बंद पडलेल्या मालीका

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
30 May 2018 - 9:54 am
गाभा: 

आज टी व्हीवर अनेक मालीका येतात.
काही मालीका रोजचा रतीब घालत दळण दळत असतात, काही सम्पतात.
मात्र योग्य रितीने शेवट करून संपलेल्या मालीका फारच थोड्या दिसतात.
उदा " अग्नीहोत्र, रात्रीस खेळ चाले ( सध्या तरी या दोनच आठवतेय). एक शून्य शून्य,
बाकी बहुतेक मालीका या कधी बंद होतात तेच कळत नाही आणि त्या लगेच विस्मरणातही जातात.
कळत नकळत , आभाळमाया , माझे पती सौभाग्यवती ( याच्या इतकी भीषण मालीका झाली नाही)
हिंदीतही फार काही फरक नाही.
चम्द्रकांता ही मालीका कधी संपली आणि ती किती दिवस चालली होती हे निर्मात्यालाही आठवत नसेल

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 May 2018 - 10:47 am | माईसाहेब कुरसूंदीकर

योग्य बोललास रे विजू. गाव गाता गजाली.. जरा बरी मालिका होती.. ती पण संपली बहुतेक. तुमच्या आय.टी.च्या भाषेत सांगायचे तर-
आज अनेक स्टार्ट-अप्स येतात..
काही स्टार्ट-अप्स रोजचा ई-कॉमर्सचा रतीब घालत दळण दळत असतात, काही सम्पतात.
मात्र योग्य रितीने शेवट करून संपलेल्या स्टार्ट-अप्स फारच थोड्या दिसतात.
उदा " फ्लिप-कार्ट, जबाँग्,मिंत्रा,रेड-बस
बाकी बहुतेक स्टार्ट-अप्स या कधी बंद होतात तेच कळत नाही आणि त्या लगेच विस्मरणातही जातात.
ईन्क्स-एज्,शोपो, टास्क-बॉब( याच्या इतकी भीषण स्टार्ट-अप्स झाली नाही)
अमेरिकेतही फार काही फरक नाही.
ए-ओएल ही कंपनी कधी संपली आणि ती किती दिवस चालली होती हे सी.ई.ओ.लाही आठवत नसेल

विजुभाऊ's picture

31 May 2018 - 3:57 pm | विजुभाऊ

मायडे ! तू ना कोणता विषय कुठे मिसळशील ते सांगता येत नाही.
सुरूवर ( स्टार्ट अप ) कुंपण्या वेगळ्या आणि मालीका वेगळ्या.
सुरूवर कुंपण्या त्यांच्या वेळ बरा जावा म्हणून येतात. मालीका आपल्याला वेळ बरा जावा म्हणून येतात.
ती कोणतीतरी एक मालीका होती त्यात ती पोटुशी असलेली बाळंतीण बरेच महिना तशीच अडकली होती. सुटली का ग ती त्यातून काही कळालेच नाही.
बाकी ती कोणतीतरी " कोन मी व्हय" असलेली मालीका, तो राणा , त्याची भावजय. ती दुसर्‍या नवर्‍याची बायको वगैरेत काय चालते पहावत नाही गं.
तुझा चष्मा फुटला असेल तर नवा करायचा खर्च करू नको. आवर्जून पहावे अस्से काही नसते त्यात.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

31 May 2018 - 5:54 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

विजू, स्टार्ट-अप असो वा मालिका, दोघांचेही ग्राहक आपणच असतो. असो.
गाव गाता गजाली पण संपली. ती पल्लवी जोशीची भूतछाप मालिका होती... सुरूवातीला बरी वाटली होती. "माझ्या नवर्याची बायको' करमणूक प्रधान मालिका.. जरा बरी आहे..
जे काही नशिबाने(चॅनेल्सनी) दिले आहे त्यातले जे बरे वाटते ते बघायचे.. नाहीतर तू-नळी/बी.बी.सी./सी.एन.एन. आहेच असे ह्यांचे मत.

रात्रीस खेळ चाले व्यवस्थीत संपली?

बाकी चालू द्या.

कपिलमुनी's picture

1 Jun 2018 - 1:20 am | कपिलमुनी

क्वांटीको पण बंद पडली म्हणे ! नवीन सीझन साठी रीन्यू केले नाही