मित्र

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
30 May 2018 - 1:48 pm

मित्र
तो रिटायर्ड झाला अन त्याला सोशल नेटवर्क आवडु लागले
कथा कविता..काही अनुभव तो लिहितं असे..
फेसबुक वरच्या पोस्टा वाचत होता..अन तेव्हढ्यात "तो" आला
हॅलो..तो म्हणाला.
तू??
हो मी च ....ओळखले का मला?
अरे मित्रा तुला कोण विसरणार? ऍट्याक आला होता.. आय सी यू त ऍडमिट असताना कायम माझ्या भोवती तू उभा असायचास..खास मित्र आहेस तू.
आता काय विशेष?..तो म्हणाला...
काही नाही..चला आमच्या बरोबर..वेळ भरली आपली...
कुठे नेतोस बाबा ?? त्याने विचारले
आमच्या नेहमीच्या जागी -- चला आवरा पटापट वेळ कमी आहे मित्र म्हणाला
तू कायम घाईत असतो-थांब ना...एक कथा अर्धवट राहिली ती पुरी करतो...मग निघूच..
छे रे...तसं नाही जमणार....
एक सुंदर कविता एकाने लिहिली आहे तिला लाईकतो...
नको ..मी वेळ चुकवू शकत नाही...ठरलेली..असे म्हणत त्याने त्याला हाताला धरुन ओढले...
त्याच्या हातातला माऊस निसटला..डोके दणकणं कॉम्प्युटर च्या टेबलावर आदळले..
............
४ च्या सुमारास तिने चहा केला अन तिथूनच सांगितले.."चहा तयार आहे..येताय ना हॉल मध्ये?
त्याचा काहीच प्रतिसाद न आल्याने ती त्याच्या खोलीत गेली...
टेबलावर डोके टेकवून तो बसला होता..
तिने त्याला हालवतं म्हटले...उठा अन हे काय ?ही काय झोपायची जागा का आहे?
चहा तयार झालाय..
तो काहीच बोलेना पाहताच तिने त्याला खुर्ची वर बसत केल अन त्याची पाठ खुर्चीला लागली अन डोके निर्जीव पणे डावी कडे झुकले..
काहीतरी अघटित असल्याची शंका मनाला आली अन तिने आकांताने टाहो फोडला...
सोसायटीतले शेजारी पाजारी जमले ..
त्यात एक वयस्कर डॉक्टर होते त्यांनी तपासले अन मान हालवतं सांगितले.."खेळ संपला"
पुरुष मंडळींनी बॉडी जमिनीवर ठेवली..
जाणते अनुभवी लोक पुढच्या तयारीला लागले...
सुन्न पणे ती सारे बघत होती..
....................
फेसबुक वरचे एक अकाउंट पोरके झाले

कथा

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

31 May 2018 - 11:08 am | संजय पाटिल

'माणूस' ते 'बॉडी'

पद्मावति's picture

31 May 2018 - 1:55 pm | पद्मावति

'माणूस' ते 'बॉडी'

खरंय :(
कथा आवडली.

प्रचेतस's picture

1 Jun 2018 - 3:10 pm | प्रचेतस

कथा खरंच आवडली.
अकुकाका कधीकधीच चांगली जिलबी पाडून जातात.

किसन शिंदे's picture

2 Jun 2018 - 12:03 am | किसन शिंदे

कथा आवडली.