावर (जे आपापल्या देशात फ्रेंच शिकले आणि आता भारताबाहेरच्या शाळेत फ्रेंच शिकवतात) फ्रेंच लोक नाखूष असल्याचे पाहिले आहे.

जयन्त बा शिम्पि's picture

8 Jun 2018 - 11:11 pm | जयन्त बा शिम्पि

बातम्या सांगतांना अनेकवेळा ' सुत्राकडून ' मिळालेल्या बातमीनुसार असा सरसकट मराठीत वापर आढळतो. त्यापेक्षा " माहितगाराकडून " असा पुर्ण मराठी शब्द वापरावयास हवा.

कुमार१'s picture

9 Jun 2018 - 11:16 am | कुमार१

वर जेम्स यांनी चांगला मुद्दा मांडला आहे. आता ‘घडवणू की’ बाबत एक बाजू अशी आहे.

शब्दरत्नाकर मध्ये म्हटल्याप्रमाणे संस्कृत ही मराठीची आजी, तर प्राकृत ही आई आहे. जेव्हा आपण “मायबोली”त शब्दांची घडवणूक करतो तेव्हा या ‘आई व आजीच्या’ बोलीचा नकळत प्रभाव पडतोच.

आता इंग्रजी चेही बघा. तिचे मूळ आणि कूळ हे ग्रीक व लॅटिन पर्यंत जाते.
तेव्हा भाषेच्या ‘पूर्वजांचा’ प्रभाव नसलेले “शुद्ध” शब्द घडवणे हे खरेच आव्हानात्मक काम आहे.

१.५ शहाणा's picture

9 Jun 2018 - 11:17 am | १.५ शहाणा

ICU सहज पणे अ द वि (अती दक्षता विभा ) म्हणता येईल .

मराठी_माणूस's picture

9 Jun 2018 - 11:26 am | मराठी_माणूस

आजकाल कोणी "स्वयंपाक" करत नाहीत, तर "जेवण" करतात.

वकील साहेब's picture

9 Jun 2018 - 11:38 am | वकील साहेब

प्रशासनाने या बाबत नवीन नियम जारी केले आहेत. अस का म्हणतात मराठी प्रसारमाध्यमे ? त्यापेक्षा लागू केले अस म्हणावे ना.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2018 - 1:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

या चर्चेच्या संदर्भात अनधिकृत जागतिक भाषा समजल्या जाण्यार्‍या इंग्लिश भाषेबद्दलची थोडीशी माहिती उपयोगी ठरावी.

इंग्लिशचे मूळ

इंग्लिशचे मूळ ग्रीक किंवा लॅटिन नव्हे तर 'पश्चिम जर्मेनिक भाषाकुळ आहे'. त्या भाषाकुळातील अँग्लो-फ्रिसिअयन उपभाषा (dialects), उत्तर-पश्चिम जर्मनी, डेनमार्क आणि नेदरलँड्स येथून पाचव्या शतकात (post-Roman period) ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेल्या अँग्लो-सॅक्सन (Anglo-Saxon) लोकांनी आपल्याबरोबर आणल्या आणि त्या उपभाषांतून इंग्लिश भाषेचा जन्म झाला. या स्थलातरितांपैकी एका मुख्य जमातिला आंग्लेस (Angles; Latin: Angli) असे सबोधले जात असे. यांनी ब्रिटनमध्ये अँग्लो-सॅक्सन (Anglo-Saxon) राज्ये स्थापन केली. त्या जमातिच्या नावापासून इंग्लंड हे नाम बनले आहे.

जर्मेनिक भाषाकुळाची जननी "प्रोटो-इंडो-युरोपेअन भाषा" आहे. म्हणून 'उत्तर व पश्चिम भारतापासून' ते 'उत्तर-पश्चिम युरोप व ब्रिटन इथपर्यंत" बोलल्या जाण्यार्‍या भाषा इंडो-युरोपियन भाषाकुळातील जवळ-दूरच्या नातेवाईक आहेत.


(जालावरून साभार)

आधुनिक इंग्लिश

चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत (सुमारे ६०० वर्षे) ब्रिटिश राजघराण्याची, सरदार-उमरावांची आणि राजदरबाराची भाषा लॅटिन व फ्रेंच होत्या. तोपर्यंत, हुच्च लोकांत, इंग्लिश बोलणे गावंढळ समजले जात असे ! उत्तम इंग्लिश बोलणार्‍या पहिल्या इंग्लिश राजाची (Henry III; १२१६-१२७२) ती मातृभाषा नव्हती. Henry IV (१३९९-१४१३) हा इंग्लिश मातृभाषा असलेला पहिला इंग्लिश राजा होता.

(अ) औद्योगिक क्रांतीमुळे व (आ) वसाहतवादातील इंग्लंडच्या यशामुळे जसजसे इंग्लंडचे, युरोपच्या व नंतर जगातल्या राजकारणातले महत्व वाढत गेले; तसतसे इंग्लिशमध्ये आयात केल्या जाणार्‍या शब्दांचा ओघ वाढत गेला. ब्रिटिश साम्राज्य जगभर पसरलेले असल्याने कोणताही एक देश या आयातीस वर्ज्य समजला गेला नाही. तेव्हा सद्याच्या इंग्लिश शब्दांचे मूळ आशियातील व आफ्रिकेतील भाषांत असणे ही आश्चर्याची गोष्ट नाही. सद्याच्या आधुनिक इंग्लिशमध्ये सुमारे ८०% शब्द (विज्ञान व तंत्रज्ञानासंबंधीत शब्द पकडले तर हे प्रमाण ९०% इतके वर जाते) जगभरातील इतर भाषांतून घेतलेले आहेत... त्यामुळे, या "अनधिकृत जागतिक भाषा" समजल्या जाणार्‍या भाषेला "उसनी घेतलेली भाषा (borrowed language)" असे गमतीने म्हटले जाते. :) लॅटिन आणि ग्रीक भाषांचा इंग्लिशमधला शिरकाव या भाडोत्री शब्दांच्या आवकीतून झालेला आहे.

इथे त्या सावकार भाषांची सूची मिळेल.

तेव्हा, दुसर्‍या भाषेतून आपल्या भाषेत शब्द येणे हे तितकेसे वाईट आहे असे नाही. जी भाषा अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण इत्यादींवर प्रभुत्व मिळवते ती जास्तीत जास्त सहजपणे लोकांच्या तोंडी येते. त्याबरोबरच, हे पण समजून घेतले पाहिजे की, हा भाषेचा प्रवाह उलट दिशेनेही वाहतो... म्हणून तर इंग्लिशमध्ये आशियायी आणि आफ्रिकन भाषांमधील शब्दांचा सहज शिरकाव झालेला आहे !

जेम्स वांड's picture

9 Jun 2018 - 1:31 pm | जेम्स वांड

आशयघन, ज्ञानपूर्ण अन नीरक्षीर प्रतिसाद दिलात काका, खूप आवडला.

तेव्हा, दुसर्‍या भाषेतून आपल्या भाषेत शब्द येणे हे तितकेसे वाईट आहे असे नाही. जी भाषा अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण इत्यादींवर प्रभुत्व मिळवते ती जास्तीत जास्त सहजपणे लोकांच्या तोंडी येते. त्याबरोबरच, हे पण समजून घेतले पाहिजे की, हा भाषेचा प्रवाह उलट दिशेनेही वाहतो... म्हणून तर इंग्लिशमध्ये आशियायी आणि आफिकन भाषांमधिलचे शब्दांचा शिरकाव झालेला आहे !

हे खणखणीत प्रतिपादन तर अजूनच आवडलं

श्री हेमचंद्र प्रधान यांच्या 'विज्ञानशिक्षण नव्या वाटा' या पुस्तकातील हा मजकूर मार्गदर्शक ठरावा.

paribhasha

उपयोजक's picture

9 Jun 2018 - 6:48 pm | उपयोजक

paribhasha 2

उपयोजक's picture

9 Jun 2018 - 6:22 pm | उपयोजक

फायरवॉल= जालभिंत

संदर्भ=
(इंटरनेट= आंतरजाल)

राऊटर= मार्गक

Routers perform the traffic directing functions on the Internet. Wikipedia

हे दोन शब्द सुचवले आहेत.यावर चर्चा व्हावी.योग्य आहेत का?

कुमार१'s picture

9 Jun 2018 - 6:39 pm | कुमार१

brand ambassador= मुद्रादूत .

उपयोजक's picture

9 Jun 2018 - 6:51 pm | उपयोजक

संबोध(concept) म्हणजे आपल्या एकूण अनुभव विश्वाचा वेगळा काढता येणारा घटक. असे संबोध आणि ते दाखवणाऱ्या संज्ञा आपल्या अनुभवाची वर्गवारी आणि संकेतन(codification)करतात.'खुर्ची' ही संज्ञा घ्या अनेक खुर्च्या पाहून चार पायांची,ठराविक आकाराची,एक मनुष्य ज्यावर बसू शकेल अशी वस्तू म्हणजे खुर्ची असा संबोध आपल्या मनात तयार झालेला असतो.हा संबोध अमूर्त असतो,एखादी प्रत्यक्ष खुर्ची म्हणजे हा संबोध नव्हे.अनेक खुर्च्यांच्या आपल्या अनुभवावरून आपण हे सामान्यीकरण करत असतो.या संबोधाचा सामान्यीकरणाचा आणि ते दाखवण्यासाठी वापरलेल्या संज्ञेचा उपयोग काय होतो? एक म्हणजे एखादी नवीन वस्तू आपल्या पुढे आली तर आपल्या मनातील 'खुर्ची' कशाला म्हणायचे याविषयी तयार झालेल्या कसोट्यांद्वारा ती वस्तू खुर्ची आहे की नाही हे ओळखण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होते कपाट,टेबल,स्टूल,बाक अशा गोष्टी समोर आल्या की त्या खुर्ची नाहीत हे आपल्या लक्षात येते जसे बाक जरी रचनेने खुर्चीसारखे असले तरी त्यावर एकापेक्षा अधिक माणसे बसण्याची सोय आहे हे पाहून आपण त्याला खुर्ची म्हणत नाही. दुसरे म्हणजे या संज्ञेमुळे आपल्या विचारांच्या ज्ञानाच्या विनिमयाची कार्यक्षमता वाढते. खुर्ची हा शब्द भाषेत नसता तर आपल्याला 'चार पायांची ठराविक आकाराची एका माणसाने बसायची वस्तू' असे लांबलचक वर्णन खुर्चीचा उल्लेख करताना प्रत्येक वेळी करावे लागले असते.
एकदा अशी संज्ञा आणि तिच्या मागचा संबोध आपल्या मनामध्ये दिसला की तो आपल्या विचारप्रक्रियेचा भाग होतो.त्यासाठी आपल्याला वेगळी आठवण ठेवावी लागत नाही.खोलीमध्ये चार खुर्च्या पाहिजेत असे म्हटल्यावर आपण खुर्च्या म्हणजे काय यापासून सुरुवात करत नाही.उलट खुर्च्या लोखंडी हव्या,वेताच्या हव्या की लाकडी अशी चौकशी करू लागतो. म्हणजे खुर्च्या हे वर्गीकरण गृहित धरुन उपवर्गीकरण करतो,विभेदन करतो.विभेदनाच्या विरुद्ध प्रक्रिया म्हणजे व्यापकीकरण.आपण खुर्च्या,टेबल,स्टूल, कपाट अशा एका पातळीवरच्या संबोधांपासून वरच्या पातळीवरच्या फर्निचर यासारख्या अधिक व्यापक अधिक गुंतागुंतीच्या संबंधांची गुंफण करतो. संज्ञा आणि त्यामागील संबोध हे आपल्या विचारप्रक्रियेचे पायाभूत घटक आहेत,आपल्या विचारप्रकियेची इमारत या 'विटांनी' बांधली गेली आहे हे लक्षात येईल.

लेखक - श्री.हेमचंद्र प्रधान

प्रकाश घाटपांडे's picture

10 Jun 2018 - 9:37 am | प्रकाश घाटपांडे

ज्या नवीन संकल्पना/ संज्ञा परकीय भाषातून आपल्याकडे आल्यात त्या जशाच्या तशा स्वीकाराव्यात. त्यामुळे भाषा धेडगुजरी होत नाही तर संपन्न होते. अट्टाहासाने अवघड प्रतिशब्द तयार करण्यापेक्षा ते बर. तसही मराठी भाषेत अनेक इतर भाषांतील शब्द रुळले आहेत. हे प्रत्येक भाषेत होत आहे.

बनवले जाणारे शब्द क्लिष्टच असणार हे कशावरुन ठरवलं?

१) परकीय आणि स्वकीय भाषेतून आलेले क्लिष्ट, लांबलचक, उच्चारायला अवघड असे शब्द

२) परकीय भाषेतून आलेल्या वैज्ञानिक,तांत्रिक पारिभाषिक संज्ञा

३) समान,नेमका अर्थ दर्शवणारा शब्द आधीपासूनच मराठीत उपलब्ध असूनही तोच अर्थ दर्शवणारा मराठीतर शब्द

वरील तीन प्रकारच्या शब्दांसाठी अचूक मराठी शब्द सुचवणे किंवा त्यांचे मराठीकरण करणे आणि हे करताना नवीन निर्माण केला जाणारा शब्द लांबीला कमी, उच्चारायला सोपा, अर्थवाही असेल याचाही विचार करणे म्हणजे "शब्दांची घडवणूक!"

हे स्पष्टपणे लिहिलंय की हो!

हे सुध्दा लिहिलंय

नवीन शब्दासाठी हे निकष असावेत असे वाटते.

१) उच्चारायला सोपा
२) जास्तीतजास्त ४ अक्षरी
३)अंतिम वापरकर्त्यासाठी वस्तूचा उपयोग दर्शवणारा

२) खालील वाक्य पहा.

"हार्डडिस्क केबलनं लॅपटॉपला अॅटेच केली की विदीन टेन सेकंद लॅपटॉप आपोआप बंदच होतो."

बघा कसं वाटतं हे वाक्य.याला मराठी का म्हणावं? काही शब्द आणि क्रियापद मराठी आहे म्हणून?

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Jun 2018 - 10:36 am | ज्ञानोबाचे पैजार

वरती म्हात्रे सरांचा आणि घाटपांडे सरांचा दृष्टीकोनही लक्षात घेण्यासारखा आहे

"संगणकाची तबकडी स्थुलरज्जुने उपस्थसंगणकाला संलग्न केली की उपस्थसंगणक क्षणार्धात आपोआप बंद होतो."
हे कसं वाटतय? पटकन समजायला कोणते वाक्य सोपे जाते?

भाषेचा उपयोग विचारांचे आदानप्रदान सहज पणे करता यावे हा आणि केवळ हाच असावा.

"बंधो कृपया मजला त्वरेने द्वाद्श कदलीकाफले प्रदान करतोस का? ८.२७ च्या तीव्रगती स्थानिय लोहपथगामिनीने मजला यात्रा करायची आहे"
असे जर मुंबईतल्या एखाद्या केळी विकणार्‍या भैय्याला सांगीतले तर त्याला कळणारच नाही.
त्या ऐवजी "भैया जल्दीसे एक डजन देना" असे म्हणालो तर पटकन केळी घेउन आपण ८.२७ ची सीएसटी फास्ट पकडायला मोकळे होउ.
रिटायर्ड झाल्या नंतर रस्त्यावर उगाचच टाइमपास करत फिरायचे असेल तर मग ठिक आहे विशुध्द मराठीचा अभिमान वगेरे वगेरे..

पैजारबुवा,

उपयोजक's picture

11 Jun 2018 - 11:44 am | उपयोजक

मिपावर न आल्यास अजून बराच वेळ वाचेल.काय म्हणता? :)
(वेळ वाचावा म्हणून ज्ञा.पै. लिहिले आहे.राग मानू नये.)

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Jun 2018 - 2:22 pm | ज्ञानोबाचे पैजार

ठिक आहे मी माझ्या वरच्या प्रतिसादातील वाक्यात अजून थोडी सुधारणा करतो


भाषेचा उपयोग विचारांचे आदानप्रदान सहज पणे करता यावे हा आणि केवळ हाच असावा, अन्यथा भाषेचा धर्म बनायला फारसा वेळ लागणार नाही.

पैजारबुवा,

कपिलमुनी's picture

11 Jun 2018 - 2:42 pm | कपिलमुनी

बंधो कृपया मजला त्वरेने द्वाद्श कदलीकाफले प्रदान करतोस का? ८.२७ च्या तीव्रगती स्थानिय लोहपथगामिनीने मजला यात्रा करायची आहे"

>> भावा , बावीस केळी दे . ८. २७ ची वेगवान आगगाडीने जायचे आहे .

पर्यायी शब्द म्हणजे भाषांतरीत शब्द नव्हे . काही गोष्टी या इंग्रजांकडून आल्या आहेत , त्याला पर्यायी शब्द सहज मिळणे अवघड आहे.
मेतकूट , कुरडया , भातवडी , कोनाडा याला इंग्रजी शब्द नाहीत. पण इंग्रजी भाषा नवनवीन शब्द स्विकारते . आपण देखील नेवीन इतर भाषामधले शब्द स्विकारून मराठी समृद्ध करायला हवी.

समीर वैद्य's picture

14 Jun 2018 - 11:44 am | समीर वैद्य

साहेब द्वादश म्हणजे बारा, बावीस नव्हे.

अपमान करण्याचा किंवा भावना दुखावण्याचा हेतू नाही. चूक दिसली म्हणून दाखवली एवढेच.

ह घ्या.....

गवि's picture

10 Jun 2018 - 11:52 am | गवि

चुकीचे, खुपणारे, अशुद्ध, अमराठी, धेडगुजरी, मुद्दाम "शुद्ध" करावे लागावे असे शब्द सहज रुटीनमधे का बरं स्वीकारत असतील सामान्यजन? का हा मार्ग घेतात ते? काय आकर्षण आहे यामागे?

अति अवांतर: हालगीवादन, गोंधळ, वासुदेव हेही हल्ली कमी होत चाललेत. हिंदी, अमराठी, पाश्चात्त्य इव्हेंट्स वाढलेत. काय काय जपायचं त्याची यादी करू.

राही's picture

10 Jun 2018 - 3:03 pm | राही

थेट बुल्स आय.

कलंत्री's picture

10 Jun 2018 - 10:14 pm | कलंत्री

थेट बुल्स आय = मर्मभेद. हा शब्द कसा वाटतो.

बरोबर आहे. "बुल्स आय" असं मनात आलं की "मर्मभेद" असं लिहायचं / म्हणायचं.

"मर्मभेद" असं वाचलं / ऐकलं की त्याचा अर्थ बुल्स आय..

राही's picture

11 Jun 2018 - 11:44 am | राही

' मर्मभेद' पेक्षा ' लक्ष्यवेध' हा शब्द अधिक योग्य वाटतो. हिटिंग द टार्गेट या अर्थाने. (पुन्हा इंग्लिश!) फापटपसाऱ्यातून नेमका मुद्दा ओळखून तिथे बरोब्बर रोख ठेवायचा. आपल्याला लक्ष्य वेधायचं आहे. कुणाचा/ कशाचा भेद करायचा नाहीय.

दक्षिणी मराठी's picture

10 Jun 2018 - 9:39 pm | दक्षिणी मराठी

तुमचं शब्द घडवणाचं कार्यक्रमामुळे महाराष्ट्रीय समुदायालाहीं महाराष्ट्राचं बाहेर राहणार मराठी समुदायालाहीं एकत्र मिळणं शक्य झालं तर उदंड आनंदावाणीं असेल. तुमचं प्रयत्नांस शुभेच्छा..!!

गेलं ३५० वर्षांत मराठी भाषांत भरून शब्द परिवर्तन झालं त्यामुळे महाराष्ट्राचं मराठींतहीं तंजावूराचं मराठींतहीं उदंड व्यत्यास येऊन गेलं आहे. तसं व्यत्यास आलं त्यामुळे तंजावूराचं मराठीहीं महाराष्ट्राचं मराठीहीं दोघेहीं मराठीच असलं तरीपणहीं दोघांला मिळाला साध्य वाटत नाही… त्यामुळे उत्पन्न झालं ते कष्टाला हे वीडियोंत दक्षिणी मराठी वर्णन करलों आहों. दया करून ते वीडियो पहांत.

वीडियोंत्सून एक परिच्छेद...

"तरीपणीं... इतिहास साक्ष आहें.. आमच्या तंजावूर राज्याचं छत्रपति श्रीमद् भोंसलें महाराजांच्या वंशावळींत जन्मलें ते अख्खेहीं राजे-महाराजे संस्कृत भाषावरं उदंड प्रीति करलेंत. आमच्या महाराजांनी संस्कृतांतून लिव्हालापणहीं उदंड प्रोत्साहन करलेंत, स्वतःपणी संस्कृतांतून साहित्य लिव्हलेंत. आणखी एक विषय काय म्हणजे, “संस्कृत भाषा हे एक देवाचं भाषा, तसंच आमचं मराठी भाषापणहीं एक साधु – संतांचं भाषा आहे.. साधु – संतांला कसं देवाचं सोयरिक.. तसं आमचं भाषालापणहीं संस्कृताचं सोयरिक” असं म्हणून सांगतीलं आमचं महाराजा.. त्याच्यामुळं भरून जुनं शब्द, मूळ शब्द आहेंत, आमच्या तंजावूर मराठींत.. गेलं साडेतीनशे वर्षं आम्हीं राहात असाच्या ठिकाणांत कुठंपणहीं मराठी भाषाचं चलनं-वलनं नाहीं तरींपणहीं, मराठी लिवाला-वांचाला येणारं लोकं उदंड उणं असलं तरींपणहीं.. आमचं लोके कित्ती यत्न करून आमच्या जुनं मराठीच्या शब्दांला सांभाळून ठिंवलेंत? हे आमच्या लोकांला उदंड अभिमान, फार गर्व भोगाचं विषय...."

पूर्ण वीडियो पहांत हे ठिकाणांत...!!

अनिंद्य's picture

11 Jun 2018 - 11:59 am | अनिंद्य

उपक्रमास शुभेच्छा, त्यानिमित्ताने रोचक चर्चा घडत आहे.

'दुसर्‍या भाषेतून आपल्या भाषेत शब्द येणे फारसे वाईट नाही' हा डॉ. म्हात्रेंचा प्रतिसादही पटतो आहे.

उपयोजक's picture

11 Jun 2018 - 12:02 pm | उपयोजक

आधीपासून असलेले तर काही नवीन शब्द.कोणते योग्य,अयोग्य,सोपे,अवघड याबद्दल अभिप्राय मिळावेत.

१) LED = दिवडी (प्रकाश देणारे छोटे दिवे)
२) Mobile = चलभाष
३) Acceleration = त्वरण
४) Generator = जनित्र
५) Transformer = रोहित्र
६) Air conditioner = वाकु( वातानुकूलक चे लघुरुप)
७) CFL = स्वल्पदीप
८) Adhesive = आसंजी
९) Direct Current दिष्ट धारा
१०) Absolute निरपेक्ष
११) Acoustic ध्वनिक
१२) Adaptor अनुकूलक
१४) Air break वातारोधी
१५) Coil कुंडल
१६) Alarm संकटघंटी
१७) Amplifier प्रवर्धी
१८) Anode धनाग्र
१९) Cathode ऋणाग्र
२०) Welding सांधण
२१) Array विन्यास
२२) Audio श्रुति
२३) Illumination दीपन
२४) Diode = एकदि (एकाच दिशेत वीजप्रवाह वाहू देतो म्हणून)
२५) Pentode = पंचोड
२६) Conductor = सुवाहक
२७) Insulator = दुर्वाहक
२८) Semiconductor = अर्धवाहक
२९) Remote = दुनि (दूरनियंत्रक)
३०) Periodic table = अणूक्रमणिका
३१) Talk time = बोलकाळ
३२) Firewall = जालभिंत
३३) Router = मार्गक
३४) Flash = तडीत
३५) Hardware = यंत्रणा
३६) Software = मंत्रणा
३७) File = धारिका
३८) Pixel = चित्रपेशी
३९) LCD = दसद(द्रव स्फटीक दर्शक)
४०) Charger = भारक
४१) चॅनेल = वाहिनी
४२) कॉम्प्लेक्स = क्लिष्ट
४३) कंटीन्यूअस = सतत की अविरत?
४४) कन्व्हिनियंट = सुलभ
४५) कन्व्हर्टर = रुपांत्रक
४६) डाटा = विदा
४७) डिजिटायझर = अंकक
४८) इलेक्ट्रॉन = विजक
४९) एक्स्टेंशन = विस्तार
५०) फॅसिलिटी = सुविधा
५१) इंडिकेटर = दर्शक
५२) इन्फॉर्मेशन = माहिती
५३) इन्स्ट्रुमेंट = उपकरण
५४) इंटरकनेक्ट = अनुबंध
५५) मल्टिप्लेक्सर = चयनक
५६) पोर्टेबल = जंगम
५७) रेंज = पल्ला
५८) रिअल टाईम = यथाकाल
५९) सेन्सर = संवेदक
६०) सिग्नल = संकेत
६१) स्केच = रेखाटन
६२) स्टोअरेज = साठवण
६३) स्विच = खटका
६४) सिस्टिम = प्रणाली
६५) टेप = फीत
६६) टेम्परेचर इंडिकेटर = तापदर्शक
६७) ट्रॅन्समिशन = पारेषण
६८) युजर = वापरदार

समीर वैद्य's picture

14 Jun 2018 - 11:48 am | समीर वैद्य

ला वापरकर्ता असा पर्याय जास्त चपखल वाटतो.

बाकी पर्याय उत्तम.

उपयोजक's picture

11 Jun 2018 - 12:07 pm | उपयोजक

मिपाकर नरेंद्र गोळे यांच्या आभासी उपकरणन भाग २ धाग्यामधून

लेखाचा आणि लेखकाच्या मतांचा आदर आहेच, पण भाषा हा विषय आला कि माझ्या मनात खाली दिलेले (विस्कळीत) विचार येतात.

ज्ञानेश्वरांनी लिहिलेली-बोललेली मराठी शिवाजी महाराजांपर्यंत वेगळी झाली असेल, टिळकांपर्यंत अजून वेगळी झाली असेल, पु लंपर्यंत अजून वेगळी झालीये, अजून पुढे कोण लेखक येतील ती अजून वेगळी होईल. आधी आपल्या कितीतरी शब्दावरती फारसी चा प्रभाव होता, आता हिंदी इंग्लिश चा असेल. भाषा हि फक्त विचारांच्या देवाण-घेवाणीचं साधन आहे, विचार कळाल्याशी मतलब, भाषा कुठली का असेना.

ज्ञानेश्वरांनी त्या काळातील शुद्धतेत कमी अशा प्राकृत भाषेत ग्रंथ लिहिला (व्याकरणाचे नियम पळाले का, आणि असतील तर कुठले? संस्कृत चे? ते माहित नाही ). थोडक्यात कदाचित त्या काली अशुद्ध गणल्या गेलेल्या भाषेत ग्रंथ लिहिला, आणि आपण ती भाषा शुद्ध करण्याचे प्रयत्न करतो हा मला कधी कधी विरोधाभास वाटतो. असं वाटतं कि ज्यांना भाषा शुद्ध हवीये त्यांनी संस्कृत मधून बोला. आणि ज्यांना बोली भाषा (जशी आहे तशी ), त्यांनी मराठीतून बोला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jun 2018 - 4:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकदम चपखल ! असेच काहीसे वाटत होते.

आपल्या आवडी निवडीची कोणी एक भाषाआवृत्ती प्रमाण मानून विचार करू लागलो की मात्र खूप प्रश्न आणि अस्मिता छळत राहतात.

तेराव्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी त्या काळच्या प्रमाण मराठीत असावी. आज ती वाचताना अनेक शब्दांमुळे सर्वसामान्यांची सोडा... भल्याभल्यांची तारांबळ होते. तसे पुढे येत येत दर शतकाच्या मराठीचा अभ्यास केला तर, मागची भाषा पुढल्याला जराशी तरी क्लिष्ट वाटेलच. इतकेच काय सतराव्या शतकातली शिवलालीन मराठीच नव्हे तर त्यानंतरचीही काव्य-अभंग-ओव्या इत्यादींनी समृद्ध असलेली मराठी, आपल्यापकी किती जण घडाघड वाचू आणि समजू शकतील ?

त्याचबरोबर, एकच भाषा, एकाच कालखंडात वापरल्या जाण्यार्‍या सगळ्या भूभागांवरही, पूर्णपणे समान कधीच नसते... म्हणूनच दर वीस किलोमीटरला भाषा बदलते असे म्हणतात. एकाच भाषेती शब्द आणि ती बोलण्याची लकबही दर ठिकाणी खूप वेगवेगळी असते. सत्तरीच्या काळात पुण्याच्या ससून सार्वजनिक रुग्णालयात खूप दूरून, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातून, बरेच रुग्ण येत असत (आता जागोजागी मोठी रुग्णालये झाल्याने ते प्रमाण खूप कमी झाले असावे). एक-दोन वर्षे बाह्यरुग्ण विभागाचा अनुभव झाल्यावर रुग्णाने तक्रार सांगायची सुरुवात केली की लगेच, "बाबा/मावशी, सातार/सांगली/कोल्लापूर... वरून आलासा म्हनावं का काय ?" असं त्यांच्याच लकबीत अभावितपणे म्हटलं जायचं... आणि ९० टक्के किंवा जास्त वेळा ते बरोबर असायचे.

गंमत म्हणजे, स्थानिक व्यापार-उद्योगधंदे-समाज यांच्यातील परिस्थितीप्रमाणे उचललेल्या परक्या शब्दांची निवड, स्थानिक भाषेमुळे त्या शब्दांत केलेले बदल आणि ते बोलण्याची लकब वेगवेगळी असते. यात तर भाषेचे सौंदर्य, श्रीमंती आणि मजा आहे, असे मला वाटते !

याशिवाय, एखादा शब्द किंवा तो वापरण्याची अथवा बोलण्याची पद्धत यांना बर-वाईट कोण ठरवणार ? बर्‍याचदा, भाषेमधील काही समान गोष्टींना स्थानिक समजूतींप्रमाणे बरे-वाईट, योग्य-अयोग्य समजले जाते. मराठीत हेल काढून बोलण्यास सर्वसाधारणपणे गावंढळ समजले जाते. या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर, "दक्षिण नॉर्वेमधील (आणि विशेषतः ओस्लो या त्यांच्या राजधानीतील) लोक हेल काढून नॉर्वेजियन भाषा बोलतात, ती कानाला कशी संगितासारखी (म्युझिकल) वाटते" हे उत्तर नॉर्वेतल्या लोकांच्या तोंडी ऐकले तेव्हा मी खुर्चीवरून पडता पडता वाचलो !

भाषा मानवी संपर्काचे असाधारण आणि अपरिहार्य साधन आहे. भाषेला "बनवण्याचे" काम (किंवा मक्ता) कोणत्याही एका किंवा अनेक समाजगटांकडे (किंबहुना समाजधुरीणांकडे) कधीच नव्हता... असू शकत नाही. शिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत, वरिष्ठ-कनिष्ठ, किंवा आणखी कोणत्याही गटाला याबाबतीत सर्वाधिकार नसतात. हे सगळे वैयक्तिकरित्या त्यांना शक्य तेवढ्या सोईने बोलता येईल, समजेल, समजावून देता येईल अशीच भाषा वापरत आले आहेत आणि वापरत राहतील... अगदी जगाच्या अंतापर्यंत. हीच केवळ एकुलती एक भाषा बनण्याची प्रक्रिया आहे.

तसेच, मानवी जीवन ही प्रवाही गोष्ट आहे. तीच गोष्ट प्रचलित परिस्थितीबद्दल (प्रिव्हेलिंग सर्कम्स्टॅन्सेस). या दोन्ही गोष्टी सतत बदलत असतात आणि त्यांचा एकमेकाशी सतत संवाद (इंटरअ‍ॅक्शन्स) होत असतो. हा संवाद शक्य आणि शक्य तेवढा सुरळीत करण्यामध्ये भाषेचा सिंहाचा वाटा असतो... अर्थातच माणूस आपली भाषा या संवादाला अनुरूप बदलत असतो, अगदी दिवसागणिक बदलत असतो... काळ-स्थळ-समोरचा माणूस पाहून बदलत असतो. काही कालानंतर त्यातले जास्तित जास्त सोईस्कर व सुखकर बदल अंगवळणी पडतात... म्हणजे काय ? भाषाबदलच ना ?! हे फरक हळुवार आणि सहजपणे होत असतात. ज्या समाजगटात ते फरक होत असतात त्यातल्या बहुसंख्यांची भाषाही तशीच बदलत असल्याने ते फरक झाले असे जाणवतही नाही. मात्र, आपले स्थान सोडून शंभर दोनशे किमी दूर जाऊन "आपलीच भाषा" बोलणार्‍यांशी संवाद साधू लागलो किंवा आपल्या शहर-गावाच्या पार्श्वभूमीवरील एखादे जुने पुस्तक/चलत्चित्रपट इत्यादी पाहू लागलो की भाषेतील फरक जाणवतो.

यात सगळ्यात फक्त एक गरजेची सवलत अशी की, एका भाषेच्या सर्व भाषीकांना एकमेकाशी सामाजिक-शास्त्रिय-प्रशासकिय* संवाद सहजपणे करण्याच्या सोयीसाठी एक प्रमाणभाषा आवृत्ती असणे निकडीचे असते. मात्र, ती आवृत्ती सर्वसामान्य जनतेला सहज वापरता येईल अशी असेल तरच तिला काही अर्थ असेल... क्लिष्ट आवृत्ती चेष्टेची धनी होऊन, जेथे अत्यावश्यक आहे तेथे नाईलाजाने वापरली जाऊन, इतरत्र दुर्लक्षित राहण्याचीच जास्त शक्यता आहे.

================

* : यामध्ये "कला" हा शब्द हेतुपुर्रसर टाळला आहे. कारण, समाजाभिमुख कलेत (विशेषतः लेखन, चित्रपट, इ) फक्त प्रमाणभाषा वापरणे म्हणजे वास्तवाशी फारकत घेणे होईल. कलेसाठी प्रमाणभाषा असू शकत नाही !

आमच्या आजोबांची पिढी लै हुशार. इंग्रजीला बेमालूमपणे मराठीत घोळवणारी. खाली धोतर आणि वर कोट घालणारी. जसा पेहराव तशीच भाषादेखिल. सार्वजनिक वाहतूक-व्यवस्था आली आणि त्याबरोबरीने Ticket हा शब्ददेखिल आला. पण त्याला मराठी पेहराव देत त्यांनी "तिकिट" बनवले आणि वापरलेदेखिल.

पण त्यांची पिढी गेली आणि नंतरच्या पिढ्यांना इंग्रजी शब्दांचे मराठीकरण करणे म्हणजे गांवढळपणा असे वाटू लागले. ती पिढी इंग्रजी शब्द जसाच्या तसा वापरू लागली. एवढेच नव्हे तर, जी मंडळी त्याचे देशीकरण करीत, त्यांना हंसू लागली.

आमची पिढीदेखिल आता तेच करते. पण कधीतरी मराठीची उबळ येते आणि मग आम्ही संस्कृतला वेठीला धरून एखादा अवजड-बोजड शब्द घडवायला बसतो.

आता हेच पहा - आमच्या आजोबांनी Ticket चे "तिकिट" केले नसते तर काय झाले असते?

आम्ही Ticket असाच उच्चार करीत राहिलो असतो. जे तिकिट/टिकट म्हणतात त्यांना हंसत राहिलो असतो. आणि वर त्याला "प्रवासपत्र" असे नाव सुचवीत राहिलो असतो!!

थोडक्यात काय तर आमच्या आजोबांच्या "तिकिटा"मुळे मराठीची "प्रवासपत्रा"तून सुटका झाली!

केवळ तिकिटच नव्हे तर, Cupboard (कपाट), Tumbler (टमरेल), Tinpot (टिनपाट), Gasoline (घासलेट) असे अनेक शब्द त्याकाळी मराठीत आणले गेले आणि मराठी अधिकाधिक संपन्न होत गेली.

अजूनही वेळ गेलेली नाही. देशीकरण झालेले अनेक शब्द अल्प-शिक्षित मंडळी वापरीत आहेत. त्यांना प्रमाण मराठीत जागा देता येईल आणि बोजड शब्दांपासून मराठीचे रक्षण करता येईल!

उपयोजक's picture

12 Jun 2018 - 10:04 am | उपयोजक

प्रतिसाद आवडला.आमचा हा क्रम ठरला आहे.

१) उच्चारायला सोपा+सुगम असा शब्द बनवता येतो का हे प्रयत्न करुन तर पाहूयात.
नाहीच जमलं तर

२) इंग्लिश शब्दाचे मराठीकरण करु.

आपल्याला शक्य असेल तर WhatsApp समुहात सामील व्हा.
:)

श्वेता२४'s picture

18 Jun 2018 - 4:22 pm | श्वेता२४

आपल्या प्रतिसादाशी 100 टक्के सहमत आहे. असेच शब्द निर्माण व्हायला हवेत.

राही's picture

12 Jun 2018 - 10:30 am | राही

जे सध्या बोलले जातेय आणि अशुद्ध मानले जातेय त्यातलेच कित्येक शब्द रूढ होतात आणि प्रमाण किंवा शुद्ध मानले जातात. सध्याच्या संस्कृतनिष्ठ मराठीला दख्खन पठाराच्या दगडधोंड्यांचा आणि मातीचा वास नाही. यादवकाळापर्यंत तो होता. ती मराठी आजही अस्सल वाटते. त्यात संस्कृत शब्दांचे सुंदर तद्भवीकरण आहे. इतकेच नव्हे तर अनेक कानडी शब्द मराठीचा साज लेऊन वावरतात आणि मराठीला समृद्ध करतात. आज शेजारच्या दक्षिण भारतीय भाषांशी मराठीचा संबंध तुटल्यात जमा आहे आणि विस्तीर्ण दख्खन पठारातल्या वेगवेगळ्या प्रदेशांत जी समरसता होती ती लोप पावली आहे. देशी शब्दांचे आदानप्रदानही थांबले आहे. कदाचित ळोकाग्रहास्तव झालेल्या भाषावार प्रांतरचनेचा हा एक साइड इफेक्ट असावा. सध्या हिंदी लादली जातेय हे खरे आहे. कोणत्याही सरकारी दस्तऐवज किंवा अर्जविनंतीसाठीच्या फॉर्मात पहिले वाक्य किचकट हिंदीत आणि नंतर त्याचे भाषांतर त्याहूनही किचकट मराठीत असते.
कारण घण आणि ऐरण घेऊन हे शब्द ' घडवलेले' असतात. अर्थात ही घडवणूकहीच सदहेतूनेच चालली आहे. सावरकरनिर्मित शब्दांप्रमाणेच यातले काही थोडे काळाच्या ओघात टिकतील, बाकी सारे वाहून जातील.
क्रमशः

राही's picture

12 Jun 2018 - 12:12 pm | राही

सुनील यांचा प्रतिसाद आवडला हे सांगण्यासाठी आणि त्यातले विचार पुढे नेण्यासाठी हा प्रतिसाद होता.

मराठी कथालेखक's picture

12 Jun 2018 - 5:17 pm | मराठी कथालेखक

चांगला उपक्रम आहे पण प्रत्येकच विशेषतः तांत्रिक शब्दाला मराठी शब्द शोधायला हवा अशी गरज वाटत नाही. वर दिलेले अंकक , भारक, तडीत असे शब्द काहीसे अनावश्यक व रुळण्यास कठीण वाटतात. मुळात ते अगदी प्रयत्नपुर्वक लक्षात ठेवावे लागतील.

निदान जे शब्द आधीपासूनच (पक्षी ऑलरेडी) मराठीत आहेत त्यांच्याकरिता इंग्लिश वा हिंदी शब्द वापरणे टाळले (म्हणजे अव्हॉइड) केले तरी खूप होईल. काही लोक म्हणतात की त्यांना इंग्लिशमध्ये स्वतःला एक्स्प्रेस करणं कन्व्हिनियंट वाटतं त्यांना मला म्हणावसं वाटतं की तुम्ही एकदा मराठीतून व्यक्त व्हा आणि अनुभवा किती सहज आणि सोयीचं आहे ते.

उपयोजक's picture

13 Jun 2018 - 12:54 pm | उपयोजक

या धाग्यावर आतापर्यंत आलेल्या प्रतिसादांमधून काही गैरसमज झालेत असं लक्षात आलंय.ते दूर व्हावेत यासाठी थोडसं.....

१) परभाषेतून आलेले झाडून सगळे शब्द बदलून त्या जागी मराठी शब्द पेरायचे नाहीयेत.ते शक्यही नाही.

२) ......येऊ देत आले तर परभाषेतून शब्द.काय होतंय त्याला?भाषा ही अशाच प्रकारे समृध्द होत असते,भाषा ही प्रवाही असते वगैरे वगैरे.....

तर अशा प्रकारे नको इतकी सहिष्णुता दाखवून मराठी भाषेत येतील तितके परके शब्द स्वीकारणे,परभाषेचं व्याकरण मराठीच्या व्याकरणावर आक्रमित होऊ देणं यामुळे मराठी कशी समृध्द होते हे काही समजलं नाही.यासंदर्भात याच धाग्यातल्या या छायाचित्रात सावरकरांनी काही दशकांपूर्वी सांगितलेलं पुरेसं ठरावं.

https://www.misalpav.com/comment/1000312#comment-1000312

३) मराठी कथालेखक यांचा हा प्रतिसाद

....वर दिलेले अंकक,भारक,तडीत असे शब्द काहीसे अनावश्यक व रुळण्यास कठीण वाटतात. मुळात ते अगदी प्रयत्नपुर्वक लक्षात ठेवावे लागतील.....

हे शब्द आपण सतत वापरत नाही म्हणून ते रुळण्यास कठीण वाटतात.हे वर दिलेले शब्द कठीण वाटत असतील तर शासनाने बनवलेले तंत्रविषयक पारिभाषिक कोश पहावेत.त्यामानाने हे खुप जास्त सोपे वाटतील.सतत वापरत गेलं की हे शब्दही आपलेसे वाटू लागतील.यासाठी थोडा विश्वास,संयम हवा.वापरासाठी नवीन असल्याने ते सुरुवातीला प्रयत्नपूर्वक लक्षात ठेवावे लागतील हे साहजिकच आहे.मिपावर लांबलचक शब्दांची अनेक लघुरुपे बनवून इथे सतत वापरल्यानेच आता सहज आठवतात ना?

४)भाषा हे केवळ विचारांचे आदानप्रदान सहज व्हावे म्हणून असेल तर मुकबधिरांसाठीची हातांनी दर्शवायची चिन्हांची भाषा(sign language)हीच जागतिक भाषा म्हणून करायला हवी.ती बोलीभाषांपेक्षा जास्त फायदेशीर ठरेल.अनेक भाषा शिकायला नकोत,परक्या शब्दांचं आक्रमण नको.बरेचसे प्रश्न निकालात निघतील.

५) मराठी भाषाविकासाबद्दलची अनिच्छा,निरुत्साह,पैसे मिळवून देण्याबाबत इंग्लिशची मराठीशी तुलना, इंग्लिशबद्दलचा अहंगंड या सगळ्यातून मराठीवर अन्याय होऊ नये असे वाटते.

पिशी अबोली's picture

13 Jun 2018 - 4:03 pm | पिशी अबोली

भाषा हे केवळ विचारांचे आदानप्रदान सहज व्हावे म्हणून असेल तर मुकबधिरांसाठीची हातांनी दर्शवायची चिन्हांची भाषा(sign language)हीच जागतिक भाषा म्हणून करायला हवी.

Sign language एकच एक असं काही नाही, त्याही वेगवेगळ्या असतात. ही यादी बघा.

https://en.m.wikipedia.org/wiki/List_of_sign_languages_by_number_of_nati...

बाकी चालू दे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jun 2018 - 4:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

४)भाषा हे केवळ विचारांचे आदानप्रदान सहज व्हावे म्हणून असेल तर मुकबधिरांसाठीची हातांनी दर्शवायची चिन्हांची भाषा(sign language)हीच जागतिक भाषा म्हणून करायला हवी.ती बोलीभाषांपेक्षा जास्त फायदेशीर ठरेल.अनेक भाषा शिकायला नकोत,परक्या शब्दांचं आक्रमण नको.बरेचसे प्रश्न निकालात निघतील.

असहमत. sign language तुलनेने क्लिष्ट आणि सर्व विषयांवर बारकाव्यांनी संवाद साधण्यास अत्यंत तोकडी आहे. जर ती सोपी आणि शिवाय परिपूर्ण संवाद साधण्यास योग्य असती तर ती केव्हाच लोकप्रिय झाली असती ! किंबहुना, संवाद साधण्याची प्रक्रिया मूलभूत आवाज आणि खाणाखूणा यानीच झाली. वाढणारा संवाद साधण्यासाथी ती साधने तोकडी पडत असल्याने आणि त्याबरोबरच मानवी ध्वनियंत्राचा विकास झाल्याने, विशिष्ट आवाजांना शब्दरूप देत देत भाषा निर्माण झाल्या... खरे तर ते आवाज म्हणजे ठराविक अर्थ दर्शविणार्‍या ध्वनीखुणाच आहेत, नाही का ?! त्यापुढे, विकसित मानवी मेंदूने, विकसित ध्वनियंत्र वापरून त्याचे सोने केले !

जे शब्द, व्याकरण आणि भाषा आपल्याला चांगले "फायदा-व्यय* गुणोत्तर (बेनेफिट-कॉस्ट रेशो)" मिळवून देतात असे वाटते तेच सहज प्रचारात येतात लोकप्रिय होतात... या बाबतीत लहान-मोठे, शिक्षित-अशिक्षित, इत्यादी सर्व मानवी गटांची वागणूक समान असते. तश्या फायद्याची पर्वा न करणारा केवळ एखादा एकांडा शिलेदार अपवाद असू शकतो... आणि बर्‍याचदा इतरांच्या तो चेष्टेचा विषय झालेला असतो.

===========

* या बाबतीत फायदा-व्यय गुणोत्तरामधला फायदा हा केवळ आर्थिकच अस्तो असे नाही... समवयीन आणि/अथवा समविचारी आणि/अथवा सहकर्मी (यांना एकत्रितपणे 'पियर्स' असे म्हणता येईल), आणि ज्यांच्याशी आपला कोणत्याही इतर कारणाने संवाद होत असतो ते लोक; इत्यादींशी सहज संवाद साधण्यासाठी होणारी वेळ व श्रमांची बचतही या गुणोत्तरात सामील असते. याशिवाय, पियर्समध्ये खास (भावनिक जवळीकीचे, वरचढपणाचे, इ) स्थान निर्माण करणारा एखादा शब्द, शब्दप्रयोग अथवा भाषा लकब सहजपणे (किंबहुना) अभिमानाने अंगवळणी पडतात... यातला फायदा म्हणजे सामाजिक महत्वामध्ये होणारी वाढ. या फायद्यामुळेच, विशिष्ट वय-विचार-काम या पायावर तयार होणार्‍या गटांची एक खास परिभाषा (लिंगो) बनते... आणि त्या गटात सामील झालेल्या प्रत्येकाला तिचा योग्य वापर माहित असणे आवश्यक बनते.

उपयोजक's picture

13 Jun 2018 - 2:33 pm | उपयोजक

*मुंबई खरंच महाराष्ट्राची राहिली आहे का?*

*मराठी भाषे सोबतच आज मराठी माणूसही संपत आला आहे.*

काल माझ्या मुलाच्या आयसीएसई बोर्डाच्या शाळेत सर्व इयत्तांसाठी orientation दिवस म्हणजेच शाळेची तोंड ओळख होती. इतके वर्ष नोकरी निमित्ताने मी कधीच हजर राहू शकले नाही पण काल आवर्जून उपस्थिती दर्शविली कारण होते की आता मुलगा मोठ्या इयत्तांमध्ये इयत्ता तिसरी मध्ये जाऊ लागला आहे तर आता आपल्याला जवळून शाळेविषयी सर्व कळायला हवे.
यामध्ये मुख्याध्यापिका बाईंनी शालेय वर्षात शिकविल्या जाणाऱ्या भाषणविषयी माहिती देताना असे सांगितले की इंग्रजी ही प्रथम भाषा म्हणून शिकवली जाणार, हिंदी ही द्वितीय भाषा म्हणून या दोन्ही भाषांचे वर्ग रोज भरवले जाणार आणि मराठी ही तृतीय भाषा म्हणून शिकवली जाणार असल्याने मराठीचा वर्ग फक्त आठवड्यातून एकदाच भरवला जाईल.
मराठी मन एकदम आतून ढवळून निघालं. सर्वात शेवटी प्रश्नोत्तरे असणार होते म्हणून मी उशीर होत असतानाही थांबले आणि मुख्याध्यापिका बाईंना प्रश्न केला की इंग्रजी माध्यम शाळा आहे म्हणून इंग्रजी ही प्रथम भाषा म्हणून मान्य आहे, पण आपण महाराष्ट्रात असताना जर मराठी ही राज्यभाषा आहे तर शासनाच्या नियमाप्रमाणे आपण मराठी ही द्वितीय भाषा म्हणून शिकवायला हवी आणि इतर कुठल्याही भाषेला तुम्ही तृतीय भाषेचा दर्जा द्यावा.
तेवढ्यात बाईंकडून माईक चा ताबा घेत शाळेचे अमराठी भाषिक ट्रस्टी मला समजावू लागले की मुंबई आता खूप व्याप्त झाली आहे आणि इथे सर्व मिश्र भाषिक राहतात म्हणून हिंदी द्वितीय स्थानी शिकवली जाते. त्यावर मी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमांबाबत व २००९ साली प्रकाशित झालेल्या परिपत्रक विषयी आठवण करून दिली असता ते म्हणाले की आम्ही सर काही नियमाप्रमाणे करत आहोत आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे सर्व होत राहणार, आणि जर तरी तुमचा विरोध असेल तर तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे.
मनातील सर्व राग गिळून मी त्यांचे धन्यवाद मानले आणि हे ही ठणकावले की मला माझे सर्व मार्ग, प्राधान्यक्रम आणि गरजा या सर्व चांगल्याच माहीत आहेत आणि मी त्या कटाक्षाने पाळते आणि पुढेही पाळत राहील. हे प्रतिउत्तर ऐकल्यानंतर त्यांनाही खूप राग आला आणि त्यांनी तिथेच सर्व कार्यक्रम संपवला. बाहेर येऊन मी पुन्हा त्यांची भेट घेतली आणि त्यांना गोड शब्दात पुन्हा एकदा सांगितलं की आपली शाळा अजून नवीन आहे आणि कायद्यात राहिलो तर आपल्याला योग्य प्रकारे शासनाचे प्रमाणपत्र मिळेल त्यावर फक्त मला ते परिपत्रक पाठवा मी बघतो इतके बोलुन त्यांनी माझा निरोप घेतला.
यावर मी अमाच्या शाळेच्या इयत्ता ३री च्या व्हॉट्स ऍप ग्रुप वर भावना व्यक्त केल्या की ट्रस्टी ने तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे असे शब्द वापरायला नको हवे होते त्यांचा पालकांशी बोलण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे.
यावर काही अमराठी भाषिक सहजगत्या विरोध करत व्यक्त होत राहिले. आधी ते गोड शब्दात विरोध करत होते व नंतर जेव्हा मी त्यांना सांगितलं की मराठी भाषेला द्वितीय भाषेचे स्थान मिळवून देणं माझा मला लोकशाहीमध्ये संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि मी त्याचेच पालन करत शाळेची व सरकारशी जमेल तसे संवाद साधून प्रयत्न करत राहणार.

यावर मला सर्व विविध प्रांतातून आलेले अमराठी भाषिक एकत्र येऊन खूप काही बोलू लागले. कुणी म्हणालं तुम्हाला जर इतकचं तुमच्या पाल्याला मराठी भाषा शिकवायची असेल तर तुम्ही त्याला जास्तीच्या शिकवणीला टाका मराठी शिकवण्यासाठी. मी ही त्यांना तसाच बोलले की तुम्हाला मराठी इतकीच कठीण वाटते आणि शाळांनी ती अभ्यासक्रमात सामावून घेतली तर आमच्या पाल्यांचे कसे होईल अशी भीती असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना त्या वेळी जास्तीची शिकवणी लावून मराठी शिकवा आणि त्यांना पारंगत करा. त्यावर ते सर्व आणखी तोषाने मला बोलू लागले. मग मी ही म्हणाले की तुम्ही महाराष्ट्राचे पाहुणे आहात तर तुम्ही आमच्यावर अशी का जबरदस्ती करता? ज्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे त्या आमच्याकडून का अपेक्षा करता? तर त्यांना पाहुणे म्हणाले म्हणून अती जास्त राग आला.

एकीने तर कहरच केला. त्या बाई म्हणे की मुंबईत पंजाबी सिंधी आणि गुजराती लोक जास्त राहतात तर मग आम्ही पण शासनाकडे हट्ट धरायचा का की आमची मातृभाषा द्वितीय भाषा म्हणून शिकवली जावी? तेव्हा त्यांना मला कान उघाडणी करावी लागली की बाई तुमच्या मताचा आदर आहे पण एक लक्षात ठेवा मुंबई महाराष्ट्रात येते आणि महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे जी महाराष्ट्राची राज्यभाषा असेल तिलाच वरचे स्थान प्राप्त व्हावे ही माफक अपेक्षा असणं काही गुन्हा नाही तर अमाचा मूलभूत हक्क आहे.

त्यात भरीत भर एक बाई म्हणे हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि आपण तिचा आदर करायला हवा. अहो पण कोण अनादर करत आहे हिंदीचा? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठलाही कागदोपत्री पुरावा नाही की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे म्हणून. हा फक्त काही लोकांचा भ्रम आहे. पण ऐकेल तो खरा.

मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला की आमची गरज नाही तर तुम्ही तुमची वैयक्तिक गरज पाहून मुंबईमध्ये स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे तुम्ही नवीन ठिकाणी आलेल्या संस्कृतीला व तेथील लोकांना मान देवून आणि त्यांचा आदर ठेवून वागले पाहिजे जसा आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही जर स्वतः ला आमच्यासोबत सामावून घेण्याचा प्रयत्न करतच नाहीत तर तुम्ही आमच्यापैकी एक कसे? तुम्ही तर आमच्यासाठी काही काळासाठी आलेले पाहुणे आहात ना?

पण हे इतक्यावरच थांबले नाही. ग्रुप अडमीन यांना मान देवून मी माझे भाष्य कधीच थांबवले होते पण तरीही त्यावर प्रतिक्रिया येतच होत्या. सारखी विचारणा होत होती की आमच्याच देशात आम्ही पाहुणे कसे वगैरे वगैरे. मी त्यांना उदाहरणादाखल हे ही सांगितलं की जर उद्या तुम्ही दुबई, युरोप अथवा आफ्रिकेत गेलात की तुम्ही तिथेही हिंदीची जबरदस्ती कराल की अनुक्रमे उर्दू, फ्रेंच आणि स्पॅनिश भाषा शिकून तुमचं दैनंदिन जीवन जगाल?

पण कुणीही ऐकायला तयार नाही. सरतेशेवटी मी सर्वात शेवटचा संवाद टाकला की मराठी माणसाचं दुर्दैव इतकं मोठं आहे की या ग्रुप मध्ये जवळपास ३०-४०% मराठी भाषिक असूनही कालपासून कुणीच काहीच बोलत नव्हत आणि १-२ जन चक्क विरोधात बोलत होते. यातूनच कळत की आपल्यावर ही वेळ का आली आहे आणि ती म्हण पण अगदी खरी आहे की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो आणि हे एक कटु सत्य आहे. इतकं बोलुन मी अडमिन बाईंना वचन दिलं की यापुढे कसल्याही प्रतिक्रिया आल्या तरी मी त्यावर तुमचा मान राखून काही भाष्य करणार नाही.

त्यावर एका मराठी भाषिक महोदयांनी फक्त इतकचं लिहिलं की मला वाटतं हा ग्रुप अशा सर्व चर्चांसाठी नाही आणि तो फक्त शाळेविषयी आणि मुलांच्या शाळेतील असणाऱ्या गराजांविषयी चारचांपुरताच मर्यादित रहावा. अरे दादा पण मी पण तर शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या चुकीच्या गोष्टींबद्दल बोलत होते हे त्याच्या लक्षातच येईना त्याला कोण काय करील? फक्त एक गुजराती मैत्रीण जी पूर्णपणे महाराष्ट्रातील भाग आहे आणि छान मराठी बोलते तिने माझी बाजू सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत घेतली तिचं कौतुक तर आहेच पण मराठी भाषिकांची इतक्या संवेदनशील विषयांना हाताळण्याची पद्धत पाहून खंत ही वाटली.

यानंतरही माझ्यावर टीका होत गेल्या आणि एक एक करून आत्तापर्यंत जवळ जवळ ८ अमराठी भाषिक व्यक्तींनी तो ग्रुप सोडला.

माझ्यासाठी खरंच एक मोठं आश्चर्य आहे की बाहेरून कैक प्रांतातून आलेले लोक जर आज मराठी विरोधात एकत्र येऊ शकतात तर आपण महाराष्ट्रातील लोक का आणि कुणाला घाबरतो आहोत? हे लोक चक्क असं विधान करतात की असंही आता मुंबईत पंजाबी, गुजराती आणि सिंधी जास्त आहेत तर त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्या अरे मग ही मराठी माणसं नक्की कुठे जात आहेत? ते आहेत इथेच आहेत पण आज सर्व जण मूग गिळून गप्प बसले आहेत असं म्हणायला हरकत नाही.

मी इतरांना नाही तर मला स्वतः ला ही तितकंच दोषी मानते आहे.

आता फक्त एकच विनंती आहे की वेळ गेलेली नाही जागे व्हा, संघटित व्हा आणि महाराष्ट्रातील सर्व माध्यमांमध्ये सर्व शाळांमध्ये राज्य शासनाने जाहीर केलेल्या परिपत्रकात लिहिल्याप्रमाणे योग्य ते स्थान देऊया.

*तेजस्वी कलढोणे-घाटे*

मराठी_माणूस's picture

13 Jun 2018 - 2:43 pm | मराठी_माणूस

तुमच्या चिकाटीचे कौतुक आणि अभिनंदन.

या ग्रुप मध्ये जवळपास ३०-४०% मराठी भाषिक असूनही कालपासून कुणीच काहीच बोलत नव्हत

हेच आपल्या समस्येचे मुळ आहे.

उपयोजक's picture

13 Jun 2018 - 5:37 pm | उपयोजक

कारण काय या समस्येमागचं?इंग्लिश भाषा जेवढा पैसा मिळवून देते तेवढा पैसा मराठी देत नाही हे असेल का?

मराठी_माणूस's picture

14 Jun 2018 - 12:52 pm | मराठी_माणूस

इंग्लिश भाषेच उत्पनांच्या दृष्टीने असलेले महत्व हे मराठी भाषा आणि इतर भारतीय भाषा च्या तुलनेत सारखेच आहे.

तुमच्या अनुभावात मात्र, आपण आपल्या भाषेकडे कसे पहातो ही समस्या उठुन दिसते.

जे विविध प्रांतातून आलेले अमराठी भाषिक तुमच्याशी वाद घालत होते , त्यांना तुम्ही जर एक प्रश्न विचारला असता की जर असा निर्णय त्यांच्या राज्यातल्या एखाद्या शाळेने घेतला असता (त्यांची राज्य भाषा डवलुन हिंदी ला अग्रक्रम देणे) तर त्यांना ते मान्य झाले असते का ? जे उत्तर तुम्हाला मिळाले असते ते उत्तर जर तुम्ही तुमच्या ग्रुप मधल्या मराठी भाषीकांच्या उत्तराशी पडताळुन पाहीले की लगेच फरक लक्षात येईल.

उपयोजक's picture

14 Jun 2018 - 2:52 pm | उपयोजक

....इंग्लिश भाषेच उत्पनांच्या दृष्टीने असलेले महत्व हे मराठी भाषा आणि इतर भारतीय भाषा च्या तुलनेत सारखेच आहे.....

ते कसं काय?इंग्लिश आंतरराष्ट्रीय भाषा आहे.

शिवाय वरील अनुभव माझा नाही.अग्रेषित म्हणजे फॉरवर्ड असं लिहिलंय की!

मराठी_माणूस's picture

14 Jun 2018 - 3:28 pm | मराठी_माणूस

मला असे म्हणायचे आहे की "इंग्लिश भाषा जेवढा पैसा मिळवून देते तेवढा पैसा मराठी देत नाही हे असेल का?"
इथे "मराठी" च्या ऐवजी इतर कोणतीही भारतीय भाषा टाकली तरी चालेल.

प्रतिसादाचा काही भाग हा फॉरवर्ड मधल्या अनुभवा संबधी आहे. रोख तुमच्या कडे नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Jun 2018 - 4:04 pm | ज्ञानोबाचे पैजार


शिवाय वरील अनुभव माझा नाही.अग्रेषित म्हणजे फॉरवर्ड असं लिहिलंय की!

शिंपल मराठीत लिवायच ना "फॉरवर्ड मेसेज" म्हणून आम्ही उगा दोन दीस डोक लावत बसलो "अग्रेषित" वर.

आम्हाला वाटल हा कोन नवा प्रेषित आला की काय?

पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jun 2018 - 4:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

खी खी खी...

https://www.misalpav.com/comment/1000667#comment-1000667

या प्रतिसादातल्या, ठळक केलेल्या मजकूराचे उत्तम उदाहरण, इथे इतक्या लवकर मिळेल असे वाटले नव्हते ! =))

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Jun 2018 - 4:44 pm | ज्ञानोबाचे पैजार

ओ म्हात्रे सर आमच्या धनुष्यातुन तुम्ही तुमचे बाण मारु नका.

एका विषिष्ठ, उदात्त, विशुध्द, प्रामाणिक सोज्वळ आणि निर्मळ मनाने दिलेला तो प्रतिसाद होता.

कोणालाही कोणत्याही प्रकारे दुखावण्याचा आमचा हेतु नव्हता.

पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jun 2018 - 4:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

दिसले ते सांगितले... फक्त, (काहीसे आश्चर्य वाटून केलेले) स्टेटमेंट ऑफ फॅक्ट आहे हो ते ! :)

तुमच्या विषिष्ठ, उदात्त, विशुध्द, प्रामाणिक सोज्वळ आणि निर्मळ मनाबद्दल आमच्या मनात काडीचीही शंका-आशंका नाही.

आमच्या मनात काडीचीही शंका-आशंका नाही

डाऊट नाय म्हणा की राव. की तुमीपण अस्मितावादी हायसा?

अस्मिता म्हणजे लै वंगाळ नशा बगा. आरडीएक्स जनू. ९९% तुडवातुडवीचं कारण. बोले तो रूट कॉज.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jun 2018 - 3:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

सरकारी नियमांचे उल्लंघन होत असल्यास व तुम्ही केला आहे तसा प्रयत्न करूनही शाळेचे प्रशासन सुधारत नसेल तर, महाराष्ट्र शासनाच्या योग्य त्या सरकारी खात्यात त्याबद्दल तक्रार करणे योग्य होईल.

सप्तरंगी's picture

14 Jun 2018 - 6:40 pm | सप्तरंगी

वर ते सर्व आणखी तोषाने मला बोलू लागले.

मराठीसाठी त्या इतक्या पोटतिडकीने लिहित आहेत, पण तोष आणि त्वेष यातील फरक त्यांच्या लक्षात आलेला दिसत नाही, मराठी त्यांचीपण तृतीय भाषाच होती का :))

मराठी कथालेखक's picture

15 Jun 2018 - 7:32 pm | मराठी कथालेखक

एक एक करून आत्तापर्यंत जवळ जवळ ८ अमराठी भाषिक व्यक्तींनी तो ग्रुप सोडला.

भारीच की ...

बाकी वाद-विवाद करण्यापेक्षा बाईंनी कायदेशीर प्रक्रियेलाच हात घालायला हवा असे मला वाटते.

उपयोजक's picture

15 Jun 2018 - 8:37 pm | उपयोजक

३.५० ते ४.३८ पर्यंत इरावती हर्षेंचं मराठी ऐका.

https://youtu.be/z0Gc91HZohY

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jun 2018 - 9:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

परफेक्ट आहे की हो, तुम्हाला काय डाऊट आला बरं ?!

उपयोजक's picture

16 Jun 2018 - 9:02 am | उपयोजक

चार अोळी मराठीत बोलताना इतके इंग्रजी शब्द वापरलेत हे पाहून धन्य झालो.

मराठी_माणूस's picture

16 Jun 2018 - 12:13 pm | मराठी_माणूस

अगदी अगदी

एक ठीकाणी ती असे म्हणते "there is उत्सुकता आहे मला" खरेच धन्य आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jun 2018 - 12:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

(हर्षे मॅडमच्या मराठीबद्दल केलेला) उपरोध हुकला ! ;) :)

हुप्प्या's picture

18 Jun 2018 - 6:28 am | हुप्प्या

मराठी बोलताना इंग्रजीच्या कुबड्या घेऊन बोलणे खरेतर लाजिरवाणे वाटले पाहिजे पण तो एक कौतुकाचा, आदराचा विषय बनतो. बोलताना अतिरेकी इंग्रजी शब्दांचा वापर म्हणजे सदर व्यक्ती उच्चभ्रू, उच्चशिक्षित, समाजाच्या अभिजन वर्गातली आहे ह्यावर शिक्कामोर्तब असे अत्यंत विकृत समीकरण बनलेले आहे.
खरे तर अशा व्यक्तीचे मराठीही चांगले नाही आणि इंग्रजीही अशी मला तरी शंका येते.
आचार्य अत्रे हे अनेक वर्षे शिक्षणाकरता इंग्लंडला होते. ते परत आल्यावर त्यांना मराठीत एक भाषण करायचे होते. त्याची त्यांनी चांगली तयारी होती. पण त्यातील मुख्य भर हा आपल्या बोलण्यात इंग्रजी शब्द असता कामा नये ह्यावर होता. आपण इंग्लंडमधे राहिलो असल्यामुळे ह्या बाबीकडे त्यांचा कटाक्ष होता.
(अंगावर इंग्रजी सूटबूट धारण करण्यात त्यांना फार चुकीचे वाटत नव्हते. पण आपल्या मराठी भाषेला अशा प्रकारे सूटबूट चढवणे हे साफ नामंजूर होते.) अर्थात तो जुना काळ होता. आज असे झाले तर उलट प्रकार होईल. जास्तीत जास्त परदेशी इंग्रजी शब्द, इंग्लंड वा अमेरिकी पद्धतीने उच्चारण्याची अहमहिका सुरू होईल ह्यात शंकाच नाही.
मला वाटते की भाषेत काय बदल व्हावेत ह्याबद्दल एक निरोगी संघर्ष कायम चालू असला पाहिजे. नव्या शब्दांची आयात वा जुन्या शब्दांचे पुनरुज्जीवन वा मराठीतच नवे शब्द जन्माला घालणे ह्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. समाज काय स्वीकारतो ह्यावर भाषा कशी बदलते ते अवलंबून आहे. ज्यांना मराठीचा अभिमान आहे (गर्व नाही!) त्यांनी आपापल्या परीने नवे चांगले मराठी शब्द नव्या शब्दांच्या आयातीला पर्याय म्हणून सुचवले पाहिजेत. नाहीतर मराठी भाषा नष्ट होईल.

उपयोजक's picture

18 Jun 2018 - 8:08 am | उपयोजक

१. गोरीला ग्लास - माकडकाच
२. हार्डडिस्क - हार्दीक(थेट अपभ्रंश :))
३. OTG केबल - अोतार(OT+तार)
४. डेटा केबल - वितार (विदा+तार)
५. सेट टॉप बॉक्स - साधपेटी
६. रिचार्ज - पुभार(पुनर्भार)
७. सिमकार्ड - मामापत्र(मालकाची माहिती भरलेले पत्रक)
८. डेटा केबल = विदावती
९. गोरीला ग्लास = माकडकाच
१०. ३.५ mm जॅक = रवटेकू
११. सिम स्लॉट = सरखळी
१२. Cathode ray tube = (ऋकिन/रुकिन) ~ ऋण किरण नलिका
१३. सोल्डरींग = लयघट्ट

मराठी कथालेखक's picture

18 Jun 2018 - 7:59 pm | मराठी कथालेखक

४. डेटा केबल - वितार (विदा+तार)
८. डेटा केबल = विदावती

यामुळेच गडबड होते.. एकाच गोष्टीसाठी तुम्ही दोन शब्द दिले.. झालंच तर तुम्हीच दिलेले शब्द का प्रमाण मानायचे असंही इतर जण म्हणू शकतात. मग इंग्लिशमध्ये जसा Oxford चा शब्दकोश बहुतांशी प्रमाण मानला जातो तसा मराठीचा एक शब्दकोष असायला हवा.

उपयोजक's picture

19 Jun 2018 - 12:53 am | उपयोजक

लक्षात आलं. खरंतर अोतार हा एकच शब्द द्यायचा होता.समुहात चर्चेदरम्यान घेतलेला होता विदावती.त्यामुळे तो ही आला.क्षमस्व!

उपयोजक's picture

19 Jun 2018 - 1:07 am | उपयोजक

आमचेच शब्द प्रमाण मानावेत असा मुळीच आग्रह नाही.इतरांनीही सुचवावेत.त्यावर चर्चा होऊन सर्वांतून एकच शब्द अंतिमत: निश्चित करुन तोच पुढे जायला हरकत नाही.
पण याहून महत्त्वाचं म्हणजे एखादा नवीन शब्द तयार होऊन तो सातत्यानं वापरात येणं.मी वर शब्द सुचवताना कोणते निकष असावेत ते सुचवलं आहेच.ते पटण्यास हरकत नसावी. अर्धशिक्षित,अशिक्षित किंवा खेड्यातल्या लोकांना हे शब्द सहज म्हणता यावेत हा उद्देश आहे. कारण शहरी लोकांपेक्षा हेच लोक मराठी भाषा टिकवायला तुलनेने अधिक मदत करतात. त्यांना डावलून हा उपक्रम यशस्वी होऊच शकत नाही.

नवीन शब्द
* उच्चारायला सोपा असावा.
* जास्तीतजास्त ४ किंवा ५ अक्षरे असावीत.
* एकच अखंड शब्द असावा.शब्दांचे दोन गट नकोत.

१. पेनड्राईव्ह
२. बॅककव्हर
३. स्मार्ट टिव्ही
४. इलेक्ट्रिक स्क्रू ड्रायव्हर
५. Printed circuit board(PCB)
६. Monitor
७. Card reader
८. हेडफोन्स
९. हेल्मेट
१०. USB

कुमार१'s picture

18 Jun 2018 - 11:40 am | कुमार१

Monitor ला दृश्यदर्शक ?

श्वेता२४'s picture

18 Jun 2018 - 4:44 pm | श्वेता२४

Otg cable - ओतार
तशी
Data Cable - डीतार / डातार/दातार/देतार
पेनड्राईव्ह - पांडाव /पनडाव/पेंडाव
USB - असबी

मला कदाचित जमत नसेल परंतु मराठीकरण करताना मराठी उच्चार हा इंग्रजी शब्दाच्या जवळ जाणारा असावा भले त्याला मरीठीत काही अर्थ नसला तरी चालेल असे वाटते. इतर सदस्यांना काय वाटते?

पेनड्राईव्ह - पांडाव /पनडाव/पेंडाव

'पांण्डू हवालदार', पण हरकत नाही :) , (हवालदार मंडळींनी हे फायली सांभाळण्याचे काम ह. घ्यावे)

श्वेता२४'s picture

19 Jun 2018 - 2:07 pm | श्वेता२४

कारण धागा कर्त्याने 4 अक्षरी शब्द सुचवावयास सांगितला आहे.

चांगला प्रयत्न. शक्य सगळं आहे. फार पुर्वी आकाशवाणीवर क्रीकेटचं धावतं समालोचन ऐकायचो. त्यानंतर टीवीवरचे हींदी समालोचनही ऐकले आणि त्यानंतर असं वाटलं की क्रीकेट्चे जास्तीत जास्त शब्द भाषांतरीत झाले असतील तर ते फक्त मराठीतच.
रन - धावा, स्टंप - यष्टी,धावचित, यष्टीचीत, गोलंदाज, फलंदाज, अजून बरेच... आजच्या पीढीला जर खेळपट्टी, सीमारेषा असे शब्द ऐकवले तर बघत बसेल.
विषेश म्हणजे हे शब्द अगदी चपखल बसले, कोणाला ते कठीण वाटले नाहीत की कोणी आक्षेप घेतला नाही की नाके मुरडली नाहीत. अशा प्रकारचं भाषांतर झालं तर कधीही स्वागतार्हच असेल...

धागा वाचून यष्टिचित झालो.

रंगीला रतन's picture

20 Jun 2018 - 12:25 am | रंगीला रतन

मी त्रिफळाचित झालो.

उपयोजक's picture

19 Jun 2018 - 9:17 am | उपयोजक

१. इलेक्ट्रिक स्क्रू ड्रायव्हर = विमचा ~ विद्युत मळसूत्र चालक

२. हँड स्क्रू ड्रायव्हर = हामचा ~ हाताने वापरायचा मळसूत्र चालक

३. Printed Circuit Board(pcb) = छापटी ~ छापील परिपथ पट्टी

४. Monitor = चित्रक ~ चित्र दाखवणारा

५. USB = जुतार ~ अन्य साधनांची संगणकाशी जुळवणी करायला मदत करणारी तार

मराठी कथालेखक's picture

19 Jun 2018 - 3:04 pm | मराठी कथालेखक

हार्दिक , ओतार , विदार वगैरे नवीन शब्द रुढ करणे ही नंतरची पायरी असावी असे मला वाटते.
टू स्टार्ट विथ ज्या इंग्लिश शब्दांना मराठीत ऑलरेडी शब्द आहे निदान ते तरी रुटीन कॉनव्हर्सेशनमध्ये रेग्युलरली युज करुयात..व्हाट यू से ?
ओह.. माफ करा.
असो. असो , मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळालंच असेल तर आता आपण या उपक्रमाला सुरुवात करुयात का ? मिपावरील इतर धाग्यांवरही मूळ लेख , प्रतिसाद यांत विनाकारण आलेल्या इंग्लिश शब्दांना जमेल तशी'भाषादुरुस्ती" सुचवूयात. काय म्हणणे आहे ?
इंग्लिश शब्दांप्रमाणेच 'लोक्स' , वीकांत अशा शब्दही टाळता येतील का ? वीकांत ऐवजी साप्ताहिक सूटी/सूट्या हा आधीच प्रचलित असलेला शब्दप्रयोग करता येईल. लोक्सची तर अजिबातच गरज नाही.

माहितगार's picture

19 Jun 2018 - 3:13 pm | माहितगार

एडव्हान्स सूचना आम्ही नूतन शब्द निर्मिती प्रेमी पाठीराखे आणि कट्टर मराठी प्रेमी असलो तरीही ज्या धागा / प्रतिसादम्मध्ये / व्यनि / खरडीतून आम्ही स्वतःहून पृच्छा केलेली नाही तो पर्यंत सूचवण्या देऊ नयेत फाट्यावर मारल्या जातील .

मराठी कथालेखक's picture

19 Jun 2018 - 3:41 pm | मराठी कथालेखक

ज्या धागा / प्रतिसादम्मध्ये / व्यनि / खरडीतून आम्ही स्वतःहून पृच्छा केलेली नाही तो पर्यंत सूचवण्या देऊ नयेत फाट्यावर मारल्या जातील

मग मराठी प्रेम आणि मराठीचा आग्रह या (किंवा अशा) एकाच धाग्यापुरता मर्यादित ठेवायचा आहे का ?

माहितगार's picture

19 Jun 2018 - 4:02 pm | माहितगार

दीर्घ उत्तराचा विषय आहे, ते काळाच्या ओघात वेगळ्या धागा लेखाच्या माध्यमातून मांडेन. तुर्तास थोडक्यात, मी सोशल अ‍ॅडव्होकसीचा पक्षधर नाही सोशल मार्केटींगचा पक्षधर आहे. मलाही नकळत नवे शब्द माझ्या वापरात कुणी आणू शकत असेल तर माझी ना नाही, वस्तुतः त्यालाच नैसर्गीक रुळणे म्हणवले जाऊ शकेल -त्यासाठी डोक्यात न जाणारे मार्केटींग जमावयास हवे. ( या विषयात कृत्रिमतेचे अपयश -विशेषतः कृत्रिम आग्रहाचे अपयश- नवे नाही हे वे.सा.न.ल.)

मराठी कथालेखक's picture

19 Jun 2018 - 5:15 pm | मराठी कथालेखक

मला वाटतं मिसळपावसारख्या संस्थळावर अशा प्रकारची सूचना (ज्याला तुम्ही कृत्रीम आग्रह म्हणत आहात) केली गेली तर ती अस्थानी वाटू नये. झालंच तर अशा मैत्रीपुर्ण सूचने वा आग्रहाशिवाय चांगले बदल सहसा लवकर घडून येत नाहीत (याउलट वाईट/विचित्र गोष्टी सहसा लवकर ,सहज आणि कोणत्याही जाहिरातबाजीशिवाय पसरतात. उदा: 'लोक्स', 'वीकांत' )
आणि एखाद्या अगंतुक सूचनेला किती गांभीर्याने घ्यायचे (अथवा साफ दुर्लक्ष करायचे) ह्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहेच.

माहितगार's picture

19 Jun 2018 - 6:00 pm | माहितगार

मत ज्याचे त्याचे, पण व्यक्तीशः न विचारता केलेले आग्रह बहुतांश वेळेस अस्थानी आणि अस्विकार्ह वाटत आले आहेत. नंतरचे गैरसमज नको म्हणूनच मी माझ्यापुरती भुमिका आधीच स्पश्ट ठेवत आलो आहे.

पर्यायी मराठी शब्द शोधण्यासाठी माझ्या कडे ऑनलाईन डिक्शनरींची मोठी यादी आहे त्यातील सुयोग्य शब्दकोश मी बर्‍यापैकी सातत्याने वापरत असतो. आणि तरीही नैसर्गिकपणे अध्ये मध्ये येणारे परभाषिय शब्द थांबवत नाही. भाषा ही प्रवाही असते, अमुक एवढ्या वापरानंतर एखादा शब्द मराठी झाला किंवा मराठीत रुळला याचे नेमके गणित भाषाशास्त्री देताना दिसत नाहीत कारण तसे शक्यही नसते. प्रमाण भाषेची व्याख्या संकुचित आणि आदेशात्मक असुन चालत नाही त्याने भाषेचा मृत्यू ओढावण्याचा धोकाच अधिक असतो. मराठी सर्वनाम आणि क्रियापदे वापरते आनि भौगोलीक महाराष्ट्र आणि बृहन महाराष्ट्रात बोलली जाते ती सर्व मराठी अशी माझी मराठीची व्यापक व्याख्या असते. माझ्या मराठीच्या व्याख्येत मराठीच्या सर्व बोली आणि त्यांच्या सरमिसळीचा समावेश असतो.

इतर अनेक भाषांशी भाषिक देवाणघेवाण अनेक कारणांनी होते अशा प्रत्येक प्रकारच्या देवाण घेवाणीतून नवी बोली जन्माला येत असते. ती माझ्या भाषेची बोली म्हणून स्विकारणे मला भाग असते. माझ्या प्रदेशाची एकचतुर्थांश मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेतअ, त्यांची म्हणून एक स्वतंत्र बोलीही तयार होणार आहे हे कितीही कटू वाटले तरी सत्य मला स्विकारावे लागते.

जेव्हा केव्हा ते बघू इच्छितील तेव्हा त्यांच्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधीक मराठी शब्द उपलब्ध करणे हा एक नव्या काळातला उपाय आहे. हि उपलब्धता ऑनलाईन शब्दकोश आणि ऑनलाईन भाषांतर सुविधाच्या माध्यमातून दिली जाऊ शकते. इतर वेळी जिथे जिथे मराठी शब्द वापरले आहेत त्यांच्या पर्यायी शब्दाम्ची यादी लेखाखाली दुव्यातून उपलब्ध ठेवणे असे उपाय असू शकतील किंवा मनोरंजन आणि रंजक पणे मराठी शब्द रुळवता येतील. किंवा मिपा सॉफटवेअर अपडेटच्या माध्यमातून सॉफ्टवेअर मला पर्यायी शब्द सुचवू शकत असेल तर नको आहे असे नाही. किंवा मिपा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आठवड्यातून दोनचार रॅम्डम सजेशन दिली तरी चालू शकतील. न मागितलेले स्पॅमिंग नकरता हुशारीने सुयोय वेळी सुयोग्य पर्याय उपलब्ध ठेवण्याचे अनेक मार्ग असू शकतात.

पण कुणितरी सारखे सारखे टोकणे नकोसे होते हे प्रांजळपणे सांगावेसे वाटते. माझ्या लेखनाच्या अथवा विचार प्रक्रीयेत मला स्पॅम ईमेलसारखे मध्येमध्ये डोकावणारे मी स्वतः न मागितलेले अडथळे नकोसेच असतात. पुढे कधितरी अधिक सविस्तर पणे लिहिन

मनमोकळ्या चर्चेसाठी अनेक आभार

मराठी कथालेखक's picture

19 Jun 2018 - 7:05 pm | मराठी कथालेखक

पण कुणितरी सारखे सारखे टोकणे नकोसे होते हे प्रांजळपणे सांगावेसे वाटते.

मराठी शब्दांचा वापर सुचवणे हे टोकणे वाटत असेल तर काय म्हणणार !!

माझ्या लेखनाच्या अथवा विचार प्रक्रीयेत मला स्पॅम ईमेलसारखे मध्येमध्ये डोकावणारे मी स्वतः न मागितलेले अडथळे नकोसेच असतात.

एकूणातच धाग्यावर येणार्‍या प्रतिसादांवर कुणाचे नियंत्रण नसतेच. पण प्रत्येकाचे स्वातंत्र्य आणि ज्याची त्याची इच्छा. असो.

बाकी

१) रॅम्डम सजेशन

साठी धूनमधून सूचना आणि
२) डिक्शनरींकरीता शब्दकोष
हे शब्द सुचवण्याचे मी माझे स्वातंत्र्य उपभोगतो :)
धन्यवाद

उपयोजकांच्या यादी वाचली त्यातील periodic table म्हणजे अनुक्रमणिका हे तर माझ्या वाचण्यात कधीच आलं नाही. content म्हणजे अनुक्रमणिका ना ? periodic table ला बहुदा आवर्त-सारणी म्हणतात.

इतके पर्यायी मराठी शब्द शोधणं (इंग्रजी शब्दांना तसे त्या तसे accept करता त्यावर कल्हई करणं, कुछ जमा नाही ) आणि वापरणं काहीसं अतिरेकी वाटत. त्यामुळे भाषेच्या flowमधे (प्रवाही राहणं ) अडथळा येण्याचीही शक्यता आहे. ज्याला हवं त्यांनी करावं पण सर्वांसाठी
ते must नसावं

उपयोजक's picture

19 Jun 2018 - 9:21 pm | उपयोजक

उघडा डोळे बघा नीट (हघ्याहेवेसांनल)

ते अणूक्रमणिका आहे.

सप्तरंगी's picture

20 Jun 2018 - 4:34 am | सप्तरंगी

मी खरंच व्यवस्थित पहिले नसावं तोही शब्द मला माझ्या अभ्यासक्रमात गेला नाही. माझं मराठीबद्दलचं अज्ञानच असावं.

पण खरे डोळे तर तुमच्या प्रतिसादानेच उघडले हो. लोकांनी भाषेबरोबर किंवा त्याआधी मार्दवपण (politeness) शिकायला हवे हे परत जाणवले. असो.

रंगीला रतन's picture

20 Jun 2018 - 1:06 am | रंगीला रतन

१) “ संघमित्रा संध्याकाळी रोजच्यापेक्षा उशिरा दमून भागून कार्यालयातून घरी आली. खांद्यावरचे पोते काढून कोनाड्यात ठेवले आणि कर्णपिशाच्च किणकिणले. तातडीने काही अहवाल जलदपत्राद्वारे त्यांना पाठवण्याचा आदेश असलेला साहेबांचा संदेश आला होता. दिवसभर कार्यालयात मान मोडेपर्यंत काम केल्यानंतर खरंतर स्वतः पुरती कॉफी करून घेण्याचे त्राणही तिच्यात उरले नव्हते. पण कामाप्रती असलेल्या तिच्या श्रद्धेमुळे तिने मंडळाने दिलेला मांडीवरचा संगणक तिच्या कार्यालयात नेण्याच्या पोत्यातून बाहेर काढून उघडला आणि कळ दाबून सुरु केला. खिडक्यांच्या कार्यपट्टीवर विद्युतघटाची भार पातळी कमी असल्याचा संदेश पडद्यावर दिसत होता. म्हणून तिने पोत्यातून मांडीवरच्या संगणकाचा भारक काढून त्याच्या एका टोकाची त्रिकांडी भिंतीवरच्या विद्युतपुरवठा करणाऱ्या फलकावरच्या खोबणीला जोडून दुसऱ्या टोकाची कांडी मांडीवरच्या संगणकाच्या खोबणीशी जोडली आणि बिनतारी जोडणीसाठी उपलब्धता दर्शवणाऱ्या यादीतून तिच्या घरच्या मार्गकाचा सेवा संच अभिज्ञापक निवडून आंतरजालाशी संपर्क प्रस्थापित केला. जसा आंतरजालाशी संपर्क प्रस्थापित झाला तशी लगेच रोगजंतू प्रतिरोधक प्रणाली अद्ययावत होण्यास सुरवात झाली........”

२) “ रामू सुतार काल-परवा पर्यंत हामचा वापरात होता, पण शहरात शिकत असलेल्या त्याच्या मुलाने उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी परतताना त्याच्यासाठी विमचा आणला होता. विमचाने काम करताना हामचा पेक्षा कमी वेळ आणि कष्ट लागत असल्याने रामू खुश होता.....”

अशाप्रकारचा मजकूर असलेला लेख, कथा, कादंबरी लिहिणारा थोडे जास्तीचे कष्ट घेऊन लिहील, पण नवीन वाचक या शब्दांचे अर्थ एकीकडे नवीन शब्दकोश बघून समजून घेत घेत पुढचा मजकूर वाचण्याचे कष्ट घेईल का?
एवढा द्रविडी-प्राणायाम करण्यापेक्षा तो अशा लिखाणाकडे मग त्यातला आशय कितीही चांगला असला तरी पाठ फिरवण्याचीच शक्यता अधिक वाटते.
त्यामुळे अशा प्रकारचे लिखाण हे मास बेस्ड न राहता क्लास बेस्ड होण्याचीही शक्यता अधिक.
जाणकार यावर अधिक प्रकाश टाकतीलच. उपक्रमास शुभेच्छा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jun 2018 - 3:19 pm | ज्ञानोबाचे पैजार

+१
पैजारबुवा,

रंगीला रतन's picture

22 Jun 2018 - 4:08 pm | रंगीला रतन

:)

माहितगार's picture

20 Jun 2018 - 3:30 pm | माहितगार

+१००१
सहमत, मला जे माझ्या प्रतिसादातून एक्सप्लेन करणे नीटसे जमले नाही ते आपण चपखलपणे केलेत. अनेक आभार.

रंगीला रतन's picture

22 Jun 2018 - 4:08 pm | रंगीला रतन

:)

उपयोजक's picture

20 Jun 2018 - 6:33 pm | उपयोजक

तुम्ही धाग्यावरचे याआधीचे सर्व प्रतिसाद वाचले नसावेत असं वाटतंय.

नवीन शब्द सुचवताना हे खाली दिलेले निकष वापरावेत असं लिहिलंय की हो!

१) उच्चारायला सोपा+सुगम असा शब्द बनवता येतो का हे प्रयत्न करुन तर पाहूयात.
नाहीच जमलं तर,
२) इंग्लिश शब्दाचे मराठीकरण करु.
३) नवीन शब्दात जास्तीतजास्त ४ अक्षरे असावीत.
४) एकच अखंड शब्द असावा.शब्दांचे दोन गट नकोत.

मराठी शब्द म्हणजे बोजड,लांबलचक असेच असणार हा पूर्वग्रहच तर बदलायचाय.लांबीला कमी असणारे शब्द बनवण्यासाठी प्रयत्न करायचेत.

हे तुम्ही समजूनच घेतलं नाहीत.त्यामुळेच तुम्ही पहिल्या उतार्‍यात वापरलेले खांद्यावरचे पोते , कर्णपिशाच्च किणकिणले , मांडीवरचा संगणक, खिडक्यांच्या कार्यपट्टीवर विद्युतघटाची भार पातळी,
रोगजंतू प्रतिरोधक प्रणाली असे लांबूडके शब्द वापरलेत.जे लक्षात ठेवायला अवघड आहेत.हे नवीन शब्द सुचवणारे लोक असेच डोकं भंजाळणारे शब्द बनवणार आहेत या पूर्वग्रहातून हा पहिला उतारा लिहिला असावा की काय असे वाटून जाते.

पण दुसरा उतारा पहा(रामूचा) त्यात तुम्ही वर सुचवलेले नवे शब्द वापरलेत.त्यामुळे मजकूराची लांबी कमी झाली हा फायदाच झालाय.वर त्याचे अर्थही दिलेत.नव्या वाचकाला तेवढे अर्थ सांगितले की तो ही प्रश्न निकालात निघेल.त्यावरचा उपाय पुढे देतो आहे.

दुसरं असं की इंग्रजीत लिहिलेला मजकूर असलेला लेख, कथा, कादंबरी वाचणारा वाचक त्याला माहीत नसलेले शब्द वाचनात आले तर त्या शब्दांचे अर्थ शब्दकोशात बघून समजून घेत घेत पुढचा मजकूर वाचण्याचे कष्ट घेतो ना?

की कशाला एवढा द्रविडी-प्राणायाम असं म्हणून तो अशा लिखाणाकडे मग त्यातला आशय कितीही चांगला असला तरी पाठ फिरवतो?
अशा प्रकारचे इंग्रजी भाषेतले लिखाण हे मास बेस्ड न राहता क्लास बेस्ड होते का?

की इंग्रजी पैसा ही मिळवून देणारी,जागतिक दर्जाची भाषा,ती जितकी चांगली बोलता येईल तितका पैसा जास्त म्हणून हा शब्दकोशात अर्थ पाहण्याचा त्रास सोसला जातो? आणि मराठी काही इंग्रजी एवढा पैसा मिळवून द्यायला उपयोगाची नाही म्हणून मराठीसाठी एवढी तसदी घेण्याची गरज नाही. असं काही आहे का? तसं असेल तर मराठीबद्दलचा हा नकारात्मक विचार,अौदासीन्य मराठीचं नुकसान करणारंच म्हणावं लागेल.

आता तुमच्या या समस्येवरचा उपाय

नवे शब्द रुळेपर्यंत या नव्या शब्दाशेजारीच कंसात याअाधी मराठीत वापरात असलेला शब्द लिहायचा; म्हणजे शब्दकोश शोधणे,ते विशिष्ट पान शोधणे यात वेळ जाणार नाही.नंतर जसजसे हे शब्द रुळत जातील तसतसे कंसात आधी वापरात असलेले शब्द लिहिण्याची गरज पडणार नाही.

मिपावरचे कृहघ्याहेवेसांनल,हाकानाका,विदा,खखोदेजा,बशिवला टेंपोत,कायप्पा,तू नळी या शब्दांचे अर्थ काही नवीन मिपासदस्यांनाही माहित नसण्याची शक्यता आहे.मग असे मिपाप्रेमी या शब्दांचे अर्थ कळत नाहीत म्हणून मिपाच वाचायचं सोडून देतात का?

फक्त इच्छा हवी.मार्ग मिळतोच.अौदासीन्य नको असे वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jun 2018 - 8:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेखनात कॉफी हा फाऊल असलेला शब्द वापरल्याचा निषेढ ! :) ;) (हघ्या)

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Jun 2018 - 9:27 am | ज्ञानोबाचे पैजार

कॉफी साठी "करणामृत" असा शब्द सुचवतो.
पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jun 2018 - 8:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

जराशी गम्मत केली हो !

तसं केशविभाजन (हेअर स्प्लिटिंग) करायचं म्हटलं तर "चहा" या शब्दालाही प्रतिशब्द शोधावा लागेल. खूप काळ वापरात असल्याने आपला (आणि 'आपला आपलासा'ही) वाटणारा हा शब्द, मूळच्या चीनी असलेल्या चहाबरोबर त्याच्या "चा (茶, Chá)" या मूळ चिनी नावाबरोबर भारतात आला आहे. :)

गामा पैलवान's picture

22 Jun 2018 - 12:16 am | गामा पैलवान

ज्ञानोबाचे पैजार,

माझ्या मते कॉफीस कवा हा प्रतिशब्द आहे. हा अरबी पेय कहावा वरून आला असावा. मात्र वापरला जातो कॉफीसाठी.

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jun 2018 - 10:23 am | डॉ सुहास म्हात्रे

कॉफी मूळची इथिओपिया, सुदान व मादागास्करमधली. वसाहतवादी युरोपियनांनी तिचा इतर ठिकाणी प्रसार केला... सद्या सुमारे ७० देशांत तिचे उत्पादन केले जाते.

इथिओपियातिल काफ्फा (Kaffa) विभागावरून तिचे नाव पडले असावे असे म्हणतात. सर्वप्रथम तिचा ऑटोमान (तुर्कस्तान) साम्राज्यात कहवा (قهوة) या नावाने प्रसार झाला. अरबीतले काहवा हे तिचे नाव तेथूनच आले आहे. डच व्यापार्‍यांनी तिला कोफ्फी (koffie) या नावाने उचलले आणि तिचा जगप्रवास सुरू झाला. इंग्रजानी आपल्या भाषेत घेताना तिचे कॉफी (coffee) असे नामकरण केले.

मराठीत कॉफीला कवा असे म्हणतात हे माहीत नव्हते. अरबी-फारसीतून मराठीत येताना "काहवा"चा "कवा" असा अपभ्रंश झाला असावा.

गामा पैलवान's picture

22 Jun 2018 - 11:06 pm | गामा पैलवान

डॉक्टर सुहास म्हात्रे,

कहवा वरून कवा आला असावा असा माझाही अंदाज आहे. हा शब्द तरखडकरांच्या इंग्रजी शब्दकोशात वाचल्याचं स्मरतं. नक्की कुठला शब्दकोश ते आठवंत नाही. त्यात कॉफीच्या दाण्यांना बुंदकवा असाही प्रतिशब्द दिल्याचंही आठवतं.

आ.न.,
-गा.पै.

रंगीला रतन's picture

22 Jun 2018 - 4:11 pm | रंगीला रतन

अर्रर्रर्र तिच्या...हो कि. उत्तेजक काढा करून प्यायला असं काहीतरी पाहिजे होत :)

मराठी कथालेखक's picture

20 Jun 2018 - 7:23 pm | मराठी कथालेखक

प्रत्येक इंग्लिश शब्दाला अगदी एकच मराठी शब्द असायला हवा असे काही नाही. जर एका शब्दातून नेमका अर्थ व्यक्त करणे कठीण असेल तर ओढून ताणून लांबलचक शब्द न देता योग्य असा शब्दसमूह वापरता येईल.
एका भाषेत एका शब्दात जे सांगता येते ते दुसर्‍या भाषेत एकाच शब्दात सांगता येईल असे नाही.
जसे मराठीतील मामा साठी इंग्लिशमध्ये Maternal uncle असे दोन शब्द लागतात. कैरी या शब्दासाठी तर बहूधा दुसर्‍या कोणत्याच भाषेत 'एक' शब्द नसावा.

बाकी स्क्रू साठी मळसूत्र हा शब्द कसा आला ? तो आधीच प्रचलित आहे का ? तसे नसल्यास मला दुसरा शब्द सुचवायला आवडेल.

मराठी कथालेखक's picture

20 Jun 2018 - 7:33 pm | मराठी कथालेखक

मळसूत्र हा आधीच प्रचलित आहे असे दिसते. मग screw driver साठी मळसूत्र चालक ही रचना थोडी लांबलचक वाटते त्या ऐवजी मळसूत्रक कसे वाटेल ?

उपयोजक's picture

22 Jun 2018 - 12:58 am | उपयोजक

विजेवर चालणारा असेल तर विद्युत मळसूत्रचालक आणि हाताने वापरायचा असेल तर हाताचा मळसूत्रचालक होईल ना ते? केवढं लांबलचक.त्यापेक्षा हामचा,विमचा अधिक चांगलं.छोटंसं!

उपयोजक's picture

22 Jun 2018 - 1:00 am | उपयोजक

मळसूत्रचालक टंकले गेले.ते मळसूत्रक असे हवे.

मराठी कथालेखक's picture

27 Jun 2018 - 1:40 pm | मराठी कथालेखक

वीजेवर चालणारा विद्युत मळसूत्रक आणि हाताने वापरायचा असेल तर साधा /हाताचा मळसूत्रक असे होवू शकेल. हे मोठे वाटत असले तरी सुटसुटीत दोन शब्द आहेत. शिवाय मळसूत्र या आधीच काहीशा माहित असलेल्या शब्दाचा त्यांत उपयोग असल्याने जास्त योग्य वाटतो.
पण मुळात मळसूत्र या शब्दाचा वापर वाढणे गरजेचे आहे , नाही का ?

सर्व प्रतिसाद वाचले. कोणा एका प्रतिसादावरून नव्हे तर एकूण निरीक्षण असं झालं:

परभाषेतल्या रूढ शब्दांचा एकवेळ अपभ्रंश करू, मराठीत पाडलेला किंवा असलेला शब्द लांब आणि क्लिष्ट असल्यास त्याचे एकवेळ पूर्ण अर्थहीन भासणारे शॉर्टफॉर्म करू, मूळ परभाषेतल्या शब्दाच्या उच्चाराशी साम्य असलेला पण मराठीत अर्थ नसला तरी चालेल असा शब्द बनवू, हे सर्व पसरवू, रूढ करू.. हे सर्व मूळ मराठीत नसलेलं आलं तरी चालेल. ते उच्चाराबाबतीत मूळ परभाषीय शब्दाशी साम्य असलेलंही चालेल पण किंचित तरी काळी तीट लावून का होईना आम्ही थोडातरी दृश्य बदल करणार. तरच तो मराठी शब्द. तसे शब्द चालतील..

पण तो नतद्रष्ट परभाषेतला मूळ शब्द नको. भले तो तोंडात बसलेला का असेना. तो अन-लर्न करू.

यात मला मराठीप्रेमापेक्षा परभाषातिरस्कार किंवा परभाषा अस्पृश्यता जास्त दिसते आहे.

प्रचेतस's picture

22 Jun 2018 - 2:22 pm | प्रचेतस

गविशेठ, यु गो अहेड, हम तुम्हारे साथ है..

काय हे.. मी तीन चार जणांना मला समर्थन देण्यासाठी विनंती केली होती. एकाचाच रिप्लाय यावा?

कंपूबाजी सक्स. :-)

रंगीला रतन's picture

22 Jun 2018 - 4:12 pm | रंगीला रतन

हम भी है.

उपयोजक's picture

22 Jun 2018 - 3:54 pm | उपयोजक

पण तो नतद्रष्ट परभाषेतला मूळ शब्द नको. भले तो तोंडात बसलेला का असेना.

पण मी म्हणतो एवढे भारंभार परके शब्द स्वीकारायचा मक्ता मराठीनं कशाला घ्यावा?

अहो नवीन मराठी शब्द ही रुळतील की,तोंडात बसतील की.हाकानाका.

रंगीला रतन's picture

22 Jun 2018 - 4:18 pm | रंगीला रतन

अहो मालक तंत्रज्ञान रोज बदलतंय, कालचं आज कालबाह्य होतंय. त्यासाठी आमच एवढच म्हणणे आहे कि तांत्रिक किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित शब्द यातून वगळा.
उपक्रम चांगलं आहे पण तो सुरवातीला static शब्दांसाठीच मर्यादित राहणे चांगले, नाहीतर एवढेवेळा शब्दकोश अद्ययावत करणे जिकीरीचे होऊन जाईल.

उपयोजक's picture

22 Jun 2018 - 9:05 pm | उपयोजक

तंत्रज्ञान बदलू द्या दिवसाला.काही अडचण येणार नाही.फक्त ते मराठीबद्दलचं अौदासीन्य नको.ते नसलं की सगळं जमेल.शिवाय लगेच शब्दकोश बनवायला बसायचं नाहीचयं.शब्द वापरात आणणं महत्वाचं.मग शब्दकोश बनो की न बनो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2018 - 4:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्ताच सर्व प्रतिसाद वाचले. आपल्या प्रतिसादाशी सहमत आहे. आपली मतं नेहमीच वेगळी, रोचक आणि बुद्धीला चालना देणारी असतात. पण आता पेनड्राइव्हला मराठी शब्द कसा तयार करावा ? काही कल्पना, खेळ करूयात का काही इंग्रजी शब्दांचे ?

''लहानविदासाठवणजोडणीपेटी'' असा शब्द तयार करावा, जेणेकरून त्यात काय अर्थ दडला आहे, त्याचा बोध व्हावा असे वाटते.

-दिलीप बिरुटे

खटपट्या's picture

22 Jun 2018 - 4:36 pm | खटपट्या

टंकायला खूप वेळ लागेल. थोडा लहान शब्द सुचवा सर.
''लघुविदापेटी'' कसा वाटतोय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jun 2018 - 8:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शब्द चांगला आणि जमलाआहे.

-दिलीप बिरुटे

मराठी कथालेखक's picture

27 Jun 2018 - 2:50 pm | मराठी कथालेखक

सामान्यत: कोणत्याही उत्पादनासोबत येणारी माहिती पुस्तिका (युजर मॅन्युअल) फक्त इंग्लिशमध्ये असते. मला प्रश्न पडतो या कंपन्यांना आपले उप्तादन फक्त इंग्लिश येणार्‍या ग्राहकांनाच विकायचे आहे काय ? की इग्लिश न येणार्‍याबाबत "बघतील ते त्यांचं.." अशी उत्पादकाची बेफिकीर वृत्ती असते ? अगदी स्वस्त अशा मिक्सर पासून टिव्ही, फ्रीज, वॉशिंगमशीन ते कार पर्यंत सगळ्याच उत्पादन व उत्पादकांची हीच कथा (अपवाद वगळून). फार काय अनेकदा एखाद्या पाककृतीत वापरला जाणार्‍या वा पुर्ण पाककृतीच ज्यावर बेतलेली आहे अशा एखाद्या पदार्थाच्या वेष्टनावर पाककृती लिहिलेली असते ती केवळ इंग्लिशमधूनच ..म्हणजे इंग्लिश न येणार्‍यांनी असा पदार्थ घेवू नये !! अगदी अस्सल देशी म्हणवणार्‍या कंपन्याही बहुसंख्येनं हेच करताना दिसतात.
ग्राहक संरक्षण कायद्यात सुधारणा करुन इंग्लिशसोबतच स्थानिक भाषेतील पुस्तिका , सुचना देणे बंधनकारक केले पाहिजे.

उपयोजक's picture

27 Jun 2018 - 9:04 pm | उपयोजक

सहमत

उपयोजक's picture

28 Jun 2018 - 8:24 am | उपयोजक

*नवीन आवक*

डिस्प्ले = दर्शक
डिस्प्ले पिक्चर = दचि ~ दर्शनचित्र.
Strategy व्यवसाय विषयी - धोरण
Strategy वैद्यकीय संदर्भाने - उपचार
brand ambassador = मोहरा
स्टॅमिना = चिवटपणा
टेस्टबड = रसांकूर
अपग्रेड = दर्जावर्धन
कॉनकॉल = सांतरसभा ~ अंतरासहित घेतलेली सभा
व्हायरल= फैलावणे
पेस्ट - वाटण
डिटर्जंट - निर्मलक
ब्रेनस्टॉर्मिंग = मनावर्त

श्वेता२४'s picture

18 Jul 2018 - 3:23 pm | श्वेता२४

brand ambassador - मुद्रा दूत

निनाद's picture

16 Jul 2018 - 4:14 am | निनाद

नवीन पर्यायवाचक शब्दांचे सर्जन व्हावे. त्यात वावगे काही नाही!

ते शब्द वापरले जातील की नाही हे वापरकर्ते ठरवतील.

पण नवीन इंग्रजी पर्यायी मराठी शब्द येऊच नयेत हा विचार चुकीचा आहे.

निनाद's picture

16 Jul 2018 - 4:18 am | निनाद

ब्रेनस्टोर्मिंग साठी मनावर्त हा खूपच छान पर्याय. धन्यवाद!
अजून काही पर्याय पण असू शकेल का

निनाद's picture

16 Jul 2018 - 7:28 am | निनाद

विमर्श हा शब्द Brainstorming साठीच आहे ना?

गामा पैलवान's picture

18 Jul 2018 - 9:23 pm | गामा पैलवान

ब्रेनस्टॉर्मिंग साठी भिरभिरभेजा कसाय? भिरभिरभेजा लाव जरा. भिरभिरभेजा करूया. भिरभिरभेजाची पैदास, हाये लई झक्कास. वगैरे, वगैरे.

-गा.पै.